नको असलेले मित्र

Submitted by कटप्पा on 6 December, 2020 - 00:20

मंडळी प्रश्न सिरीयस आहे.
आमचे एक मित्र आहेत. आम्ही राहायला दुसऱ्या शहरात होतो आणि ठरवले की जॉब चेंज करून या दुसऱ्या शहरात जाऊ.. तिथे हे मित्र होते..
आम्हा नवरा बायकोने जॉब स्विच केला आणि त्या शहरात शिफ्ट झालो. या मित्र दांपत्याने आमचे स्वागत केले. कंपनी अकोमोडेशन देत होती तरी पहिले १५ दिवस त्यांनी आपल्या घरी राहायची सोय केली. आम्हीदेखील आनंदाने राहिलो. मात्र त्यांना खर्च नको म्हणून ग्रोसरी वगैरेआणली, बाहेरून जेवण वगैरे मागवले तर बिल आम्ही देऊ लागलो.
नंतर आम्ही वेगळे घर भाड्याने घेतले. एकमेकाकडे येणे जाणे होतेच. सगळे व्यवस्थित चालू होते. एकदा दिवाळीत सात वाजता मंदिरात जाण्याचा प्रोग्रॅम ठरला. आम्ही पावणे सात पासून दोन तीन वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. आम्हला वाटले की बिझी असतील, आम्ही मंदिरात जाऊन आलो. त्यांनी नंतर कॉल बॅक केला. खूप चिडले की मिळून जायचे ठरले असताना तुम्ही एकटेच का गेलात. आम्ही देखील ओरडा खाऊन घेतला.
नंतर हे वारंवार होऊ लागले, आम्ही काही नवीन वस्तू घेतली त्याना न सांगता ते चिडू लागले.
परिणामी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांना इंफॉर्म करू लागलो. फिरायला चाललोय मेसेज टाक. Tv घेतोय मेसेज टाक वगैरे वगैरे.
नंतर आम्ही स्वतःचे घर घेतले ते देखील त्यांच्या पेक्षा मोठे. त्यांना न सांगता.
तेंव्हा ते म्हणू लागले इतके मोठे घर, मेन्टेन कसे करणार वगैरव वगैरे.
आणि मूद्धाम घराचा उल्लेख करु लागले की अरे मला ट्रेडमील घ्याची होती पण माझे घर तुज्याएवढे मोठे नाही ना. तुझे बरे आहे मोठे घर आहे वगैरे वगैरे.
आणखी इक त्रास म्हणजे यांना फोन करावा तर हे उचलत नाहीत, दोन तीन दिवसांनी कॉल बॅक करतात.
आम्ही फोन नाही उचलला तर चिडतात म्हणतात अरे असला कसला मित्र जो मदत हवी असताना फोन उचलत नाही.

काय करावे मायबोलीकर???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कटप्पा तुमचा धागा वाचुन अनिळजींच्या धाग्याची आठवण आली. तुम्ही जसे मित्राचे अपडेट देत आहात तसे ते घरातल्या भुतांचे द्यायचे.

क्राऊड कौंसेलिंग घेण्यापेक्षा स्वतः मार्ग शोधा.
मानवा, आम्रिकेत जर गुड-डे बिस्कुट्स (पुलं माँजिनी च्या तालात वाचावे) देत असतील, तर क्राउड कौंसेलिंग घ्यायला काय हरकत आहे.

<< क्राऊड कौंसेलिंग घेण्यापेक्षा स्वतः मार्ग शोधा. >>

------ स्वत: चा मार्ग शोधण्याच्या प्रकाराचाच क्राऊड कौंसेलिंग हा एक भाग असू शकतो.

अशा व्यक्ती आणि वल्ली प्रत्येकाच्या आयुष्यात असतात... आणि काही प्रमाणांत ते आपले आयुष्य मजेशीर बनवतात.

मानवसर स्वतःला मार्ग शोधता आला असता तर मी इथे कशाला लिहिले असते?
फार अजब अनुभव आहे हा. मला सुचत नाहीय काय ककरावे.

