
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
इथे काही किस्से आले नाहीत बर्
इथे काही किस्से आले नाहीत बर्याच दिवसात. नव्या वर्षात भुभू आणी माऊंनी काही नविन मज्जा केल्या नाहीत का
आमच्या इथं ट्रॅक वर परत
आमच्या इथं ट्रॅक वर परत किरकिर सुरू झालीये लोकांची
आणि त्यांचे बरोबरच आहे, भुभु पालक अतिशय बेजबाबदारपणे वागताना दिसून येतात
मी ओडीन ला फिरवायला घेऊन जातो रस्त्याने तर जागोजागी शी पडलेली दिसते. मध्ये एक आजोबा मलाच ओरडायला लागले, तुमचा कुत्रा शी करून जातो म्हणून दारात
मी त्यांना खिशातून कागद काढून दाखवले म्हणलं माझ्या कुत्र्याने शी केली तर मी या कागदाने उचलून टाकतो. बघायचं असेल तर चला सोबत. मग म्हणाले बाकीच्या लोकांना पण सांगा
म्हणलं आहे डोक्यात
पण हे कसं करावं हे कळत नाहीये
पण हे कसं करावं हे कळत नाहीये
पण हे कसं करावं हे कळत नाहीये
नवीन Submitted by आशुचँप on 7 January, 2021 - 21:00
>>
पेट मालकांचा एक स्थानिक समुह तयार करु शकता व त्यामार्फत अशी सकारात्मक वागणुकीला चालना देणारे विविध उपक्रम सगळ्यांनी एकत्र येऊन राबवु शकता.
उदा. एखाद्या रविवारी टेबल खुर्ची घेऊन बसा व रितसर प्रिंट करुन आणलेली माहिती दाखवा व प्रेझेंटेशन द्या.
कोणाला देऊ प्रेझेंटेशन?
कोणाला देऊ प्रेझेंटेशन?
टेबल टाकून कुठं बसू?
कोणाला देऊ प्रेझेंटेशन?
कोणाला देऊ प्रेझेंटेशन?
टेबल टाकून कुठं बसू?
नवीन Submitted by आशुचँप on 7 January, 2021 - 22:26
>>
मी "सांगत" नाहीये,
पण हे कसं करावं हे कळत नाहीये
Submitted by आशुचँप on 7 January, 2021 - 21:00
>>
असं तुम्ही पब्लिक फोरमवर विचारले, माहिती विचारली म्हणुन "सुचवत "आहे. "मदत" करत आहे.
कोणाला देऊ प्रेझेंटेशन?
>>
तिथे आलेल्या बेजबाबदार पेट मालकांना व इतरही हौशी पेट मालक असतील त्यांना.
टेबल टाकून कुठं बसू?
>>
जिथे हे सगळे बेजबाबदार पेट मालक येजा करतात!
अशी एक जागा नाहीये, सगळे
अशी एक जागा नाहीये, सगळे एकत्र येऊन आपल्याला भुभु ना शी करायला आणायला
रस्त्यावर, इतके तिकडे कुठंही फिरवत असतात आणि कुठेही पडलेली असते
नक्की कुठं राहता तुम्ही? म्हणजे नक्की काय कल्पना आहेत तुमच्या? आणि काहीही माहिती नसताना सल्ला द्याच असं चांदीच्या वाटीतून अक्षता दयायला आलो होतो का?
पब्लिक फोरम असला तरी निदान आपल्याला त्यातलं कळतंय त्यावर बोलावं हा एक सर्वमान्य संकेत आहे
तो काय कळत असेल तुम्हाला असं काही वाटत नाही
खरंच,हे पेट च्या शी चं बर्
खरंच,हे पेट च्या शी चं बर्याच लोकांना कळत नाही. पत्रकं वाटूनही फार उपयोग होणार नाही.
आपल्या इथे याबाबत बरेच एक्स्क्युज काढले जातात. 'लहान पोर आहे. त्याने टाकला कचरा, मी थोडाच टाकला?' (अरे पण ते लहान पोर तुमच्या घरातलं आहे.त्याला एकदा रस्त्यावर टाकलेला कचरा उचलायला लावला तर काही चांगलं शिकेल.) "पाळीव प्राणी आहे. आम्ही थोडीच शी करतो रस्त्यावर? मुक्या प्राण्यांना काय कळतं?" म्हणतात. ('शी, त्या काढलेल्या डायपर ला मी स्वच्छ आंघोळ करुन हात का लावू' म्हणून निसर्गरम्य फार्म हाऊस मध्ये नाश्ता टेबलवर डायपर सोडून जाणार्या बाई नुकत्याच पाहिल्या आहेत.)
