भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे बिचारा Sad

आम्ही पण मंकी सॅमी ला कधी बाहेर जाऊ दिलं नाही की दाराच्या इथे बसून मंकी केविलवाणे आवाज काढत राहतो.

आमची व्हेला न cashew खूप हुशार आहेत, आम्ही त्यांना बालकणी मध्ये जाऊ देत नाही , पण आमचा डोळा चुकवून त्या मस्त बाल्कनीत फिरून येतात, अन माझी चाहूल लागसली तर धावत घरात येतात. तेच मुलगी न मिस्टरांना अजिबात दाद देत नाही.

Cashew ला कधी कधी मात्र फारच हुक्की येते पण मी असते म्हूनन बाल्कनी त जात येत नाही, मग काय करणार, बाई साहेब येतात म्याव म्याव करत. मग तिला कडे वर घ्याच न ब्लकाँनी फिरवून आणायचं. माऊ एकदम खुश.

छान झालय पेन्टिग!
माउईची बर्फातली मजा भारी, गोड पिल्लु आहे एक्दम.

हॉलिडेमध्ये जोइबाबांचं आजारपण ! त्याला ते डीवार्मिंगचं औषध मानवलं नाही. त्यामुळे डायरिया झाला, सगळं सायकल गंडलं! फक्त आता बाहेर नेता येतंय त्यामुळे बाहेर गेला की एकदम खुष असतो. तो धड जेवत नाही म्हणून आम्ही पुन्हा बेक टू स्ट्रेस मोड!! Sad

अरे जोई लवकर बरा होवो. थोडा घास भर दही भात, तूप भात खातो का बघा. पोट बिघडले की हे उपयोगी पडेल. धीर धरा. बेस्ट विशेस टू
ऑल पपर्स कॅटोज अँड देअर मम्मा पप्पा.

आज वॉकीज जरा उशीरा आठ वाजता. मुंबई चाकरमान्याची वीकेंड सुरू झाली ना. तर सर्व भुकेली मांजरे कुठे तरी गायब झालेली. एक आमचा म्हातारा काळू आहे तो एक देवी कुत्री व काजल ह्यांना खाउ घातले. पुढे आलो तर राणी दिसली पण दिमाखात बसली होती व कबुतर मारून पुढ्यात होते. म्हणजे आज पोट्या भरणार मस्त पैकी. तिच्या समोर एक कबरे मांजर वाट बघत बसले होते. हरणी कुत्री अतिशय गाढ झोपली होती. ( हिची एक खेप झाली नुकतीच) एकदम बच्चे बडे हो गये फीलिन्ग आले. जे मला आजकाल रोजच येते. हॅपी वीकेंड.

माऊईचा व्हिडीओ केवढा क्युट आहे. मी परत परत पाहिला. एकदम स्ट्रेस बस्टर म्हणून सेव्ह करून ठेवावा. गोंडस बाळ आहे अगदी. Happiness is......... सिरीजमध्ये टाकून ठेवावा.

ओडिनला थंडीत पण स्विमिंग करायचं असतं? मग खराच स्विमिंग फॅन आहे. त्याला डॉग स्विमिंग पूल आहेत तिथे आठवड्यातुन 2-3 वेळा नेऊन आणा म्हणजे खुमखुमी कमी होईल.

पराग, तुमच्या दोन्ही पोस्ट वाचुन जुन्या आठवणी येऊन हसु आलं. ही नवीन आईबाबा anxiety आहे. एकमेकांना सवय होईपर्यंत आणि नवीन बाळाचं रुटीन सेट होईपर्यंत स्ट्रेस येत रहाणार. तुम्ही लिहिलेल्या गोष्टी सुरुवातीला फार कॉमन आहेत. (तेव्हा तो आजारी पडला की मी रडायचे वगैरे. त्याला गॅस्ट्रो झाला आणि IV लावायची वेळ आली तेव्हा मी बदाबदा रडले होते. )
होईल त्याचं रुटीन ठीक. आणि मुख्य म्हणजे सवय झाली की तुम्हाला एकमेकांशी कम्युनिकेट करायला जमेल. कसं ते कळेलच. पण व्यवस्थित सगळं समजतं.