त्रासदायक अनुभव आहे पण जेवढ्यास तेवढे करून सोडून द्यायचे.तुम्ही वेगळ्या देशात आहात, गरज, आधार, एकत्र काम करण्याची अपरिहार्यता कधीही येऊ शकते.
शिवाय त्यांना स्पष्टपणे तुमचे घर जास्त चांगले, इतर गोष्टी जास्त चांगल्या यामुळे त्रास होतोय.त्यातून बाहेर पडायला ते 'अमुक एका तात्विक कारणाने आपल्याकडे ती गोष्ट नाही' असे स्वतःला व तुम्हाला समजवू पाहत आहेत.एन्जॉय करा. वहिनींना म्हणावे अजिबात त्रास करून घ्यायचा नाही.त्यांचे पॅटर्न ओळखून नंतर गेल्यावर चर्चा करून मजा घ्यायची.
(फेसबुकवर एखादीचे सतत सुंदर आणि परफेक्ट फोटो येत असतील तर माझीही मनात चिडचिड होतेच Happy मग त्यावर मीही 'माझी नोकरी जास्त स्ट्रेस वाली' वगैरे अत्यंत चक्रम करणं मनात देत असते.फक्त तिला(नेहमी वेगवेगळी ती) प्रत्यक्ष न भेटल्याने तिला कळत नाही इतकेच. )

तुमचा मित्र उगाचच तुम्हाला गिल्ट द्यायचा प्रयत्न करतोय. त्याला जेलस होतय... असे मित्र हवेतच कशाला. अजून चांगले मित्र जोडा. आम्ही सगळे मिळून त्यालाच गिल्ट द्या.

अनुभव मधून एक शिकलो आहे मित्र असू नाही तर नातेवाईक त्यांची थोडी जरी मदत घेतली तरी आयुष्भर ते कर्ज उतरत नाही.
चांगले संबंध असतील तो पर्यंत ठीक संबंध बिघडले की बोलून नक्की दाखवणार आम्ही मदत केली.
मदत केली की समरोच्या नी आपला शब्द मोडला नाही पाहिजे अशी पण भावना असते.
तुमचा मित्र पहिल्या पासून असाच स्वभावाने असेल तर त्याचे वागणे नैसर्गिक आहे.
पण तुम्ही त्याच्या घरी राहिल्या नंतर तो असा वागत असेल तर .
मी वर्णन केलेलं त्याला लागू पडते.

माझ्या एका मित्राचा असाच त्रास होता. तो मी एखादी वस्तु खरेदी केली की तिची किंमत, कुठुन आणली याची चौकशी करायचा आणि मग त्या वस्तुला नावं ठेवायचा. माझी चिडचीड व्हायची. नंतर लक्षात आले की तो मी घेतलेल्या वस्तुसारखीच पण स्वस्तातली वस्तु सगळा बाजार पालथा घालुन आणतो. आणि त्या वस्तुच कौतुक करत रहातो. ही गोष्ट लक्षात आल्यावर मी हे सगळं एन्जॉय करायला सुरुवात केली.

कटप्पा, ठीक आहे, मग घ्या माझेही दोन आणे:

तिकडे तो क्राऊड कौंसेलिंग घेत असेल. सांगत असेल
"याच्या बायकोच्या वाढदिवसाला मुद्दाम रात्री बाराला फोन केला (टाइम झोन फरक असेल तर त्या प्रमाणे काही), उचलला नाही ठीक आहे पण वाटले सकाळी कॉल बॅक करतील तर नाही, मुद्दाम उशीरा कॉल बॅक केला.

एकदा माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या भर पार्टीत म्हणतो कसा #मेणबत्ती मागल्या वर्षीची आहे का?'

वगैरे
वगैरे"

आणि त्याला सल्ले मिळत असतील, आता फोन आला की उचलू नका, परत आला तर मेसेज करा बिझी आहोत, नंतर बोलू / भेटु वगैरे.

