युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

माझ्याकडे लाल रंगाचे बटाटे आहेत त्याचे काय करू शकतो.. ( महाबळेश्वरला मिळतात, आणि ते मधुमेहवाल्याना ला चालतील का ? )

उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत लाईट नसणार..(प्रत्येक महिन्यात असा एक दिवस असतो)
मटर खराब तर होणार नाहीत ना?? >> एका प्लास्टिकच्या पेल्यात पाणी भरून ( काठोकाठ नाही ) फ्रीझरमधे ठेवा. पूर्ण गोठले की त्यावर एक छोटे नाणे ठेवा आणि परत तो पेला फ्रीझ मधे ठेवा. वीज नसेल तेंव्हा फ्रीज सारखा सारखा उघडबंद केला नाही तर बराच काळ गोष्टी फ्रोझन राहू शकतात. नक्की किती वेळ हे फ्रीझची क्षमता, बाहेरचे तापमान या सर्वावर अवलंबून असते. वीज परत आली की ते नाणे चेक करा. जर नाणे तळाला किंवा खाली गेले असेल तर या काळात फ्रीझरमधले बर्फ वितळले असणार आणि त्याबरोबर इतरही पदार्थांचे तापमान वाढलेले असणार.
असा एक पेला बर्फ + त्यावर एक नाणे असे इथले काही लोक नियमित फ्रीझरमधे ठेवतात.

अमुपरी भारी आईडया, घरच्या पब्लिकला चाट प्रकार आवडेल.

मला टोमॅटो कांदा रस्यात घालून खायला आवडेल.

तांदळात घालून पुलाव करायचा विचार डोक्यात आलेला पण कितपत चांगला लागेल ही शंका वाटली.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

लाल बटाटे सहसा ओव्हनमध्ये लसूणाबरोबर/गार्लिक सॉल्ट बरोबर भाजतात. मसूर/बार्ली इ च्या सूप मध्ये पण चालतात. दोन्ही खाल्ले आहे. छानच लागते. मधुमेहींना चालतात का ते माहिती नाही.

माझ्याकडंच दही आंबट झालंय. भरपूर दही आहे त्यामुळे फेकवत नाहीये. फ्रीज मध्ये ठेवून पाहिलं पण आंबट पणा कमी होत नाहीये.

Youtube वर एक दोन व्हिडीओ पाहिले आंबटपणा कमी करण्यासाठी पण दही जवळ पास 1 लिटर दुधाचं बनवलंय त्यामुळे त्यात पुन्हा एक लिटर दुध घातलं तर ते अति प्रमाणात होईल आणि पुन्हा इतकं संपणार पण नाही.
तर

दह्याचा आहे त्याच प्रमाणात आंबटपणा कमी करता येईल का ?
हे खाण्यायोग्य आहे का ? दह्याला वास येत नाहीये, अळी नाहीये आणि चिकटपणाही नाहीये
आंबट दही वापरून काय पदार्थ बनवता येतील? (खाणारी तोंड सव्वा दोन)

आंबट दयाचेही अनेक प्रकार होऊ शकतील की... ढोकळा, रवा ईडली, कढी गोळे, पराठे भिजवायला वापरायचं, दह्यातलं पिठलं, उकडलेल्या बटाट्याची दह्यातली भाजी, रवा-मैदा-कणीक समप्रमाणात दह्यात भिजवून भटुरे..................

थोडं थोडं ह्यात त्यात, हे ते करुन संपव. त्याचं बरंच काही करता येईल रीया पण गोड पदार्थ करायला गेलं तर प्रचंड साखर लागेल, श्रीखंडाच्या वड्या वगैरे होऊ शकतात.

दुसरा एक उपाय म्हणजे त्याचं ताक कर आणि भरपूर पाणी घालून फ्रीजमध्ये ठेव. काही तासानंतर वरती आलेलं पाणी टाकून द्यायचं आणि परत पाणी घालून ठेवायचं, असं केल्याने आंबटपणा कमी होतो. दोन तीनदा हे केलं तर आंबटपणा कमी होईल.

कढी, दही वडे, दम आलू हे सगळं त्या दह्यामुळे आंबट नाही होणार का ? का खूप साखर घालायची म्हणताय त्यात हे करताना ?

दह्यातलं पिठलं आणि पराठा नोटेड. ढोकळा आणि रवा इडली करून पहिली, मला जमली नाही.

अंजुताई, श्रीखंडा पर्यंत पोहचण्याएवढी सुगरण नाही झाले मी अजून. मला फार अवघड जाईल ते प्रकरण. नवऱ्याला येतं अर्थात सो त्याच्या गळ्यात मारते. फक्त तो तयार व्हायला हवा. त्याचं सगळ्याच बाबतीत म्हणणं असतं 'दे टाकून'

चक्का नाही केला तर ताकाचा प्रकार करून बघते.

थोडं यात थोडं त्यात करून च संपवावं लागणार आहे मला असं दिसतंय चक्का नाही केला तर.

