आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धवन व शाॅ ने धुतलेत सीएसकेच्या गोलंदाजीला. 151 - 1 ( 15 षटकं. लक्ष्य -189 )

धोनीने बस करावे आता. अजून किती गुणी खेळाडूंवर अन्याय करणार आहे देव जाणे.
>>>

आयपीएल पैश्यांचा खेळ आहे. आर्थिक लाभ पाहता तो खेळत असेल आणि खेळवणारयांनाही त्याच्या ब्रांड वॅल्यूचा लाभ होत असेल त्यामुळे खेळवत असतील. किंबहुना कदाचित त्याची ईच्छा नसतानाही त्याच्यावर खेळायचा दबाव असेल.
आज चेन्नईमध्ये जवळपास नऊ दहा क्रमांकापर्यंत फलंदाजी होती ती याच कारणासाठी की धोनी फलंदाजीत गिणतीतच नाही. तरी खेळलाच तर बोनस..

बाकी काही असो, आपला चुम्मा फलंदाज कप्तान ऋषभ पंत आज त्याचा पहिलाच सामना जिंकला. ते सुद्धा विनिंग शॉट मारत.. हे त्याच्या धाग्यावर टाकणे मस्टच आहे. Happy

रिषभ काल Low on energy वाटला...... टॉस, किपींग, बॅटींग, पोस्ट मॅच कुठेच त्याचा नेहमीचा स्पार्क जाणवला नाही.
पहिली मॅच म्हणून जरा बुजला असेल तर ठीक पण कॅप्टनपदाचे दडपण घेतले असेल तर ते त्याच्या खेळासाठी चांगले नाही.
कॅप्टन म्हणूनही विशेष चमक दिसली नाही.... रैनासमोर पेसर लावून शॉर्टपीच टाकायचे सोडून मिश्रा आणि अश्विनला कोण लावते यार? ते पण वानखेडेवर? ते पण मार पडत असताना?
एकूणच बॉलिंग चेंजेस आवडले नाहीत.... कदाचित रबाडा आणि नॉर्जे आल्यावर फरक पडेल!

धवन आणि शॉ मस्त खेळले.... शॉ एकदमच फ्लॉलेस होता..... त्याच्या विजय हजारे ट्रॉफीमधल्या फॉर्मबद्दल फारच चर्चा झाली होती.... आणि काल दिसले की मागच्या सीझनचा शॉ आणि या सीझनचा शॉ याच्यात खूप फरक आहे!
धवनचे पहिले दोन्ही कॅचेस कमाल होते..... आणि बॅटींग तर एकदम गब्बर इज बॅक स्टाईल!

रैना अनपेक्षितपणे तुफान खेळला.... एकदम कडक सिक्स ओढले त्याने!

*शॉ एकदमच फ्लॉलेस होता....* - शाॅ काल त्याच्याबद्दलच्या अपेक्षाना न्याय देवून गेला. फारच छान !
( कुणाला जाणवलं का, इतर नवोदित फलंदाज ज्या सफाईने व सहज षटकार ठोकतात, तें शाॅला अजून जमत नसावं. दोनदां तो सीमारेषेवर झेल सुटून वांचला. बाकी त्याचे फटके मात्र दिमाखदार, प्रेक्षणीय !! )

शॉ काल चांगलाच खेळला, पण त्याला फिटनेस आणि fielding वर खूप काम करावे लागणार आहे, नवीन फिटनेस टेस्टस मध्ये तो पास होईल का थोडी शंका वाटते. वयाच्या मानाने तो फार स्लो वाटतो हालचालींमध्ये.

शॉ चा सर्वात मोठा बदल जाणवला तो ॲटीट्यूडचा. आधी तो स्वत:ला फार शहाणा समजायचा. आता विमान जमिनीवर आलेय. चुकांवर मेहनत घेताना दिसतोय. अगदी फिल्डींगलाही एकदा बाऊंडरीवर जीव तोडून फोर अडवला.
बॅटींगमध्येही त्याच्या बॅटस्पीडवर कंट्रोल मिळवतोय असे वाटले. आधी त्याचा शॉट एखादा खवडा मारल्यासारखा वाटायचा. बघायला आकर्षक वाटायचा पण वरच्या लेव्हलला चुकला की बॉलर घुसला. काल तसे वाटले नाही. जास्त आश्वासक वाटला. आणि तरीही तितकाच फटकेबाज आणि डॉमिनंट बॅटसमन वाटला.
अशीच सुधारणा राहिली तर तो नक्कीच एक वर्ल्डक्लास प्लेअर बनू शकतो जे त्याच्यातले टॅलेंट पाहता त्याचे ध्येय असायला हवे.