माझं घर, माझी कार, मी, माझी पोरं स्वच्छ यापलिकडे 'माझा परिसर स्वच्छ' याची जाणीव करुन द्यायला थिएटर मध्ये जाहीराती लवल्या पाहिजेत.
त्यातल्या त्यात 'फूटपाथवर किंवा रस्त्यावर शी न करु देता भूभू माऊना मऊ मातीत शी करु दे' इतकं प्रबोधन झालं तरी भरपूर आहे.
खरंय अनु, आणि बरेचसे लोकं
खरंय अनु, आणि बरेचसे लोकं भल्या पहाटे अंधारात जातात घेऊन भुभु ना फिरायला
आम्ही सकाळी साडेसात ला जातो तेव्हाही रस्त्यात शी चे ढीग पडलेले असतात आणि ओडीन प्रत्येक शी चा वास घेतल्याशिवाय पुढे सरकतच नाही त्यामुळे अलमोस्ट सगळ्या नोटीस होतात
कोणी रस्त्यात दिसला तर त्याला सांगू शकेन
पण भल्या पहाटे कोण फिरवतात आणि कोण शी उचलत नाही हे कळायला मागे मागे फिरायला लागेल
आता मी देखील ओडीन ला घेऊन फिरतो दिवसाला 5 किमी
वाटेत कोणालाही समज होऊ शकतो की त्याची घाण सुद्धा पडली असेल आता मी काय त्याची उचललेली शी घेऊन फिरू शकत नाही लोकांना दाखवायला
आशु धागा भरकटवू नकोस.
आशु धागा भरकटवू नकोस.
नवीन गमती जमती (च) वाचायला आवडतील.
ओके आजची गंमत
ओके आजची गंमत
पाऊस पडतोय आणि ओडीन बाहेर जाऊन आला की मस्त चिखलाचे पाय घेऊन येतो
आणि बाबा ओरडतात मग त्याला
त्यावेळी त्याचा चेहरा बघण्यासारखा असतो
म्हणजे मी तर गुड बॉय सारखा बाहेर जाऊन पॉटी करून आलोय, आता का बरं ओरडत असतील हे असे भाव स्पष्ट दिसतात
आता तर आम्ही आमच्या लेन ला गेट च करून घेतलं आहे तयामुळे महाशय निवांत हिंडत असतात सगळीकडे
येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवतात, त्याच्या सगळ्या मैत्रिणी आल्या की गेटमधूनच जितके शक्य आहे तितकी गळाभेट, पाप्या सोहळा उरकतात
पूर्वी घरात ठेऊन किराणा वल्याकडून काही आणायला गेलो तरी हलकल्लोळ करायचा
आता बाहेर गेट पाशी थांबलेला असतो वाट बघत
त्यावेळी त्याचा चेहरा
त्यावेळी त्याचा चेहरा बघण्यासारखा असतो>>> डोळ्यासमोर त्याचा चेहरा आला.
त्याहून मज्जा म्हणजे सध्या
त्याहून मज्जा म्हणजे सध्या सकाळी ऑनलाइन योगासने क्लास लावला आहे
ओडीन मध्ये मध्ये येऊ नये म्हणून त्याला आतल्या खोलीत अडसर घालून ठेवतो
क्लास झाला की शेवटी तीन ओंकार असतात ते झाले की मग मी त्याला घेतो आणि बाहेर फिरवून आणतो
त्यामुळे त्याला आता हे कळलं आहे की ओंकार ऐकू आले की आपल्याला फिरायला नेतात
त्यामुले शाळा सुटताना पोरं कशी घंटेचया आवाजाची वाट बघत असतात तसं तो ओंकार व्हायची वाट बघत डोकं बाहेर काढून बसलेला असतो
तो झाला रे झाला की लगेच कुईकुई उड्या मारणे सुरू होतं
जाताना मग पोराच्या शाळेसाठी त्याला उठवणे हेही एक काम असतं
तेही सध्या ओडीन कडे दिलं आहे, जा दादा ला उठाव म्हणलं की हा थाटात जातो बेडवर दोन पंजे ठेऊन त्याला गालाला चाटायला सुरुवात करतो, पोरगं वैतागून त्याला ढकलतो तरी ऐकत नाही, तो पुरता उठेपर्यंत चाटत राहतो
मग कामगिरी फत्ते झाली असे म्हणत शेपूट हलवत दारापाशी जाऊन थांबतो
कसलं गोड आहे हे
कसलं गोड आहे हे
ओडीनला प्रत्यक्ष भेटायला
ओडीनला प्रत्यक्ष भेटायला लवकरात लवकर यायला हवे
मला कुत्र्याची भिती वाटते पण
मला कुत्र्याची भिती वाटते पण मी इथले किस्से आणि गंमती नेहमीच वाचते. ओडीन, माऊई, तिरामिस्सूचा फोटो हे सगळं खूपच गोड आहे.
