मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

नमस्कार.
प्रकाशित केलेल्या लेखात दुरुस्ती करून मजकूर वाढवायचा आहे.
संपादन (EDIT) कसे करावयाचे ?
मदतपुस्तिकेत दिल्यानुसार संबंधित लेखावर गेल्यावर EDIT ऑप्शन कुठे दिसत नाही.

माबोच्या नवीन पॉलिसीनुसार लेख प्रकाशित केल्यानंतर काही ठराविक काळापर्यंतच (बहुतेक १ महिना) संपादन करता येतो. त्यानंतर तो पर्याय उपलब्ध नाही.

माझ्या लेखावरील प्रतिसाद मला खालील पत्त्यावरून आला आहे
notify@maayboli.com
आणि मी प्रतिसाद दिला तर फेल गेला.
मेल address not found असे दिसते आहे
काय समस्या आहे सांगू शकाल का

मला स्मायली टाइप केल्या की प्रतिसाद error येत आहे... खूप प्रयत्न केले... Webmaster च्या अनेक सूचना वाचल्या... फॉलो करायचा प्रयत्न केला... तरीही जमत नाही आहे... मार्गदर्शन करावे :(:-(

१) एकेका स्थानाची वाहते पान_ गप्पा ( जपान, ठाणे वगैरे दिसत ती हल्ली कुठे आहेत?
२) अगदी छोटे प्रश्न, बातमी वगैरेसाठी खरडफळा - वाहते पान असावा. तिथे चर्चा वाढली तर धागा सुरु करता येईल.

वाहती पाने फक्त ग्रुप पुरती मर्यादित झालीत. तुम्हाला त्या त्या ग्रुप चं सभासदत्व घेऊन 'ग्रुपमध्ये नवीन' मध्ये पाहावं लागेल.
त्या धाग्यावर नवीन प्रतिसाद आले तर 'माझ्यासाठी नवीन\ मध्येही दिसतील.

पूर्वी मायबोली ने प्रकाशचित्रे वेगळ्या app वर दिलेली होती ती डाऊनलोड करता येत होती. पण आता मात्र तसे होत नाही व ती लिंक सापडली नाही

खरडफळा सुरू करा. एक दोन ओळींचे मत मांडण्यासाठी उपयुक्त आहे. बरेच प्रतिसाद आले तर लेखक/सभासद धागा काढेलच.

Pages