भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त आहे बेला !
न्युटरींग बद्द्ल खूप अभ्यास नाही केलेला पण काही लोकांचं मत असं ऐकलय की तसं करणं हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे वगैरे. पण मला असंही वाटतं की नाही केलं तर तुम्ही त्याला फिमेल पार्टनर आणण्याची सोय करणार का? तसं नसेल तर ते ही निसर्गा नियमाच्या विरुद्ध नाही काय ?
वेट शी बोललोय त्यानुसार न्युटरींग करून घ्यावं ह्या मताचे आहोत आत्तातरी.

पण वरचे वर होत असेल तर एकदा व्हेट च्या सल्ल्याने डाएट प्लॅन ठरवून घ्या >>>> काल पहिल्यांदाच झालं. पुढे मॉनिटर करू आता.

प्राण्यांचं पण ईआर असतं? >>> हो असतं ना. इथे एक युनिट असं नाही. वेगळं हॉस्पिटलच आहे आणि त्यात इआर आहे.

सर्वांचे फोटो क्युट.

मोठी पोस्ट लिहिलेली एरर येउन वाया गेली. ती ब्रेक करून परत लिहिते.

उलटी जमिनीवर केल्यास सोपे आहे डेटॉल घालून पुसून घेणे. कार्पेट मध्ये केल्यास वरून आपली अंगाला लावायची पावडर टाकणे व थोड्या वेळाने ब्रश ने साफ करून घेणे. जुन्या ओढण्यांचे चौकोनी तुकडे करून ठेवल्यास ह्या कामी उपयोगी येतात. साफ करून फेकून देता येतात गार्बेज बॅग मध्ये. व वास राहात नाही.

पपी साठी वेगळे अन्न मिळते. इ कान्यु बा एक ब्रँड आहे इथे भारतात.
मग पपी पेडिग्री आहेच.

लहान मुले कसे रांगताना काहीही तोंडात घालतात तसेच ह्यांचे होते व मग उलटी होते.
वार्धक्यात किडनी डिसीज वगैरे असू शकतो.

सर्वांचे फोटो क्युट.

मोठी पोस्ट लिहिलेली एरर येउन वाया गेली. ती ब्रेक करून परत लिहिते.

उलटी जमिनीवर केल्यास सोपे आहे डेटॉल घालून पुसून घेणे. कार्पेट मध्ये केल्यास वरून आपली अंगाला लावायची पावडर टाकणे व थोड्या वेळाने ब्रश ने साफ करून घेणे. जुन्या ओढण्यांचे चौकोनी तुकडे करून ठेवल्यास ह्या कामी उपयोगी येतात. साफ करून फेकून देता येतात गार्बेज बॅग मध्ये. व वास राहात नाही.

पपी साठी वेगळे अन्न मिळते. इ कान्यु बा एक ब्रँड आहे इथे भारतात.
मग पपी पेडिग्री आहेच.

लहान मुले कसे रांगताना काहीही तोंडात घालतात तसेच ह्यांचे होते व मग उलटी होते.
वार्धक्यात किडनी डिसीज वगैरे असू शकतो.

न्युटरिंग : मझ्या कडे दोन फीमे लच आहेत. त्यामुळे त्यांचे ऑपरेशन मी केलेले नाही. कुत्र्यांचा मेनोपॉज नसतो. पण पाळी येण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. व नॅचरल रोमँटिग इन्स्टिंक्ट आहे तसाच शेवट परेन्त राहतो. पाच सहा वर्शानंतर बाळंत पण पण अवघड म्हणजे नकोच ती रिस्क असे होते. भारतात एका कुत्र्याचा गर्भाशय काढून टाकण्याचा खर्च ७५००- ८००० रु. आहे.

वीनीचे एक ऑपरेशन झाले शेवटी त्यात गर्भाशयात काही ट्युम र असल्याने सर्व काढून टाकले व नंतर सहा महिन्यात ती किडनी डिसीज ने वारलीच. वय आठ पूर्ण होते तेव्हा. व दोन बाळंत पणे झालेली होती. दर वेळी सहा पपीज!!!

