भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुंतल - माउई coton de tulear +कॅवेलियर आहे. कॉटन चे जास्त लूक्स आणि ट्रेट्स आहेत मात्र त्याच्यात.

ईथले सर्व भुभु आणि माउ प्रचंड क्युट आहेत. लवकरच आमच्या भुभुच्या गमति जमति ईथे शेअर करेन. महिना अखेरिला घरी येइल हे पिल्लु
6FA495D8-428C-4C5F-B0B1-5948463A064C.jpeg

मस्त आहे पिल्लू, समीर ! Happy

आमची सिच्वेशन बरीच सुधारली आहे. आता वर खोचुन ठेवलेले पडदे बॅक टू नॉर्मल आले आहेत आणि ज्योई ते ओढत किंवा कुरतडत नाहीये (अजून तरी). आता हलवलेला टीव्हीपण पुन्हा मुळ जागी आणायचा आहे. पॉटी ट्रेनिंग फ्रंटवरही बरं चाललय (टच वूड). ठराविक वेळांना तो गॅलरीच्या दाराकडे जातो. दार उघडून दिलं की करून येतो. ते घंटा वाजवायचं शिकवायचं आहे आता.
एकटं रहाण्याचं जमत नाहीये अजून. आम्ही जेव्हडा वेळ बाहेर जातो, तेव्हडा वेळ पूर्ण भुंकत बसतो. (आम्ही घरात व्हॉईस रेकॉर्डींग सुरू ठेऊन जातो.) आता त्यावर जरा काम करायचं आहे.

सध्या त्याला "हे घे" हे शब्द कळायला लागलेत. त्यामुळे कोणीही कोणालाही काहीही देताना "हे घे" असं म्हणालं की ह्याला वाटतं त्याला ट्रीट देतो आहे. त्यामुळे लगेच कान टवकारतो आणि धावत येतो.. Proud

सगळे नवीन किस्से किती मस्त .माउईची आणि स्नो मॅन गम्मत भारीच

मस्त आहे पिल्लू, समीर !

आज ओडीन ला घेऊन टेल्स ऑफ द सिटी म्हणून डॉग हॉस्टेल आहे तिकडे गेलो - नक्की कुठे आहे ? पत्ता आणि no देऊ शकाल का ?

माऊई आणि स्नो मॅन
कसला निषेध नोंदवतोय भारी
नंतर बर्फात पडून स्टायलिश फोटो सेशन वगैरे
धमाल एकदम

नवीन पिल्लाचे सिलू चे कुटुंबात स्वागत
मस्त कहाणी आहे नावामागची, हे वाचलं पाहिजे आता

मृणाल - विपु मध्ये टाकतो, इथे जाहिरात करण्यासंदर्भात काय नियम आहेत माहिती नाही

स्नोई ची समस्या सुटली का नाही अजून?

स्नोई ची समस्या नाही सुटली अजून. .
शनिवारी शाम्पू पावडर आणि ब्रश इ. इ. आणून बघते आणि परिणाम लिहिते इथे..
सध्या तरी कपड्याने पुसून घेतेय..

सध्या त्याला "हे घे" हे शब्द कळायला लागलेत. त्यामुळे कोणीही कोणालाही काहीही देताना "हे घे" असं म्हणालं की ह्याला वाटतं त्याला ट्रीट देतो आहे. त्यामुळे लगेच कान टवकारतो आणि धावत येतो.. >>smiley36_0.gif
माउइ क्युट!!
सिलू कसल गोड पिल्लु दिसतोय!

सिलू मस्त नाव आहे Happy
पराग, जोई ४ च महिन्याचा असेल ना ? इतक्या लहान पपीज ना एकटे नाही रहाता येत. म्हणजे तसे ऐकले आहे. तसेही लहान ब्रीड चे डॉग ३-४ तासापेक्षा जास्त एकटे राहू शकत नाहीत.
आम्ही पण अजून माउई ला एकटे रहायला ट्रेन केलेले नाहीये. वेळ आली नाही फारशी पण करायला हवंय खरं तर. मॅचुअर्ड डॉग (वय १८ महिने किंवा जास्त) असेल तर ४ तास हँडल करू शकतात म्हणे. कुणाला अनुभव असेल त्यांनी टिप्स शेअर करा प्लीज.
व्हिक्टोरिया म्हणते आधी १५ मिनिटे, मग २५, मग अर्धा तास , १ तास, २ तास असे करत वेळ वाढवत न्यायची. त्यांना हळु हळू समजते की घरातले लोक जात येत असतात आणि गेले तरी येतात परत Happy

ओडीन राहतो दोन तीन तास एकटा
आम्हला रात्री हॉटेल ला जायचं असेल तर त्याला आधी संध्याकाळी मस्त दमवतो मग रात्रीचे जेवण देऊन वरच्या खोलीत ठेवतो
जिथे नासधूस करायला काही नहीये फारसे
पॉटी करायला गच्चीचे दार उघड ठेवतो आणि गुपचूप खालच्या खाली जातो. त्याला बाहेर जाताना कळलं नाही तर राहतो
शेजारी सांगून ठेवलेलं असतं की फारच भुंकायला लागला तर फोन करा
पण तो खाऊन पिऊन मस्त झोप काढतो बहुदा
आम्ही आल्यानंतर त्याला कळतं आणि मग रुसवा घालवायला गाडीवर बसवून चक्कर मारावी लागते आणि ट्रीट द्यावी लागते

