मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

माफ करा...
पण सभासद नोंदणी करताना चुकून अनावधानाने पुरूष ऐवजी स्री अशी नोंद झालेय तर बदलारचे कसे सांगाल का ?

वरील post मधील कोट follow करायची असेल तर काय करावे.
वि.पु.त लेखन कसे करतात

मला वरच्या post मधील काही भाग माझ्या post मध्ये घ्यायचा आहे तशाच smiles पण घ्यायच्या आहेत काय करू >>>
कॉपी-पेस्ट करून घेता येईल.
स्माईलीज करता इथे वेगळी पद्धत आहे. : - हहगलो: : -राग : :-खोखो: :-फिदी: इ. यामध्ये '-' काढून टाका आणि बाकी स्पेस न देता टायपा, प्रतिसाद सेव केला की स्मायली दिसेल.

विपूत लेखन करण्याकरता त्या प्रोफाईल ची विपू सुविधा सुरू असायला हवी. ते असेल, तर त्या व्यक्तीच्या 'सदस्यत्वात' जाऊन 'विचारपूस' हा पर्याय निवडा. त्या जागेत हवा तो संदेश टाईप करून सुपूर्द केला की विपू जाईल.

पण सभासद नोंदणी करताना चुकून अनावधानाने पुरूष ऐवजी स्री अशी नोंद झालेय तर बदलारचे कसे सांगाल का ? >> याकरता अ‍ॅडमीन ना विपू करा.

<पण सभासद नोंदणी करताना चुकून अनावधानाने पुरूष ऐवजी स्री अशी नोंद झालेय तर बदलारचे कसे सांगाल का ?>

माझे सदस्यत्व-> संपादन-> वैयक्तिक

गेल्या दोन एक दिवसात मायबोली स्लो झाल्याचे जाणवतंय .टाईप करायला अवघड जातेय ,विशेषतः फोनवरून .
पेजही पूर्णपणे लोड होत नाही .झालेच तर वेळ लागतोय .हा प्रॉब्लेम सर्वांन येतोय का ? Uhoh

मायबोलीवर लिखाणाच्या सुरक्षिततेचा ऑप्शन आहे का? लिखाण चोरले जाऊन काही समाजकंटक स्वतःच्या नावाने खपवत आहेत.

मला मी लिहिलेल्या पोस्ट कशा वाचता येईल.? मी लेखन या रकान्यात पाहिले पण मला तिथे माझी एकही पोस्ट सापडली नाही.

छान व्यासपीठ उपलब्ध केलंय मायबोली वर अभिनंदन मायबोली टीम चे मी सुद्धा लिखाण करणार.आभार मायबोली

एखाद्या कथेचे अनेक भाग असतात त्याचे धागे कसे शोधायचे?
तसेच जर धागा सापडलाच तरी त्याच्या पुढचा धागा कसा शोधायचा?
उदा एकूण 7 भाग आहेत, भाग 5 वाचत असेल तर भाग 1ते4 चे धागे वरती दिसतात मात्र 6व7 चा धागा दिसत नाही?

माय बोली वर माझा लेखन कशा publish करावा

माय बोली वर माझा लेखन कशा publish करावा
नवीन Submitted by Harshad molishree on 18 July, 2018 - 09:28
<<

@Harshad molishree
तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर(Link) टिचकी (Click) मारुन/करुन स्वत:चे लेखन प्रकाशित करु शकता.
-
https://www.maayboli.com/user/68814/created

Pages