दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकं रँडम मीही ओळखू शकत नाही. बाकी अनोळखी चेहरा, त्यातून तिचा चित्रपटात काही संबंधही नाही, काही क्लुज पण नाहीत मग इतरांनी कसे काय गाणे ओळखणे अपेक्षित आहे?

कोई रोको ना दिवाने को किंवा रिमझिम गिरे सावन अशी मित्र-परिवारात गायलेली खिडकीला पडदा असू शकेल अशी घरातील गाणी आठवायची ... किंवा रेडीयोवरची गाणी (मीत ना मिला/ आते जाते खूबसुरत छाप).

मी तर त्या पडद्यापायी 'ये ना सोचो इसमे अपनी हार है की जीत है, उसे अपनालो जो भी जीवन की रित है' ४० वेळा ऐकलं आज...

ते कोडे देऊन विसरले वाटते.
ही अशीच आहे गाण्यात.. काहीच सम्बन्ध नाही हीचा पिक्चरशी.>>> यावरून कसे शोधणार?

वावे अजिबातच नाही .. हे वरचं दृष्य फ्लॅशबॅक मध्ये आहे. गायिका पदमभूषण. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका , आता हयात नाहीत. चित्रपटातील सगळीच गाणी हिट आहेत.

बरीच वर्षं मागे जावं लागेल
पण आपले बरेच प्रिय लोक अजूनही धंद्यात आहेत, त्यांना मागे न जाताही बघता येईल.
त्यांना हाक मारुन बघा, आपल्याच हाकेचा प्रतिध्वनी येतो का ते.

सुभाष घइ चं पिक्चर हे नक्कीच वाटत होतं , सौदागर ची सगळी गाणी बघावी लागली, इलु गाण्यात टेंट्स आहेत ते आठवत होते. असाच एक शॉट राम लखन मध्ये पण आहे बहुदा.

अरे देवा आता मला अंगठी सोडून सगळे पडलेले दागिने आठवत आहेत - बुम्बरो मध्ये कडं पडतं, एक लडकी को मध्ये डूल पडतो, कुछ ना कहो मध्ये माळ पडते.... जरा सुगाव्याच्या खुणा द्या..

Pages