त्यापेक्षा सरळ एकदा त्याला सिरीयसली भेटायचं आहे म्हणुन सांगा, भेटा, प्रत्यक्ष बोला तुम्हाला काय वाटतं, खटकतं. त्याची बाजू ऐका. त्याने आरोप (त्याच्या दृष्टीने त्याला ते खरे वाटत असण्याची शक्यता असेल) केले तर त्यावर कळकळीने ते गैरसमज कसे होते हे समजावून सांगा. आपल्यात गैरसमज नकोत, म्हणजे मैत्री टिकेल यासाठी हा खटाटोप करतोय हे समजावून सांगा. यातून गैरसमज दूर झाले तर ठीकच.
पण एवढं करून जर त्याने समजून न घेता मी बरोबरच तुमचंच चुकलं हा अट्टाहास सोडला नाही तर "मी आपले गैरसमज दूर होतील या आशेने आलो होतो, पण तू एकतर्फी विचार करत आहेस त्यामुळे यातून मार्ग निघेल असं वाटत नाही, वाटल्यास नंतर परत एकदा फेरविचार कर " असे बोलुन ती भेट संपवा. आणि त्याने परत स्वतःहून संपर्क केला तरच बोला, आणि काय बोलतो, फरक पडला की नाही, कितपत पडला हे पाहून पुढे कितपत त्यांच्याशी संबंध ठेवायचे हे ठरवा.

ते म्हणे अरे माझ्याकडे अशी मीडिया रूम असती मी कायापालट केला असता.>>> वा वा! केला कि आम्हाला नक्की कळवा. बघायला आवडेल.
नंतर घराचा विषय निघाला ( आमचे घर दोन मजली आहे) , स्वतः म्हणू लागले अरे घरात स्टेयर नको वाटतात, मुलांसाठी सेफ नाही. आमचा क्रायटेरिया फिक्स होता, घरात स्टेयर्स नको.>> प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात ना. तुम्हाला हवे तसे मिळाले ना मग छानच झाले .. अशी वाक्ये टाकत रहायची. आपल्याला आवडेल तसे आपण करतो ना, पण समोरचा तुलना करत मीच कसा भारी हे सांगायचा प्रयत्न करत असेल तर मनाला लाऊन घेऊ नका. अनु म्हणतात त्या प्रमाणे... त्यातून बाहेर पडायला ते 'अमुक एका तात्विक कारणाने आपल्याकडे ती गोष्ट नाही' असे स्वतःला व तुम्हाला समजवू पाहत आहेत... तसेच असेल.

आमच्या समोर राहणारे आमचे शेजारी असेच होते. कधी घरी येऊन २-३ तास गप्पा मारत बसायचे तर कधी बघायचेही नाही. कधी आमच्याकडे त्यांच्या घरची चावी ठेवायचे तर कधी खालच्या मजल्यावर राहणाऱ्यांकडे. पण आईने त्यांना कधी काय झाले, का बोलत नाही विचारले नाही. तर नेहमी मदतच केली.
आम्ही नवीन घर घेतल्यावर असे सजवूना कि तुम्ही तोंडात बोटेच घालाल असे काही ते बोलले कि आम्ही भावंड एकमेकांकडे कटाक्ष टाकायचो पण ‘तुम्हाला हवे ते सगळे लवकर मिळो/तसेच होऊ दे’ असे आई बोलायची. काही वर्षांनी ते दुसरीकडे रहायला गेले. आता २६ वर्षे झाली पण अजूनही मैत्री टिकून आहे.

