मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

Maybolivar asnarya sarv lekhak lakhikanchi nav mi vachu shakte ka ??

मृणालीनी
तुम्ही गुलमोहर कथा कादंबरी आणि गुलमोहर कविता (जर आवडत असतील तर) असे ग्रुप सबस्क्राइब केले की तिकडचे सर्व लेखन 'गृपमध्ये नवीन ' ह्या बॉक्सला क्लिक करून वाचत राहिले आणि ज्यांचे लिखाण आवडले त्यांचे चाहते / फॉलोअर बनलात की मायबोली लेखक सुची आपोआप तुमच्या संग्रही राहील. ललित लेखन विभाग सुद्धा काही उत्कृष्ट लेखकाना एक्सप्लोअर करण्यास चाळुन पाहायला हरकत नाही.

विकिपिडियावर लिहिणाऱ्यांकडून माहिती हा लेख . मायबोलीवर नवीनमध्ये वर का दिसत नाही? नवीन प्रतिसाद टाकला तरी? ( पब्लिक अक्सेस टु ओल आहे तो)

@vijay_Kulkarni मी खुपच नवीन असताना @भरत यांनी मला मार्गदर्शन व्व्हावे म्हणून ( गझलेसाठी म्हणून ) या लिंक्स दिल्या होत्या.
धन्यवाद त्यांच्यासाठिच असतील !!
इथे वाचा
https://www.maayboli.com/node/21889

https://www.maayboli.com/karyashala

डू आयडींमुळे अनेक चांगल्या लेखांचा आणि विषयांचाही विचका होत आलेला मायबोलीवर नेहमी पाहायला मिळते.
तर कोणताही आयडी बनवताना आधार कार्ड चेक नाही का करता येणार?
मला वाटतं एकूणच दर्जा खुप उंचावेल.

>>> मोबाईल वरुन येथे फोटो कसा टाकायचा? >>>

बरेच पर्याय आहेत.
१) इथेच आपले खाते >> खासगी जागा >> upload photo ( २ एमबीपेक्षा कमी करून घेतल्यावरच अपलोड होतो) करून >> लेखात image द्या वापरून.
वारंवार लेखन करून भरपूर फोटो देणाऱ्यासाठी हा पर्याय उपयोगाचा नाही. 70mb जागा आहे.
मायबोलीApp वरून फोटो अपलोड होत नाहीत. ब्राउजर वापरा.
-------------
२) गूगल फोटोज शेअरिंग वापरून. हा उत्तम प्रकार आहे पण जरा किचकट आहे. मोबाइलमध्ये सेटपमध्ये असलेल्या जीमेल अकाउंटशी संलग्न फोटोज app वापरता दुसरे अकाउंट photos.google.com हे ब्राउजरवरून वापरा. म्हणजे त्रास कमी होतो.
--------------
३) https://postimages.org/ या साइटवर फोटो अपलोड करून direct link copy करून
ती या template मध्ये पेस्ट करून लेखात देणे.
Template
<img src="लिंक" width="80%"/>

(यातून दिलेले फोटो काही वाचकांना दिसत नाहीत.)
------------
४) फेसबुक वर अपलोड केलेले फोटो. फोटो मोठा केल्यावर अड्रेस बारमध्ये **fbcdn**.... वाली लिंक वरच्या टेंम्प्लेटात वापरून.
ओफिसच्या संगणकावर फेसबुक ब्लॉक्ट असेल तर हे दिसत नाहीत. काही महिन्यांनी हे फोटो गायब होतात.

५) ब्लॉगरवर फोटो टाकून तिथून लिंक काढून वरच्या टेंम्प्लेटातून वापरायची. उत्तम उपाय.

मी सोडले केव्हांच रे हे वेदना कुरवाळणे. द्वैत यांनी लिहिलेली गझल खुप आवडली. मी retired व्यक्ति आहे. संगीताची आवड पूर्वी पासून होती. ही गझल मी compose करून गायली आहे. ती मला लेखकांना ऐकवयची आहे.

https://www.maayboli.com/node/77439

या माझ्या लेखावर माझा प्रतिसाद save होत नाहीये. एरर येत आहे. तीं चार वेळा प्रयत्न केला आहे. ‘प्रतिसाद तपासा’ हे व्यवस्थित होतंय. हा फक्त मला प्रॉब्लेम होतोय का हे कळायला मार्ग नाही.

cache क्लियर करून पहिलं आहे. login/logout पण पहिलं.

कृपया मार्गदर्शन करा.

तुम्ही कुठला ब्राउझर वापरता आहात? कुठल्या प्रकारे , मोबाइल का लॅपटॉप? त्याच मशीन वरून दुसरा बाऊझर वापरून जमतंय का? मोबाईलवर अडचण असेल तर लॅपटॉप पाहता का? . ही अडचण फक्त तुम्हालाच येतेय असे दिसतेय. तुम्ही काही अ‍ॅड ब्लॉकर किंवा इतर प्लगईन वापरत आहात का?

आत्ता दुसऱ्या एका डेस्कटॉप (ubuntu) वरुन लेखावर प्रतिक्रिया save करता आली आहे.

लॅपटॉप (windows) वरुन करत होते. मघाशी दुसऱ्या ब्राउझर वरुन पण एरर येत होती. Ad blocker जरी वापरत असले, तरी लेख लिहिणे/ संपादन आणि आधीच्या comments याच laptop/ ब्राउझर वरुन केल्या होत्या. म्हणून कळेना का अडचण येतेय ते.
(मदत पुस्तिकेवरच्या कॉमेंट्स लॅपटॉप वरून केल्या आहेत). असो!

माझ्या प्रश्नाची इतक्या तातडीने दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.

नाशिक सिटी बस शोधण्यासाठी साइट किंवा app आहे का?

रेल्वे स्टेशन ते पाथर्डी फाटा / इंदिरानगर?
किंवा नाशकातले बस रूट्स?
सिटी बसेस सुरू आहेत का?
( या एका प्रश्नासाठी धागा काढत नाही. नाशिक परिसर वाहते पानमध्येही विचारलं आहे.)

माझे जुन्या आय डी ने रन्गिबेरन्गी पान आहे. पण माझा जुना आयडी बॅन केला आहे . त्यामुळे रन्गिबेरन्गी पानावरील माझेच लिखाण मला वाचता येत नाही. ते कसे पाहता येइल?

मला माझ्याजवळची मराथी व इन्ग्लिश पुस्तके एका वाचनलयाला द्ययची आहेत नाव सुचवाल का? धन्यवाद.

since last month I cant post any poem .its continuously showing error message .

तुम्हाला काय error message येतो आहे? तुम्ही पूर्वी कविता प्रकाशित केल्या आहेत . त्यामुळे तुमच्या ब्राऊझर ची कॅश स्वच्छ करुन पहा.

Pages