आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मॅचनंतर चहरने राणा आणि गिलची विकेट कशी काढली त्यातल गुपीत सांगितल. तो म्हणाला मी गिलला नीट ओळखतो. तो सतत ६ मारू शकत नाही तरी पण प्रयत्न करेल हे मला माहित होत. म्हणून एक ६ मारल्यावर मी तसाच बॉल टाकला व तो फसला.
तसेच माझा शेवटचा बॉल असल्याने राणा चान्स घेइल अस वाटल म्हणून फास्ट फ्लिप्पर टाकला. Happy
रोहितभैय्या खूप कॉन्फिडन्स देतो आणि मुंबई इंडियन्स ऑफ सीझन मधेही आमची खूप काळजी घेते. -मुंबई इंडियन्स कडून खेळण्याचे फायदे, हे त्याच वक्तव्य खूप काही सांगून जातं.
- काल कृणालनेही खूप चांगली बोलिंग टाकली. ४ षटकात १३ रन.
- चेन्नाई च्या विकेटवर शेवटच्या पाच षटकात कस खेळायच याची नीट स्ट्रॅटेजी आखायला पाहिजे. टीम बदलायची काही जरूर नाही.

>>मुंबई जिंकली नाही - कोलकता मॅच हारली. ३१ बॉल्स मधे ३१ रन्स आणि ७ विकेट्स हातात असताना इतकी अटीतटीची मॅच व्हायलाच नको होती. कोण जिंकलं किंवा हारलं ह्यापेक्षा केकेआर वाईट क्रिकेट खेळले हे खरं.

अगदीच!
स्लॉगिंग वर फारच भरवसा ठेवला..... मुंबईच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये बुमराहच्या दोन असतात हे लक्षात घेऊन समोरच्या संघाने प्लॅनिंग केले पाहिजेल..... रसेल अगदीच गचाळ खेळला काल!
सुर्या आणि राणा दोघेही चांगले खेळले.... फक्त चेन्नईच्या पीचवर जम बसलेल्या खेळाडूने सहजासहजी विकेट टाकता कामा नये!

कप्तानीच्या बाबतीत कोहलीची आक्रमकता आणि धोनीचा थंडपणा ही दोन टोके धरली तर रोहित सुवर्णमध्य आहे Happy

रोहितला बऱ्याच दिवसांनी बॉलिंग करताना बघून पण फार मजा वाटली!

*कप्तानीच्या बाबतीत ... रोहित सुवर्णमध्य आहे * +1
मला यबाबतीत रोहितच्या दोन गोष्टी खूप आवडतात -1) विकेट मिळाली तर त्याच्या चेहर्यावर निखळ आनंद व आपल्या संबंधित गोलंदाज व क्षेतररक्षक यांचं कौतुक असतं, त्यांत खुन्नसचा किंवा बढाई मारण्याचा लवलेशही नसतो व 2) गोलंदाजाने लावलेल्या क्षेत्ररक्षणात तो सहसा ढवळाढवळ करत नाहीं पण खेळ अटीतटीच्या अवस्थेत असेल, तर मात्र तीं सूत्र तो आपल्या हातात घेवून अत्यंत कांटकोरपणे फिल्डिंग लावतो !

मला नाही ब्वा मुंबईतल्या मॅच ला काही जाणवलं. काल पंजाब मुंबईतच जिंकले. मॅच हारल्यावर असले नॉनसेन्स एक्स्क्युजेस धोनी नेहेमीच देतो. अजून ती च सवय कायम असल्याचं मात्र जाणवलं Happy
>>>>
मला तरी जाणवले Happy
दर सामन्याच्या आधी पिच रिपोर्ट असो वा टॉस असो, एक्पर्ट असो वा दोन्ही संघाचे कर्णधार असोत, दव काय किती पडणार याची चर्चा हमखास करतातच.
आणि मग जो संघ टोस जिंकतो तो हमखास फिल्डींगच सिलेक्ट करतो आणि कारण हेच सांगतो की ईथे दुसर्‍या डावात फलंदाजी सोपी जाईल. मग आतापर्यंतचे सामने पहिली फलंदाजी करणारे जिंकले असोत वा चेस करणारे जिंकले असोत तो हेच सांगतो आणि तेच करतो.
त्यामुळे हा मुद्दा नॉनसेन्स नसावा असे मला वाटते.