अरे वा किती गोड.
अरे वा किती गोड.
एक बारकी सूचना: कुत्रे व मांजर ह्यांचे पिण्याचे पाणी आपण जमिनीवर बोल मध्ये भरून ठेवतो. तर भारता त तरी ते रोज बदलत जा. कारण त्यात डेंग्यु च्या डासाची मादी अंडी घालू शकते व घरात डासांचा प्रादुर्भाव होउ शकतो. तसे ही ताजे पाणी बरे .
हो आम्ही करतो हे
हो आम्ही करतो हे
सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ आधीचे पाणी ओतून भांडे विसळून स्वच्छ पाणी भरून ठेवतो
ह्रपेन - ये कधीही
(No subject)
ओंकार = बाहेर जायची वेळ >>
ओंकार = बाहेर जायची वेळ >> ओडीन
पॅटर्न ओळखण्यात पटाईत असतात. पण तुमच्या घरात त्याचे तुम्हीच लाडके दिसताय सगळ्यात. आमच्याकडे माझ्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम माउईचं. सकाळी उठल्यापासून तिच्याकडे कधी एकदा जाता येईल हा अजेन्डा असतो. आम्ही लवकर उठतो त्यामुळे माउई बाहेर बॅकयार्डात जाऊन आला आणि आमचा चहा वगैरे घेऊन झाला की मग त्याला तिच्या खोलीचं दार उघडून देतो. तोवर वाट बघत बसतो सोफ्यावर. चहाचा कप खाली ठेवला रे ठेवला की उडी मारून जिन्याच्या दाराशी उभा राहून कुई कुई सुरु! जाऊ दिले की सुसाट धावतो आणि बेड वर उडी मारून उठवतो मग तिला. तिच्या स्कूल चं लॉगिन करण्या आधी ५ मिनिटं त्याचे लाड करते त्यात खूष होऊन येतो खाली. की मग परत कान आता तिचा पुढचा ब्रेक केव्हा आहे त्याच्याकडे!!
वाह कसलं भारी ना
वाह कसलं भारी ना
आमच्याकडे पोरगा आणि त्याची गट्टी चांगली आहे, दोघे अफाट मस्ती करतात, कुस्तीपासून सगळं सुरू असत, त्याच्या मागे मागे हिंडतो
पण मी बोलावलं की त्याला सोडून देतो, यावर पोरगा वैतागतो
मग मी त्याला खायला देतो, फिरायला नेतो तरी असे का म्हणतो
म्हणलं अरे त्याने अल्फा मेल सिलेंक्त केलाय, आता तो तुला बेस्ट ब्रदर, कम्पानियन मानतोय, इतकंच काय माझ्या अनुपस्थितीत तूच अल्फा असणार आहेस त्याच्यासाठी
पण म्हणून तू खायला दिलं म्हणून तुला तो माझ्या जागी नाही ठेवणार
त्यांचे काही कन्सेप्ट आपल्याला समजत नाहीत
करेक्ट कुत्र्याला मालकाची
करेक्ट कुत्र्याला मालकाची पक्की जाण असते. मालक कोण हे त्याला माहीत असते. पॅक अॅनिमल असल्याने , सोशल हायरार्की / भाजणी याचे अंगभूत ज्ञान आहे या प्राण्याला.
मी इथे गंमतीपेक्षा टेन्शनचेच
मी इथे गंमतीपेक्षा टेन्शनचेच किस्से जास्त लिहितो बहूतेक.
पण तरी लिहितोच आता.
काल ज्योईला १५ मिनिटांत पाचसहा उलट्या झाल्या आणि घश्यातून कसले कसले आवाज येत होतो. आम्ही घाबरलो की चोकिंग होतय की काय ! दुपारी खाल्लेलं सगळं खाणं उलटून पडलं. आम्ही घाबरून इआरमध्गे गेलो. तो नेहमी स्लोईटर आहे पण काल दुपारी भराभर खाल्लं त्यामुळे तसं झालं म्हणे. पण आता बरं आहे.
हल्ली पाऊस नसेल तेव्हा रोज सकाळ दुपारी आम्ही बाहेर घेऊन जातो. त्यामुळे एकदम खुष असतो! सुपर एक्साईटेड असतो. तिसरं वॅक्सीन झालं की डॉग पार्कमध्ये घेऊन जाणार आहोत.
