नको असलेले मित्र

Submitted by कटप्पा on 6 December, 2020 - 00:20

मंडळी प्रश्न सिरीयस आहे.
आमचे एक मित्र आहेत. आम्ही राहायला दुसऱ्या शहरात होतो आणि ठरवले की जॉब चेंज करून या दुसऱ्या शहरात जाऊ.. तिथे हे मित्र होते..
आम्हा नवरा बायकोने जॉब स्विच केला आणि त्या शहरात शिफ्ट झालो. या मित्र दांपत्याने आमचे स्वागत केले. कंपनी अकोमोडेशन देत होती तरी पहिले १५ दिवस त्यांनी आपल्या घरी राहायची सोय केली. आम्हीदेखील आनंदाने राहिलो. मात्र त्यांना खर्च नको म्हणून ग्रोसरी वगैरेआणली, बाहेरून जेवण वगैरे मागवले तर बिल आम्ही देऊ लागलो.
नंतर आम्ही वेगळे घर भाड्याने घेतले. एकमेकाकडे येणे जाणे होतेच. सगळे व्यवस्थित चालू होते. एकदा दिवाळीत सात वाजता मंदिरात जाण्याचा प्रोग्रॅम ठरला. आम्ही पावणे सात पासून दोन तीन वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. आम्हला वाटले की बिझी असतील, आम्ही मंदिरात जाऊन आलो. त्यांनी नंतर कॉल बॅक केला. खूप चिडले की मिळून जायचे ठरले असताना तुम्ही एकटेच का गेलात. आम्ही देखील ओरडा खाऊन घेतला.
नंतर हे वारंवार होऊ लागले, आम्ही काही नवीन वस्तू घेतली त्याना न सांगता ते चिडू लागले.
परिणामी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांना इंफॉर्म करू लागलो. फिरायला चाललोय मेसेज टाक. Tv घेतोय मेसेज टाक वगैरे वगैरे.
नंतर आम्ही स्वतःचे घर घेतले ते देखील त्यांच्या पेक्षा मोठे. त्यांना न सांगता.
तेंव्हा ते म्हणू लागले इतके मोठे घर, मेन्टेन कसे करणार वगैरव वगैरे.
आणि मूद्धाम घराचा उल्लेख करु लागले की अरे मला ट्रेडमील घ्याची होती पण माझे घर तुज्याएवढे मोठे नाही ना. तुझे बरे आहे मोठे घर आहे वगैरे वगैरे.
आणखी इक त्रास म्हणजे यांना फोन करावा तर हे उचलत नाहीत, दोन तीन दिवसांनी कॉल बॅक करतात.
आम्ही फोन नाही उचलला तर चिडतात म्हणतात अरे असला कसला मित्र जो मदत हवी असताना फोन उचलत नाही.

काय करावे मायबोलीकर???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow! Looks like i was lucky to have really good friends in my 5 years there..
Thanks to maaybolikars for wonderful time during Seattle days. And non maayboli friends before that.

सगळे तसे नसतील.
बाकी रिकाम्या टिका वगैरे भारतातही होतेच. अगदी 'कुचाळक्या वाल्या बायका आणि उदार मनाचे पुरुष' या गैरसमजाला सुरुंग लावावा इतके गॉसिपिंग पुरुष मंडळीतही चालते.
या सगळ्यात स्वतः कायम उपयुक्त कामात बिझी राहणे, या ग्रुप मध्ये त्यतल्या त्यात चांगले काम करणार्‍या व्यक्तीची संगत पकडून पुढे जाणे इतकेच उपाय.

Wow! Looks like i was lucky to have really good friends in my 5 years there.>> Same here.. गेल्या ८ वर्षात ५ शहरे बदलली.. सुदैवाने “friends who are like family” म्हणता येईल असे मित्र-मैत्रिणी भेटले.. कटप्पांना आले तसे अनुभव ऐकून होते पण कधी असं कोणी वाट्याला आलं नाही.