एक आणखी आंध्रा साईड चा पदार्थ पहिला youtube वर तांदळाचं पीठ घालून करतात तो पण आम्ही दोघं तळलेले पदार्थ खात नाही आहोत. त्यामुळे त्याला पास पण ते पण एखाद्या दिवशी करून बघेन आणि शेजारी राहणाऱ्या गुजरात्यांच्या घरात पण देऊन येईन म्हणजे खपेल जरा पदार्थ

<<दुसरा एक उपाय म्हणजे त्याचं ताक कर आणि भरपूर पाणी घालून फ्रीजमध्ये ठेव. काही तासानंतर वरती आलेलं पाणी टाकून द्यायचं आणि परत पाणी घालून ठेवायचं, असं केल्याने आंबटपणा कमी होतो. दोन तीनदा हे केलं तर आंबटपणा कमी होईल.>> +११११

"ताकतल्या पुऱ्या पाकात" आईकडचा हिट पदार्थ. मस्त होतात.
दह्यामध्ये संप्रमाणात रवा आणि कणिक, थोडं मीठ घालून भिजवून ठेवा. लहान लहान पुऱ्या तळून पाकात सोडा. ४ ५ दिवस टिकतील फ्रिज बाहेर

कणिक + ज्वारी पीठ + दही, लसूण मिरची ठेचा टाकून धिरडी होतील.

रीया, श्रीखंड कर. ते सोपंय आणि टीकाऊ पण. रात्री दही बांधून ठेव. Hand ब्लेंडर ने दुसऱ्या दिवशी क्रीम घालून ब्लेंड कर. पिठीसाखर घालून मिक्स कर.

मंजूताई +12345

चक्का केला तर दही पण कमी होते आणि श्रीखंड बनवून शेजारी 2 वाट्या द्यायचे.

Cookingshooking चा हांडवो चा व्हिडिओ पाहिल्यास त्यात खूप आंबट दही वापरायचे आहे. आणि कृती पण सोपी आहे.

हो रीया कर श्रीखंड आणि दे शेजारी.

माझ्याकडे पूर्वी काही वर्ष फ्रीज नव्हता, तेव्हा ताक बाहेर लवकर आंबट व्हायचं, तेव्हा मी पाण्याचा वर सांगितलेला उपाय करायचे. माझ्या सा बांनी सुचवलेला उपाय. तू हा करणार असशील उपाय तर ताक बाहेर ठेऊ नकोस, फ्रीजमधेच ठेव.

काश्मिरी दम आलू चवीला थोडं आंबट असतं. आणि खड्या मसाल्यांचं प्रमाण थोडं वाढवून मारता येतो आंबटपणा. पण चक्का लावून श्रीखंड ही आयडीआ बेस्ट. श्रीखंड करायचं नसेल तर सॅलड्समधे चक्का वापरता येईल. माबोवर पाककृती आहेत अशा. किंवा ताकातलं पाणी काढून दुसरं पाणी घालून एखादी ताकातली पातळ भाजी करा.

अंजू यांनी सांगितलेला उपायच याआधी ऐकला होता. पण त्यात ताक करायचं माहीत नव्हतं.
To get rid of this sourness, here is a fantastic tip. In a bowl of sour curd, add 1/2 cup of water and allow it to settle for 2 minutes. Take out the water from the top to another bowl . Repeat the process for 3-4 times depending upon the sourness of the curd

रीया, कढीसाठी थोडं आंबटच ताक वापरतात आणि जरी दही आंबट असलं तरी ताक तितकं आंबट होत नाही. पण मंजूताईंची श्रीखंडाची कल्पना बेस्ट वाटतेय!

हो जि कढी, ढोकळा, उकड, ताकातल्या भाज्या, आंबील या सर्वांसाठी आंबट ताक नसेल तर मजा येत नाही. कढीत, ताकातल्या भाज्यात, आंबीलमध्ये मात्र साखर टाकावी लागते थोडी पण बाकी उकड आणि ढोकळा करताना मी साखर घालत नाही . ढोकळयात बरेच जण घालतात पण मी नाही घालत.

भरत तुम्ही सुचवलेला उपाय पण चांगला आहे.

मी पण आंबटपणा कमी करायला अंजू ने सांगितलंय ती प्रोसेस करते. 2,3 दा पाणी काढून टाकलं की हमखास आंबटपणा कमी होतो.

@ रिया: दही खूप आंबट असल्यास त्यात दह्याच्या अर्धे कोमट पाणी घालून निदान अर्धा तास तरी झाकून ठेवावे. त्यानंतर दह्याचा साका खाली पूर्णपणे खाली बसल्यावर वरचे पूर्ण पाणी काढून फेकावे किंवा त्याचा इतरत्र उपयोग करावा. मामी व मावशीच्या मते दह्याचा आंबटपणा कमी करायचा हा हमखास उपाय आहे. त्यांच्या गावाला कधी कधी दूधडेअरीतुन आंबट दही आणले जाते, तेव्हा हाच उपाय अवलंबला जातो.

आंबटपणा कमी करायला अंजू ने सांगितलंय ती प्रोसेस करते. 2,3 दा पाणी काढून टाकलं की हमखास आंबटपणा कमी होतो.>>+१ माझी आई असेच करते. याला आम्ही दही धुउन घेणे म्हणतो.

पाणि काढुन घ्या किंवा सरळ चक्का करा. त्यात देसाई बंधु किंवा रत्नाचा मॅगो पल्प घालून मँगो लस्सी किंवा रोझ सिरप घालून रोझ लस्सी.
साखर जास्त घालायला लागत नाही कारण अल्रेडी खुप साखर असते पल्प्/सिरप मध्ये.
लवकर संपून जाईल.

दही घालून रव्याचा केक पण छान जमतो. एक मोदक पात्रासारखं केकपात्र असतं. त्याखाली वाळू ठेवून भाजतात. (असल्या धेडगुजरी शब्दाचे मला नेहमी कौतुक असते. सरळ केक टीन म्हणावे ना पण केक पात्र!!!). घरात अंडे न खाणार्‍या मंडळींसाठी असा केक बनवला जायचा. मस्त असायचा. आता एवढ्यात नाही खाल्ला.

Pages