कधी पासून फोटो टाकायचा होता. हा बघा. आहे एव्हडासा पण बस्तो अगदी रुबाबात ! त्याची आई पांढर्या रंगाची होती आणि बाबा ब्राऊन आणि काळा. त्यामुळे ह्याला तीनही रंग आले आहेत. चेहेरा आणि कॉलर पांढरी आहे. बाकी ब्राऊन आणि शेपटीच्या इथे थोडं काळपट.
मुलीची आणि ह्याची भांडणं चालतात त्यावर कोण बसणार ह्यावरून! पण ती पुस्तक वाचते तेव्हा हा तिच्या मांडीवर जाऊन बसतो. 
फायर प्लेस समोर त्या लाल एल्मो चेअरवर ढु शेकत बसायला त्याला फार आवडतं..
खरंच एकदम ऐटबाज पोज दिली आहे
खरंच एकदम ऐटबाज पोज दिली आहे
पांढरे सॉक्स घातलेत असं वाटतंय.
ऑ खूपच गोडुला आहे हा ज्योई!
ऑ खूपच गोडुला आहे हा ज्योई! पोझ तर भारीच दिली आहे.
प्राण्यांचं पण ईआर असतं? म्हणजे जे पेट क्लिनिक्स असतात त्यांचंच एक युनिट 24 तास सुरू असतं?
कसला गोड आहे
कसला गोड आहे
एकदम रुबाबात बसलाय
तब्येतीचे फार टेन्शन घेऊ नका, थोडं फार प्रमाणात सगळ्याच घरी हे असतं
पण वरचे वर होत असेल तर एकदा व्हेट च्या सल्ल्याने डाएट प्लॅन ठरवून घ्या आणि अतिशय काटेकोरपणे अमलात आणा
ओडीन लाही सुरवातीला व्हायची सारखी ओकी मग आम्ही तपासून आणलं तेव्हा कळलं की त्याच्या डाएट मध्ये ग्रेन्स चे प्रमाण जास्त होतंय
मग चिकन चे प्रमाण वाढवलं आणि सगळे त्रास एकदम कमी झाले
प्रत्येक भुभु ची तब्येत आणि खाणे वेगळं असतं त्यामुळे एकाला चालताय म्हणून दुसरयला चलेलच असं नाही
काझुमी, मस्त फोटो. बोका की
काझुमी, मस्त फोटो. बोका की भाटी? नाव काय? माझ्याकडचा मंगू बोका थोडासा असा दिसायचा.
सॅमी चं पण जरा ओकरं बाळसं आहे
सॅमी चं पण जरा ओकरं बाळसं आहे. आत्तापर्यंत बर्ञाचदा उलट्या केल्या आहेत. १-२ वेळा मीच बघितलंय तिला भराभर खाल्लं आणि लगेच उलटी केली. एकदा एक टोकेरी ग्रास निघालं उलटीमधून. पण तेव्हा ते बाहेर येईपर्यंत तिने ३-४ वेळा उलटी केली. लगेच घेऊन पळालो व्हेट कडे. दोन्ही तिन्ही वेळा कारणं वेगवेगळी होती पण प्रत्येक वेळा ती शेजारी बसूनच राहते जिथे घाण केलीये आणि साफ केल्याशिवाय हलत नाही तिथून.
मला अॅक्चुअली न्यूटरिंग
मला अॅक्चुअली न्यूटरिंग बद्दल इतर डॉग पेरेन्ट्स ची मतं हवी होती. मेल डॉग चे न्यूटरिंग करण्याचे फायदे / तोटे? करावं की नाही?
आम्ही अजून माहिती घेतो आहोत. इथे कोणी यावर अभ्यास केलाय का ? कुणाचे काही अनुभव आहेत का?
असे वाचले की नंतर सिनियर एज मधे बर्याच न्यूटर न केलेल्या डॉग्ज ना प्रॉस्टेट/ टेस्टिक्युलर डिसीजेस डेवलप होतात आणि नंतर प्रोसिजर्स कराव्या लागतात ज्या त्या वयात जास्त पेनफुल असतात. बाकी मस्ती/ इतर मेल डॉग्ज् सोबत अग्रेसिवनेस कमी होणे हे ऐकीव आहे पण त्याची काही खात्री नसते म्हणे.
काय गोड बाळे आहेत सगळी! आमची
काय गोड बाळे आहेत सगळी! आमची गुणाची बाळी... बेला. बर्यापैकी शांत आहे, मस्त खेळते पण लिश ट्रेनिंग मात्र अवघड वाटतेय
किती सुंदर फोटो !
किती सुंदर फोटो !
Pages