पण हल्ली माझे लक्ष धवनवर सुद्धा असते. त्याने फलंदाजीची शैली म्हणा वा ॲटीट्यूड म्हणा आणखी आक्रमक केली आहे. सध्याच्या स्पर्धेत २०-२० भारतीय संघात स्थान मिळवायच्या द्रुष्टीने म्हणा पण तो वाढत्या स्ट्राईकरेटसोबत तो कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवत आहे. या आयपीएल सीजनमध्ये तो असाच खेळला तर त्याला येत्या २०-२० विश्वचषकासाठी डावलता कामा नये. मोठ्या आणि महत्वाच्या सामन्यात तो राहुलपेक्षा जिगरबाज खेळाडू आहे.

*अगदी फिल्डींगलाही एकदा बाऊंडरीवर जीव तोडून फोर अडवला.* - +1. मीं हें लिहिण्याच्या बेतातच होतो. पोरगं गुणी आहे, पण स्पर्धा इतकी तीव्र आहे हें जाणून सतत सुधारणा होणं अपरिहार्य. * वयाच्या मानाने तो फार स्लो वाटतो हालचालींमध्ये.* याकढे तर लक्ष देणं आलंच.
धवनच्या बाबतीतही सहमत. ' साला, कसे डावलता मला तेंच बघतो ', हया जिद्दीने खेळतोय हल्ली ! चालला तर दादाच आहे तो !! अलिकडे, ऑफचे चेंडू लेगला 'पुल ' करताना मनगटाचा अधिक वापर करायचं तंत्र त्याने आत्मसात केलंय व ते तो सर्रास व मस्तच वापरतो, असंही जाणवतं.

शॉ ला ऑस्ट्रेलियातील अपयशानंतर पहिल्यांदाच इतक्या आत्मविश्वासाने खेळताना पाहिला. जबरी खेळला. "गब्बर" धवनही भारी. त्याचे कॅचेसही मस्त होते.

सिराज अजूनही कॅचेस सोडतोच आहे असे दिसते Happy

रैना चांगला खेळताना बघूनही बरे वाटले. त्याचा तो फारशी बॅकलिफ्ट न घेता मारलेला फ्लिक टाइप सिक्स बघायला मिळाला पाहिजे परत.

मजा येतीय नेहमीप्रमाणे.
गील कधी न्याय देणार आहे स्वतःला. रशीदला का डोक्यावर बसवून ठेवलाय सर्वांनी.
भज्जीला पाहून बर वाटल.

काही धोनी पंखे जमिनीवर येताना वाचून बरे वाटल. Happy
पंत हिरा चमकू दे.

काही धोनी पंखे जमिनीवर येताना वाचून बरे वाटल. Happy
पंत हिरा चमकू दे.
>>

या आयपीएलमध्ये धोनी १४ वेळा शून्यावर बाद झाला आणि चेन्नईने शून्य गुण मिळाले तरी धोनीच्या चाहत्यांना काही फरक पडू नये. हो, टिकाकारांची तेवढी चंगळ होईल. पण ती टिका विक्रमासाठी राष्ट्रीय संघात खेळणार्‍या कपिल, सचिन यांनाही नाही चुकलीय. धोनी आयपीएलमध्ये अजूनही खेळत असेल तर चेन्नई मॅनेजमेंट बघून घेईल आपल्याला काय Happy

धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून झालेय. त्याने देशाला जे मानमरातब मिळवून द्यायचे ते मिळवून दिलेत. हे आयपीएल तर केवळ आर्थिक कारणासाठी तो खेळतोय. स्वतःच्याच नाही तर ईतरांचेही आर्थिक हितसंबंध त्यात गुंतले असतील .. कारण धोनी हा आजही आयपीएलमधील बिगेस्ट ब्रांड आहे. त्याच्याकडच्या जाहीराती पाहिल्या तर हे लक्षात येईल.

आणि पंत म्हणाल तर तो चुम्मा आहे चुम्मा Happy
कित्येक लोकं आता त्याचे गुणगाण गात आहेत, मी तर त्याने २०१७ साली गुजरातविरुद्ध ४३ बॉल ९७ ची चेस इनिंग केलेली तेव्हापासूनच त्याच्या प्रेमात आहे Happy

पंतच्या सर्व चाहत्यांचे खालील धाग्यावर स्वागत आहे
लंबी रेस का घोडा - ब्राईट हॉर्स ऋषभ पंत !
https://www.maayboli.com/node/71667

पंतचे टिकाकार तर तिथून पसारच झालेत Happy

कालची मॅच बघता कोलकाता अचानक एक स्ट्रॉंग टीम वाटायला लागलीय..... नितिश राणा आणि त्रिपाठी ज्याप्रकारे खेळले तोच त्यांचा फॉर्म टिकून राहिला तर ते दोघे, गिल, मॉर्गन, रसेल, कार्तिक एकदमच तगडी बॅटींग आहे.
प्रसिध कृष्णाची बॉलिंग काल अजूनच आवडली.... नबीला ज्याप्रकारे त्याने स्लोअर वन वर आउट केले ते भारी होते!
भुवी आणि संदीप शर्माने निराशा केली.
हैद्राबादने नबीच्या ऐवजी विल्यमसनला आत आणले पाहिजे आणि गौथमला खेळवले पाहिजे..... मनीश पांडे काल फारच रटाळ खेळला!
हैद्राबादला प्लेऑफचे चान्सेस आहेत असे वाटत नाही!