राहिला प्रश्न हा एक्स्क्यूज म्हणून देण्याचा तर धोनीने गोलंदाजांच्या कामगिरीलाही टार्गेट केले आहे. पण लोकं कशी, त्यांनी हेच वाक्य पकडले आणि फेमस करत आहेत Happy
किंबहुना मला तर कर्णधार म्हणून त्याचा हा स्टँड पटला. कारण या कारणामुळे फ्लाईंग स्टार्ट न मिळता दोन विकेटही लवकर गेल्या तरी चेन्नईच्या फलंदाजांनी फाईनल स्कोअर काही वाईट टाकला नव्हता. तर त्यांना त्याने बॅक केले.

बाकी भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराला हरल्यावर एक्स्क्यूज देण्याची गरज भासू नये. तरी माझी समजण्यात चूक होत असेल आणि तो खरेच तसे करत असेल तर वाईट्ट करतो Happy

.

तसंच धोनी जाहिरातदारांसाठी वगैरे खेळतोय असंही नाही वाटत. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण हेच खरं.
>>>>>
राष्ट्रीय संघात खेळणे आणि आयपीएल खेळणे यातला फरक नही समझा तो क्या समझा Happy

पैसे मोजतात हो ईथे संघमालक. दिग्गज म्हणवले जाणार्‍यांनाही सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो किंवा बेंचवर बसवून ठेवतात. तुमची काहीतरी वॅल्यू असल्याशिवाय तुम्हाला ईथे कोणी ऊभे करत नाही Happy

काल सहज गम्मत म्हणून हॉटस्टारवर मराठी समालोचन ऐकत होतो.... अगदीच अ आणि अ प्रकार आहे!
अमोल मुझुमदार त्यातल्या त्यात बरा पण तो एक कुणाल का कोण होता आणि विनोद कांबळी म्हणजे अगदीच सुमार दर्जा होता!
अरे मराठीत पण चांगले समालोचक मिळतील की.... जरा शोध घ्या!
गेला बाजार ह्या बीबीवरचा कोणीही नियमित त्या दोघांपेक्षा तरी नक्कीच कितीतरी पटींनी चांगले समालोचन करेल Happy

रोहित शर्मासारखा टॅलेंटेड कप्तान शोधूनही सापडणं कठीण नाही तर अशक्य आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर रोहितशिवाय पर्याय नाही. कोहलीच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या कर्णमधुर शब्दांमुळे सगळे दडपणाखाली असतात.

मुंबईच्या खेळाडूंना समोरची टीम किती धवांपर्यंत मजल मारू शकते हे माहीत असतं. त्यामुळे ते त्यापेक्षा दहा बारा रन्स जास्त काढतात.

"बाकी भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराला हरल्यावर एक्स्क्यूज देण्याची गरज भासू नये. " - भारताचा सर्वात यशस्वी (टेस्ट आणी टी-२०) कर्णधार विराट कोहली आहे - स्टॅट्स तू शोध. पण तसाही ही मुद्दा irrelevant आहे. कारण सर्वाधिक यशस्वी कप्तान सुद्धा मॅचेस हारतो (धोनी ५०% हून अधिक हारलाय) आणि त्यावेळी तो त्या पराभवाची कारणमिमांसा करतोच. आणि धोनी ची कारणमिमांसा ही नेहेमीप्रमाणे नॉनसेन्स होती.

