मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले

Submitted by Admin-team on 3 December, 2020 - 23:13
maayaboli recipes app

मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अ‍ॅप आजच प्रकाशीत झाले.

हे अ‍ॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.

मायबोली वर प्रत्यक्ष लिहिणार्‍यांपेक्षा , वाचनमात्र रहाणार्‍यांची संख्या दहापट आहे. अशा वाचकांना हि सुविधा उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
या विभागात पाककृती लिहिणार्‍यां लेखकांच्या पाककृती आणखी जास्त वाचकांपर्यंत पोहोचतील.


मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येईल.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कल्पना उत्तमच आहे। मायबोलीला उत्पन्नही मिळेल चांगलं। याबद्दल लगेच प्रतिसादही दिलेला। वरती पहा।

पण हे करताना माझ्या https://www.maayboli.com/node/33570 या लेखातील मजकूर तोडून ८-१० नवीन धागे केलेे दिसताहेत। तेही माझे नाव न लिहिता? प्रत्याधिकार अधिकार मायबोली ॲडमिन टिमच तोडणार का?

म्हणजे कोणाला वाटू शकतं की त्यात काय। यादीतर आहे। पण तो एकत्रित लेख भरपूर कष्ट करून लिहिलेला
आणि मुळात एक ओळ काय नुसतं नावही प्रत्याधिकारात येतंच। याबाबत ॲडमिनचे मत वाचायला नक्की आवडेल।

मायबोली ॲडमिन टीमने अवल यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या लिखाणाचा वापर करू नये. अवल यांची परवानगी असल्यास त्यांना श्रेय देऊन त्यांच्या लेखननिर्मितीचा वापर करून योग्य ते बदल करावेत ही विनंती करत आहे.

@अवल
पहिल्या प्रथम मी तुमची माफी मागतो. तुमच्या प्रताधिकाराचा मुद्दाम भंग व्हावा असा आमचा इरादा नाही, पण या सगळ्यात तो झाला आहे असे तुम्हाला वाटले असेल तर मी समजू शकतो.
१. सगळ्यात प्रथम , मायबोलीच्या नवीन अ‍ॅप मधे दिसणारा कुठलाही मजकूर मायबोलीवरच असतो. तो मुद्दाम अ‍ॅपमधे कॉपी केलेला नसतो. जशी मायबोली गुगल, फायरफॉक्स, क्रोममधून वाचता येते , तसेच या ग्रूपमधल्या पाककृती वाचणे सोयीचे व्हावे म्हणून केलेला तो स्पेशल ब्राऊझर आहे.
२. सुरुवातीला तुमचा लेख जशाच्या तसाच दिसत होता. पण नंतर असे लक्षात आले कि त्या लेखावर इतर अनेक मायबोलीकरांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्याही लेखात समावेश करून इतर भाज्या मूळ लेखात समाविष्ट करा असे तुम्हाला सुचवले आहे.
३. त्या प्रति़क्रिया मूळ लेखात संकलित केल्या तर दोन अडचणी आहे १) जशा जशा नवीन भाज्या देऊ, तसे तसे पानाचा आकार डाऊन्लोड ला मोठा होत जाईल. २) आवडती भाजी पाहण्यासाठी , आधी बर्‍याच न आवडत्या भाज्यांना ओलांडत, टिचक्या मारत खाली जावे लागेल. थोडक्यात त्या पानाची उपयुक्तता वाढवण्यासाठी ते पान अनेक पानात विभागणे आवश्यक झाले.
४. तुमच्या मूळ लेखाला धक्का न लावता , नवीन पण स्वतंत्र भाज्यांची पाने सुरु करणे योग्य वाटले. आता या नवीन पानांवर फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेक मायबोलीकरांच्याही पाककृतिंची लिंक दिलेली आहे . त्यामुळे मुख्य धाग्याला फक्त तुमचेच नाव देणे योग्य होणार नाही. दुसरे असे की हे पान वरचेवर जसे नवीन सुचना दिल्या जातील तसे बदलत जाणार आहे.
५. जिथे जिथे तुमच्या पाककृती आलेल्या आहेत तिथे इतरांप्रमाणेच तुमच्या नावाचा उल्लेख आहे. उदा. https://www.maayboli.com/node/77414 इथली सहावी पाककृती पहा.
६. प्रत्येक पानावर ( जे तुमच्या मूळ लेखातून घेतले आहे), तिथे तुमच्या नावाचा उल्लेख करतो आहे. थोडा अर्धा तास वेळ द्या.

