आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी चा क्रिकेटींग सेन्स वगैरे मान्य करूनही
>>>>>>>

हे तुम्ही मान्य करता मग प्रश्नच मिटला Happy
आणि प्रत्येक गोष्ट नाही तर बॉलिंग चेंजेसचे श्रेय देतोय त्याला. यात जे दिपक चहरचे स्वत:चे श्रेय आहे ते उघड्या डोळ्यांनी सर्वांना दिसतेच. पण धोनी कसे प्लेअर घडवतो हे असे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणून नमूद केले ईतकेच.
तरी कधी दिपक चहरलाच विचारा त्याच्या जडणघडणीत धोनीचा वाटा किती.. उत्तर मिळून जाईल Happy

आणि हो, मी सामना कामात असल्याने अधूनमधून पाहिला. पण पहिल्या दोन ओवरमध्येच विकेट टू विकेट फुलर लेण्थ गोलंदाजी चहरच नाही तर सॅम करनचीही दिसली तिथे लक्षात आले की सुरुवातील गोलंदाजांना जी मदत आहे तिचा पूरेपूर फायदा उठवायचे ठरवूनच आलेत. आक्रमकता म्हणजे कर्णधाराने चेकाळत उड्या मारणे ईतकेच नाही. शांतपणे धोनीने पंजाबची वरची फळी कापून काढली. अन्यथा नंतर गोलंदाज नव्हते त्याच्यकडे..

राहिला प्रश्न आधीच्या सामन्यात याच गोलंदाजांनी फटके खाल्ले होते तर याचे उत्तर आपणच दिले आहे. मैदानात प्रत्येक गोष्ट धोनी घडवून आणू शकत नाही. काल सुद्धा वर विकेट आल्या नसत्या तर मागे फटकेच खाल्ले असते. गोलंदाजीत दम नाही फारसा चेन्नईच्या. आणि जिथे सॅमसनच्या शतकाच्या मॅचला आपण पाहिले की २२० सुद्धा चेस होऊ शकतात तश्या खेळपट्टीवर चेन्नईच्या पेस नसल्याल्या गोलंदाजीकडून अपेक्षा तरी किती करणार होतो. खाल्ले होते फटके ईटस ओके.

कालची मॅच बघितल्यावर आणि गेल्या सीझनच्याही काही मॅचेसवरुन मला साधारणतः काही शक्यता वाटतात
१: जशी चर्चा आहे तसे धोनीला त्याच्या/इतरांच्या व्यावसायिक बाजू सांभाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध आयपीएल खेळावे लागत आहे पण बॅटींग वगळता त्याचा मैदानावरचा वावर नेहमीसारखाच आहे; त्यामुळे अगदीच त्याच्या मनाविरुद्ध वगैरे वाटत नाही.
२: धोनीला खेळायचे आहे; तो मॅच-फीट पण आहे पण त्याची बॅटींग गंडलेली आहे आणि ते त्याला expose rather highlight होऊन द्यायचे नाहिये म्हणून त्याला स्वताला बॅटींग प्रॅक्टिसची गरज असताना आणि काल संधी असतानाही त्याने सॅम करनला आधी पाठवले.

धोनीला काय करायचेच हे आपण ठरवण्यात काही अर्थ नाही किंवा ठरवून काही फायदाही नाही.
पण धोनीची खेळाडू म्हणून जर ही शेवटची आयपीएल असेल तर एक चाहता म्हणून या आयपीएल मध्ये CSK जिथवरही पोहोचेल त्यात धोनीचा फक्त कॅप्टन म्हणूनच नाही तर विकेटकिपर आणि फिनिशर म्हणूनही मोठा वाटा असावा असे वाटते Happy

93-3.
*चेन्नई च्या पीचवर १५० विनिंग स्कोअर ठरू शकतो.* - मधयंतरात तर खात्री देवून गंभीर हेंच म्हणाला ! बघूं.

राहिला प्रश्न आधीच्या सामन्यात याच गोलंदाजांनी फटके खाल्ले होते तर याचे उत्तर आपणच दिले आहे. मैदानात प्रत्येक गोष्ट धोनी घडवून आणू शकत नाही. काल सुद्धा वर विकेट आल्या नसत्या तर मागे फटकेच खाल्ले असते. >> चहर ला धोनी सपोर्ट केलय ह्याबद्दल हा वाद नाहीये तर धोनी मैदानात असताना होणार्‍या प्रत्येक गोष्टीचे श्रेय प्रथम धोनीला देण्याबद्दल आहे हे समजून घे आधी नि सबगोलांकार पोस्ट लिहून मुद्दा टाळू नकोस.

हैद्राबादच्या त्या सपोर्टर मुलीचे केव्हढे मीम्स फिरतायेत राव. कुठून कुठून शोधून काढतात.

132-7 !

132-7 !

134-8 ! 20व्या षटकात 15 धांवा पण 135-9 !!!
जिंकली मुंबै!!!!!

हैद्राबादच्या त्या सपोर्टर मुलीचे केव्हढे मीम्स फिरतायेत राव. कुठून कुठून शोधून काढतात.
>>> ओनर आहे ती.. काव्या...

