खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@Shraddha , मृणाली: हो, उकडपेंडी आहे, साध्या कणकेची.

म्हाळसा भारी दिसतेय तुमची अवघड उच्चार आणि स्पेलिंग वाली डिश! हुतात्मा होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही.

वाह मस्तं डिशेस एकदम.
मृणाली, म्हाळसा, अमुपुरी छानच.

आज आमच्याकडे उडीद वडा सांबर. पण आईने केलंय Lol

पावभाजी मस्त.
रातातुई भारीच दिसत आहे म्हाळसा.

या जेवायला..
शेतात उगवलेल्या सुरमई चे कालवण Wink
IMG_20210214_134235.JPG

म्हाळसांची डिश, तिचं नाव आणि उच्चार सगळ्यांनाच माहिती आहे तर.... मीच एक गावठी निघालो. Happy

रगडा पॅटिस मस्त मी_रुचा

Valentine Day Special
Home Made Cakes
One for Adults, One for Kids Happy

1613335134188.jpg
.
1613335197320.jpg
.
1613335228568.jpg

केक मस्त. हल्ली मला केक पाहिला कि साखर, मैदा, लोणी दिसायला लागते.
कच्चे केळे उकडतात का?>> नाही. मोठी केळी(Plantains) पूर्ण पिकू द्यायची(तेव्हाही ती कडक असतात) मग वाफवायची.(पाण्यात उकडायची नाहीत. वरच्या वाक्यात चूकून उकडलेली असे लिहीले आहे.)
बऱ्याच लोकांना त्या उकडलेल्या केळ्याचा वास नाही आवडत. आमच्या घरात ते खाणारे फक्त मी आणि माझा मुलगा.

केक मस्तच आहे.
ऋन्मेष तुमची पत्नी हौशी व सुग्रण आहे. >> +11111

ऋन्मेष तुमची पत्नी हौशी व सुग्रण आहे. >> +11111 ---- हो खरेय, धन्यवाद Happy

आज मोदक का? काही सणवार स्पेशल दिवस संकष्टी जयंती वगैरे होते का आज?
मी सुद्धा आज ऑफिस कँटीनमध्ये दुपारी साबुदाण्याची खिचडी खाल्ली
आणि दुपारी तिथेच नॉनवेज Happy

अरे हो, आज माघी गणेश जयंती होती ना... आमच्या जुन्या बिल्डींगमध्ये महाप्रसाद असायचा. किती धमाल असायची, दरवर्षी माझे कॉलेजचे मित्रही यायचे.. छे, आज लक्षातही नाही, माहितही नाही Sad
गणपती बाप्पा मोरया !!!

Pages