अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
(No subject)
चुकलंय जरा टाकतो परत
माऊई आणि सांता क्यूट आहेत
माऊई आणि सांता क्यूट आहेत
(No subject)
हो गं सिंडरेला आता ते दोघं ९
हो गं सिंडरेला आता ते दोघं ९ महिन्याचे झाले.
सँटाची हॅट घालूनच घेतली नाही म्हणून मग हा मोजा तरी ठेवून घेईल का बघत होतो. भाव असे आलेत की काय ठेवलंय ते डोक्यावर काढा पटकन
(No subject)
कसला क्यूट फोटो! काल तुम्ही
कसला क्यूट फोटो! काल तुम्ही लिहिलेल्या किश्श्यातले सगळे सार यात आलंय
(No subject)
किती गोड!
किती गोड!
भारी फोटो!!
भारी फोटो!!
मस्त फोटो. काळ्या आगावे
मस्त फोटो. काळ्या आगावे
सगळी बाळं क्यूट!
सगळी बाळं क्यूट!
पाहुण्या बाळाचा आणि ओडीनचा फोटो मस्त!
आपल्या मनस्थिती चा भुभु वर
आपल्या मनस्थिती चा भुभु वर कसा परिणाम होतो याचे काल उदाहरण अनुभवले
काल खांद्यात चमक भरली होती, सतत कळ येत होती, त्यातून कामाचा प्रचंड लोड, फोनाफोनी किरकिर, हप्ते भरल्यावर आता आपला बँक बॅलन्स किती कमी होत चाललाय याची काळजी
असं सगळं दाटून आलं होतं
त्यात ओडीन ची वेळ होताच त्याने कुईकुई करून उत आणला
म्हणलं देतोय थांब जरा पण ऐकेना
मग तसाच तिरमिरीत खाली गेलो, मुलगा निवांत टीव्ही बघत बसलेला
ओरडलो नाही पण चांगलीच कानउघडणी केली
म्हणलं फक्त खेळायला आणला नाहीये, थोडी जबाबदारी घ्यायला नको
घरात चिकन आणून शिजवून ठेवलेलं आहे, भाकरी तयार आहे
काय करायचं असतं वेगळं, ते सगळं कुस्करून त्याला वेळेवर खायला द्यायचं
हे सुद्धा मी करायचा, कामातून उठून आणि तू पड इथे निवांत टीव्ही बघत
असं बरंच बोललो आणि बोलत बोलत ओडीन चे जेवण केलं तयार आणि त्याच्यापुढे ठेवलं म्हणलं चल खा आता पटकन
तर अत्यंत आवडीचे चिकन असूनही त्याने तोंडही लावले नाही
नुसता वास घेतला आणि बसून राहिला
मला वाटलं खराब झालं का काय चिकन म्हणून मी वास घेऊन पहिला पण ओके होतं सगळं
पॉटी पण झालेली होती
मग त्याला फिरवून आणलं थोडं बाहेर तरी खाईना
म्हणलं हे काय आता नाटक
मग मुलगा म्हणाला मी देतो, आणि मग त्याने बाउल घेतला आणि त्याला मानेवर हात फिरवत तुझ्यावर नाही चिडलाय, तू खा मस्त
आणि मग जसं काही कळलं असावं तसं त्याच्या हातून खाल्लं सगळं चाटून पुसून
म्हणलं माझी अस्वस्थ मनस्थिती त्याच्या अन्नात उतरली असणार
आणि म्हणलं आपण जेव्हा असे रागारागात, चिडचिड करत जेवत असतो तेव्हा आपण किती स्वतःलाच त्रास करून घेत असतो
ओह.ओडिन ला किती वाईट वाटलं
ओह.ओडिन ला किती वाईट वाटलं असेल.पण बरंय मुलांर समजवलं
मग मुलगा म्हणाला मी देतो, आणि
मग मुलगा म्हणाला मी देतो, आणि मग त्याने बाउल घेतला आणि त्याला मानेवर हात फिरवत तुझ्यावर नाही चिडलाय, >>>> वा! लेकही गुणी आहे.
<<<<> मुलगा निवांत टीव्ही बघत
<<<<> मुलगा निवांत टीव्ही बघत बसलेला
ओरडलो नाही पण चांगलीच कानउघडणी केली
म्हणलं फक्त खेळायला आणला नाहीये, थोडी जबाबदारी घ्यायला नको
घरात चिकन आणून शिजवून ठेवलेलं आहे, भाकरी तयार आहे
काय करायचं असतं वेगळं, ते सगळं कुस्करून त्याला वेळेवर खायला द्यायचं
हे सुद्धा मी करायचा, कामातून उठून आणि तू पड इथे निवांत टीव्ही बघत
असं बरंच बोललो >>>>
आमच्याघरी पण हेच ( सं )वाद असतात....
