मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले

Submitted by Admin-team on 3 December, 2020 - 23:13
maayaboli recipes app

मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अ‍ॅप आजच प्रकाशीत झाले.

हे अ‍ॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.

मायबोली वर प्रत्यक्ष लिहिणार्‍यांपेक्षा , वाचनमात्र रहाणार्‍यांची संख्या दहापट आहे. अशा वाचकांना हि सुविधा उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
या विभागात पाककृती लिहिणार्‍यां लेखकांच्या पाककृती आणखी जास्त वाचकांपर्यंत पोहोचतील.


मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येईल.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आजचा अनुभव ---
नेहमी प्रमाणे आज सकाळीही , आज जेवायला काय करू ? प्रश्न छळत होता .

भातावर तुरडाळीचे वरण , तिखट डाळ वगैरे करायचा कंटाळा आला , सार वगैरे लाड करण्यासाठी पेशन्स नव्हते .
पटकन हे अ‍ॅप उघडले , आमटी-भाज्या वगैरे सेक्शन मध्ये बघितले काही वेगळं सापडतयं का?
"शांन्तिनिकेतन डाळ" ची पाक्रु नजरेस पडली . पटकन मसूर डाळ शोधून शिजत ठेवली . २० मिनिटात प्रश्न सुटला.

पण --

साबानी भोपळी मिरच्या ओट्यावर काढून ठेवल्या होत्या . काही वेगळी भाजी करता येईल का म्हणून परत अ‍ॅप उघडले .
भाज्यांच्या प्रकारात शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडणे कठिण होती .
शब्दखुणा आता ज्या जास्त वापरल्या गेल्यात त्या अगोदर असे सॉर्ट केले गेल्यामुळे "सिमलामिरची " किन्वा "भोपळी मिरची " शोधणे कठीण .

तात्पर्य :: विशेष असे काही नाही . मला फक्त एक "user experience" सांगावसा वाटला .
शब्दखुणा अकारविल्हे दाखवणे जास्त सोयीचे आहे असे मला वाटते .
शोध सुविधा हवी . वापर नक्की सोपा होईल .

उत्सुकता म्हणुन फक्त अँप डाऊनलोड करुन एकदा उघडुन पहाणार आणि uninstall करणार.

वेगवेगळ्या अँप्सने सेलफोन खच्चून भरला आहे. काहीही विकत घ्यायला जा, काहीही शिकायला, पहायला जा, अँप डाउनलोड करणं अनिवार्य करुन ठेवलं आहे, त्यामुळे अगणित अँप्सने फोन भरला आहे.
Thanks to माबो ऍडमीन की इथून रेसिपी उडवुन टाकणार नाहीत. मी माबोवर येऊन पुर्वीसारखीच रेसिपी शोधेन. मला तेच आवडतं आणि झेपतं. Happy

@स्वस्ति शब्दखुणांमधे बरेच बदल केले आहेत. त्या पुन्हा अकारविल्हे आणि पहिल्यापेक्षा सापडायला सोप्या केल्या आहेत. तुम्हाला लगेच दिसल्या नाहीत तरी ४८ तासांनंतर दिसायला हव्या. अ‍ॅप पुन्हा डाऊनलोड करायची गरज नाही.
अ‍ॅप आवडले असले तर आणि तुम्ही गुगल प्लेवर तुमचा अभिप्राय दिलात तर अजून जणांना सापडायला मदत होईल.

app मध्ये पाकृ ची लिस्ट नक्की कशाच्या आधारे sort केलीय? कारण, मागील आठवड्यात नवीन पाकृ वर दिसत होत्या.. आता random दिसत आहेत. माझं निरीक्षण चुकलं देखील असेल पण शंका आहे..

अतिरिक्त, मांसाहारी category च्या tile मध्ये, माझ्या धाग्यातील पापलेट (हो हो सरंगा/हलवा Happy ) चं प्रचि दिसलं आणि ऊर भरून आला.. आभार! Happy

@डीडी, पाकृ ची लिस्ट वापरकर्त्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन मुद्दाम random दिसेल अशी केली आहे. सहसा अ‍ॅप वापरणार्‍याना पटकन नवीन वेगळं काही तरी हव असतं. सध्यातरी मायबोलीवरचे वाचक आणि अ‍ॅप वापरणारे यांच्यात एकच पाककृती पण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते असे दिसते आहे.
लिस्ट मधे मुद्दाम खाली लेखकाचे नाव दिले आहे. काही काळानंतर आपोआप काहीजण आवडीचे लेखक होतात आणि त्यांच्या पाककृती मुद्दाम शोधून बघितल्या जातात. सध्या (किंवा नेहमीच) पाककृतीं बरोबर १ तरी फोटो असला तर त्या जास्त वाचल्या जातात असे दिसते आहे. तुम्ही नेहमी छान छान फोटो टाकता पण ताज्या पाककृतीला (पनीर पराठा) दिला नाहीत म्हणून मुद्दाम सांगावेसे वाटले. काही दिवसांनी हव्या त्या लेखकाच्या सगळ्या पाककृती पाहता येईल अशी सोय करायचा विचार आहे.
पाककृतींवर कष्ट घेऊन, चांगले फोटो इथे दिल्याबद्दल तुमचे आभार. पापलेट चं प्रचि तिथे टाईलवर दाखवल्याबद्दल तुमची काही हरकत नसावी असे तुमच्या प्रतिसादावरून वाटते आहे. असल्यास कृपया कळवा.
अवांतर: तुमच्या यू ट्यूब चॅनलला शुभेच्छा. मायबोलीवरून किंवा अ‍ॅपवरून तुम्हाला काही वाचक आणि चाहते मिळाले तर आनंदच आहे. नुसती चॅनलची लिंक न देता तुम्ही इथल्या वाचकांना काहीतरी उपयोगी देत आहात आणि तुमच्या चॅनलला अधिक प्रेक्षक इथून मिळाले तर तुम्हालाही ते उपयोगी ठरावे. नवीन अ‍ॅपच्या माध्यमातून जे नेहमी मायबोलीवर येत नाहीत असेही जास्तीचे प्रेक्षक तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे.

@webmaster, अगदी सहमत.. आणि लिस्ट randomly येते त्यामुळे बघायला गंमत येते.
तुमच्या सुचनेबद्दल आणि शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.. नुकती सुरुवात आहे..
पराठा रेसिपी ला चिकटवला फोटो, preview बघताना चुकून delete झाला माझ्याकडून. पूढे काळजी घेईन. Happy

पाकृ ची लिस्ट वापरकर्त्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन मुद्दाम random दिसेल अशी केली आहे>>>>

ही कल्पना आवडली. दरवेळेस नवी रेसिपी दिसल्यामुळे काहितरी नवे केले जाईल…
...

आणि अन्न वै प्राणा: हवीच... ती लेखकाने पूर्ण केली तर मग काय, बघायला नकोच....

सुटसुटीत आहे वापरायला. इंडेक्स कल्पक आहे. नंतर मायबोलीचा फील राहतो.
मग आता माबोवर पाकृ मध्ये धागा काढता येत नाही का? ऋन्मेषच्या खाऊगल्ली मध्ये तसा उल्लेख आहे.

Pages