मेल डॉग चे ऑपरेशन केले की अ‍ॅग्रेशन कमी होते. त्यांचे सेल्फ एस्टीम संभाळ्ण्यासाठी फेक प्रायवेट पार्ट इन्सर्ट करतात . नेट फ्लिक्स वर एक शो आहे त्यात बघितले होते. ते व्हेटला विचारून घ्या. रॉट वेलर, जर्मन शेपर्ड सारख्या खंद्या मॅस्कुलाइन ब्रीडचे पण ऑपरेशन होते.
ऑपरेशन केले की हार्मोनल इंबॅलन्स होईल काय अशी शंका मला वाटते. पण आपल्या परिस्थितीस योग्य ते करावे.

उलटी जमिनीवर केल्यास सोपे आहे डेटॉल घालून पुसून घेणे. >>>> आमच्या इथे हार्डवूड फ्लोअर आहे. त्यामुळे साफ करायला फार त्रास होत नाही.
ह्यावरून आठवलं. मध्यंतरी मैत्रेयीशी बोलत असताना तिने विचारलं की आता जरी कमी झाला असला तरी तुला नक्की कसला स्ट्रेस होतो त्याचा विचार कर. खोलात विचार करता असं लक्षात आलं की मला पपीमुळे होणार्‍या घरातल्या अस्वच्छतेचा स्ट्रेस होतो. मला त्याला उचलणे, केस विंचरणे, आंघोळ घालणे, दात घासणे, फिरायला नेणे वगैरेचा काही त्रास नाही पण हे सगळं झाल्यावर मला 'माझी स्पेस' स्वच्छ हवी असते. तिथे वास/घाण नको असते. त्यामुळे ट्रेनिंग होईपर्यंत त्याची शु-शी घरात करणे, त्याच्या खाण्याचा वास, सगळीकडे चावणे / चाटणे ह्यामुळे फ्लोर सारखा झाडणे, पुसणे, शी/शू साफ करणे, सतत हात धुणे, नेहमीपेक्षा जास्त आणि जास्त फ्रीक्वेन्सीने कपडे धुणे (कारण हा ट्रॅकपँट चाटत / चावत बसतो) ह्यामुळे फार दमायला होतं. पण पॉटी ट्रेनिंग सुरळीत झालं की हे कमी होईल हे दिसतय. (मी माझ्या घरात घालायच्या चप्पल कधी आयुष्यात धुतल्याचं आठवत नाही. हल्ली रोज रात्री झोपायच्या आधी चप्पल आणि पाय धुतो.. Wink )
आम्ही गेल्या आठवड्यापासून पॉटी ट्रेनिंगसाठी एकदम कंबर कसली आहे! वेळा लक्षात ठेऊन बाहेर नेतो आहोत आणि हल्ली जिथे पॉटी अ‍ॅक्सिडेंट झाले होते तिथे जास्त लक्ष देत आहोत. ह्या आठवड्यात नक्कीच सुधारणा दिसते आहे. शिवाय इथलं वाचून एक बेल पण गॅलरीच्या दाराला लावली आहे.

तुम्ही मंडळी भुभुंना आंघोळ कितीवेळाने घालता ? मी आत्तापर्यंततरी आठवड्यातून एकदा घातली आहे. ठरवून असं नाही पण सध्या इथे खूप पाऊस असल्याने बाहेर ओलं असतं. फिरायला नेलं की हा ओला होऊन येतो. साधारण आठवड्याने त्याला वास यायला लागतो आणि मग मी आंघोळ घालतो. वेट म्हणे जर चांगला शांपू वापरत असाल तर हरकत नाही. शिवाय हा केसाळ असल्याने जितकं ग्रुमींग करू तितकं बरच आहे असं नेटवर वाचलं. पण इथल्यांचे त्याबाबत अनुभव ऐकायला आवडतील.