ह्या धाग्यावरून मला “नको असलेले शेजारी“ असा धागा काढायचा मोह होतोय.. एक काळ होता जेव्हा एका शेजाऱयाने छळ छळ छळलं होतं Sad

खरंय खूप त्रासदायक असतात असे लोक. नोकरीमुळे आम्ही पण नव्या ठिकाणी .नवीन ठिकाणी आमचे कोणी नातेवाईक नाहीत. मग कुणी तरी असा जो आपल्या सारख्या 2tier शहरातून मेट्रो मध्ये आलेला म्हणून आपण मैत्री करतो. सुरुवातीला सगळे आपल्या घरात सामावून जातात. पण नंतर हळूहळू आपल्यावर जळने सुरू . प्रत्येक गोष्टीत बरोबरी. आणी मग आपल्याला कळते मैत्री तर फक्त आपल्या बाजूने होती. समोरचा फक्त आपला उपयोग करून घेत होता. त्या पेक्षा इथली लोकल लोक बरी. पण वाईट खूप वाटते. आता तर मला नवीन कुणाशी मैत्री करायलापण भीती वाटते. कुणी introvert म्हटले तरी चालेल पण मी तरी आता असे मित्र गोळा करणार नाही.

खूप त्रास झाला आम्हाला . कारण ते कुटुंब पण आमच्याच बिडिंग मध्ये राहात आहे rent वर.सुदैवाने आमचे पण new possession मिळेल चार महिन्यात. आणि वरून ते महाशय नवऱ्याच्या सरकारी कंपनीत नशीब डीपार्टमेंट वेगळे.खूप depressing experince आहे हा. पण मी आता इथल्या लोकल लोकांशी मैत्री केली वयाने मोठया असलेल्या निदान jelous हा विषय येत नाही.आणि बाकी ठिकानि फक्त नवरा बायको आणि मुलगा enjoy करतो.कधी कधी तर आता समोरून जातात पण ओळख दाखवत नाहीत.खरंच माणसे अशी वागू शकतात???उगाच कुढत जळत बसतात???त्यापेक्षा ते तोंडावर बोलणारे मला आवडतात निदान त्यांचे मन तरी स्वच्छ असते.

गेल्या ८ वर्षात ५ शहरे बदलली.. सुदैवाने “friends who are like family” म्हणता येईल असे मित्र-मैत्रिणी भेटले..
> म्हणजे तुम्ही एका ठिकाणी जास्त वेळ राहिला नाहीत. हे प्रकार दीड दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर सुरू होतात. पहिले एक वर्ष सगळे गुड गुड असते.
लांबचे मित्र नेहमीच चांगले वाटतात.

मला वाटतं फ्रेंड्स ने फ्रेंड्स सारखेच राहावे. फॅमिली बनण्याच्या /बनवण्याच्या फंदात पडू नये. Proud एक फॅमिली आहे तेवढी बास Lol

कटाप्पा, किती विचार करताय. गिल्ट राईड घेउ नका. आणि दुर्लक्ष करणं उत्तम उपाय आहे. स्वाती२ च्या पोस्ट नेहमीप्रमाणेच उपयोगी.

मलाही एक मैत्रीण भेटलीये शेजारची. लॉकडाउनच्या काळात घरातच असल्याने जुजबी ओळख होती ती जास्त वाढली.
तिला पण अशीच सवय आहे. सगळं विचारुन घ्यायचं आणी मग कधीमधी ते वापरुन तुझी काय मज्जा आहे अजुन पण घरुन काम चाललंय. मला ऑफिसला जावं लागतं.
तुझी काय मज्जा आहे तुझा नवरा सगळा बाजार हाट आणुन देतो मला स्वतःला आणावं लागतं.
तुझी काय मज्जा आहे. तुला चार माणसांचंच करायचं आहे माझ्याकडे बघ किती माण्सं
तुझी काय मज्जा आहे तुला मोठा पगार. शिल्लक उरत असेल
तुझी काय मज्जा आहे तुझा नवरा सरकारी नोकरीत आमच्यचा पगारच नाही लॉकडाउन मधे
तुझी काय मज्जा आहे अमकं नी ढमक.
शिवाय नको ते सल्ले-नवीन टीव्ही घे ना. वॉम घेना. मुलीला नवीन लॅपटोप घेना. काय रडते. सरकारी नोकरीतला पगार तरी वैगेरे.
चिडचिड व्हायची पण सासु आणि मुलीने तिचं नाव मज्जा आहे असं ठेवलंय. आता मी ही मस्करीत घेते आणि कधीकधी चपखल उत्तरही देते.