सगळ्यांना हॅप्पी हॉलिडेज! जाई, पेंटिंग सुरेख झाले आहे!
जोई ला लवकर बरं वाटो! पोट बरोबर नसेल तर नाही जेवत ते. मीही माउई च्या खाण्यावरून फार स्ट्रेस घेतलेला आहे सुरुवातीच्या काळात. अनुभवी डॉग पेरेन्ट्स च्या सल्ल्याने मीही अगदी २-३ चमचे दही भात देऊन पाहिला आहे पोट बिघडले असताना. माउई लपालप संपवायचा तो. इट हेल्प्ड. एरव्ही ही ते नुसते किबल खायला माउई फार खळखळ करायचा. मग नेट वर अभ्यास केला, तिथे आणि इतर डॉग पेरेन्ट्स, एक डॉग ट्रेनर यांच्या अनुभवानुसार किबल वर थोडेसे वेट टॉपिंग घातले की डॉग्ज सहसा व्यवस्थित खातात असे समजले. मग मी चमचाभर प्लेन बॉइल्ड चिकन जरासे कुस्करून दर मील ला त्याच्या किबल वर घालून द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून खाण्याचे तंत्र जमले आहे.
७-८ दिवस पुरेल इतके चिकन बॉइल करून लहान पोर्शन्स मधे फ्रीझ करते आणि ऐन वेळी वॉर्म करून द्यायचे.
अर्थात हा फक्त माझा अनुभव आणि पालकाच्या भूमिकेतून सल्ला आहे. व्हेट ना विचारले तर ते कायम त्यांच्या किबल शिवाय काहीही देऊ नये सांगतात.

पोट बिघडणे अगदी कॉमन आहे
ओडीन ला जुलाब झाले सुरू तर मी त्याला एक दिवस पूर्ण लंघन करायला लावतो, दुसरे दिवशी फक्त दही आणि ताक, मग दहीभात आणि मग परत नॉर्मल ला यायला लागला की उकडलेले अंडे, चिकन शिजवलेलं पाणी असं आणि मग सगळ्यात शेवटी किबल्स
ते पचायला जड असतात आणि शेल्फ लाईफ वाढवायला त्यात भरपूर अवांतर घटक असतात.
दही नॅचरल अँटी बायोटिक्स चे काम करते
एरवी सुद्धा अधून मधू दही देत जावा

मैत्रेयी, मी पण किबल्सवर बॉईल्ड चिकन श्रेड करून किंवा छोटे छोटे चंक्स घालुन देते कारण माझा बिगल पण नुसते किबल्स खात नाही. आम्ही सकाळी खिचडी (चिकन+तांदुळ+मुग डाळ+ गाजर/दुधी/ब्रोकोली ) देतो, देताना त्यातले दोन चिकन पीस काढुन रात्री किबल्स मध्ये मिसळले की विना तक्रार जेवण होतं. चिकन नाही दिलं तर उपास. चिकन ब्रॉथ पण प्रचंड आवडतो.

पराग, तुम्ही अर्धा चमचा दही देऊन मग मोठा झाल्यावर 1/दीड/ दोन चमचे पर्यंत दही देऊ शकता. हे माझ्या व्हेटच्या सल्ल्याने चालु केलं होतं, आता हा पठठया दह्याशिवाय जेवायला सुरुवात करत नाही. दही हे बेस्ट प्रो बायोटिक असल्याने पचनाचे त्रास कमी होतात. पण तिथले व्हेट बहुतेक नाही म्हणतील.

जाई, कसलं क्युट आहे तुझं भुबी. खूप मस्त काढलं आहेस.

ओह हे दह्याचं माहीत नव्हतं. आम्ही व्हेटकडे जाऊन आलो. तिने स्टूल टेस्ट करून गोळ्या दिल्या. हा अजून किबल सोडून बाकी काही खात नाही. ट्रीट म्हणूनही किबलच खातो. त्या गोळ्या ब्रेडचा अगदी छोट्या घासत कश्यबश्या गुंडाळून दिल्या. काल रात्री आणि आज सकाळी नीट जेवला. झोपलाही नीट. होपफुली आज दिवसभरात रुटीन बेक तू नॉर्मल येईल. दही देऊन बघू आता नॉर्मली पण।
धन्यावाद सगळ्यांना Happy

जाई, चित्र छान आलय !

ट्रीट म्हणूनही किबलच >> ये तो नाइन्साफी है! काय रे. प्रॉपर ट्रीट्स आणा की त्याला. ट्रेन करताना मोटिवेशन म्हणून छोट्या छोट्या ट्रीट्स उपयोगी पडतात.