अवांतर:
आमच्या शेजारच्या एक काकू, ज्या आईंपेक्षा १२ ते १५ वर्षं मोठ्या आहेत, त्यांना देखील हि सवय आहे. कोणतीही गोष्ट घरात आणली आणि त्यांनी पाहिली कि त्यात काही ना काही खुसपट काढणार म्हणजे काढणार. सुरुवातीची काही वर्षे आईंना वाईट वाटायचं, पण नंतर स्वभाव तसा समजून त्या काकूंचे नाव "बुगदा" ठेवले आहे.
ह्या उलट दुसऱ्या एक काकू आहेत, आईच्या वयाच्या, त्यांना आमच्या घरी काहीही चांगले घडले कि फार आनंद होतो. आता बुगदाकाकूंच्या आधी कोणतीही गोष्ट आनंदीकाकूंकडे शेअर केली जाते. वाडा असल्याने शेअरिंग बरंच असतं.

कटप्पा,तुम्ही त्रास करून घेताय म्हणून त्रास होतोय,त्यांचं असं सतत तुलना करून स्वतःला तुमच्या वरचढ दाखवणं म्हणजे तुम्हाला मुद्दामहून त्रास व्हावा असाच हेतू आहे त्यांचा,जनरली कुणीच असं करत नाही,उलट खरोखर स्वस्त पडली असेल एखादी वस्तू तरी समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून सांगत नाही.
तुम्ही फक्त इग्नोर करत राहा तरच फायदा होईल तुम्हाला,दुसर्याच्या हेतू ला तुम्ही स्वतः सफल करत आहात,चिडचिड करून आणि चेहरा पाडून.
खरं तर सम्बन्ध तोडणं हा पर्याय योग्य राहणार नाही पण सम्पूर्ण इग्नोर करणे सहज शक्य आहे
Ok ,वा, एक no, तुझं सगळं एकदम भारीच असतं वगैरे वगैरे बोलून तो विषय सम्पवत चला
तुम्हाला वाईट वाटत नाही बघून तोच हे सगळं हळूहळू बंद करेल

हर एक फ्रेंड थोडा चक्रम होता है!! ज्यांचा चक्रमपणा आवडतो त्यांना मित्र म्हणावं.>> सीमंतिनी यांचं हे वाक्य अगदीच पटलं

कटप्पा,तुम्ही त्रास करून घेताय म्हणून त्रास होतोय,त्यांचं असं सतत तुलना करून स्वतःला तुमच्या वरचढ दाखवणं म्हणजे तुम्हाला मुद्दामहून त्रास व्हावा असाच हेतू आहे त्यांचा,जनरली कुणीच असं करत नाही,उलट खरोखर स्वस्त पडली असेल एखादी वस्तू तरी समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून सांगत नाही.
तुम्ही फक्त इग्नोर करत राहा तरच फायदा होईल तुम्हाला,दुसर्याच्या हेतू ला तुम्ही स्वतः सफल करत > सहमत.. काही मित्र असतात असे.. आपलाच आहे समजून थोडे दिवस मैत्री कंटिन्यू करा आणि मग ठरवा.. असे मित्र कधी ना कधी पुन्हा वाट्याला येणारच मग किती वेळा मैत्री तोडणार आणि पळ काढणार .. त्याऐवजी थोडंसं दुर्लक्ष फेकून मारा.

मानव, मित्राचेही म्हणणे मोकळेपणी ऐकून त्यावर विचार करायची गरज वाटत नाही का?
एकतर्फी विचार एकाच बाजूने असेल असे नाही.

माझ्या पहिल्या जॉबवर, माझा बॉस तामिळ होता. त्याने दिलेला सल्ला मला आयुष्यात पुढे खूप उपयोगी पडला. तो म्हणाला:
"If someone is screwing you, just smile. Nothing irritates them more, than finding that it doesn't affect you much."
And then he added, with a wink: "Just don't smile so much that he will think that you actually enjoy it."

तुम्हाला ते मित्र (हा त्रास वगळता) किती आवडतात यावर ठरवा. तुम्हाला त्यांची कंपनी एरवी खूप आवडत असेल तर या त्रासाकडे शुद्ध दुर्लक्ष करा. मनाला लावून घेऊ नका. २४×७ तर तुम्ही एकत्र नसणार आहात.

