आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या खेळपट्टीवर ट्र्यू बाऊन्स असेल तिथे सॅमसंगचा टायमिंग सातवे आसमान पे असतो.
पण उद्या एखाद्या पिचवर बॉल किंचित थांबून यायला लागला तर सॅमसनला काय कसे ॲडजस्ट करावे हे कळणार नाही.
ईथे तो मार खातो.

मॉरीस नुकताच आला होता. आधी त्याचा एक बॉल कनेक्ट्सुद्धा झाला नव्हता. सॅमसनची ४ मारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त होती. त्याच निर्णय बरोबर होता.
काल अक्षरदीपने सुद्धा छान बोलिंग केली.
काल गावस्करांनी भारतीय खेळाडू कॉल न केल्यामुळे उंच कॅच दोघे मिळून सोडतात, त्यांना युवा असताना चांगले कोचिंग मिळत नाही अशी टीका केली. त्याआधी बटल्रर आणि स्टोक्स जोडीने तसाच कॅच सोडला होता ते विसरले. कॉल करणे ही साधी गोष्ट आहे. कोचने घडवून आणलीच पाहिजे.
काही कारणामुळे कोविद नंतर कॅचिंगची पुरती वाट लागली आहे. प्रत्येक मॅच मधे ४-५ गोळे सुटतात. अगदी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या आपल्या सिरीज मधे हेच दिसून आले.

कालची मॅच मस्तच झाली!
राहुल, गेल, हुडा भारी खेळले पण ते खेळतानाच असे दिसत होते की विकेट राखल्यातर राजस्थानच्या आवक्याबाहेरचे लक्ष नाहीये.... अगदी २००पेक्षा जास्त स्कोअर झाला तरी!
चेतन संकरियाने इंप्रेस केले.... निकोलस पूरन चा झेल पण भारी घेतला गड्याने!
पहील्या दोन विकेट पडल्यावर पण जिद्दीने खेळले राजस्थान..... रियान पराग जरा अजुन टिकला असता तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलीच नसती
सॅमसन कम्माल खेळला..... जरी एकदोन झेल सुटले तरी he made most out of it!
19 व्या ओव्हरच्या सुरुवातीला सॅमसनकडे स्ट्राईक आला असता तरी जिंकू शकले असते..... तिवेटीया हिट ॲंड मिस टाईप्स आहे.... त्याच्या भरवश्यावर फार रहाण्यात अर्थ नाही.
मॉरीसने २-४ बॉल ज्या पद्धतीने खेळले ते बघत सॅमसनने शेवटच्या ओव्हरमध्ये ती सिंगल घेतली नाही ते पण योग्यच होते.
अर्शदीपने शेवटची ओव्हर आणि एकूणच बॉलींग चांगली केली.

मजा आली बघायला मॅच!

"तिवेटीया हिट ॲंड मिस टाईप्स आहे" - टोटली अ‍ॅग्रीड!! दोन परफॉर्मन्सेस च्या जीवावर त्याच्यावर अजून तरी अवलंबून रहावं अशी परिस्थिती नाहीये. डोमेस्टीक मधे सुद्धा असं काही खास मैदान गाजवून नाहीये तो. राजस्थान मोमेंटम कितपत राखतंय ते पहायला हवं, नाहीतर नेहेमीप्रमाणे हाच त्यांचा टूर्नामेंटमधला बेस्ट परफॉर्मन्स ठरायचा Sad

आज केकेआर वि. मुंबई! केकेआर ने पूर्णपणे स्पिनर्स ने सुरूवात केलीये. इंटरेस्टींग स्ट्रॅटेजी! डी-कॉक तर गेलाय. रोहित कसा प्रति-आक्रमण करतो ते बघायचंय. आत्तापर्यंत तरी तो बलरामाच्या (नांगर टाकून) भुमिकेत आहे आणी सुर्यकुमार आक्रमक खेळतोय.

"तिवेटीया हिट ॲंड मिस टाईप्स आहे" - टोटली अ‍ॅग्रीड!! >> मॉरिस ला त्याच्या जागी पाठवायला हवे होते. मॉरीस ला थोडा वेळ मिळाला असता नि मॉरीस ऑन एनी डे तेवाटीया पेक्षा चांगला हिटर आहे.

भाऊ, सॅमसन बद्दल कळले नाही काय म्हणालात ते. तो मागचे २-३ सामने खेळला भारतासाठी ते फक्त बॅट्समन म्हणून खेळला होता.

पोलार्ड ५ नंबर वर आला तर त्याला थोडा वेळ मिळेल आणि हार्दिक आल्या आल्या मोठे फटके खेळु शकतो...
रोहित ला शेवटपर्यंत टिकून खेळायचं होत पण तो मोठे फटके खेळलाच नाहीये.
जेन्सन ऐवजी निशम ला
कुणाल ऐवजी जयंत किंवा अनुकूल...

