Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेंटलिस्ट मस्त आहे +१ पण रेड
मेंटलिस्ट मस्त आहे +१ पण रेड जॉन चे रहस्य चान्गल जमवुन आणल पण तो अस का करत असतो ते नीट नाहि सन्न्गितल .
ग्रेस व्हॅन पेल्ट, चो, लिसबन सगळे आवडतात +१
बबन , भ्रष्टाचार हे कारण !
बबन , भ्रष्टाचार हे कारण !
रेड जॉन जितके उद्योग पॅट्रिक
रेड जॉन जितके उद्योग पॅट्रिक शी वैर/त्याला उचकवायला/इंटरेस्ट कायम ठेवायला करतो तितके उद्योग कोणीही दुष्ट माणूस आपल्या शत्रूसाठी करण्याचे कष्ट घेणार नाही(हे वैयक्तिक मत.)
होम्स मॉरियारटी सारखे कट्टर वैरी सेटिंग चालू ठेवायला रेड जॉन कथेत आहे.पण हे खरं की पॅट्रिक च्या यातना, त्याच्या सूडाचा प्रवास खूप खरा वाटतो.
हा प्राणी ऑफिस चे कपडे बदलून घरातले घालतच नाही असे दिसते.कायम वेस्ट आणि सूट मध्येच असतो.झोपतोही तसाच.फक्त सिझन 6 च्या एका एपिसोड मध्ये शर्ट लुंगी या पोशाखात दाखवला आहे.
Kristina पहिल्या 10 एपि मध्ये
Kristina पहिल्या 10 एपि मध्ये येऊन जाते >>> ओह! ती आठवली. तिला पुढे रिकरिंग रोल दिसतोय म्हणजे. बहुतांश भागात एखादे उठून दिसणारे कॅरेक्टर असते पण ते नंतर लक्षात राहात नाही. ती कॅलिफोर्नियात विटनेस प्रोटेक्शन मधे राहणार्या माणसाची इटालियन बायको, नाव बदलून लोकांना गंडवणारी सायकियाट्रिस्ट वगैरे.
Schitt's Creek on Netflix,
Schitt's Creek on Netflix, total binge worthy!
२ दिवसापूर्वी पहायला सुरवात केली आणि ८ एपिसोड्स संपले, एकदम धम्माल आहे
खूप दिवसांनी कॉमेडी सिरीज एवढी आवडतेय , नक्की बघा !
Schitt's Creek is love! It's
Schitt's Creek is love! It's a very wholesome drama/comedy. पुरवून पुरवून बघावी अशी सिरीज आहे.
Schitt's Creek बघितली. अतिशय
Schitt's Creek बघितली. अतिशय मस्त आहे.
Hotstar वर ऑफिस चे दोन्ही
Hotstar वर ऑफिस चे दोन्ही सीझन पाहिले
ठीक आहेत, आवडलं असं नाही पण अगदी नावे ठेवावी इतकी वाईट नाही
One time watch
Dice media ची youtube वर
Dice media ची youtube वर सध्या प्रसारित होत असलेली operation mbbs पाहतंय का कुणी?
पहिला सीझन भारी होता
दुसरा थोडा फिका वाटत आहे
एकंदरीत छान आहे
Hotstar वर OK Computer बघतयं
Hotstar वर OK Computer बघतयं का कोणी ? Timepass आहे.
नेटफ्लिक्स वरची the originals
नेटफ्लिक्स वरची the originals कोणी बघितलीय का?
मी नुकतीच बघायला सुरुवात केली आहे चांगली वाटतेय..
बॉम्बे बेगम्स थोडी पाहिली.
बॉम्बे बेगम्स थोडी पाहिली. जितकी टीका ऐकली तितकी वाईट नाही वाटली. एकूण ड्रामा एंगेजिंग आहे.
पण सगळा भर कॉर्पोरेट ड्रामा व स्त्रियांना तेथे व घरी मिळणारी वागणूक यावर ठेवला असता तर बरे झाले असते. इतर असंख्य अनावश्यक गोष्टी आहेत.
दीपांजलीने वरती लिहील्याप्रमाणे अनेक गोष्टी केवळ चेकमार्क करता आहेत. "नेफिवर दाखवण्याकरता या दहा गोष्टी सिरीज मधे असणे गरजेचे आहे" अशा लिस्ट वरून घेतल्यासारखे अनेक सीन्स आहेत.