पण फारसे आवडत नसतील तर हळूहळू संबंध कमी करून एका विशिष्ट (सहनीय) पातळीवर आणून स्थिर ठेवा. (असं करणं अशक्य नाही. म्हणजे अचानक कुठे भेटले तर हसतमुखाने गप्पा मारायच्या. घरात अगदी महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर बोलवायचं. त्यांनी बोलवलं तर फार आटापिटा न करता जाता येणार असल्यास जायचं. पण जाणंयेणं खूप वाढवायचं नाही. )

>>ते 'अमुक एका तात्विक कारणाने आपल्याकडे ती गोष्ट नाही' असे स्वतःला व तुम्हाला समजवू पाहत आहेत.

अगदी अगदी!
हे सगळे वाचून मलाही असेच वाटतेय.
बरोबरचे लोक करीअरमध्ये, सोशल लाईफमध्ये आपल्या पुढे निघून गेले आणि आता त्यांची बरोबरी करता येत नाही म्हंटल्यावर मनात असूया तयार होतेच.... आणि यातूनच असे प्रकार घडतात!

मानव, मित्राचेही म्हणणे मोकळेपणी ऐकून त्यावर विचार करायची गरज वाटत नाही का? >> भरत हो.
त्याची बाजू ऐका हे मी मोघम लीहिले तरी उद्देश तुम्ही म्हणता तोच आहे. दोघांनी आपले म्हणणे सांगायला हवे व त्यावर दोघांनी विचार करायला हवा, गैरसमज, एकतर्फी विचार दोन्ही बाजूंनी असु शकतात.
प्रत्यक्ष भेटीत चर्चा केल्यावर हे सर्व होईल असे मी गृहीत धरले, पण कटप्पा यांची त्याची बाजू ऐकून, समजून घेण्याची तयारी असावी आणि एवढे करून त्याने एकतर्फी विचार सोडले नाही तर पुढचे.

त्यांनी कपडे आणले तुम्ही खुश झालात. त्यांनी टीव्ही वर कमेंट केली तुमचा चेहरा पडला. वैगेरे वैगेरे इथेच analysis ची गरज आहे. तुम्ही त्यांच्याकडून approval/endorsement शोधत आहात का? स्वतःच्या प्रतिक्रियांचा (आत उमटणार्या किंवा बाहेर व्यक्त होणाऱ्या) नेहमी असा analysis करत राहिलात तर एक तर approval शोधणे consciously स्वीकारता येइल किंवा टाळता येइल. दोनी पैकी काहीही केले तरी संबंध ना तोडता तुमचा त्रास कमी होऊन त्यांना तुमच्या आयुष्यात accommodate करता येइल

कटप्पा,तुम्ही त्रास करून घेताय म्हणून त्रास होतोय,>>>+१.
मित्राने वस्तूंवर काधी कॉमेंट केली तर होक्का छान छान म्हणा नाहीतर स्पष्ट बोला.मला/ आम्हाला हेच आवडले,म्हणून घेतले.कुठेही मित्राला कमी न दर्शवताही हे करता येईल.हां भले त्यांना काय वाटेल म्हणून विचार केलात तर आहे त्याच परिस्थितीत रहाल.गुड लक.

कटप्पा, त्यांनी गरजेच्यावेळी मदत केली. त्यासाठी नेहमी कृतज्ञ रहावे अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि मी ते केले असते. कुठेतरी त्यांच्या त्या अपेक्षेत तुम्ही कमी पडत आहात अस वाटत्य. मी संबध कधी तोडले नसते.

असतात असे विचित्र एकेक लोक. संपर्क कमी करू शकत असाल तर बरं आहे जेवढ्यास तेवढे ठेवा. वर्स्ट केस उद्या तुम्ही संबंध अगदी तोडले तरी बाहेर तुमचीच बदनामी करू शकतील की तुम्ही नीट नाही वागलात. अगदीच पुन्हा कटकट केली की तुम्ही भेटत नाही, फोन करत नाही तर स्पष्टपणे कल्पना द्या की थोडा ब्रेक घेऊया फ्रेंडशिपपासून. अगदी गरज वाटली तर पुन्हा एकत्र येऊ शकतो. ब्रेक काळात समजेलच की कोणाला किती गरज आहे.