हैद्राबादने नबीच्या ऐवजी विल्यमसनला आत आणले पाहिजे आणि गौथमला खेळवले पाहिजे >> हो तो अतिशय अनाकलनीय निर्णय होता. त्या पिचवर विल्यमसनची गरज होती वॉर्नरचा फॉर्म बघता.

नितिश राणा कंसिस्टंसी नसते हा मेन प्रॉब्लेम आहे. मुंबई ने म्हणूनच परत बिड केले नव्हते त्याच्यावर.

हैद्राबाद ने प्लेयिंग-११ ची लिस्ट लिहिताना विल्यमसन चं नाव यादीच्या 'श्री'कारानंतर लगेच लिहायला हवं.

आज पंजाब वि. सॅमसन मॅच चांगली चाललीय. बेन स्टोक्स ची महानता (वर्ल्ड-कप फायनल आणी 'ती' अ‍ॅशेस ची मॅच वगळता) अजून तरी मला कधी दिसली नाही. हूडा चे शॉट्स जबरदस्तच होते आज. पण बॉलिंग सुद्धा अ(ति)सामान्य होती. एक मॉरिस च्या यॉर्कर लेंथवर मारलेल्या सिक्स व्यतिरिक्त बाकीचे बॉल्स अगदीच 'हिट-मी' कॅटेगरीतले होते.

अरे त्या सॅमसनला काय खाउन एलबीडब्ल्यू आउट दिला होता त्या अंपायरने? उंच बोलर, पिचवर बाउन्स चांगला आहे (आधीच्याच बॉल वर अपर कट मारला होता) आणि पॅडच्याही वरती बॉल लागला होता. बरे झाले रिव्यू घेतला.

"अरे त्या सॅमसनला काय खाउन एलबीडब्ल्यू आउट दिला होता त्या अंपायरने?" - सिरियसली!! अंपायरिंग धन्य आहे. पंजाब च्या बॅटींग च्या वेळी सुद्धा मयंकला मुस्तिफिझूर च्या पहिल्या ओव्हरमधे नॉट-आऊट कसा दिला होता कुणास ठाऊक? राजस्थान ने रिव्ह्यू न घेऊन चूक केली होती. फारशी महाग नाही पडली हे त्यांचे सुदैव.

सॅमसन शतक ! मला आवडतो हा खेळाडू. केरलचा एकमेव खेळाडू संघात यावा , अर्थात गुणवत्तेवरच, असं खूप वाटतं !

man! थोडा शॉट चुकला अगदी. नाहीतर एकहाती घेउन चालला होता मॅच. पण जबरी खेळलाय.

शेवटून दुसर्‍या बॉलवर सिंगल रन घेतला नाही त्याने. मॉरिस किती खेळू शकतो माहीत नाही, कारण मग त्याला फोर मारावीच लागली असती.

तो मेरेडिथ एकदम टेस्ट मॅच रन अप घेउन बोलिंग करतो!

मॉरीस तेवातिया मंडळींनी बॉल खायचे काम केले. लास्ट ओवरला मॉरीस होता हे नडले. जर तळाचा फलंदाज असता आणि आता आपल्यलाच सहा बॉल खेळून १३ मारायचे आहेत असे ठरवले असते तर त्याने सहज मारले असते असे वाटते.

झक्कासच इनिंग होती आजची त्याची. तो रन नाकारून चूकीचे केले असे वाटले नाही. मी जिंकून देऊ शकेन असा आत्मविश्वसच दिसत होता. अशा १-२ इनिंग्स तो दर वर्षी खेळतो ज्या बघितल्या नंतर हा भारतीय संघात का नाही असा प्रश्न उभा राहतो. दुर्दैवाने बाकीच्या मॅच मधल्या स्कोर नी त्याचे उत्तर मिळून जाते.

सकेरिया प्रॉमिसिंग वाटतो.

मागच्या आयपीएलला पंजाबविरुद्ध 200+ धावांचा पाठलाग करताना राजस्थान जिंकली होती. काल पंजाब जिंकली. नियती आजकाल जमाच वर्तुळं पूर्ण करून हसायला लागले.

*...दुर्दैवाने बाकीच्या मॅच मधल्या स्कोर नी त्याचे उत्तर मिळून जाते* - कदाचित, राष्ट्रीय संघनिवडीत सॅमसनकडे विकेटकिपर- बॅटसमन म्हणूनच पाहिलं जातं व त्यांमुळे त्याच्यासाठी स्पर्धा अधिकच तीव्र होते.

Pages