आता या नवीन पानांवर फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेक मायबोलीकरांच्याही पाककृतिंची लिंक दिलेली आहे . त्यामुळे मुख्य धाग्याला फक्त तुमचेच नाव देणे योग्य होणार नाही.
>>+1..

प्रत्येक घरी या भाज्या केल्या जातात...

धन्यवाद लगेच हालचाल केल्याबद्दल।
कसय ना हा लेख कष्ट करून लिहिलेला असला तरी फार कलात्मक वगैरे नव्हता। परंतु म्हातारी मेल्याचं दु:ख नाही काळ सोकावतो या म्हणी चा धसका आहे। उद्या उठून इथले माझे सगळेच लिखाण (ज्यात राधे ही समाविष्ट आहे) नावा शिवाय कुठे अन कसेही वापरले गेले तर नक्कीच खुप त्रास होईल। हे असे कोणत्याच लेखकाचे होऊ नये असे मनापासून वाटते। लेखकाची एक ओळही किती त्याच्या मनाशी जोडलेली असते याची इथल्या सगळ्यांनाच नीट माहिती आहे। इथले लेखकच नव्हे तर वाचकही याबाबत जागरुक आहेत। एका चांगल्या साईटवर याचे भान रहावे नेहमीच यासाठी हा खटाटोप।
पुन्हा एकदा धन्यवाद। आशा आहे भावीकाळातही याचे योग्य भान आणि महत्व पाळले जाईल।

>>लेखकाची एक ओळही किती त्याच्या मनाशी जोडलेली असते
खरंय अवलदी.
लगेच दखल ते घेतल्या बद्दल webmaster यांचं कौतुक.

मस्त आहे ॲप.. ☺️
गोड पदार्थांसाठी वेगळा विभाग असायला हवा. तसेच सर्च बार दिसत नाहीये..

३. त्या प्रति़क्रिया मूळ लेखात संकलित केल्या तर दोन अडचणी आहे १) जशा जशा नवीन भाजा देऊ, तसे तसे पानाचा आकार डाऊन्लोड ला मोठा होत जाईल. २) आवडती भाजी पाहण्यासाठी , आधी बर्‍याच न आवडत्या भाज्यांना ओलांडत, टिचक्या मारत खाली जावे लागेल. थोडक्यात त्या पानाची उपयुक्तता वाढवण्यासाठी ते पान अनेक पानात विभागणे आवश्यक झाले.
<<

काय हे!

भाजा!?

शोनाहो वेमा. भाजी चे अव भाज्या. Lol

तुम्हीच भाज्यांना असं त्याच प्रतिसादात म्हटलं आहे, अन २ वेळा भाजा केला आहे Rofl

टेक्निकली संकलन नव्हतं माझ्या लेखात। मूळचं लिखाण होतं; मी घरी करत असलेल्या भाज्यांची यादी होती; पण ते असो आता। हे आपलं सहज काही"च" लोकांसाठी नोंदवावं वाटलं म्हणून।
ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांचे आभार।

एक कुतुहुल म्हणुन विचारतोय. हे सगळं कॅटगरायझेशन एक "व्यु" बिल्ड करुन साधता* आल नसतं का? पाकृ चा मूळ घटक ओरिजिनल धाग्यात टॅग करुन. अश्याने भविष्यातला मेंटेनंसचा प्रश्नहि सुटला असता... Wink

*उत्तम उदाहरण आय्ट्युन्स प्लेलिस्ट. आणि त्यात केलेलं हिंदी सिनेमातल्या गाण्यांचं कॅटगरायझेशन; गीतकार, संगीतकार, इवन त्यांच्या "रागा" नुसार. ओरिजिनल गाणं गायकाच्या नावाने स्टोर केलेलं; पण त्यात टॅग्ज दिले, गीतकार, चित्रपट, "राग" इ. चे...

@राज तेच केलंय. पण तो नुसता व्ह्यू पुरेसा नाही. झालंय काय १) मूळ लेखक लेखिकेने त्यांना सोयिस्कर असे टॅग केले आहेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात एकाच भाजीला वेगळी नावे आहेत. उदा. काही भागात फ्लॉवर आणि कोबी ज्याला म्हणतात त्याच भाज्यांना दुसरीकडे कोबी आणि पानकोबी म्हणतात . त्यामुळे कोबी या एकाच टॅगचा पूर्ण वेगळा अर्थ असू शकतो. त्यामुळे टॅगची साफसफाई होई पर्यत दोन्ही द्यावे लागते आहे. २) उदा. "मेरा जुता है जपानी" हे गाणं एकजण शोधतेय आणि तिने राजकपूरची गाणी असे शोधले तर "रुकना मौत की निशानी" असं शीर्षक असलेलं गाणं येतंय. कारण ते टायटल मूळ लेखकाने दिलंय. आता हे गाणं तेच आहे हे आत गेल्याशिवाय दिसणार नाही. म्हणून सध्यापुरते पटकन व्ह्यू च्यावर नेहमी लागणार्‍या गाण्यांची माहिती देतोय. त्या खाली आपोआप व्ह्यूच आहे. जसा सुसुत्रीकरणाला वेळ देणे जमेल तसे याची गरज कमी भासत जाईल.

