नको असलेले मित्र

Submitted by कटप्पा on 6 December, 2020 - 00:20

मंडळी प्रश्न सिरीयस आहे.
आमचे एक मित्र आहेत. आम्ही राहायला दुसऱ्या शहरात होतो आणि ठरवले की जॉब चेंज करून या दुसऱ्या शहरात जाऊ.. तिथे हे मित्र होते..
आम्हा नवरा बायकोने जॉब स्विच केला आणि त्या शहरात शिफ्ट झालो. या मित्र दांपत्याने आमचे स्वागत केले. कंपनी अकोमोडेशन देत होती तरी पहिले १५ दिवस त्यांनी आपल्या घरी राहायची सोय केली. आम्हीदेखील आनंदाने राहिलो. मात्र त्यांना खर्च नको म्हणून ग्रोसरी वगैरेआणली, बाहेरून जेवण वगैरे मागवले तर बिल आम्ही देऊ लागलो.
नंतर आम्ही वेगळे घर भाड्याने घेतले. एकमेकाकडे येणे जाणे होतेच. सगळे व्यवस्थित चालू होते. एकदा दिवाळीत सात वाजता मंदिरात जाण्याचा प्रोग्रॅम ठरला. आम्ही पावणे सात पासून दोन तीन वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. आम्हला वाटले की बिझी असतील, आम्ही मंदिरात जाऊन आलो. त्यांनी नंतर कॉल बॅक केला. खूप चिडले की मिळून जायचे ठरले असताना तुम्ही एकटेच का गेलात. आम्ही देखील ओरडा खाऊन घेतला.
नंतर हे वारंवार होऊ लागले, आम्ही काही नवीन वस्तू घेतली त्याना न सांगता ते चिडू लागले.
परिणामी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांना इंफॉर्म करू लागलो. फिरायला चाललोय मेसेज टाक. Tv घेतोय मेसेज टाक वगैरे वगैरे.
नंतर आम्ही स्वतःचे घर घेतले ते देखील त्यांच्या पेक्षा मोठे. त्यांना न सांगता.
तेंव्हा ते म्हणू लागले इतके मोठे घर, मेन्टेन कसे करणार वगैरव वगैरे.
आणि मूद्धाम घराचा उल्लेख करु लागले की अरे मला ट्रेडमील घ्याची होती पण माझे घर तुज्याएवढे मोठे नाही ना. तुझे बरे आहे मोठे घर आहे वगैरे वगैरे.
आणखी इक त्रास म्हणजे यांना फोन करावा तर हे उचलत नाहीत, दोन तीन दिवसांनी कॉल बॅक करतात.
आम्ही फोन नाही उचलला तर चिडतात म्हणतात अरे असला कसला मित्र जो मदत हवी असताना फोन उचलत नाही.

काय करावे मायबोलीकर???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेही काही जण पाहिलेत की त्यांना इतर मुले त्यांच्या घरी जाऊन खेळलेली आवडत नाहीत पण त्यांची मुले इतरांच्या घरी खेळायला पाठवून देतात.
>>>>>

उलटेही असते म्हणा. म्हणजे आपली पोरं दुसरया घरी जाण्यापेक्षा दुसरयांची आपल्या घरी आलेली बरे असे वाटणारेही असतात. आता या मागे हल्ली दिवस कसे वाईट आहे हि काळजीही असू शकते वा आपली पोरं धड नाहीत ती लोकांकडे जाऊन काय गोंधळ घालतील हि चिंताही असू शकते.
आणि एक तिसरेच कारण आहे ते म्हणजे पोरांना बोलायची आवड असेल तर ते आपल्या घरच्या नको नको त्या सर्व गोष्टी तिथे मीठ मसाला लाऊन सांगण्याची शक्यता असते Happy

हे भोचक भेटणारे किंवा प्रश्न विचारणारे तुमचे फ्रेंड्स आहेत का ? विकूंचा किस्सा किंवा वावेचा किश्श्यांमध्ये ही लोक फ्रेंडस नाहीयेत. कटप्पा एवढा विचार करताहेत कारण ही लोक त्यांचे फॅमिली फ्रेंड्स आहेत.