"राष्ट्रीय संघात खेळणे आणि आयपीएल खेळणे यातला फरक नही समझा तो क्या समझा" - राष्ट्रीय संघातही असाच चिकटून बसला होता. इतरांना वयाची कारणं देऊन टीममधून काढलेला धोनी स्वतः मंदावलेल्या हालचाली घेऊन जवळ जवळ चाळीशीपर्यंत खेळला. बाकी conspiracy theories मधे मी पडत नाही.

आज बंगलोर वि. हैद्राबाद! हैद्राबाद ची बॉलिंग वि. बंगलोर ची बॅटींग असं चित्र जरी दिसत असलं तरी वॉर्नर आणि बेअरस्टॉ क्लिक झाले तर हैद्राबाद ची बॅटींग सुद्धा विस्फोटक आहे.

सेम पिच वर बंगलोर ची आज ची बॅटिंग बघून वाटतंय की काल ची मुंबई ची बॅटींग इतकी खराब नव्हती.

काल मुंबई आणि आज बंगलोर - साधारण तितकाच स्कोअर झालाय. आता हैद्राबाद किती सेन्सिबल बॅटींग करतायत आणि बंगलोर किती 'स्मार्ट' बॉलिंग करतायत ह्यावर निकाल ठरेल.

हैदराबाद फेव्हरेट असतानाचा सामना फिरवून ४ बॉल १३ वर आणल्यावर एक नो बॉल चौका फ्री हिट... ब्यूटी ऑफ आयपीएल.. सामना जितका क्लोज तितके मनोरंजन जास्त Happy

ही पिचच तशी आहे. पंधरा ओव्हर्स नंतर सामना फिरतो. मला वाटलं रोहितच्या कप्तानीमुळे मुबई जिंकली.

ही पिचच तशी आहे. पंधरा ओव्हर्स नंतर सामना फिरतो. मला वाटलं रोहितच्या कप्तानीमुळे मुबई जिंकली. >> Happy

हैद्राबाद किती सेन्सिबल बॅटींग करतायत >> फारसे नाही. काल राणा नि शाकिब , आज पांडे नि होल्डर. हर्शल पटेल ला चांगले दिवस आले आहेत. कोहलीचा शाबाज ला शेवटच्या तीन ओव्हर्स मधली एक ही ओव्हर न देणे गट्सी डिसीजन होता.

Hyderabad pulled KKR today! ५१ बॉल्स मधे ५१ आणि ९ विकेट्स हातात असताना मॅच हारणं अनाकलनिय होतं. केकेआर आणि सनरायझर्स ने अक्षरशः हाराकिरी केली.

उद्या राजस्थान वि. दिल्ली! दोन अत्यंत गुणी विकेटकीपर बॅट्समन मधे सामना रंगणार. कागदावर तरी दिल्ली चं पारडं जड आहे. स्टोक्स आणि आर्चर च्या अनुपस्थितीत राजस्थान कडे लिव्हिंग्स्टन आणि मुस्तफिझूर / टाय असे पर्याय आहेत. दिल्लीकडे रबाडा आणि नॉर्ट्ये परत येतील. ते दोघं, अश्विन, मिश्रा (बॉलिंग) आणि शॉ, धवन, पंत, हेटमायर, स्टॉइनिस (बॅटींग) असा तगडा लाईनअप आहे दिल्ली चा.

भारताचा सर्वात यशस्वी (टेस्ट आणी टी-२०) कर्णधार विराट कोहली आहे - स्टॅट्स तू शोध.
>>>>>>>
धोनीचे कारनामेच असे आहेत की स्टॅटस शोधायची गरज नाही Happy
२०-२० वर्ल्डकप !
वन डे वर्ल्डकप !
चॅम्पियन ट्रॉफी !

तीनही आयसीसी ट्रॉफी मिळवणारा एकमेव कर्णधार.
याऊपर धोनीच्याच नेतृत्वात भारत पहिल्यांदा कसोटी क्रमांक १ वर विराजमान झाला.