वेबमास्तर, स्पिनच बर्गर म्हणून दिनेश यांची पालक वापरून केलेल्या पाककृती ह्या धाग्यात दिसतेय. पण दिनेश यांनी ती काढून टाकल्याने फक्त क्ष क्ष असे दिसतेय. त्यांनी पाककृती काढून टाकल्याने ती लिंक देऊन काही उपयोग नाही असे दिसते.

त्या शब्दखुणांचे काही करताय का तुम्ही ?
बर्याच शब्दखुणा repetitive आहेत.

आणि दिनेशदांच्या क्ष पाककृती गाळता आल्या तर बरं होईल.

क्ष पाकृ गाळल्या तर बरं होईल.+१११

Searching साठी काही करता येत का बघा.

आणि शक्य असेल तर शब्दाखुणा साठी देखील रेसिपीज related असा background wallpaper ठेवु शकता.

>>पण तो नुसता व्ह्यू पुरेसा नाही. <<
अंडरस्टुड. डेटा क्वलिटी इशु आहे हे ध्यानात आलं होतं पण त्याच्या व्यापकतेची क्ल्पना नाहि. मॅन्युअल स्क्रबिंग, रँगलिंग करण्याऐवजी देर आर डिफरंट वेज टु हँडल सच सिनॅरिओज. विल बी हॅपि टु चाइम इन ऑफलाइन, इफ निडेड...

मॅन्युअल स्क्रबिंग, रँगलिंग करण्याऐवजी देर आर डिफरंट वेज टु हँडल सच सिनॅरिओज. विल बी हॅपि टु चाइम इन ऑफलाइन, इफ निडेड...
नवीन Submitted by राज on 7 December, 2020 - 23:13
>>
नीट ईंग्लिशमधे किंवा देवनागरी मराठीत लिहिले असते तर तुमच्या मदतीची किंमत कमी झाली असती का?

शब्दखुणांमधे थोडा बदल केला आहे. शब्दखुणा अकारविल्हे दाखवण्याऐवजी , ज्या जास्त वापरल्या गेल्यात त्या अगोदर असे सॉर्ट केले आहे. हा बदल उपयोगी पडतोय का अकारविल्हे होते तेच बरे होते ते कळवा.

आणखि एक ,
लेखमालिकेतल्या पाक्रु एकत्र करून वेगळ्या देता येतील का?
जसे , जागूच्या - मासे किन्वा रानभाज्याच्या पाक्रु ?

@स्वस्ति
अ‍ॅपचा मुख्य उद्देश , लॉगिन न करता, चटकन काय पदार्थ करता येईल ते सुचवण्यासाठी आहे. मायबोलीवरच्या सगळ्या सुविधा पुन्हा दुसर्‍यांदा देण्यासाठी नाही. तुम्ही सुचवलेले नेहमीच्या मायबोलीवर किंवा मायबोलीच्या अ‍ॅपवर , लॉगिन करून लेखक्/लेखिकेचे सगळे लेखन जिथे एकत्र पाह्ता येते तिथे दिसेल की.
तुम्हाला काही वेगळा उपयोग अभिप्रेत आहे का? मला लक्षात आला नाही.

अ‍ॅपचा मुख्य उद्देश , लॉगिन न करता, चटकन काय पदार्थ करता येईल ते सुचवण्यासाठी आहे. मायबोलीवरच्या सगळ्या सुविधा पुन्हा दुसर्‍यांदा देण्यासाठी नाही. >>> मान्य

तुम्ही सुचवलेले नेहमीच्या मायबोलीवर किंवा मायबोलीच्या अ‍ॅपवर , लॉगिन करून लेखक्/लेखिकेचे सगळे लेखन जिथे एकत्र पाह्ता येते तिथे दिसेल की. >>> फोकस लेखकांवर नाही , पाक्रु वर आहे . उदा. वेगवेगळ्या रानभाज्या एकत्र.

पण ठीक आहे. It was nice to have .

Pages