माफ करा. दोन तीन दिवस मायबोली उघडली नव्हती. आज सगळे प्रतिसाद वाचले. खूप धन्यवाद.

गेले तीन चार दिवस संपर्क नाहीय आणि खूप मस्त आणि रिलॅक्स वाटत आहे.
असे वाटतेय की त्यांनी संपर्कच करू नये कधीच Happy

असे वाटतेय की त्यांनी संपर्कच करू नये कधीच Happy >> असा विचार करून परिस्थितीचा कंट्रोल तुम्ही त्यांनाच देत आहात.
जादूची छडी फिरावी आणि परिस्थिती बदलावी असे आपल्याला वाटत असते. पण असे होत नाही.

ते ही माबोवर असतील
कदाचित 5BHK आणि ईतर वर्णना वरुन आपणास ओळखले असेल.

आता मजेत रहा

इट दॅट फ्रॉग. बऱ्याचदा आपल्या मनातलं कोणत्याही कारणाने होईना आपण बोलू शकत नाही. पण ती गोष्ट सारखी खात राहते. त्याची इतकी सवय होऊन जाते कि आपल्याला तेच नॉर्मल वाटायला लागत. त्यामुळे तुमचं त्यांच्यासोबत काही न बोललेली गोष्ट (unsaid communication) आहे का ते बघा. जे कि स्पष्ट दिसतंय. ते सर्व मनमोकळेपणाने बोलून टाका आणि होणाऱ्या परिणामांना सामोरे जा. जो काही व्हायचाय तो एकदाच त्रास होईल. पण रोजची मनाची टोचणी नक्कीच कमी होईल.

गेले तीन चार दिवस संपर्क नाहीय आणि खूप मस्त आणि रिलॅक्स वाटत आहे.
असे वाटतेय की त्यांनी संपर्कच करू नये कधीच
>>>>>> अरे बापरे! कटाप्पा, खूप टेन्शन, ओझं आहे तुम्हाला या मैत्रीचे. त्यांच्याशी स्पष्ट बोलायची वेळ आलीये. स्वतःच्या खासगी आयुष्यात मैत्रीचे ओझे येऊ देऊ नका.

आपण कधीच संपर्क करू नये असे ज्याच्यासाठी आपण बरेच केले अश्या मित्राला वाटावे असा माणूस कसे बनायचे नाही हे या किश्श्यातून शिकता यावे.

च्रप्स, Proud मला पण नंतर कन्फ्युज झालं..
विस्कटून सांगतो-
अ ने बसाठी एके काळी काही गोष्टी केल्या
प्रथम ब ला अ बद्दल कृतज्ञता व मैत्रीची भावना होती
अ ने ब ला त्या मैत्रीत दाबून टाकायचा प्रयत्न केला
ब ने क्लूज देऊनसुद्धा अ ची अतिरेकी वागणूक चालूच राहिली असे ब ला वाटले मात्र ब हे खुलेपणाने अ ला सांगू शकला नाही
कालांतराने अ ने संपर्क कमी केला तर ब ला हायसे वाटू लागले
अ ने कधीच संपर्क करू नये असे ब ला वाटू लागले
इतकी तीव्र प्रतिक्रिया यावी असे अ वागला. म्हणून आपण अ सारखे वागायचे नाही. सिग्नल्स वेळीच समजून घ्यायचे हा धडा आपण घेऊ शकतो.