पपीज लहान असताना दर दोन तासाने पी आणि दिवसातून ३-४ वेळा पॉटी करू शकतात. मोठे झाले की जास्त वेळ होल्ड करू शकतात. दिवसातून २-३ वेळा ठरलेल्या वेळी बाहेर नेले तरी बस होते.
स्वच्छतेच्या बाबतीत म्हणशील तर घरात सू केल्यावर अर्थातच फ्लोर वगैरे साफ करणे हे होते, पण नुस्ते चाटले किंवा चावले तर लगेच आपले कपडे अन घरातल्या चपला इ. काही पुन्हा पुन्हा धूत वगैरे बसत नाही आम्ही Happy
पपीज ची स्किन नाजूक असते त्यामुळे फार फ्रिक्वेन्टली धुवायचे नाही. महिन्यातून एकदा आंघोळ आणि आठवड्यातून एकदा ड्राय शांपू आणि कोंबिंग.अ‍ॅडल्ट झाल्यावरही फार तर २-३ आठवड्यातून एकदा आंघोळ पुरे होते. ग्रुमीम्ग फ्रिक्वेन्टली सांगतात पण ते म्हणजे कोंबिंग, ते मात्र रोज करावे. माणसासारखी कुत्र्यांना फ्रिक्वेन्ट आंघोळ घातली तर त्यांची स्किन ड्राय होते आणि त्यांना त्रास होऊ शकतो. शिवाय केस ओले असताना चिकटून बसून मॅटींग होण्याची शक्यता वाढते ते वेगळेच. इथे वाचा:
https://www.ccspca.com/blog-spca/education/how-often-should-you-bathe-a-...
https://www.akc.org/expert-advice/health/how-often-should-you-wash-your-...

बेकिंग सोडा आणि बेबी पावडर यांचं मिक्स करून आठवड्यातून एकदा ते टाकून केस विंचरायचे. वास येत नाही. रादर छानसा पावडरचा वास येतो. बेकिंग सोड्यामुळे इचिंग होत नाही. पावसात पॉटीला नेताना मोठी छत्री वापरली तर (जेणेकरून पपीच्या अंगावर पाणी येणार नाही) वास येणं कमी होईल.

पावसात पॉटीला नेताना मोठी छत्री वापरली तर (जेणेकरून पपीच्या अंगावर पाणी येणार नाही) वास येणं कमी होईल. >>>>> पाऊस पडत असताना तो बाहेर येतच नाही. बहुतेक अजून घाबरतो तो. कव्हर्ड पॅटीयो असल्याने पॉटी तिकडे पॅडवर करतो. तो इतका बुटका आहे की पाऊस पडत नसताना बाहेर गेल्यावर गवतात पूर्ण ओला होऊन जातो. आल्यावर तळवे घासत बसतो त्याच्या पांघरूणावर. इथे रस्ते आणि फुटपाथवर मीठ टाकतात त्यामुळे इरीटेशन होतं म्हणे. त्यावर रुम टेंपचं पाणी घातलं की बरं वाटतं त्याला. आधी मी कोमट घालायचो पण त्याने हुळहुळतं बहुतेक.

बेकिंग सोडा आणि बेबी पावडर बद्दल माहित नव्हतं. मी परवाच विचार करत होतो की जॉन्सन बेबी पावडर लावली तर चालते का हे विचारावं व्हेटला. Happy

नुस्ते चाटले किंवा चावले तर लगेच आपले कपडे अन घरातल्या चपला इ. काही पुन्हा पुन्हा धूत वगैरे बसत नाही आम्ही >>>> हो. घरात कधीच कुठलाच पाळीव प्राणी नसल्याने मला ती कम्फर्ट लेवल यायला वेळ लागतोय. Happy

रच्याकने, काल रात्री मी मॅच बघत बसलो होतो तर हा माझ्या पायापाशी घुटमळत होता. मग मी उचललं तर माझ्या मांडीवर पडून राहिला. एकदम शांत नो हालचाल, चाटाचाटी ! त्याला तेव्हा कडल करून घ्यायचं होतं बहुतेक. Happy