आम्हाला हे असे अनुभव आले होते पूर्वी अमेरिकेत नवीन असताना की ज्यांनी अगदी आम्ही किती वेळा जेवायला बोलावलं तुम्ही किती वेळा बोलवलं याचे हिशोब ठेवले. नंतर सुदैवाने शहरं बदलल्याने संपर्क कमी झाला पण जेव्हा भेट व्हायची तेव्हा अगदी चिडचिडच असायची. मी प्रेग्नंट असतानाही त्यावरुन भांडणं उकरून काढलेली आहेत. सो अशा लोकांना पास.

. त्यासाठी नेहमी कृतज्ञ रहावे अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि मी ते केले असते. कुठेतरी त्यांच्या त्या अपेक्षेत तुम्ही कमी पडत आहात अस वाटत्य>>>>>>

ही अपेक्षा अगदीच वाईट किंवा चुकीची नाही.

पण ही अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून समोरच्याने केलेल्या प्रत्येक कृतीत जर कोणी खुस्पट काढत असेल, त्याच्या आनंदावर विरजण टाकत असेल तर ते चूक आहे.

कटप्पा यांचे प्रतिसाद वाचून ते ज्याला मित्र म्हणताहेत तो मित्र नाहीय असे म्हणावेसे वाटते.

अंजली_१२ अगदी असाच काहीसा माझाही अनुभव आहे.
अमेरिकेत नवऱ्यांबरोबर येणारे बरेचसे महिला मंडळ सुरवातीला रिकामटेकडे असल्यामुळे जेवणांची मोजदाद(!) ठेवणे , त्यातल्या मेनूची दुसऱ्या दिवशी इतर स्त्रियांनी यजमान स्त्रीच्या अपरोक्ष चिरफाड करणे ( उदाहरणार्थ वरणाला अमकी फोडणी आणि भाजीला तमकी कशी चुकीची होती! ) इ. कार्यात व्यस्त असते. किंवा जेवताना - अय्या , ( तिथे उपस्थित नसलेल्या ) तमकीने अगदी हाच्च मेनू ठेवला होता गेल्या आठवड्यात - तुम्ही ओळखता का एकमेकींना असे खवचटपणे विचारणे इ. प्रकार पाहून कुठे येऊन पडले असं झालं होतं. आधीही कधी मदत घेतली नव्हती आताही सुदैवाने नकोच आहे पण मैत्री (चं नाटक)आवरा असं म्हणायची वेळ आली !
नंतर आम्ही शहर बदललं. तोवर पुरेसं शहाणपण आलं होतं.
माझा अनुभव वैयक्तिक आहे तरी पण कटाप्पाना एक सांगावेसे वाटते ते म्हणजे ही नुकती सुरवात आहे! आगे आगे देखो होता है क्या Happy
मुलांच्या शाळा , त्यांच्या grades , त्यांची इतर activities मधली प्रगती, त्यांना मिळणारी बक्षिसं, तुमचे / पत्नीचे pramotion , नवीन गाडी किंवा इतर मोठी खरेदी या सगळ्या गोष्टींचा परिणाम अशा प्रकारच्या अपरिपक्व मैत्रीवर होतो. मुलांपेक्षा त्यांचे पालकच या तथाकथित स्पर्धेत अधिक गुंतलेले असतात. तुम्हाला तुमचा सूर (balance) सापडावा आणि मैत्रीही अबाधित राहावी म्हणून शुभेच्छा ! Happy

चंद्राअगदी योग्य अनुभव लिहलात. मी पण असेच बरेच अनुभव सांगायचा मोह टाळले. बिचारे कटाप्पा आणखी घाबरतील म्हणून.

वाढदिवसाला मुलांंना आलेल्या/ दिलेल्या गिफ्ट वरुन भांडणारया बायका अगदी वैताग आणतात.

Pages