जास्त दिवस नाही टिकला आनंद. आमचा एक कॉमन व्हाट्सएप ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे. तिथे डिस्कशन चालू होते की पोलिटिकल मेसेज टाकायचे नाहीत, उगाच वाद होतात नाती बिघडतात. मी देखील रिप्लाय केला की चांगला डिसीजन आहे. तर माझ्या मेसेज ला त्याने रिप्लाय केला ग्रुप मध्ये की तू बरोबर बोलतोयस पण फक्त पोलिटिक्स नाही, अहंकार, स्वार्थीपणा आणि इगो ने देखील नाती बिघडतात. नंतर एक स्मायली.
काय त्रास आहे हा खरंच.
त्यांची अपेक्षा असेल की मी आता त्यांच्या मागे मागे करू की काय झालंय. असे का लिहिले तुम्ही.
पण मी सरळ इग्नोर करणार आहे.

तू बरोबर बोलतोयस पण फक्त पोलिटिक्स नाही, अहंकार, स्वार्थीपणा आणि इगो ने देखील नाती बिघडतात. नंतर एक स्मायली.>>>>>> लिहा की तुम्हीही 'अगदी खरंय,फक्त दोन्ही पक्षी हे पाळले गेले पहिजे'आंणि स्मायली चिकटवा.

अनुल्लेख करणे सगळ्यात उत्तम.पण दरवेळी नव्हे हे माझे मत.

इग्नोर करणे आणि केल्याचे दाखवणे यात फरक आहे.

त्याच्या कमेंट्स वाचून त्रास तर होणारच आहे.

प्रत्यक्ष भेटून सगळा गुंता सोडवणे हाच खरा उपाय आहे. त्याला असे का वाटते ते समजून घेणे, आपले चुकले असल्यास दुरुस्त करणे, तो चूक असल्यास त्याला तसे सांगणे. झाले गेले विसरून जाऊ किंवा एकमेकांनाच विसरून जाऊ या निर्णयाप्रत येणे.

पण इथे शेजाऱ्याला त्याचे कोणते वागणे आपल्याला चुकीचे वाटते हे समजावून सांगणे कठीण दिसतेय. कारण तो ' माझेच बरोबर' ह्याच मोडमध्ये आहे. आणि त्याच्या चुका दाखवत राहिले तर नाते उभे तुटणार हे नक्की. आणि हो बाबा माझे चुकले असे बळेच म्हटले तरी ते स्वतः:क्या मनाविरुद्ध असणार आणि तुम्हाला त्याचा त्रास होत राहणार. म्हणजे मन: शांतीसुद्धा नाही आणि नात्यांमध्ये मोकळेपणा सुद्धा नाही.
काही नाही, आला प्रसंग साजरा करत राहा. त्यातला अलिप्तपणा त्याला जाणवेल हळू हळू. स्वतः:ला त्रास करून घेणे मात्र सोडून द्या.

मी बाहेर देशात नाही, मला घर घेणे, संसार-प्रपंच आणि त्याला जोडून येणारे ते सोशलायजिंग वगैरे याचा काही अनुभव नाही पण तरी रोजच्या व्यापात असा प्रॉब्लेम मला असता तर वेळ मिळाला असता का यावर एवढा विचार करायला याचा विचार करतोय. असे काय गुंतलेय तुमचे त्या मित्रात की तुम्हाला त्याला स्पष्ट सांगता येत नाही आणि दुर्लक्षही करता येत नाही. त्या शहरात इतर पब्लिक असेलच की. तो तुमचा कोणी जवळचा नातेवाईकही नाही तरी त्याची हांजीहांजी करण्यापेक्षा एकदा बोलून सोक्षमोक्ष लावा आणि थोडा सख्त लोंडा बना आता.

झाले गेले विसरून जाऊ किंवा एकमेकांनाच विसरून जाऊ या निर्णयाप्रत येणे.>>>>>>> तस होत नाही ना! निर्णय घेतला तरी विषय डोक्यात रहातात

@कटप्पा, मूळ पोस्ट + प्रतिसाद --
शब्दांचा टोन दोष देतेय असा वाटला तर माफ करा. मला तुम्ही १००% चूक तो बरोबर असे म्हणायचे नाही. पण नाते सुधारायचीच सुरूवात तुम्ही करून तर पहा... समोरून नाही अनुकूल प्रतिसाद मिळाला तर किमान नंतर रूखरूख रहाणार नाही.

