मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी बहिण दुसरीला होती आणि मी पाचवीत होते. एकदा मी डब्बा विसरले. आईने तिला डबा देऊन पाठवले. ही पठ्ठी सराना न विचारता सरळ वर्गात आली मला शोधत आणि डबा हातात दिला. वर पून्हा 'पूर्ण डबा खा, लौकर ये' वगैरे (आईने सांगितले असणार.) सगळे टकमका बघताहेत. तेव्हड्यात सरांनी हटकले "ए कोणाला विचारून आलिस?"
ही तेव्हड्याच आवाजात म्हणाली" कोणाला म्हणजे? आईला"
सरांसहित सगळे हसले.

ही अती हुशारी झाली गौतम भाऊ. Wink
एकतर त्याच लक चांगल होत किंवा तुमचा मास्तर मट्ठ होता. Lol
नक्की काय ते तुम्हालाच माहित.

पने.... Lol

हा किस्सा ५ - ६ वर्षांपूर्वीचा..
खरा तर टाकणार नव्हतो पण pure वेंधळेपणाचा किस्सा असल्याने राहवत नाहीये. Proud

आमच्या प्रोजेक्ट्ची डिलिव्हरी डेट जवळ आली होती. आम्ही दिवस रात्र काम करत होतो ऑफिसमध्ये. मी तर जवळ जवळ ३ आठवडे सतत ऑफिसला जात होतो. (शनिवार, रविवार सुद्धा)
त्यानंतरचा एक रविवार मात्र आराम करण्याकरता घेतला. ठरवलं की आज फक्त आराम करायचा. फक्त जेवायचं आणि झोपायचं. रविवारी सकाळी ११ वाजता उठलो. आंघोळ केली. देवाची पुजा केली. पुजा झाल्यावर माझा नेहमीचा होम ड्रेस चढवला.. लुंगी आणी T-shirt.
जेवण तयार झालं होतं. लगेच साडेबारा पाऊणला जेवायला बसलो. मस्तपैकी जेऊन परत झोपायला गेलो.
संध्याकाळी ६ ला उठलो. उठल्यावर थोडसं अवघडल्यासारखं वाटायला लागलं. म्हटलं असं काय वाटतय? शोध घेतला तेंव्हा लक्षांत आलं.. सकाळी पूजा झाल्यानंतर लुंगी चढवली पण त्याआधी पुजा करताना कमरेला गुंडाळलेला टॉवेल आत तसाच राहीला होता.
त्यानंतर आई पुजा झाली की आठवण करून देत असे.. टॉवेल मोकळा केलास का?
आता माझा होम ड्रेस मी बदलला आहे. (ट्रॅक पँट, T-shirt) आणि आईचं कामही कमी केलय.

आज सकाळचा किस्सा,
सकाळच्या -मॉर्नींगवॉक ला गेलेले, बागेतुन बाहेर आल्यावर मैत्रीणीशी बोलता बोलता
मोबाईल ठेवायला अ‍ॅक्टीवाची डिकी उघडत होते, बराच वेळ खटपट करुन उघडेना, तेव्ढ्यात एक काका बागेतुन बाहेर पड्ले आणि म्हंटले म्याडम बहुतेक ही माझी आहे अ‍ॅक्टीवा, किल्ली देऊ का ?
नंतर् लक्षात आल माझी २ गाड्या सोडुन पलीकडे लावलेली.

किरू Lol

स्मिता ताई,
मला वाटत कि मॉर्निंगवॉकला सकाळीच जातात.
हा पण एक किस्सा होईल हो!

किरु Rofl
मला वाटत कि मॉर्निंगवॉकला सकाळीच जातात. >>>> Rofl

एक काका बागेतुन बाहेर पड्ले >> काका लैच अ‍ॅक्टिव निघाले Proud
सकाळच्या -मॉर्नींगवॉक >> तू हे मुद्दाम ठळक केलेस काय ? Proud

हे सालं सगळ्याच अक्टीव्हांचं होतं की काय समजत नाही. मी एकदा फिश आणायला गेलो. फिश घेतलं आणि पिशवी घेऊन अ‍ॅक्टीव्हाला लावून चावी फिरवतोय फिरवतोय... फिरेचना. मला कळेना नक्की काय होतय. एक सदगृहस्थ साताठ फुटावरून स्वतःशीच माझ्याकडे पहात हसत उभे होते. चावी लावून कंटाळल्यावर मी वैतागून वर पाहिले तर हे दिसले. मी प्रश्नार्थक चेहरा करून त्यांच्याकडे पाहिले तर ते म्हणाले' अहो ही गाडी माझी आहे!!!"