ईतके पुरेसे आहे. स्टॅटस शोधायची गरज नाही Happy

असो, वरच्या या धाग्यावरच्या, एकूणच सोशल मिडीयावरच्या कॉमेंट पाहिल्यात तर लक्षात येईल की कोहलीच्या कप्तानीत आपण विश्वचषक जिंकूच शकत नाही असा ठाम विश्वास आहे कित्येक लोकांना. मग याला म्हणावे का यशस्वी कर्णधार Happy

धोनी ५०% हून अधिक हारलाय >>> कुठे, कधी, कसे, केव्हा? हे स्टॅटस बघायला मला नक्कीच आवडतील Happy

धोनी कदाचित आपला नावडता खेळाडू असेल त्यामुळे त्याच्या कप्तानीवर आपण शंका घेतली असावी.
आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया

धोनी स्वतः मंदावलेल्या हालचाली घेऊन जवळ जवळ चाळीशीपर्यंत खेळला >>> धोनी ईंटरनॅशनल किती वयापर्यंत खेळला नक्की हे नेमके आकड्यात चेक करायला हवे. पण तो सचिन वा कपिल यांच्यासारखा कुठल्या विक्रमासाठी कुंथत खेळत नव्हता हे नक्की. पण तरीही सचिन आणि कपिल हे दोघे लिजंड आहेत हे मी सुद्धा मानतोच. विक्रमासाठी कारकिर्द खेचली म्हणून लगेच त्यांना व्हिलन बनव्णार नाही मी. बाकी कसोटी हा धोनीचा तितकासा प्रांत नव्हता स्पेशली परदेशात खेळताना म्हणून त्याने तिथून वेळीच निवृत्ती घेतली हे लक्षात घ्यायला हवे.

मर्यादीत षटकांचे क्रिकेट म्हणाल तर वर्ल्डकपला जायच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत तो मालिकावीर होता हि त्याची उपयुक्तता होती. जी म्हटले तर त्याच्या अखेरच्या सामन्यातही दिसली, वर्ल्डकपच्या सेमीला दिसली, ज्यात त्याच्याच साथीने जडेजाने विजय जवळजवळ खेचून आणलेला. जर त्याला किमान एक नंबर पुढे किमान पांड्याच्या पुढे पाठवला असता तर त्याची विकेटही वाचली असती. कारण धोनी जिथे ऊभा राहतो तिथे पडझड थांबते.

बाकी मंदावलेल्या हालचाली म्हणाल तर विकेटकीपर म्हणून त्याच्याच हालचाली सर्वात चपळ असाव्यात जे वर्ल्डकपला एकाच वेळी पंत कार्तिक राहुल असे आणखी तीन कीपर संघात असूनही यष्टीमागे उभे राहायला धोनीच सर्वोत्तम पर्याय होता Happy

*भाऊ, सॅमसन २-३ सामने खेळला भारतासाठी ते फक्त बॅट्समन म्हणून खेळला होता.* - मान्य. पण त्याची ' आयडेंटीटी' ही ' विकेटकिपर- बॅटसमन' अशीच आहे. उदा. ही फेफ यांची कालची पोस्ट- <उद्या राजस्थान वि. दिल्ली! दोन अत्यंत गुणी विकेटकीपर बॅट्समन मधे सामना रंगणारem> ! Wink

हैद्राबादची बॅटींग पहील्यापासूनच टॉप हेवी आहे..... लोअर मिडल ऑर्डर हा त्यांचा बराच जुना प्रॉब्लेम आहे!
आतातरी विल्यमसन ला घ्या रे!

हर्षल पटेल भलताच फॉर्मात आहे!
बरीच सुधारलीय त्याची बॉलींग.... काल मॅक्सीपण खेळला Happy

आज राजस्थान विरूध्द दिल्ली Happy

राजस्थान वि. दिल्ली: राजस्थान चं इंटरेस्टींग टीम सिलेक्शन! गोपाळ च्या जागी उनाडकट खेळतोय. दिल्ली ३०० करेल बहुदा Wink तीन लेफ्ट हँडेड फास्ट बॉलर्स!