चेन्नईला सामने आहेत त्यात टॉसही हरत आहेत त्यामुळे मुंबईची अशी स्थिती आहे आणि लोकं दोष काढत आहेत.
पुढे ईतरत्र खेळताना अचानक हीच टीम पुन्हा चॅम्पियन वाटू लागेल.
तोपर्यंत फार डॅमेज होऊ नये हे बघावे लागेल कारण पुढेही काही आठात आठ जिंकतील असे होणार नाही.
पियुष चावलाला घेतला आहे स्क्वाडमध्ये तर हिच योग्य वेळ होती त्याला वापरायची. एक वेगवान कमी करून पांड्याचे स्लो वेरीएशन ईथे चालले असते.
रोहीत सुर्या आज चांगले खेळत होते. एकाने शेवटपर्यंत राहणे गरजेचे होते या पिचवर. १५२ चे १६५-१७० झाले असते तरी त्या १५ धावांनी फरक पाडला असता आणि एक्स्ट्रा स्पिनर असता तर वेगळाच सामना असता.
सध्या स्कोअर ११.४ ओवर ९५-२ आहे.. बघूया कुठवर लढते मुंबई

शर्मा बॉलिंगला आला, चावला आत बसून बघतोय Happy
पाचवी विकेट आली, ४ राहुल चहर १ कृणाल पांड्या, चहरचा स्पेल संपलाय.. कृणाल पांड्याचे अजून १० चेंडू शिल्लक आहेत. बुमराहचे १२.. कलकत्याला हवेत २८ बोल ३१ Happy

रसेलला दोन जीवदान दिले
तो ४ बॉल ० ला अडकला असताना बुमराह नो बॉल टाकून फ्रि हिटचा फोर देऊन त्याला सोडवतो
मुंबई हरायचा पुर्ण प्रयत्न करतेय तरी... पण कलकत्यालाही सहज जिंकायचे नाहीये Happy

रोहित शर्माकडे कप्तान पदाचे गुण जरा म्हणून नाहीत.
बुमराने नो बॉल टाकला. झेल सोडला.
याने शिव्या दिल्या नाहीत. साधं रागाने बघितलं नाही. वर बघून रडका चेहरा केला.
दुसरा कोणी असता तर बुमराची पॅन्ट उतरवली असती भर मैदानात.

बुमराने नो बॉल टाकला. झेल सोडला.
याने शिव्या दिल्या नाहीत. साधं रागाने बघितलं नाही. वर बघून रडका चेहरा केला.>>> म्हणूनच ती मॅच विनिंग 19 वी ओव्हर आली. कोहलीने शर्माकडे क्लास लावावा.

मुंबई जिकंली... कोलकाता कडुन हरू नये ही अपेक्षा पुन्हा पुर्ण...
अटीतटीच्या सामन्यात रोहितचं नेतृत्व बहरतं... हो आणि आज परत निराश नाही केलं...

काहीच्या काही खेळले कलकत्ता आज. नितिश राणा चा शॉट अनावश्यक होता चहरच्या स्पेलच्या शेवटच्या बॉल वर. मुंबई त्यानंतर डोक्यावर चढून बसले लगेच. पोलार्ड नि हार्दिक कधी अ‍ॅडजस्ट करणार स्लो पिचला देव जाणे.

फेसबूकवर तासाभरापूर्वी ९० टक्के जनता शर्मा आणि मुंबई ईंडियन्सवर टिका करत होते,
आता त्यातले निम्मे पुन्हा मुंबई आणि शर्माचे गुणगान गाऊ लागलेत तर निम्मे अंबानी सामने फिक्स करतो म्हणून गळे काढत आहेत Happy

मुंबई जिंकली नाही - कोलकता मॅच हारली. ३१ बॉल्स मधे ३१ रन्स आणि ७ विकेट्स हातात असताना इतकी अटीतटीची मॅच व्हायलाच नको होती. कोण जिंकलं किंवा हारलं ह्यापेक्षा केकेआर वाईट क्रिकेट खेळले हे खरं.

बाकी गेल्या तीन दिवसात पहिली बॅटींग करणारी टीम जिंकली आहे #७:३०वाजता_मॅचसुरूझाल्यामुळे_पहिलीबॅटींगकरणार्याटीमसाठीअवघडजातं इति महामहिम धोनी Happy

गेल्या तीन दिवसात पहिली बॅटींग करणारी टीम जिंकली आहे #७:३०वाजता_मॅचसुरूझाल्यामुळे_पहिलीबॅटींगकरणार्याटीमसाठीअवघडजातं इति महामहिम धोनी Happy
>>>>>

यात तथ्यही आहे. स्पेशली मुंबईतील सामन्यांना ते जाणवले. रिझल्ट पहिली बॅटींग करणारे जिंकले म्हणून हे खोटे होत नाही.

बाकी माही ची स्पेलिंग चुकलीय Happy

Submitted by भरत. on 13 April, 2021 - 23:18 >>>> Lol

भारी जिंकले मुंबई. यादवने एकदम कडक शॉट्स मारले !

मला नाही ब्वा मुंबईतल्या मॅच ला काही जाणवलं. काल पंजाब मुंबईतच जिंकले. मॅच हारल्यावर असले नॉनसेन्स एक्स्क्युजेस धोनी नेहेमीच देतो. अजून ती च सवय कायम असल्याचं मात्र जाणवलं Happy

तसंच धोनी जाहिरातदारांसाठी वगैरे खेळतोय असंही नाही वाटत. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण हेच खरं. Happy

Pages