खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शेवपूरी आणी समोसे मस्त.
Mrunali साधेसुधे जेवण पण छान आहे..
मक्याची भाकरी आणी छोले पूरी पण मस्त दिसत आहे आधिच्या पानावरचे..

सुप्रभात खवय्यांनो! Happy

अगं रानभुली खूप सोप्पे पदार्थ च करते..उलट इथे लोक किती मस्त मस्त बनवतात त्याचच कौतूक वाटतं..

केया..हो बीटाचेच पराठे आहेत.
बीट किसून.. थोड आलं किसून.. लाल मिरची, हळद, धनेजिरे पावडर जरा, मीठ, कोथिंबीर,गव्हाचे पीठ मिक्स करून चपाती लाटायची...हिरवी मिरची पण बारीक चिरून टाकू शकता, छान लागते..मी नाही टाकली.. मुलं खायची नाहीत म्हणून.
मुलांसाठी म्हणून तुपाचे आम्हाला कोरडेच बीन तेल/तुप पण छान लागतात दह्यासोबत.

थँक्स सामो, लावण्या !

बीटाचे पराठे खूप मस्त.
दिसायलाही मस्त आणि हेल्थीही.
मीही माझा मुलगा लहान असताना त्याच्या पोटात ढकल्यानासाठी हे करायचे.
आता बीटाची कोशिंबीर करते.

हुलग्याची उसळ छान!
बीटाचे पराठे मस्तच! भाजी देखिल छान होते बीटाची बारीक फोडी करून ह. डाळ, नारळ, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या इत्यादी वापरून वाफवली की.

थँक्स रूचा, रूपाली !
थँक्स कृष्णा !
भाजी देखिल छान होते बीटाची बारीक फोडी करून ह. डाळ, नारळ, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या इत्यादी वापरून वाफवली की.>>>
हो मी पण अशी भाजी करते छान लागते..

नाही.. मी जराशी फोडणीत टाकते..बीट उकडून घेते....फोडणीत कांदा, हिरवी मिरची, मोहरी,कडीपत्ता, ह.डाळ छोटा चमचा, चिरलेला बीट..शेवटी कोथिंबीर आणि किसलेले ताजं खोबरं.. फोटो आहे का बघते.. असेल तर टाकते

मृणालिनी यांचे पाहून काल बीट पराठे केले फार यमी लागतात. पण मी जी रेसिपी वाचली ती वरीलप्रमाणेच पण तीळ व कोथिंबीर , धणे पूड वगैरे घालून केलेली होती. तीळांनी खमंगपणा आला.

बीट पराठे मस्त.
सामो भोपळी मिर्ची ची भाजी छान. मलाही अशीच भाजी आवडते भोपळी मिर्ची ची.. आणी कोणत्याही कोरड्या भाजी बरोबर दह्या चे combination मस्त च लागते.

Pages