खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

PSX_20210210_215652.jpg
साधसच जेवण आहे.. प्लेटात दिसणारे मुगाच्या डाळीचे वरण आहे कढीपत्ता, हिंग आणि थोडी मेथी (my style ) बाकी ताट कलरफूल करण्याचा प्रयत्न केलाय.
पांढरा, लाल वगैरे रंग वापरून.

आज पहिल्यांदाच रेसिपीत दाखवले त्यापेक्षा जास्त लोकांसाठी नाश्ता बनवला आहे.
पोहे, दही, रवा आणि असतील त्या भाज्या.
सिमला मिर्ची, कोबी, आलं, लसूण आहे यात.
एखादं छानसं नाव पण सुचवा. क्रिस्पी आहे एकदम.
IMG_20210211_074342~2.jpgIMG_20210211_074335~2.jpg

पोहे, दही, रवा आणि असतील त्या भाज्या.
सिमला मिर्ची, कोबी, आलं, लसूण आहे यात.
>>>>>

हे असले आमच्याकडेही बायको करते. छान लागते खूप. गरमागरम बनवतानाच थोडे थोडे खातच राहावेसे वाटते चटक लागल्यासारखे..

केळ्याच्या पिठापासून काय बनवता येईल?>>>> उपासाच्या थालीपीठात वापरता येते. किंवा कणिक , आले- लसुण- मिर्ची पेस्ट , कोथिंबीर घालुन मळुन पराठे.

20210212_125805.jpg

सर्व पदार्थ मस्त! ते दाणेदार दही मला प्रचंड आवडते. भारतातून येताना मी नेहमी विरजण घेऊन येते पण तसे दही लागत नाही आणि क्वचित लागले तरी नंतर त्याचे विरजण टिकत नाही. Sad
मागे एक व्हिडीओ पाहिला होता. दह्यात ६-७ बदाम ७-८ तास भिजवून ठेवायचे मग ते बदाम लागेल तेव्हा विरजण म्हणून वापरायचे. पुढच्या वेळेस हाही प्रयोग करून बघणार आहे.

शिरा करायचा म्हणजे पेशन्स हवा. रवा मंद आचेवरती तांबूस परतायचा Sad त्या पेशन्सची तर कमी आहे ना. मग शिरा ॲनिमिक होतो. काल अ‍ॅनिमिक शिरा केला Wink

कोई भी पका सकता है!!
Movie माझा आवडता आहे तो!
Ratatui मस्त दिसतेय yummy
Veg dish असेल तर पाकृ द्या की म्हाळसादेवी Happy

यस्स, कोणीही पकऊ शकतं .. किल्ली, तो माझा पण आवडता movie आहे.. आणि हो शंभर टक्के वेज रेसिपी आहे.. लवकरच टाकते

Pages