भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी गोड म्हणजे विचारू नका.. मी  त्याची  पापी घेतली कि म्हणते, आई आज फुंतरू नि गुळ  खाल्ला होता का? मग आई म्हणणार हो आज १ भेळी गुळ  खाल्ला आहे... मग आपण म्हणावे, तरीच आज इतकी  गोड आहे  पापी. तसेच आंघोळ झाली त्याची कि बाबा नाटक करून म्हणतात अरे एवढे लीगत का लावले आहे,मग मी म्हणते बाबा फुंती ची अंघोळ झाली आहे त्याचा उजेड पडला आहे, हे ऐकून फुंती च्या अंगात येतं

कल्याणी Lol बजरंग दल प्रकार तर कहर आहे! मजेशीर आहे फुंतरु Happy कोणता ब्रीड आहे तो?
ओडिन चा व्हिडिओ आत्ता पाहिला. भलताच गुणी बाळ आहे!

सध्या आमच्याइथे स्नो , थंडी असं वातावरण असल्यामुळे सगळे डॉग पेरेंट्स त्यांच्या डॉगना छान छान स्वेटर्स घालून फिरायला नेतात. काही डॉग्जनी ते कोनही घातलेले असतात.
मस्त वाटतं सगळे डॉग्ज त्यांच्या सुरेख रंगसंगती असलेल्या उबदार कपड्यात पाहून. बाळंच ती छोटुकली.

वरचं कल्याणीचं पोस्ट आणि सनवच्या पोस्ट वरून आठवलं, माझ्या मुलीची इंडियन लोकांबद्दल थिअरी अशी आहे की एक तर बरेच लोक डॉग आधी घेत नाहीत आणि जर घेतला तर मात्र अति म्हणजे अति लाडावतात. Happy कुत्र्यापेक्षा बाळासारखेच वागवतात. मी मागे लिहिलं होतं कोविड सुरु झाल्यापासून आमच्या नेबरहुडातच ( बहुसंख्य देशी लोक) २० एक पपीज आले. आता सगळ्या डॉग पेरेन्ट्स चा एक व्हॉअ‍ॅ ग्रुप पण आहे. त्यावरची एकेक पोस्ट्स म्हणजे फोटो अन क्लिप्स बघण्यालायक असतात. कपडे वगैरे तर असतातच , पण औक्षण, गृहप्रवेश, भाऊबीज, राखीच्या क्लिप्स, टिळा वगैरे लावून पूजेला मांडीवर घेऊन बसणे, झालंच तर कुणी आपल्या पपी शी बोबडं बोलतंय, कुणी मांडीवर घेऊन अंगाई , ख्रिस्मस कॅरल्स गातायत , कुणी त्याला पाठीवर घेऊन घोडा घोडा करतायत काही लिमिटच नाही Lol

हो, बारशाचा एक व्हिडिओ एवढ्यातच पहिला WA वर.

कपड्यांंवरून आठवलं, कुत्र्यांना कपडे घळण्याबद्दल काय मत आहे इथल्या जाणकार लोकांचे? घालावेत की घालू नयेत, आणि का?

इंडियन लोकांबद्दल थिअरी अशी आहे की एक तर बरेच लोक डॉग आधी घेत नाहीत आणि जर घेतला तर मात्र अति म्हणजे अति लाडावतात. >>>> +१.
आमच्याकडच्या पिंट्याला, २२ दिवसांचे पोर ग आईला सोडून आलंय करून आमच्या आईने लाडावलेलं होतं.त्यामुळे फक्त तिला सोडून आम्हां सर्वजणांना तो चावायचा.त्याच्या आंघोळीच्यावेळी मुस्की बांधून आंघोळ घालायला लागायची.त्यातही आमचे पपा,पिंट्याच्याही आधी ओरडायचे की तो घाबरूनजाऊन त्यांना चावायचा नाही.पपांना जरबयुक्त घाबरायचा नाही,तर अकस्मात निघालेल्या किंचाळीने तो दचकायचा.आताही हे टाईप करताना तो सीन आठवून लोट्पोट हसतेय.

माऊई कसला गोडुला आहे.

इंडियन लोकांच्या मानसिकतेबद्दल +100
प्लूटो लहान असताना इंडिया ट्रिपच्या आधी त्याला गिफ़्ट घ्यायला पेट सेक्शनमध्ये गेले तर सगळी toys आवडत होती पण choking hazard च्या भीतीने काहीच घेतलं नाही. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत आपण घाबरतो तसंच अगदी.