१. जर तुम्ही म्हणाल ते होईल तर तुमच्या मनाचा स्पष्ट कल काय असेल? नको नको झालाय हा माणूस नजरेसमोर की तसा बरायस, पण सुधार बाबा! ? तुमच्या बाजूने शून्यावर आला असाल तर तोडा. अन्यथा सुधारण्याचा प्रयत्न करून पहा.

२. संपवायचेच असेल तर + टोनमध्ये संपवावे असे वाटते. वाईटपणा घेऊन शक्यतो नको. कारण कसे का होईना त्याने मदत केलीय. १५ दिवस म्हणजे फार नाही पण काही लोक लावतात फूटपट्ट्या आम्ही असं तुम्ही तसं ..... थोडी चूक तुमचीही दिसतेय दिलेल्या उदाहरणावरून. त्यांनी आपले वागणे 'दिसायला निर्दोष' ठेवलेय; तुमच्या वागण्यात थोड्या त्रुटी आहेतच, भले जाणूनबुजून / कृतघ्नपणामुळे नसतील पण त्यांना कोलीत मिळाले ना...

३. त्याच्या जेलसीचे कारण कळत नाहीय, पण ती असेलच तर दिवसागणिक, कारणागणिक नवे बखेडे उभे होणार. ज्याचा त्याचा स्वभाव. काही समोर व्यक्त करतात; काही समोर तोंड भरून हसतात, गळाभेट घेतात नि घरी जाऊन 'बघ बघ लायकी नसताना कसे दस उंगलिया घी में'... म्हणतात, फक्त आपल्याला ते कळत नाही. त्यांचे काय करतो आपण? काय करू शकतो? फार गोष्टी उघड करू नयेत मग....

घर घेतल्यावर, वस्तू आणल्यावर तुमच्याही नकळत काही फरक पडला का वागण्यात? तुम्ही त्याला समाधान, यश, रूटीन घटना समजता. ते आत्मप्रौढी समजतात? तुम्ही ज्याला हक्क गाजवणे, नाऊमेद करणारे शब्द म्हणता त्याला ते आपलेपणा म्हणत असतील?

४. तुम्ही दोघेही सद्ध्या एकमेकांच्या वागण्याचा / लिहीण्याचा आपापल्या नजरेतून अर्थ लावताय, जो चुकीचाही असू शकतो. परस्परविरोधी फिल्टरमधून बघताय सद्ध्या एकमेकांना. खूपजणांनी सुचवले तसे बोलून बघा. गैरसमज दूर होतील. तुम्ही दोघेच बोला फक्त. बायका आल्या की अनंत 'ते ते आठवतय का?' मुद्दे येणार आणि समेटाचा मुद्दा मागे पडणार.

५. जनरली पुरूष हे असे शेवया काढत नाहीत मुद्द्यांच्या. बायका काढतात बहुतांश. प्रत्येक फॅमिली मीटनंतर अर्थ लावायची सुरूवात घरात कोण करतं? त्याची बायको, वहिनी बोलतात आणि तुम्ही नवरे ऐकून हो रे, खरंच की... म्हणता असे होत असेल ? मित्र-मित्र फॅमिलीशिवाय भेटल्यास हे सर्व उद्भवत नसेल तर मैत्री, गाठीभेटी ऑफीस, क्लबपुरती ठेवा, घरापर्यंत / कुटुंबापर्यंत आणू नका.