ज्योई ५ महिन्यांचा झाला. आम्ही ऐकलं की आत्तापासूनच थोड्या थोड्या वेळाने सुरुवात करायची म्हणजे नंतर जड जात नाही. व्हिक्टोरियाचे व्हिडीयो पाहिले आहेत. आम्ही जास्तीत जास्त ४५ मिनिटे गेलो आहे आत्तापर्यंत. ते पण एकदाच. साधारण १५ मिनिटे ते अर्धा तास जातो. खाणं / खेळणं सगळं करून जातो.
तसेही लहान ब्रीड चे डॉग ३-४ तासापेक्षा जास्त एकटे राहू शकत नाहीत. >>>> आम्ही घ्यायच्या आधी ब्रिडरला विचारलं आणि वाचलं त्यानुसार ह्या प्रकारचा ग्रोन अप डॉग ६ त्र ७ तास राहू शकतो. पी होल्डींग टाईम वाढला की राहू शकतात म्हणे.
आशू, मी जेव्हडं वाचलं आणि पाहिलं त्यानुसार तुम्ही बाहेर जात आहात हे त्यांना कळलं पाहिजे म्हणे. लपून छपून जाऊ नये.

ज्योईला भयंकर फोमो आहे! परवा मला मध्यरात्री जाग आली आणि नंतर झोप येईना म्हणून मी हॉलमध्ये येईन टेनिस बघत बसतो तर ह्याने कुई कुई करून बाकीच्यांनाही उठवलं आणि मला शिव्या बसल्या. मग त्याचा क्रेटही बाहेर आणला, तेव्हा झोपला.

भयंकर फोमो >>> हे अगदी डीट्टो! माउई गाढ झोपलेला असला तरी घरात काहीतरी एक्सायटिंग घडतंय असं वाटलं ( एखादे माणूस हॉल मधून किंवा ऑफिस रूम मधून उठून किचन मधे जाणे हेही त्याच्या मते एक्सायटिंग घटना असते) तर खडबडून उठून मागोमाग येतो Happy

आम्ही बाहेर जाताना नक्की परत येणार आहोत याची सूचना म्हणून कायम मुंबई पुणे मुंबई पिक्चर लावूनच जातो. पहिले फिरवून खायला घालून आण तो. पूर्वी मला अडीनडीला एअर्पोर्ट वर ऑड वेळी जावे लागायचे लेकीला आणायला सोडायला तेव्हा पण तिला फिरवून आणून खाउ समोर ठेवून जाउन येत असे. त्यांची काळजी जास्त अ‍ॅक्टिव्हेट झाली नाही पाहिजे . आपण तो कॉण्फिडन्स द्यावा लागतो. युट्युब वर कुत्र्यांनी बघायचे स्क्विरल जंगल वगैरे चे आठ आठ तासांचे व्हिडीओ असतात ते लावायचे.
अर्थात पपी ला लहान मुलासारखेच बघावे लागते.

ओडीन ला टीव्ही बघायची सवय कशी लावावी हेच कळत नाही
अजिबात म्हणजे अजिबात बघत नाही
भुभु चे व्हीडिओ लावले तरी

आमच्याकडे उलट आहे, मोठ्याला टीव्ही कमी कर म्हणावं लागत आणि लहाण्याला थोडा तरी बघ

स्पेशली रात्री जेवताना
त्याचं जेवण आधीच झालेले असतं त्यामुळे तो खेळायाच्या मूड मध्ये असतो
मग बॉल आणून प्रत्येकासमोर ठेवतो आणि खेळा सांगतो
एक जण नाही म्हणाला की दुसरा, मग मी किंवा बायको
कोणीच दाद दिली नाही की चिडून मग भुंकायला लागतो
मग त्याला पकडून आत कोंडावं लागतं नैतर मांजर आली म्हणून सांगावं लागतं
की पाच दहा मिनिटे जाऊन तो शोधत बसतो कुठं आलीये मांजर ते
तेवढ्या वेळात बॉल लपवून ठेवावा लागतो

आम्ही बाहेर जाताना नक्की परत येणार आहोत याची सूचना म्हणून कायम मुंबई पुणे मुंबई पिक्चर लावूनच जातो. >>>> Lol हे भारी आहे !

Seriously that movie is good for dogs. The actors speak like you and me. Great music to soothe anxiety annd fun . Btw there is an Indian site called heads up for tails. We got good dog bed and leash from there. Plus tons of stuff. For cats and dogs.

ईथले प्रतिसाद वाचुन एकिकडे हसायला येतय आणि दुसरिकडे टेन्शन. Happy
पाहुया आअमचे विर घरी आले काय गोंधळ करताय्त ते

भूभूंना घरात एकटे रहायला आवडत नाही हे तर पक्के. .
पण स्नोई ला पण घरात एकटे ठेवलेले चालत नाही. मुले आणि नवरा गावाला गेले होते तर घरभर फिरून फिरून ओरडून त्याना शोधत होता. त्याने खाणे सोडले, बाहेर फिरायला जाणे सोडले. त्यातच मी पण कामासाठी बाहेर गेले तर दारातच बसून राहायचा. चार दिवसांनी सगळे परत आल्यावर गाडी रुळावर आली एकदाची.
बोके तसे फारसे attached नसतात. पण आमचा बोकोबा भूभूसारखा जीव लावतो. ..

Pages