दुसरे म्हणजे टीनेजर्सचे प्रश्न दाखवायला इतके डीटेलिंग करण्याची गरज नव्हती. भारतात त्यावर आलेले आक्षेप बरोबर वाटतात.
पूजा भट, शहाना गोस्वामी, मनीष चौधरी ती प्लेबिता ("आयेशा") यांची कामे चांगली आहेत. अमृता सुभाष ने ही काम चांगले केले आहे. दुसर्या एपिसोड पासून तिची पर्सनॅलिटी दिसायला लागते. अर्थात दोनच भाग आत्तापर्यंत पाहिले आहेत. पुढे कसे आहे माहीत नाही.
आता कॉर्पोरेट बद्दल. हे लोक कोणाला कन्स्लट करत नाहीत का कंपन्यांचे कामकाज दाखवताना? अगदी झी मराठी प्रमाणे हजारो कोटींच्या बाता चालू असताना सेट अप ८-१० लोकांच्या एखाद्या छोट्याश्या फर्म मधला वाटतो तितका प्रकार नाही. पण तरीही खूपच ढोबळ आहे. इथे सेट्स वगैरे मोठ्या कंपन्यांचे वाटतात पण अगदी थोडेफार. सीईओ जनरल एम्प्लॉयीजच्याच रेस्टरूम/बाथरूम मधे जातात का? टॉप लेव्हल मीटिंग ही बोर्ड मिटिंग आहे की कंपनीची सीईओच्या हाताखालच्या डायरेक्ट रिपोर्टची, हे अनेकदा कळत नाही. कारण म्हणावे तर तिच्या रोलसाठी स्पर्धक असलेले लोक तेथे असतात पण ते प्रश्न कंपनीचा बोर्ड मेम्बर सीईओला विचारेल ते विचारतात. "तूही किती वेळ सीईओ राहशील ते यावर आहे" छाप बोर्ड-वाक्ये मारतात.
पूजा भट व तिचे काही विभागांचे हेड्स ज्या गोष्टी कॉमन नॉलेज असायला हव्यात त्या गोष्टी पहिल्यांदाच बोलत असल्याप्रमाणे बोलतात. अॅक्विझिशन च्या निगोशिएशन मीटिंग मधे जाताना काहीही तयारी न करता असे कोण जाते? चर्चा कोण लीड करणार वगैरे सगळे आधी ठरवलेले असते. त्यात त्या अॅक्विझिशन मुळे सीईओला नवीन फंड मिळणार, की अॅक्विझिशनकरता लागणारा फंड बोर्ड मान्य करणार नाही - नक्की कोणता प्रोब्लेम आहे यात खूप घोळ वाटला. "बॅड लोन्स" - जी लोन्स फेडली जाण्याची शक्यता नाहीये - अशा लोन्सची चर्चा इतकी वर्षे एकत्र काम करत असलेले लोक पहिल्यांदाच करत आहेत असे संवादांवरून वाटते.
मात्र सगळ्यात मोठे ऑब्जेक्शन म्हणजे महत्त्वाकांक्षी स्त्रिया = लफडेबाज हा स्टीरीओटाइप यात तसाच दाखवला आहे हे.
मात्र सगळ्यात मोठे ऑब्जेक्शन
मात्र सगळ्यात मोठे ऑब्जेक्शन म्हणजे महत्त्वाकांक्षी स्त्रिया = लफडेबाज हा स्टीरीओटाइप यात तसाच दाखवला आहे हे.
<<
+१
इन फॅक्ट एक्स्ट्रॉमॅरोटल अफेअर = फ्रीडम , हे प्रोजेक्ट होतं त्याला ऑब्जेक्शन !
इन फॅक्ट एक्स्ट्रॉमॅरोटल
इन फॅक्ट एक्स्ट्रॉमॅरोटल अफेअर = फ्रीडम , हे प्रोजेक्ट होतं >> हो ना.
विशेषतः मला त्या फातेमाचे क्लायन्ट बरोबर एकदम झोपणे २-३ भेटींनंतर तेही, हे झेपलेच नाही.
The No 1 Ladies Detective
The No 1 Ladies Detective Agency S01 E01 : https://www.youtube.com/watch?v=gPN_XJ_CDsA
ही सिरीज युट्युबवर आहे. <<<<< अरे वा, पुस्तके फार आवडती आहेत. मागे यु ट्युबवर शोधले तेव्हा अर्धवट भाग बघायला मिळाले. आता नीट बघते.
थॅन्क्यू मामी.
