नको असलेले मित्र

Submitted by कटप्पा on 6 December, 2020 - 00:20

मंडळी प्रश्न सिरीयस आहे.
आमचे एक मित्र आहेत. आम्ही राहायला दुसऱ्या शहरात होतो आणि ठरवले की जॉब चेंज करून या दुसऱ्या शहरात जाऊ.. तिथे हे मित्र होते..
आम्हा नवरा बायकोने जॉब स्विच केला आणि त्या शहरात शिफ्ट झालो. या मित्र दांपत्याने आमचे स्वागत केले. कंपनी अकोमोडेशन देत होती तरी पहिले १५ दिवस त्यांनी आपल्या घरी राहायची सोय केली. आम्हीदेखील आनंदाने राहिलो. मात्र त्यांना खर्च नको म्हणून ग्रोसरी वगैरेआणली, बाहेरून जेवण वगैरे मागवले तर बिल आम्ही देऊ लागलो.
नंतर आम्ही वेगळे घर भाड्याने घेतले. एकमेकाकडे येणे जाणे होतेच. सगळे व्यवस्थित चालू होते. एकदा दिवाळीत सात वाजता मंदिरात जाण्याचा प्रोग्रॅम ठरला. आम्ही पावणे सात पासून दोन तीन वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. आम्हला वाटले की बिझी असतील, आम्ही मंदिरात जाऊन आलो. त्यांनी नंतर कॉल बॅक केला. खूप चिडले की मिळून जायचे ठरले असताना तुम्ही एकटेच का गेलात. आम्ही देखील ओरडा खाऊन घेतला.
नंतर हे वारंवार होऊ लागले, आम्ही काही नवीन वस्तू घेतली त्याना न सांगता ते चिडू लागले.
परिणामी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांना इंफॉर्म करू लागलो. फिरायला चाललोय मेसेज टाक. Tv घेतोय मेसेज टाक वगैरे वगैरे.
नंतर आम्ही स्वतःचे घर घेतले ते देखील त्यांच्या पेक्षा मोठे. त्यांना न सांगता.
तेंव्हा ते म्हणू लागले इतके मोठे घर, मेन्टेन कसे करणार वगैरव वगैरे.
आणि मूद्धाम घराचा उल्लेख करु लागले की अरे मला ट्रेडमील घ्याची होती पण माझे घर तुज्याएवढे मोठे नाही ना. तुझे बरे आहे मोठे घर आहे वगैरे वगैरे.
आणखी इक त्रास म्हणजे यांना फोन करावा तर हे उचलत नाहीत, दोन तीन दिवसांनी कॉल बॅक करतात.
आम्ही फोन नाही उचलला तर चिडतात म्हणतात अरे असला कसला मित्र जो मदत हवी असताना फोन उचलत नाही.

काय करावे मायबोलीकर???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती2, कारवी पोस्ट आवडल्या.
माझी ही एका अतिशय sensitive type च्या एकीशी गाठ पडली. जितकी प्रेमल तितकी चक्रम. तिच्या गुड बुक मधे नसलेल्या पण माझ्याशी काहिही वाकडं नसलेलीशी मी पण वाकडं वागावं अशी अपेक्शा ती ठेउन असते. तिच्या एफ बी पोस्ट का लाईक केलस? ती करते का तुला अमुक, तमुक.. फारच अति झाल्यासारखं वाटलं तेव्हा ignore केले तर उलट आता माझ्याशी बोलत नाहिये आणि मला space दे म्हणाली Happy
मी फार खुश होउन म्हटले हो जरूर. लोल

Pages