६. त्यांना बोट ठेवायला वाव उरणार नाही असे politically correct वागून बोलून वेळ निभावून न्या आणि वाईट दिसणार नाही, त्यांना 'बघा बघा तुम्ही असे करताय' बोलता येणार नाही अशा तर्‍हेने दूर व्हा. तुमच्या गाठीभेटी होतात त्या वेळात इतर काही जेन्युईन अ‍ॅक्टिव्हीटी सुरू करा. जिम, ऑनलाईन क्लास, म्युझिक क्लास, समाजसेवा, किंवा असे काही, जे तुम्हाला आवडते त्याला नाही. हळूहळू अंतर वाढेल जे खटकणार नाही, किंवा त्यांना बोट ठेवता येणार नाही. तू भेटत नाहीस म्हटल्यावर हो रे, वेळच पुरत नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करायची, सफाई नाही द्यायची...चारदा टाळा, एकदा भेटा. तुम्हाला शक्य नसेल तर पुरेसे आधी कळवून टाकायचे...

७. त्यांना करायची आणि केलेले बोलून दाखवायची सवयच आहे का? अजून कोणाचा असा अनुभव? त्यांनी कसे टॅकल केले?

८. त्यांची तुमची व्यावसायिक ओळख असेल तर त्यांची nuisance value काय आणि ती वापरायची त्यांना किती हौस आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. कालचा गोंधळ बरा होता म्हणायची वेळ नाहीतर.

थोडे त्याच्या बाजूने --- असाही विचार करून बघा ---
१. त्याची कम्युनिटी. गुजराथी, मारवाडी, पंजाबी, उत्तर भारतीय लोक बोलण्या-वागण्यात मराठी लोकांपेक्षा वेगळे असतात. गोडबोले, गळेपडू, लाघवी, आस्थेवाईक वागतात ( हे सगळे काहीवेळा नाटकीही असते पण ते करतात मात्र इमानेइतबारे ). समजून घ्या. प्रसंग निभावून न्या. हे मी दिल्लीला केले तेव्हा २ वर्षे निभली. आपला कणा, बाणा त्यांच्या पचनी पडत नाही तर तो ठेवायचा पण जिथेतिथे दाखवायचा नाही.

घरी येऊन मनाला रिसेट मारा. अ‍ॅनॅलिसीस करत बसू नका. काय गरज तुम्हाला? दुसरे उद्योग नाहीत का? स्वतःचे मनःस्वास्थ्य बिघडवून घेण्याइतके हे महत्त्वाचे आहे का?
त्यांना करू दे. त्यांनी आरोप केल्यावर, अरे काय यार, तुम्ही हे केलंत ते केलंत आमच्यासाठी, आम्ही असे वागू तर देव ( वाहेगुरू, श्रीकृष्ण, महादेव असे त्यांचे लाडके स्पेसिफिक ) माफ करेल काय? असे काही बरळायचे. टोन सच्चा. त्यांना रिपीटेड पावती हवीये ना त्यांच्या लहानमोठ्या मदती करण्याची. देत जा. पैसे पडतात का? डोक्याचा ताप तर कमी होईल.

२. त्याची काही भावनिक गरज आहे का बघा. वहिनी त्याच्या भारतातील लहान बहिणीसारख्या / आता नसलेल्या बहिणीसारख्या दिसतात वगैरे.....काहीजण घरात मोठे अपत्य असतात. त्यामुळे जबाबदारी, सर्वांचे करणे, काळजी घेणे हा प्रकार 'भिनलेला' असतो. ( गु, मा, पं, उभा, बं) तो सगळीकडे उफाळून येतो. समोरच्याला गरज असो नसो. किंवा त्यांना नवीन असताना सेटल होताना खूप त्रास झाला असेल तर तो इतर कोणाला होऊ नये यासाठी आपण उभे रहायचे असे काही विचार...... पण त्यात जेलसी फिट होत नाही, हे खरे. पण माणूस तुमच्यासमोर आहे, बघा ही शक्यता आहे का. तसे काही बोलण्यात आले असेल तर सहानुभूतीपूर्वक त्यांना बरे वाटेल असे वागा. परत नो अ‍ॅनॅलिसीस अ‍ॅट युअर एन्ड.