स्नोई पण असे चिडचिड करून खायला दिले तर तोंडाकडे केविलवाणे पणे बघत बसतो.. खात नाही आजिबात.
त्याला गोड बोलून खा रे म्हणावे लागते तरच खातो. .
आमचा स्नोई पान 4 वरचा.. पांघरूण घेऊन वामकुक्षी करणारा आता इथे बरेच स्नोई आहेत म्हणून ही जादा माहिती
4 वरचा.. पांघरूण घेऊन
4 वरचा.. पांघरूण घेऊन वामकुक्षी करणारा>>>> पाहून आले स्नोईला,छान झोपलाय.
बाबा आज सकाळी टीव्ही वर स्टॉक
बाबा आज सकाळी टीव्ही वर स्टॉक मार्केट बघत बसलेले
ओड्या तिकडेच खेळत होता आजूबाजूला
ते एकदम म्हणाले अरे हा शेअर एवढा वरती गेला, बापरे
ओड्याला काय शेअर म्हणजे मांजर वाटलं देव जाणे
तो तातडीने उठला मागच्या अंगणात जाऊन मांजर जिथं बसतं तिथे जाऊन भुंकून आला
बाबांना काही कळलंच नाही तो काय करून आला एकदम
शेअर म्हणजे मांजर >> काय
शेअर म्हणजे मांजर >> काय डोकी चालतात त्यांची ते त्यांनाच माहित.
एवढा वरती गेला --- हे वाक्य
एवढा वरती गेला --- हे वाक्य / उच्चार आवाज ओळखता येते बहुतेक त्याला.
ते तुमचे मांजर झाडावर / भिंतीवर आणि हा खालून भुंकतो ना?
उगाचच वेगळी निरर्थक वाक्ये म्हणून बघा 'एवढा वरती गेला' मोठ्याने उच्चारून. बघा धावतो का बाहेर.
हे भारीच आहे.
हे भारीच आहे.
म्याव वर गेली वगैरे म्हणून बघा.
हो केला मग आता हाही प्रयोग
हो केला मग आता हाही प्रयोग
म्हणलं बापरे, तीन हजारने वरती चढला सेन्सेक्स
सेम रिएक्शन आली, तसाच बाहेर जाऊन बघायला लागला कोण कुठं भिंतीवर चढलाय ते
पोरगा हसून हसून लोळतोय
ओडीन
ओडीन
ते एकदम म्हणाले अरे हा शेअर
ते एकदम म्हणाले अरे हा शेअर एवढा वरती गेला, बापरे >>> मला वाटलं आता पुढचं वाक्य "ओडीन आत जाऊन चेकबूक घेऊन आला. जणू सांगत होता की काका, ह्यात कराच इंव्हेस्ट हा अजून वर जाणार.. ! शिवाय पुढचे दोन पाय उचलून 'शेअर वर जाणार 'असं इंडीकेट पण केलं... " असं येतय की काय.. ! आशु, तुझ्या पोस्टी "फडकुल्यां"च्या वळणावर जाणार अशी धास्ती वाटते कधीकधी..
गोड आहे ओडीन
गोड आहे ओडीन
धमाल आहे.
धमाल आहे.
फडकुले चा पोपट होता हो
फडकुले चा पोपट होता हो
जोशीण बाईंचा मॅकमिलन
नई नई ओड्या असले काही उद्योग करत नाही
उलट कधी कधी इतका मॅड पणा करतो की याला शाळा अभ्यास वगैरे काही घ्यावं लागतं नाही हे किती बरंय असा विचार येतो मनात
कळत तर ढेकळं नाही, पण कुतूहल
कळत तर ढेकळं नाही, पण कुतूहल नुसतं ओसंडून वाहत असतं चेहऱ्यावरून
ओडीनचे फोटो आणि किस्से भारी
ओडीनचे फोटो आणि किस्से भारी आहेत! इथल्या सगळ्याच बाळांच्या गमती वाचायला मजा येते.
फडकुले चा पोपट होता हो
फडकुले चा पोपट होता हो
जोशीण बाईंचा मॅकमिलन
टॉमी पण असतो ना कोणाचा तरी. ती नावं भारी आहेत. व्हिक्टोरिया, सिंडरेला, अलेक्झांडर बोका आणि दुष्यंत!
कुतुहल ओसंडून वहातंय.
कुतुहल ओसंडून वहातंय.
Pages