सस्मित,
तुमची काय मज्जा आहे. 'मज्जा आहे' तुमच्या शेजारीच राहते. Wink

Lol

माझी एक कलीग होती(म्हणजे आहे ती अजून).कानातले नवीन घातले की बघू नवीन केलेस म्हणून कान दुडून पहायची.म्हणजे फिरकी,मळसूत्र चेक करायची नक्की खरं की खोटं! पहिल्यांदा वैताग यायचा,मग अंगवळणी पडले.बाकी सस्मितने म्हटल्याप्रमाणे वागायची.एकदा धमाल झाली होती.काहीतरी नवीन होते की काय ते आठवत नाही,पण आईने हे गिफ्ट दिले म्हटल्यावर मग तुझी वहिनी रागावत नाही का? म्हटलं आईला पेन्शन आहे.त्यावर अशी कितीशी पेन्शन मिळते तुझ्या आईला वगैरे नाक फेंदारुन विचारले.आविर्भाव अस होता की आता कसं हिला पकडले! माझा त्या दिवशी संतावतार होता की काय नकळे. मीही म्हटले,माहित नाही पण आज विचारते.नशीब दुसर्‍या दिवशी विचारले नाही.
आता देणारी आई घेणारी मी,कलीगला चोंबडेपणा करायची गऱजच नव्हती.पण असेही नमुने असतात.

Lol देवकी, मी आईकडुन परतल्यावर हिने मला, मग भावाने काय दिलं भाऊबीजेला विचारलं होतं. मी म्हणलं आम्ही दोघी बहिणी तर प्रतेकी दोन हजार दिले. तर परत मज्जा आहे Lol

आमच्या कामवाल्या बाई अशी प्रत्येक नवीन वस्तूची किंमत विचारायच्या. आता एखादी वस्तू त्यांना घ्यायची असेल तर समजू शकतं, पण उगाच आपलं प्रत्येक वस्तूची किंमत त्यांनी विचारल्याचं मला अजिबात आवडायचं नाही. पण त्या कामाला आणि बाकी स्वभावाने अतिशय चांगल्या असल्याने मी चालवून घेत होते. एकदा हाईट झाली. मुलासाठी कन्नड ट्यूशन लावली होती. ते सर शिकवायला घरीच यायचे. ते संध्याकाळी यायचे आणि आमच्या बाई सकाळी. त्यामुळे त्यांची गाठ कधी पडली नव्हती. एकदा दुसऱ्या दिवशी आम्हाला गावाला जायचं होतं म्हणून बाईंना संध्याकाळी बोलावलं. तेव्हा त्यांनी ट्यूशन चालू असल्याचं बघितलं आणि सर गेल्याबरोब्बर लगेच मला विचारलं , किती फी ? मी म्हटलं, तुम्हाला शिकायचीय का कन्नड? त्या चपापल्या आणि काही तरी सारवासारव करायला लागल्या. तेव्हा त्यांना स्पष्ट सांगून टाकलं, की मला तुम्ही हे सगळ्याची किंमत विचारता ते बिलकुल आवडत नाही. असलं विचारणं बंद करा. तुम्हाला काही घ्यायचं असेल (मिक्सर, ग्राईंडर वगैरे) तर तसं सांगा आणि मग मला माझ्या वस्तूची किंमत विचारा. तेव्हापासून त्या एकदम सुधारल्या Happy

मज्जा आहे प्रकरण वाचून एक गंमत आठवली. मी फोन केल्यावर माझी आई नेहमी कामाची बाई आली का, तिने जेवण काय बनवले, त्यातले मी किती बनवले, बाईने किती बनवले व व चौकश्या करते. मधली तीनचार वर्षे बाईच्या घरी सिरीयस इश्यूज सुरू होते व त्यामुळे तिला सतत गावी जावे लागायचे. त्यात मीही सतत गावी जात असल्यामुळे महिन्यात 7-8 दिवस तरी बाईला सुट्टी मिळायची. आईने फोन केल्यावर मी सांगायचे की जेवण मीच केले, बाई गावी गेली व व . मग आई 'तुझ्या बाईची मज्जाच आहे, 15 दिवस काम व महिन्याचा पगार.' हे असे खूप वेळा झाल्यावर मी एकदा असेच 'तुझ्या बाईची मज्जा आहे' ऐकल्यावर बाईचे काय इश्यूज आहेत ते आईला सांगितले आणि म्हटले, बघ बाई, तिचे हे हे असे प्रॉब्लेम्स आहेत आणि ती पूर्ण गांजलीय या प्रॉब्लेम्समूळे. तू घेतेस का तिची मज्जा आणि सोबत तिचे प्रॉब्लेम्स पण?? त्यानंतर आईने मज्जा आहे बोलणे बंद केले पण तरी अधून मधून चुकून बोलतेच. Lol

यावर सोपा उपाय! कोणी सारखे काही किंमत वगैरे विचारू लागले की, म्हणायचं, 'यांना विचारून सांगते! मला काही माहित नै बै!!'