दिल्ली ने अमित मिश्रा च्या जागी ललित यादव ला खेळवलंय. रबाडा ला (हेटमायर च्या जागी) घेतल्यामुळे बॅटींग reinforce केली असावी बहुदा.

कागदावर तरी दिल्लीचं पारडं जड वाटतंय. राजस्थान च्या लाईनअप मधे शेवटच्या तिघांना बॅटींग अजिबात येत नाही. तिवातिया हिट अँड मिस आहे, मॉरिस बॉलिंग ऑल-राऊंडर आहे, दुबे बर्यापैकी फ्रिंज प्लेयर आहे. सगळा भार बटलर, मिलर, संजू ह्यांच्यावर आहे. त्या तुलनेत दिल्ली कडे शॉ, धवन, पंत, रहाणे, स्टॉयनिस असा तगडा बॅटींग लाईनअप आहे. बघू आता काय घडतं ते.

उनाडकट सुटलाय!
सॅमसनचा एक नंबर कॅच Happy
दिल्लीच्या दोन विकेट्स एकदमच स्वस्तात!

"धोनीचे कारनामेच असे आहेत की स्टॅटस शोधायची गरज नाही" - जिंकलंस मित्रा!! अब रुलायेगा क्या पगले? धोनी ला आजपासून क्राईम मास्टर गोगो म्हणण्यात येईल - सौजन्यः ऋन्मेष! बाकी स्टॅट्स, तज्ञ, जागतिक मान्यता वगैरे गोष्टी गेल्या बारा गडगड्याच्या विहिरीत. ते विन टू लॉस ratio वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. Happy

"हे स्टॅटस बघायला मला नक्कीच आवडतील" - कशाला उगाच!!
"वरच्या या धाग्यावरच्या, एकूणच सोशल मिडीयावरच्या कॉमेंट पाहिल्यात तर लक्षात येईल" - लो! कर लो बात!! मायबोलीच्या क्रिकेट धाग्यावर दोघा-तिघांनी आणि तुझ्या सोशल मिडीया वरच्या काही मित्रमंडळींनी क्रिस्टल बॉल पाहून भविष्यच सांगितल्यावर प्रश्नच संपला. ते बीसीसीआय बंद केलं तरी चालेल. काय तो द्रष्टेपणा!! Wink

"पण तो सचिन वा कपिल यांच्यासारखा कुठल्या विक्रमासाठी कुंथत खेळत नव्हता" - परत एकदा मास्टरस्ट्रोक!! २५-३० जागतिक विक्रम धोनी ला खुणावतच होते जे त्याने मोठ्या मनाने सोडून दिले. Wink

"कसोटी हा धोनीचा तितकासा प्रांत नव्हता स्पेशली परदेशात खेळताना म्हणून त्याने तिथून वेळीच निवृत्ती घेतली हे लक्षात घ्यायला हवे." - हे लक्षातच आलं नाही. म्हणजे ह्यात सुद्धा एक स्ट्रॅटेजी होती तर! ते अध्यात्मिक गुरू वगैरे कसे गूढ बोलतात. त्यांनी नुसती जांभई दिली तरी वैश्विक प्रलयाची ती नांदी असते, तसंच हे आहे. म्हणजे आधी ऑस्ट्रेलियात जायचं, एक मॅच खेळायची, हारायची आणि नंतर टीम ला वार्यावर सोडून, दौर्याच्या मधेच ड्रेसिंग रूम मधे निवृत्ती जाहीर करायची - ह्यातूनच टीम ला स्वयंपूर्ण बनायचं शिक्षण मिळतं. हे ज्यांना कळत नाही त्यांचं पुण्य कमी पडतं. दुर्दैव त्यांचं! Happy