विशेषतः मला त्या फातेमाचे
विशेषतः मला त्या फातेमाचे क्लायन्ट बरोबर एकदम झोपणे २-३ भेटींनंतर तेही, हे झेपलेच नाही. >>> ती पण का? अजून दोनच भाग पाहिलेत. त्यात ती फातिमा आणि लिली या दोघी इण्टिग्रिटी वाल्या वाटल्या. लिली जे करते ते पर्याय नाही म्हणून.
द इरेग्युलर्स चालू केली आहे.
'द इरेग्युलर्स' (नेटफ्लिक्स) चालू केली आहे.
) मजा येतेय अजुन तरी.
व्हिक्टोरिअन लंडन मध्ये रस्त्यावर रहाणारी चार मुलं, हिमोफिलिआ झालेला आणि त्यामुळे विजनवासात आत्तापर्यंतचे जीवन घालवलेला राजपुत्र, २२१बी बेकर स्ट्रीट वर रहाणारा डॉ. वॉटसन (आणि शेरलॉक), आणि लंडन मध्ये घडणार्या सुपरनॅचरल गोष्टी. या चार गोष्टींना एकत्र आणावसं का कोणास वाटलं असेल माहित नाही. पण या मुलांना सुपरनॅचरल गोष्टींचा छडा लावायला वॉटसन हायर करतो आणि पुढे काय काय होत जातं अशी थीम आहे. सुपरनॅचरल ट्विस्ट टू शेरलॉक (जो तीन एपिसोड होऊन अजुन दिसला नाहिये
( केवळ ब्रिटिश अॅक्सेंट मध्ये बोलते म्हणून नादिया बेक्सचे दोन एपिसोडही मी बघितले)मजा येतेय अजुन तरी. >>> पुढे
मजा येतेय अजुन तरी. >>> पुढे बर्यापैकी डार्क होत जाते ही मालिका. माझे शेवटचे २ एपि राहिले आहेत आता. ही स्टोरी दाखवायला शेरलॉक, वॉटसन या पात्रांचा वापर का केला असेल असा विचार करतेय.
मात्र सगळ्यात मोठे ऑब्जेक्शन
मात्र सगळ्यात मोठे ऑब्जेक्शन म्हणजे महत्त्वाकांक्षी स्त्रिया = लफडेबाज हा स्टीरीओटाइप यात तसाच दाखवला आहे हे. >>> हे असं काहीतरी असेल याचा अंदाज होताच. म्हणूनच नाही बघितलीय ही मालिका. बरंच झालं मग नाही बघितली ते.
महत्त्वाकांक्षी स्त्रिया =
महत्त्वाकांक्षी स्त्रिया = लफडेबाज हा स्टीरीओटाइप >>>> लफडी केली इ. म्हटले तरी ठीक एक वेळ. पण मह्त्त्वाकांक्षी स्त्रिया त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला कुणाबरोबर तरी झोपणे हेच एक हत्यार वापरतात हा फार फार धोकादायक स्टिरिओटाइप वाटतो मला.
पुढचे भाग भिकार आहेत.
पुढचे भाग भिकार आहेत. सुरूवातीच्या भागात तो ड्रामा बर्यापैकी जमला होता तो नंतर रानोमाळ हरवला आहे.
पण मह्त्त्वाकांक्षी स्त्रिया त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला कुणाबरोबर तरी झोपणे हेच एक हत्यार वापरतात हा फार फार धोकादायक स्टिरिओटाइप वाटतो मला. >>> हो. एकूणच कंपन्यांमधील लोकांबद्दल कायच्या काय इमेज पसरवत आहेत.
कंपनीच्या कामकाजाबद्दल - फण्ड्स, बॅड लोन्स, अॅक्विझिशन्स. गप्पा मोठमोठ्या आहेत पण चित्रण अगदी वरवर आहे.
ज्या कंपनीच्या सीईओ च्या अफेअरची मोठी न्यूज होउ शकते ती कंपनी एका नगरसेवकाला आवरू शकत नाही हे एक अजब आहे. दुसरे म्हणजे ती रानी व तो महेश का कोण साधारण एकाच वेळेला हॉटेल मधून बाहेर पडताना दिसले. यावर त्यांचे अफेअर आहे ही मोठी ब्रेकिंग न्यूज! हे लोक फॅमिली फ्रेण्ड्स आहेत. एकमेकांच्या कुटुंबासहित भेटतात. मित्र असतील. कामासंबंधी भेटत असतील असल्या शक्यता नाहीत. कॉम्प्रमाइजिंग पोझिशन मधे सापडले तर ठीक आहे. आणि म्हणे इंडिया वॉण्ट्स टू नो! प्रायव्हेट कंपन्यांमधेल लोक त्यांच्या खाजगी वेळात काय करतात या पब्लिकला इण्टरेस्ट असेल ठीक आहे. पण तो देशाचा प्रश्न कधी झाला?