किर्‍या Lol

माझ्या शेजारी एक सहकारी (त्याच नाव नाही लिहत कारण तो पण माबो वाचतो) बसतो, आज सकळी उशिर झाला म्हणून घाईघाईत आला, पेन ड्राईव टेबलावर ठेवला, जाऊन कॉफीचा कप घेतला व जागी परत येऊन बघतो तर पेन ड्राईव दिसेना. लगेच मोबाईल उचला व स्वतःचाच नंबर फिरवुन उजव्या कानाला लावला, व डाव्या हातात कॉफीचा कप धरुन एक एक घुट पित, मधे मधे पुटपुटत होता, "साला, ईथेच ठेवला होता, स्ट्रेस कसा होत नाहीये!"
मी: अरे काय शोधतोयस ?
तो: अरे पेन ड्राईव हरवलाय, पण नंबर लागेना राव, काय माहित कुणी उचलला!
मी: पेन ड्राईव आणि नंबर, काय बोलतोयस ?
आणि लगेच त्याच्या लक्षात आलं, यावेळी त्याला मोबाईल नाही, पेन ड्राईव शोधायचा आहे.
मग दिवरभर जाम पिळलं त्याला.

अरे या बीबी चे नाव मी केलेला वेंधळेपणा!!!! असे आहे.. दुसर्‍यांनी केलेला नव्हे ... वेंधळे कुठले Wink

हुडा तुझ्या किस्स्यावरुन आठवलं... मी कोल्हापुरला असतानाचा किस्सा... (इथं आधी लिहलं असेल तर पुन्हा एकदा झेलन्यासाठी आधीच धन्यवाद !)

संध्यकाळी मि नि माझा मित्र संदीप, दुसर्‍या एका रुम मेटची गाडी (CD-100) घेउन ट्रॅवल्सच बुकींग करायला स्टँड वर गेलेलो. गाडी तिथल्या फोटो गॅलरीच्या समोर टपरीच्या इथं लाउन टिकिट घेउन आलो. रुम वर ज्याची गाडी आहे तो मित्र वाटच पाहत उभारला होता. गाडी घेउन त्याला लगेचच निघायचे होते.
संदिपने गाडी लावतो न लावतो तोच तो जवळयेउन म्हणाला कि राहुदे मी निघतोय.
तेव्हा माझ्या लक्षात आले कि जाताना गाडीला आरसे नव्हते...
"अबे जाताना तर गाडीला आरसे नव्हते ना ? कि होते ?" Uhoh इति मी...
"हो ना बे.... गाडीला हे 'जै माता दी' ची ओढनी सुद्धा नव्हती ना?" इति संदिप.....
"अबे साल्यानो... #@*$%नो कोणाची गाडी उचलुन आणलात.... :राग:... ही माझी गाडी नाही" इति गाडीवाला मित्र....
मग मि नि संद्या क्षण्भर एक्मेकांकडे पाहत राहीलो... लगेच किक मारली नि स्टँड गाठले...
तिथे तो माणुस आमच्या गाडी शेजारी उभारुन वाट पाहत होता... आम्हाला पाहिल्यावर धावतच आला....
"बरं झालं गाडी परत आली.. यातच मिळवलं... आहो तुम्ही गाडी नेताना मी तुम्हाला हाका मारत तुमच्या मागे तिथंवर पळत आलो..." मग मि नि संद्या पुन्हाएक्मेकांकडे पाहत राहीलो... फिस्स करुन हसुन (आमची किल्ली काढुन घेउन) त्याची गाडी त्याला दिली...

एक चालूपणाचा किस्सा.
लातूरला गाडीवर(हिरो पूक) जात होते. इतक्यात मोबाईल वाजला. सेलवर बोलत साईड्ला गाडी घेतच होते तोवर पोलिस मामा आले. गाडी पार्क करायला लावली. आता बोला म्हणाले. मी निवांत बोलले फोनवर. निघावे म्हटले तर चावी गायब. मामानी चावी घेतली होती. ३०० रू दंड आकारला. मी म्हटले की मी घेतच होते गाडी बाजूला महत्त्वाचा फोन होता. मग लायसन्स मागितले. ते ही नव्हते. अजून १०० रू भरा म्हणाले. कितीही सांगितले तरी मामा चावी देत नव्हते.
मी गाडी ढकलत पुढे घेतली. मामा बघत होते. त्याना वाटले जातेय कुठे इतक्यात? सुदैवाने मागून एक हीरो पूक वाले काका येतच होते. मी त्याना थांबवून माझी चावी हरवल्याचे सांगितले. त्यांनी चावी दिली. गाडी स्टार्ट केली. मामा दुसरे गिर्‍हाईक गाठत होते. चावी वापस दिली. गाडी चालूच होती. अशी भन्नाट मारली, मामा बघतच राहिले. .
अजून शाहू चौकातून जाताना भिती वाटते मामानी गाडीचा नंबर तर घेतला नसेल ना..

कालचाच एक मजेदार किस्सा..माझ्या फ्रेन्ड (फ्रेन्ड चा मराठी शब्द लिहीता येत नाहिये असो चुकभुल देणे घेणे).. तर मी तीला फोन केला अणि आम्ही पार्टी चा मेनु ठरवत होतो... मी तीला म्हणाले कि अगा तुझा पदार्थ ठरला नसेल तर मला उद्या सान्ग याहू वर...ती आधी म्हणाली होती कि आलू टिक्की बनवेन म्हणुन तर ती म्हणाली "अग्गा नाही काही... मी याहू टिक्की करुन आणतेय ग.. एकदम फिक्क्स" आणि मी एकीकडे का हसतेय विचारत होती वरती...

Pages