आज एक मित्राकडचे रोटवायलर चे पिल्लू एक दिवस सांभाळायला आमच्याकडे आलं आहे
जेमतेम दोन सव्वा दोन महिन्यांनाचे आहे पण अक्षरशः धुमाकूळ घालताय
लुटुलुटू पळत कारभार करतोय, ओडीन आधी भुंकला पण आम्ही नाही म्हणल्यावर गप्प बसला
आणि आता त्याला छळतोय हा बारक्या, त्याच्या अंगावर उड्या मार, कान चाव, त्याच्या बाउल मध्ये तोंड घालून त्याचं फूड खा असे सगलर प्रकार करून झालेत
ओडिननने कमालीची सहनशीलता दाखवली आहे अजून तरी

सगळ्यांचेच पाळीव प्राणि मस्त आणि गोड आहेत
आधी कधीच इकडे येणे झाले नव्हते
नवीन घर घेतल्यापासून मला स्वत:ला कुठलातरी पाळीव प्राणि घ्यायचा होता
पण इथल्या वातावरणात शक्य झालेच नाही
बघू , अजून एकदा घर बदलायच चाललय, त्या नंतर एखाद भुभु आणेनच Happy
तुमची सगळी पाळलेली बाळे दीर्घायु होवोत!
होप, मी पण माझ्या पिल्लाचा फोटो पोस्ट करेन येथे एक दिवस

नवीन Submitted by आशुचँप on 12 January, 2021 - 11:34 >>>
Happy दोन अपत्ये असलेल्या रेफरी पालक मोडसाठी शुभेच्छा

बाक काढला एक दिवसात कारट्याने
एका जागी थांबतच नव्हता, उचलून घ्यावं तर सुई सारखे दात कचाकचा चावायचा आणि खाली सोडलं तर इकडे तिकडे पळापळ नुसती
वाटेत कोण काय येईल त्याचा पार भूकना
अक्षरशः घरदार त्याच्या मागे नाचत होतं
ओडीन चाही शेवटी संयम संपला आणि त्याने पंजाने दाबून धरला व्रात्य पोराला, शेवटी मग दोघांनाही वेगळ्या खोल्यात ठेवावं लागलं
दुपारची वामकुक्षी आटपून ओडीन परत खाली आला तेव्हा त्याला हे चिरंजीव कॉट खाली शु करताना दिसले
त्याचा संताप संताप झाला
अजूनही हा इथेच?
याला कायमचा घेतला का काय?
मी काय उगाच का मग आता?
मला शु केली तर ओरडला होतात आता का गप्प?
असे अनेक प्रश्न त्याच्या भुंकण्यात होते Happy

विचार होता आधी की ओड्या ला कंपनी म्हणून एक घ्यावं, पण आता विषय सोडलाच

बाप रे धमाल च उडवून दिली की पाहुण्या बाळाने Lol लहान पिल्लू आहे त्यामुळे ट्रेन झालेला नसणार. तसेही वेगवेगळ्या ब्रीड्स च्या टिपिकल बिहेविअर्स मधे फरक असतो.
पण ओडिन ची रिअ‍ॅक्शन बघायला मजा आली असेल. तुम्हाला अजून एक भुभू आणायचा उत्साह असेल तर पर्सनॅलिटी मॅच करूनच आणावे लागेल Happy

हाहा. अगदी आमच्या घरची पहिल्या आठवड्यातली परिस्थिती !! Proud मी जे भिरभिरण लिहिलं होतं ते अगदी हेच.

अरे बापरे. भूभू मंडळीत सिबलिंग रायव्हलरी. Happy
मजाच चालू आहे सगळी.त्या पाहुण्या बाळाचेही फोटो टाका.

रोटवायलर चे पिल्लू >>>>>>>>
सुई सारखे दात कचाकचा चावायचा>>>>>>>>>> हे मोठे झाल्यावर फार डेंजर असतात ऐकलंय. फाडून खाणारे लिटरली.

आमचा सँटा

IMG_6218.JPG

किती ते प्रेम Happy हा ३-४ महिन्यापूर्वीचा फोटो आहे.

IMG_2822.JPG

अंजली, केवढे मोठे झाले दोघं पण Happy सॅन्टा फारच क्युट.

बेला फारच ब्युटिफुल आहे. सगळेच म्याव आणि भुभू सुपर क्युट!

Pages