माझा ही एक मजेदार मैत्री किस्सा.
मी आधी राहायचे तिथे एक शेजारी मैत्रिण राहते.
मला नवीन डिशेस बनवल्या कि आधी शेजारी द्यायला आवडते..मग तिलाही नेहमी द्यायचे..नंतर नंतर मग ती स्वत:हून कॉल करून विचारायची आज काय भाजी/आमटी बनवली मुलींसाठी दे..मी द्यायचे..तीच्या मुलींची आणि माझ्या मुलाची सेम शाळा सकाळी आठ वाजता ची..मग ती बरेचदा पहाटे सहा वाजता कॉल करायची थोडा मुलीच्या डब्यात द्यायला भात जास्त कर वगैरे.. तेव्हा ही मी नाही म्हणत नव्हते...तीला स्वयंपाक करायचा प्रचंड कंटाळा... ते दोघे नवरा बायको बर्याचदा बाहेरून मागवायचे आणि मुलींना बाहेरचे नको म्हणून मला भाजी जास्त करायला सांगायची...असं दिड वर्षे चालले.. इथे आजुबाजुला सगळे तामिळ बोलणारे ती तेलुगू पण तिला हिंदी यायचं म्हणून तीच्याबरोबर बोलणे व्हायचे.. मी जाऊ दे वाटीभर भाजी /भात जास्त केला तर काय होतं असा विचार करून नेहमी द्यायचे..
मी मुलीच्या वेळी प्रेग्नंट असताना, मला अजिबात स्वतः बनवलेले खावेसे वाटायचे नाही,तेव्हा ही ती फोन करून काय केले विचारायची.. कहर म्हणजे तिच्याकडे काही स्पेशल बनवले कि सांगायची आज मी बिर्याणी बनवली,मटण बनवले मला वाटायचे आणून देईल माझ्या साठी आणि मी वाट पाहत बसायचे...तिच्याकडून काही कधी येत नसायचे..मग काय खावेसे वाटते ते बाहेरून मागवून खायचे..
आईकडे डिलीवरीसाठी महाराष्ट्रात आले तेव्हा एकदा तीने कॉल केला तर नवरा म्हणे सांबार मागायला कॉल केला का तुझ्या मैत्रिणीने Lol

भारी प्रकार आहेत एक एक. ..
असेही काही जण पाहिलेत की त्यांना इतर मुले त्यांच्या घरी जाऊन खेळलेली आवडत नाहीत पण त्यांची मुले इतरांच्या घरी खेळायला पाठवून देतात.

Life is too short फार लोड न घेता दुर्लक्ष करणे उत्तम !
आमच्या घरापासून रेल्वे स्टेशन पर्यंत जायला एक छोटीशी शटल आहे. भारतातील टेम्पो म्हणा, त्यात बारातेरा लोक बसतात व प्रायव्हसी नसते.
नुकताच भारतातून आलेला एक भोचक माणूस ( अर्थात हा एक अपवाद होता. आजकाल पर्सनल स्पेस ची कल्पना भारतात ही लोकांना आहेच)
माणूस : किती वर्षी झाली अमेरिकेत आहात ?
बारा वर्षे !
माणूस : अरे वा, ग्रीन कार्ड मिळाले असेलच !
( थोड्याश्या त्राग्याने) हो.
माणूस : पगारही भरपूर असेल.
( आवंढा गिळत) हो.
माणूस : लग्न केव्हा झाले ?
झाली दोन वर्षे.
माणूस : एकच मुलगी ना?
हो
माणूस : एक वर्षाची वाटते?
हो
माणूस : तशी उशीराच झाली
?
माणूस : तुम्ही बारा वर्षे इथे अहात म्हणजे पस्तीशीचे तर असालच, त्या मानाने लग्न व मुलगी उशीराच झाली.

बाकी आम्ही सर्व जण संवाद ऐकत होतो व आपला नंबर येण्यापूर्वी स्टेशन येवो अशी प्रार्थना करत होतो.

मज्जा आहे Lol

सस्मित तुमच्या त्या मज्जा आहे शेजारणीला आमच्या शेजारी पाठवून द्या. मला तसेही स्वत:हून माझी काय मज्जा असते हे लोकांना सांगायला आवडते. त्यांचा तुझी काय मज्जा आहे हा डायलॉग माझा हुरूप वाढवेल आणि आम्ही मज्जा मज्जा खेळत बसू Proud

Pages