हैद्राबादचा जुनाच प्रॉब्लेम अत्यंत ठिसूळ मिडल- लोअर मिडल ऑर्डर!
त्यातून चेन्नईचे पीच
विल्यमसन इंज्युअर्ड आहे म्हणे.

बोल्टने कांडके मस्त काढले शेवटी!

सलग तिसऱ्या सामन्यात कर्णधार रनआउट झाला आणि तो संघ हारला!

धोनी मैदानात असताना होणार्‍या प्रत्येक गोष्टीचे श्रेय प्रथम धोनीला देण्याबद्दल आहे हे समजून घे आधी नि सबगोलांकार पोस्ट लिहून मुद्दा टाळू नकोस.
>>>>>>

सर्व प्रथम तुम्ही प्रथम हा शब्द काढून टाका Happy
प्रथम श्रेय त्या गोलंदाजाचेच आहे हे तर शंभरातल्या शंभर जणांनाही कळतेच. तेच मी ईथे बोलण्यात काय अर्थ आहे. जे चटकन कळत नाही एखाद्याला तेच तर वेचण्यात मजा असते Happy

सलग तिसऱ्या सामन्यात कर्णधार रनआउट झाला आणि तो संघ हारला!
>>>>
आणि याची सुरुवतच शर्माने पहिल्या सामन्यात केली होती Happy

तीन पैकी दोन जिंकले तरी आणि स्लो पिच आहे मान्य केले तरी तिन्ही सामन्यात मुंबई ची बॅटिंग वेल बिलो पार होती

विल्यमसन आला की मिडल ऑर्डर भरीव होईल हैद्राबाद ची. बहुदा पुढच्या आठवड्यात येईल तो. भुवनेश चा इंग्लंड सिरीज नंतर गेलेला फॉर्म पण हैद्राबाद साठी काळजीचं कारण आहे.

प्रथम श्रेय त्या गोलंदाजाचेच आहे हे तर शंभरातल्या शंभर जणांनाही कळतेच. तेच मी ईथे बोलण्यात काय अर्थ आहे. जे चटकन कळत नाही एखाद्याला तेच तर वेचण्यात मजा असते >> मला शब्द काढायला सांगण्यापेक्षा तू लिहिणे अधिक योग्य ठरत नाही का ? मूलात तुला ते कळते का हे तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसे कळणार ?

विल्यमसन आला की मिडल ऑर्डर भरीव होईल हैद्राबाद ची. >> +१. तरीही आज शंकर बराच रीस्पॉन्सिबिलिटी ने खेळत होता. बुमरा नि बोल्ट च्या दोन ओव्हर्सी नी पार हवाच काढली. पांड्याचा तो वॉर्नरला बाद करायचा प्रयत्न करत नव्हता ह्या प्रामाणिकपणाचे कौतुक करायचे कि धावबाद करायचा प्रयत्न का करत नव्हता ह्याबदाल कान उपटायचे ? Happy ह्या पिचवर नंतर धावा काढणे अशक्य होत जाते नि पिचच्या मागे धावा काढणे सोपे होईल हे लिसा स्थळेकरचे बोलणे पटले. मुंबई कडे मागे हुकुमी धाव काधू शकेल असे दोघेच आहेत - स्काय नि डीकॉक. त्यातल्या एकाला खाली आणून पेसचा वापर करून खेळणार्‍या पैकी एकाला - हार्दिक किंवा किशन ला वर ढकलून बघतील की दर वेळी दीडशे डिफेंड करत बसायचे चॅलेंज घेतील ?

मला शब्द काढायला सांगण्यापेक्षा तू लिहिणे अधिक योग्य ठरत नाही का ?
>>>>

काय लिहिणे अपेक्षित होते? ओके कळलं..
चहरच्या गोलंदाजीचे श्रेय एकट्या धोनीचे नसून त्याचे स्वत:चेही आहे बाबा.
घ्या लिहिले. वाद मिटला. चहरची सुद्धा माफी मागतो Happy

तरीही आज शंकर बराच रीस्पॉन्सिबिलिटी ने खेळत होता
>>>>
धोनी स्टाईलने खेळत होता. प्रमुख गोलंदाजांना ईज्जत द्या, सामना डीप न्या आणि एखादा कृणाल पाण्ड्या पट्ट्यात घ्या. तिथवर बरोबर खेळला होता. अगदी बुमराहला २-२ धावांचे एकदोन फटकेही योग्य मारले होते. पण शेवटी समोरून फटकेबाजी न झाल्याने त्याच्या स्वत:च्या मर्यादा आड आल्या.

कमिन्स मस्त सावलीत उभा आहे फिल्डिंगला. उन्हात खेळताना सगळ्या खेळाडूंवर सावली येईल अशी काहीतरी सिस्टीम पाहिजे.

हैद्राबादचा जुनाच प्रॉब्लेम अत्यंत ठिसूळ मिडल- लोअर मिडल ऑर्डर!>>>>> खरे म्हणजे मनीष पांडे नी जवाबदारी घ्यायला हवी आता, तो इंनिंग नीट पेस करतच नाही. विजय शंकर पण सामना जिंकवून देत नाही. हैद्राबाद पुढील auction मध्ये या दोघांनाही release करेल असे वाटते

Pages