पपीज असताना खाणं फक्त महत्वाचं असतं. त्या खादाडखाऊना काय वाट्टेल ते ट्रीट म्हणुन खपवता येतं. मी पण किबल्स आणि डाळिंबाचे दाणे देऊन, सीट, फेच, स्टे, रोल, स्पीक या कमान्ड्स शिकवल्या होत्या.
आता सगळे टीनेजर्सचे नखरे चालु झाले आहेत. खाणंपिणं, वागणं, मुड्स याबाबतीत माणसाची टीएजर मुलं आणि डॉग्जची मुलं दोघेही अगदी सारखे वागतात. (माझ्याकडे दोन्ही आहेत. मला सहानुभूतीची प्रचंड गरज आहे. Proud )

मैत्रेयी, त्याला आत्तापर्यंत 4 वेगवेगळया ब्रॅण्ड आणि प्रकारांचे ट्रीट देऊन बघितले. कुठलंच खाल्लं नाही. त्यातल्या त्यात मारी बिस्कीट जरा तरी तोंडात घातलं Happy
परवा व्हेटकडे एक छोटं बिस्कीट खाल्लं. ते आणून बघणार आहे आता. आम्ही किबलवर सीट आणि थोडंफार लिश वोकिंग शिकवलंय.

मीरा अगदी सेम आमच्याकडेही
लहान असताना केळी, गाजर, बिट मस्त ट्रीट म्हणून खायचा
आता नखरे चालू
हिमालयाचे डॉग बिस्कीट आणले ते आवडतात प्रचंड
आणि wag चे मिट स्टिकस

माझाही पोरगा आणि ओडीन आता टीनेज टांतर्म्स दाखवू लागले आहेत
दोघांची मस्ती पण खूप चालते, मग ओरडाव लागतं दोघांना
पूर्वी पोराला ओरडलेलं चालायचं नाही ओडीन ला, लगेच तो अंगावर उड्या मारून लक्ष डायव्हर्ट करायचा, आता त्यालाही ओरडा बसतो कळलंय त्यामुळे आवाज किंचित चढला, बास आता म्हणलं की गुपचूप आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून त्याचा बॉल घेऊन त्याच्या गादीवर जाऊन बसतो
मी तर एकदम गुड बॉय आहे, मला काय माहिती नाही बुवा काय चाललंय असा आविर्भाव असतो

पराग - आपली बिस्किटे खाण्याची अजिबात सवय लावू नका
त्यात भरपूर मैदा असतो जो त्यांना चांगला नसतो
सलामी किंवा चिकन चांक्स चे ट्रीट मिळतात त्या द्या

हो हो आपली बिस्किटे नाही देणार. परवा अगडीबकाहिच खाईना म्हणून जरासं दिलं. जोपर्यंत किबल खातोय तोपर्यंत फार काही प्रयोग करणारच नाहीये.

पिंपरी चिंचवड मध्ये चांगले dog hostel or pet day care centre माहिती आहे का? एका डाॅक्टर मैत्रिणीला पाहिजे आहे. तिच्या डाॅबरमन साठी. Urgent आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये चांगले dog hostel or pet day care centre माहिती आहे का? >>>> धनवंती, मी पुण्यात रहाते त्यामुळे pcmc मधल्या हॉस्टेलसची नावं देऊ शकेन, पण खात्री नाही देऊ शकत, जी मिळणं अत्यन्त महत्वाची आहे. तुमच्या डॉगला बोलता येत नाही, त्यामुळे त्याला अत्यंत खात्रीलायक ठिकाणी ठेवणं फार महत्वाचं असतं. माणसांच्या दुष्ट कथा ऐकल्या आहेत, त्यामुळे माहितीतील ठिकाणी ठेवणं महत्वाचं.
तुम्ही किंवा तुमची मैत्रीण PuLa (Pune Ladies) ग्रुपवर आहे का? तिथे बऱ्याच डॉग हॉस्टेल चालवणाऱ्यांचे रेफरन्सेस आहेत. मी कॅम्प आर्मी एरियात रहाते. इथले खुप कॉन्टॅक्टस देऊ शकते. किंवा बावधन, चांदनी चौक एरियात पण माझ्या माहितीत खुप चांगली डॉग हॉस्टेल्स आहेत.

धन्यवाद देवकी, आशिष, मीरा , प्राजक्ता. मी तुमचे मेसेज तिला पाठवले. तिने काय सोय केली हे कळले की इथे लिहिते.

Pages