Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काय सुंदर फोटो निलाक्षी...
काय सुंदर फोटो निलाक्षी...
निलाक्षी वाह पुरणपोळ्या मस्त.
निलाक्षी वाह पुरणपोळ्या मस्त.
आमचं पास्ता सलाड

(No subject)
आज ची थाळी
पुपो , शेंगदाणे + गुळ पोळी , भात , कटाची आमटी , दूध , ब ची भा..
निलाक्षी, अनिश्का मस्तच
निलाक्षी, अनिश्का मस्तच
निलाक्षी, पुरणपोळी आणि
निलाक्षी, पुरणपोळी आणि प्रेझेन्टेशन सुपर्ब.
माझेमन,पास्ता सलाड कसं बनवतात?
अनिश्का थाळी मस्तच, आलेच जेवायला
आज चा मेनू पु्पो, चपाती, पातळ
आज चा मेनू पु्पो, चपाती, पातळ भाजी, पंचामृत, कडी आणि मिक्स डाळीचे वडे
. पुपो
.
पुपो
(No subject)
अनिश्का, उदयगिरी, किल्ली होळी
अनिश्का, उदयगिरी, किल्ली होळी स्पेशल मेनू मस्तच...
क्या बात है!!! सर्वांचेच मेनु
क्या बात है!!! सर्वांचेच मेनु दिलखेचक.
सगळे मेनू एकसे एक .
सगळे मेनू एकसे एक .
सामो , दिलखेचक वाचून माझा 'दिलखेचक चिंतन' हा विनोदी लेख आठवला.
(No subject)
आमचा आजचा मेनू वाटली डाळ, का
आमचा आजचा मेनू वाटली डाळ, का को, शेवयांची खीर, पुरण पोळी,कटाची आमटी, बटाटा भाजी
कैरीची आंबट गोड़ चटणी.
कैरीची आंबट गोड़ चटणी.
सगळे होळी स्पेशल ताट
सगळे होळी स्पेशल ताट
एकसो बढकर एक..
धाग्याच्या header मधली भेळ
धाग्याच्या header मधली भेळ रोज माझा थोडा थोडा खून करत असते
फारच तों पा सु आहे
मी रुचा कैरीची चटणी मस्त
मी रुचा कैरीची चटणी मस्त
>>>>>सामो , दिलखेचक वाचून
>>>>>सामो , दिलखेचक वाचून माझा 'दिलखेचक चिंतन' हा विनोदी लेख आठवला. Happy>>>>
सेलफोन खाली नसावा. फोटो
सेलफोन खाली नसावा. फोटो काढताना खाली त्याचे प्रतिबिंब दिसते आहे. >>> अगदी बरोबर.. पण मला आश्चर्य वाटले मानवमामांना हे कसे सुचले नाही याचे
@ स्वस्ति, या सोबत फक्क्कड चहा हवा >>>> येस्स, चहाच हवा, दिवसातून दहा वेळा मी तोच पितो. पण वेळ मध्यरात्री साडेतीनची असल्याने ती वेळ कॉफीला अर्पण केली आहे ईतकेच
निलाक्षी, पुरणपोळी एक नंबर दिसतेय... आमची उद्याच बनेल वाटतेय
आणि ती मांडलेली चार ताटे बघून जेवायलाच बसावेसे वाटतेय.. वेगवेगळ्या साईजची चिल्यापिल्यांची आहेत वाटते
मी रुचा कैरीची चटणी मस्त>
मी रुचा कैरीची चटणी मस्त>>धन्यवाद माझे मन.
पार्टीची तयारी.
पार्टीची तयारी.



.
दही वडा, मसाला चणा आणि श्रीखंड.
रगडा पाणी पुरी
उदयगिरी आम्ही निघालोय पार्टी
उदयगिरी आम्ही निघालोय पार्टी ला यायला
कधीही या, आपले स्वागत आहे
कधीही या, आपले स्वागत आहे
मी पण
मी पण
अप्पे
अप्पे
उदयगिरी मस्तच पार्टी!
उदयगिरी मस्तच पार्टी!
आप्पे पण मस्त.
आंब्याची कढी
आंब्याची कढी

दिप्ती_३०, रेसिपी टाका रवा कप
दिप्ती_३०, रेसिपी टाका रवा कप केकची. मस्त दिसताहेत.>>>
कढईतल्या रवा केकची कृती :
साहित्य:
दही - १/२ कप
साखर - १/२ कप (गोड जास्त हवं असल्यास २ चमचे जास्त घालू शकता)
बारीक रवा - १ कप
दूध - ३/४ कप
वॅनिला इसेन्स - १/२ टी स्पून
बेकिंग पावडर - १ टी स्पून
बेकिंग सोडा - १/२ टी स्पून
लिंबाचा रस - २ टेबल स्पून
तेल - १/४ कप
कृती :


प्रथम मिक्सर च्या मोठ्या भांड्यात दही, साखर, बारीक रवा आणि दूध घेऊन ते ३०-४० सेकंद फिरवून घ्यावं. १०-१५ मिनिट तसेच ठेवावे. तोपर्यंत कढईच्या तळाला मीठ पसरवून कढईवर झाकण ठेवून ती प्री हीट करावी. ज्या मोल्ड मध्ये कप केक बनवायचे आहेत त्याला तेल किंवा तूप आतून चोळून घ्यावं. (मी मिसळीच्या डब्यातल्या वाट्या वापरल्या होत्या. )
आता मिक्सरच्या भांड्यातल्या रव्यात दही साखर आणि दूध छान मुरल असेल. त्यात वॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालावा. त्या बेकिंग सोड्यावर लिंबाचा रस टाकावा . छान फेस येतो एनोसारखा. तेल घालावे. आता मिक्सर चालू करून हे मिश्रण १०-२० सेकंद फिरवून घावे. (फक्त सगळं साहित्य एकजीव होण्यासाठी फिरवावे, जास्त फिरवू नये.) मिश्रण मोल्ड मध्ये ओतावे. मोल्ड कढई मध्ये ठेवून वर झाकण ठेवावे. झाकण काचेचे असल्यास उत्तम. २०-२५ मिनिटात केक तयार होतो. (मोल्ड्स मोठे असतील आणि मिश्रण जास्त असेल तर जास्त वेळ लागू शकतो.) त्याआधी झाकण काढू नये. मोल्डच्या मध्यभागी टूथपिक घालून पाहावे. टूथपिक स्वच्छ बाहेर आली म्हणजे केक आतपर्यंत शिजलाय. थंड झाल्यावर मोल्डमधून काढावा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हेच प्रमाण वापरून मी वॅनिला मँगो टूटी फ्रुटी केक बनवला.
कढई मधल्या पावासाठी मी हेब्बर
कढई मधल्या पावासाठी मी हेब्बर किचन ची लादी पाव इन कुकर हि रेसिपी वापरली. लिंक खाली दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=75LA8UjFgFU
होळीला आमच्याकडे तेलपोळ्या
होळीला आमच्याकडे तेलपोळ्या करतात. लग्नानंतर पाहिलांदाच पुरण करण्यापासून पीठ मळून पोळ्या पत्र्यावर लाटण्या पासून ते भाजण्यापर्यंत मी केले. नाहीतर माहेरी मी फक्त पिठात पुरण भरून ते तेलात भिजवून लाटायचे. कधी कधी पोळी भाजायला मिळायची. बाकी सगळं आईच करायची. पहिल्याच प्रयत्नात जमल्या.


Pages