"त्याच्याच साथीने जडेजाने विजय जवळजवळ खेचून आणलेला." - दिव्यदृष्टी म्हणतात ती हीच!! बाकी अभागी क्रिकेट प्रेक्षकांना हे कळलंच नाही. त्यांना उगाचंच असं वाटत राहिलं की धोनी ने २-४ बॉल्स कनेक्ट केले असते (करू शकला असता) तर जडेजा ला मॅच जिंकायला त्याने साथ दिली असती. पण अशानं जडेजा स्वयंपूर्ण कधी होणार? क्रिकेट हा एक टीम-स्पोर्ट आहे अशा भलत्याच गैरसमजतून क्रा.मा.गोगो ने जडेजा ला बाहेर काढलं. Happy

स्टॅट्स, फॅक्ट्स वगैरे गोष्टींच्या नादी न लागता, एका वेगळ्याच दृष्टीकोनातून क्रा.मा. गोगो दर्शन घडलंय आज!!

"धोनी कदाचित आपला नावडता खेळाडू असेल " - ना ही रे बाबा. मला खेळ आवडतो. खेळाडूंशी काही वैय्यक्तिक आवडी-निवडी जुळलेल्या नाहीत. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधला, धोनी हा एक खूप चांगला खेळाडू आणि कॅप्टन होता. इथे त्याची कल्पकता, स्वतःवरील विश्वास हे वाखाणण्याजोगे होते. एक कॅप्टन म्हणून टीम डेव्हलप करायला तो कमी पडला. पण आधीच्या कॅप्टन्स कडून मिळालेल्या चांगल्या टीम ला घेऊन त्याने मोठं यश मिळवलं (ह्यात कुठलीही टीका नाही). टेस्ट मधे त्याची कॅप्टन्सी ऑर्डिनरी होती, अजिबात कल्पक नव्हती, बचावात्मक होती. एक खेळाडू म्हणून सुद्धा त्याचं तंत्र (बॅटींग आणि विकेटकिपींग) टेस्टमधे तोकडं होतं. २०११ च्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर (४-०, ४-०) सिलेक्टर्स ने त्याला कॅप्टन्सीवरून काढण्याचा निर्णय घेतला होता, पण श्रीनिवासन ने तो व्हेटो केला होता. असो. हा विषय जाऊ दे. आजच्या मॅच विषयी बोलू.

"सॅमसनचा एक नंबर कॅच" - +१ ती विकेट संजू च्या च नावावर हवी. जबरदस्त अँटीसिपेशन आणि रिफ्लेक्सेस! उनाडकट च्या ओव्हर्स संपवल्या तरी चालतील.

आज राजस्थान ने फिल्डींग फारच मनावर घेतलीय. संजू च्या कॅच नंतर, बटलर चा कॅच (स्टॉयनिस), पराग चा डायरेक्ट हिट (पंत) आणि तिवातिया चा कॅच (ललित) - दोन्ही जबरदस्त. पराग चा बाऊंड्रीवर घेऊन सोडलेला (आत टाकलेला) कॅच (?) पण जबरीच होता.

उनाडकट चे पेस चेंज सुंदर होते. स्विंग मिळाला कि त्याची बॉलिंग धारदार होतेच. पंत इनिंग मस्त पेस करत होता आज, रन आऊट काय !

उनाडकटला पहिला संपवला ते बरे झाले.... डेथ ओव्हर्समध्ये तो लैच मार खातो!
मॉरीस यंदा जरा गंडल्यासारखा का वाटतोय?

राजस्थान ने दिल्लीशी वाईट बॅटींग करण्याची स्पर्धा करायचं ठरवलंय का? दिल्लीची बॉलिंग मस्त होतीय हे जरी खरं असलं तरी राजस्थान च्या बॅट्समेन चं शॉट सिलेक्शन दयनीय आहे.

Pages