शिट्स क्रीक , बघता बघता सिझन
शिट्स क्रीक , बघता बघता सिझन ६ अर्थात फायनल सिझनला पोचले, धमाल सिरीज आहे
अख्खी रोझ फॅमिली, स्टिव्ही,मेयर, जॉसलिन, ट्वायला आणि टेड सगळी मस्त कॅरॅक्टर्स आहेत!
टेड- अॅलक्सिज कसलं क्युट कपल आहे, फार आवडले दोघं एकत्रं !
युट्युबवर महागुरुंच्या रीन १
युट्युबवर महागुरुंच्या रीन १-२-३ चे एपिसोड मिळाले. खूप मजा आली. )हे कुठेतरी प्राईम वगैरे वर अधिकृत मिळाले तर जास्त बरे.)
सुमीत राघवन हा अतिशय गुणी कलाकार )आपल्या आणि त्याच्या) लहानपणापासूनच आहे. बॉबी देओल काय भन्नाट केलाय त्याने. आणि छोले मध्ये धर्मेंद्र.
छोले २ भाग असल्याने प्रदीर्घ आहे. त्यात मध्ये महागुरु किस्से जरा लांबतात, पण तरी मजेशीर आहे. कॉपी फार चांगल्या नाहीत. पण अधिकृत पेड कॉपी अस्तित्वात नसल्याने आहे ते चालवुन घेणे भाग आहे.
मी_अनु, प्रचंड अनुमोदन.
मी_अनु, प्रचंड अनुमोदन. भन्नाट आहे ही सिरीज. तुला कुठे याचे चांगले भाग मिळाले तर मला पण सांग प्लीज.
रीन १-२-३. काय आहे हे?
रीन १-२-३. काय आहे हे?
एक- दो- तीन अशी सीरिज होती
एक- दो- तीन अशी सीरिज होती पूर्वी सोनी का स्टार प्लस वर महागुरुंची
प्रसिद्ध सिनेमाचे spoof असायचे
ए_श्रद्धा +१ मिळाली.
ए_श्रद्धा +१ मिळाली.
नेटफ्लिक्सवर ‘ऑपरेशन वार्सिटी
नेटफ्लिक्सवर ‘ऑपरेशन वार्सिटी ब्लूज- कॉलेज अॅडमिशन स्कँडल’ बघायलाच हवं. अमेरिकेतल्या टॉप कॉलेजेसमध्ये मुलांना अॅड्मिशन मिळावी म्हणून श्रीमंत आईबाप काय काय करतात आणि काय काय करता येऊ शकतं हे कळतं. खर्या घटनांवर आधारीत सिरिज आहे.
सायो - धन्यवाद. मीही परवाच
सायो - धन्यवाद. मीही परवाच ऐकले या सिरीज बद्दल.
एचबीओ मॅक्स वर "Q anon" बद्दल नवीन डॉक्यु. आली आहे. इण्टरेस्टिंग आहे.
Mxplayer वर पांडू पहिली. बरेच
Mxplayer वर पांडू पहिली. बरेच दिवसांपासून पाहायची होती पण आता ह्या सीरिजला मटा पुरस्कार मिळाल्याने मुद्दाम पहिली.
खूप आवडली. साधी सिम्पल सीरिज आजकाल पाहायला मिळताच नाही. मुंबईच्या पोलिसांवर, त्यांच्या रोजच्या जीवनावर आहे. भडिपा ची निर्मिती. ६ च भाग आहेत. पटकन होते बघून.
mxplayer डाउनलोड केल्यामुळे त्यावर काय ट्रेंडिंग आहे म्हणून चेक केले व ती ट्रेंडिंग सिरीज बघायला सुरवात केली तर अबबब......धक्काच बसला. सेमीपॉर्न सिरीज इतक्या सहज उपलबध ? Mxplayer हा प्लॅटफॉर्म फ्री आहे मग आईवडील कसं लहान मुलांना बघण्यापासून वाचवणार ? मी काही prude नाही पण तरी धक्का बसला. आणि ट्रेंडिंग आहे म्हणजे कित्येक जण बघत असणार. नुसते १८+ लिहून काय फायदा ?
Pages