कपड्याबद्दल- तर काल सगळे डॉग छान स्वेटर घालून फिरत होते आणि नंतर दुरून एक डॉग तसाच बिना कपड्यांचा येताना दिसला. तर मनात जजमेंटल विचार आलाच की अरेरे बिचारा, याचा पालक बहुधा पुरुष असणारे.
थोडं पुढे आल्यावर दिसलं की पालक तर बाई होती. मग पुन्हा मनात आलं की काय बेजबाबदार आई आहे,इतकी थंडी, स्नो आहे तर मुलाला नीट उबदार कपडे घालायला काय झालं, निदान आसपास तरी बघायचं बाकीचे पालक काय करतायत, etc.
आता काही ब्रीड्सना नसेल थंडी वाजत पण आमच्याइथे तरी बरेचसे डॉग छान छान कपड्यात गुरफटून आणि एखादाच बिचारा नंगूपंगू असं चित्र दिसतंय खरं.

किती वयाचा आहे तो>> माउई आता ९ महिन्यांचा होईल.
सनव Happy हौशी असतात एकेक डॉग पेरेन्ट्स Happy एकदा घालायला सुरुवात केली की मग "कपडे न घातलेला कुत्रा" नंगू पंगू वाटणे हे मानसिक कंडीशनिंग Lol
बहुधा सरसकट सगळ्या कुत्र्यांना स्वेटर ची गरज नसावी माझ्या माहितीप्रमाणे. आमच्यासारख्या जास्त थंडीच्या भागात लहान डॉग्ज ना गरज/ उपयोग असतो. तेही खूप थंडी असेल आणि जास्त वेळ बाहेर फिरणार असल्यास. मोठ्या ब्रीड्सइतके त्यांना बॉडी हीट फार जास्त काळ रीटेन करणे सोपे नसते असे ऐकले होते. तसंच कुत्रा /ब्रीड मुळात वॉर्म भागातला असेल तरी अति थंडीत स्वेटर उपयोगी पडतो म्हणे.

भारी व्हिडीयो!
आमचं बरं चाललय. टण्या म्हणाला तसं हळूहळू सवय होते आहे. आम्ही त्याला 'सीट' आणि 'फेच' शिकवतोय. सीट एकदम नीट कळलय. फेच अजून हीट अँड मिस आहे. लिश ट्रेनिंग घरात सुरु केलय. पुढच्या आठड्यापासून बाहेर नेता येईल. काल रात्री पासून तंत्र बिघडलय काहितरी. काल संध्याकाळी उशिरा खूप खेळला. मग झोपायचं नव्हतं. नेहमी ९ पासूनच पेंगलेला असतो पण काल ११:१५ पर्यंत जागा होता. मधेच भुंकाभुंक सुरू झाल्यावर आम्ही बघितलं तर क्रेटच्या बाहेर येऊन दार लावलं होतं! सकाळी नेहमीप्रमाणे वेळेत उठून बसला.. उठल्या उठल्या पॉटी अ‍ॅक्सिडेंट झाला. आज अजून एकदम सुस्त मलूल आहे. शेवटी मी आत्ता क्रेटमधे झोपवलय.

>> पण औक्षण, गृहप्रवेश, भाऊबीज, राखीच्या क्लिप्स, टिळा वगैरे लावून पूजेला मांडीवर घेऊन बसणे,
Lol
वदनी कवळ वाला व्हिडिओ आठवला Happy

https://www.youtube.com/watch?v=BusYrO1Rko4

अरे कसला भारी व्हिडिओ आहे हा! किती शांत बसलाय श्लोक म्हणेपर्यन्त!! जय जय रघुवीर समर्थ म्हटल्यावरच त्या कुत्र्याने तोंड लावले जेवणाला Lol

त्याची कॅनाल मध्ये उडी मारायची सवय थांबवायला शेवटी मला अजब उपाय करावा लागला
शिक्षा, रिवार्ड कशाला दाद देईना
एकदा तर मुलाला हातात छडी घेऊन फक्त जिथून तो पाण्यात उडी मारतो तिथे जाऊन बसायला सांगितलं
तर त्याचे पाण्याचे वेड इतकं की छडी ला पण न जुमानता पोराचा खांद्यावरून आत घुसला
शेवटी परवा पकड घेऊन गेलो आणि ज्या जाळीच्या गॅप।मधून तो उडी मारून कॅनाल कडे जातो ती जाळी तुटलेल्या तारा बसवून नीट केली आणि पक्का बंदोबस्त केला
मग काल ग्राउंडवर नेल्या नेल्या पळाला आणि जाळी बंद म्हणल्यावर शॉक बसला, मग कुई कुई आवाज करत बसला
म्हणलं आठवड्यात एक दोनदा मिळेल पण रोज नाही
आता गुपचूप बॉल खेळ चल
प्रेमभंग झालेला आशिक कसा बघत जाईल तसा आला मग माघारी

Pages