३. काहीजण इतके ज्ञानी असतात की चुकांबाबत मार्गदर्शन करणे हाच त्यांचा वीकपॉईंट होऊन जातो. अरे काय पैसे वाया घालवले, मी होतो ना... हा सात्त्विक संतापही असेल? उपकरणे घेण्याच्या निमीत्ताने एकदा चेक करा, खरोखरच सखोल माहिती आहे का? की फक्त बोलाची कढी. खरेदी नाही, फक्त सल्ला घ्यायचा. त्यांना सोबत घेऊन चार शोरूमला जाऊन बघा. कळेलच काय ते. मग सद्ध्या बजेट नाही, होते ते पैसे घरी भारतात द्यावे लागले म्हणून पाय मागे घ्यायचा.

४. आतापर्यंत तुम्ही त्यांच्या वरचढ असलेल्या गोष्टी तिथे शेअर केल्यात. ते जेलस झाले. फार खासगी बाबी ओपन न करता तुमच्या उण्या बाजू पण दाखवा, ज्यात ते वरचढ आहेत. खूष होतील. उगीच मोठे घर घेतले, खर्चिक झाले, झाडापुसायला त्रास होतो ; खरेदी केलेले गॅजेट मनासारखे नाही मिळाले आता इतक्यात बदलता येत नाही; थोडक्यात आमचं-आमचं केलेलं चुकलंच थोडं...... तुमच्याइतके सुखी समाधानी आम्ही नाही .... थोडा तरी पस्तावा आहेच....इत्यादि. दिसेलच त्यांची प्रतिक्रिया. मग पुढचे ठरवा.

स्पष्ट बोला हे उत्तम, नसेल जमत तर डिप्लोमॅटिक व्हा आणि मनःशांती राखा. केसांचा रंग + संख्या बिघडवण्यात काय हशील? दूरच व्हायचे तर हलकेच व्हा.... पुन्हा त्यांनी दूर होण्यावरून चारलोकात बघा हो कसे वागले !! म्हणून बभ्रा केला तर तुम्ही पुन्हा नव्या पेचात पडणार का? स्वतःला अलिप्त करणे जमवा, काटे वेचण्यापेक्षा चपला घाला म्हणतात तसे... शुभेच्छा....

कारवी यांचे दीर्घ प्रतिसाद सर्वांना उपयोगी असतात. एवढे चांगले सल्ले बऱ्याचदा समुपदेशकाकडे पैसे मोजूनसुद्धा नसतील मिळत पण आपल्याकडे शक्यतो फुकटच्या सल्ल्यांची किंमत नसते पब्लिकला ( हे मी कटप्पा यांच्यासाठी नाही तर जनरली बोलतोय) Happy

बापरे कारवी, काय छान लिहिलंय! +१११
पहिल्या काही मुद्द्यामधेच अन्दाज आला कि तुम्हीच लिहिले असणार.. फार छान मुद्देसूद सान्गितले आहेत.

स्पष्ट बोलायला काहीतरी ठोस मुद्दा असेल तर उत्तम अन्यथा समोरचा माझ्या मनात काही नव्हतं आणि तूच कसा चुकीचा अर्थ काढलास या मोड मधे जातो. उलट आपल्यालाच अपराधी वाटेल असे बोलत राहतो. मला तुझा मत्सर वाटतो म्हणून मी तसा वागलो हे तो कधीच कबूल करणार नाही.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे छोटे छोटे प्रसंग येतात ते तिथल्या तिथे मिटवा. जेणेकरून आपला गैरसमज झाला असेल तर समोरचा तो तिथेच मिटवेल. नंतर हा असा का बोलला, याचा अर्थ काय असा विचार करण्यात स्वत:चा वेळ आणि एनर्जी वाया घालवू नका.
किती अतरंगी माणसे आहेत, यांच्याशी आपण किती आणि कसे नाते टिकवू शकतो असे चॅलेंज स्वत:लाच देता आले तर जास्त त्रास होत नाही.
मला माझ्या आयुष्या ही माणसे नको आहेत असे वाटत असेल तर आणि तरच संबंध तोडा. पण तेव्हा त्यांच्या बद्दल मनात कसलाच राग, कोणतीच भावना रहायला नको हे बघा.

@ कारवी , दंडवत घ्या !!
Submitted by जिद्दु on 14 December, 2020 - 08:39 >>>. +१

यापैकी क्रमांक ६ मी अत्यंत यशस्वीपणे राबवला. सापांचा त्रास कमी झाला आणि लाठी पण सलामत Happy सापाचे उदाहरण फक्त मुद्दा कळण्यासाठी दिले आहे. कृपया चुकीच्या अर्थाने घेऊ नये.

कारवी ताई तुमचे म्हणणे पटले. खूप खूप धन्यवाद तुम्ही इतकी मोठी पोस्ट लिहिलीत. आभारी आहे.
याची एक प्रिंट आउट घेऊन रोज वाचली पाहिजे इतके सुंदर लिहिले आहे.

Sonalisl तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे. हा प्रयत्न मी दोन तीन वेळा आधी करून पाहिला आहे. सॉर्ट करायला गेलो की माझ्याच गोष्टी कशा चुकीच्या वगैरे. तुम्ही अगदी बरोबर लिहिलेय.

हिरा तुम्ही माझ्या मनातले लिहिले आहे अगदी. खूप धन्यवाद.

मला काय करायचे ते आता कळले आहे. मायबोलीवर प्रश्न मांडणे हे मी आधीच करायला हवे होते. सर्वांचे आभार.

@ कटप्पा, आज एका शब्दाचा अर्थ शोधताना हे सापडले, तेव्हा हे आठवले, म्हणून इथे शेवटची आलेय.

वो कुछ से कुछ बना डालेगा तस्लिमात के मा'नी
सलीका आ गया उसको अगर इन्कार करने का ( संदर्भ : KHAAVAR JILANI, @ rekhta.org )
( तस्लिमात -- प्रणाम, सलाम; मानी -- अर्थ; सलीका -- पद्धत, कसब )

ज्याचा नजरियाच चुकीचा आहे तो नमस्कारातूनही विपरीतच अर्थ काढणार.
आपण त्यासाठी शिणायचे नाही. आपला वेळ, शब्द, ताकद अशा वर्थलेस गोष्टींवर वाया नाही जाऊ द्यायचे.
आणि एक, आपण चपला दाराशी ठेवतो. त्या घालून बाहेरचे कामकाज करायला जाताना, घरातले टेन्शन, वादविवाद तिथे उंबरठ्याशी सोडायचे. बाहेरून आल्यावर बाहेरची तकतक, भांडणे चपलेबरोबर उतरवायची आणि आत यायचे. सगळे बॅगेज सगळीकडे वागवणे आपल्या तब्येतीला इष्ट नाही.

वो कुछ से कुछ बना डालेगा तस्लिमात के मा'नी
सलीका आ गया उसको अगर इन्कार करने का ( संदर्भ : KHAAVAR JILANI, @ rekhta.org )
( तस्लिमात -- प्रणाम, सलाम; मानी -- अर्थ; सलीका -- पद्धत, कसब )

ज्याचा नजरियाच चुकीचा आहे तो नमस्कारातूनही विपरीतच अर्थ काढणार.>>>>

मस्त.....

अस काही झाल की मी मनातल्या मनात "मै जिंदगीका साथ निभाता चला गया" हे पूर्ण गाण गातो. मस्त फिलॉसॉफी आहे. मला जमते. Happy

Pages