मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मी काल एक लेख लिहिला आहे आणि त्याचा दुसरा भाग मला पोस्ट करायचा आहे . प्रश्न असा आहे माझा लेख, 'लेख मालिका' मध्ये कसा समावेश करत येईल ???

jadhavmilind26,
तुम्ही पुढील भाग लिहा नंतर admin यांना सांगून लेखमालिका तयार करता येईल.
शुभेच्छा!

ह्या मजकुरात मोबाइल द्वारे image कशी द्यायची. मी image वर क्लिक केले नंतर नवीन विंडो ओपन झाला त्यात अपलोड ह्या option वर क्लिक केले.choose file हे option ओपन झाले नंतर ते क्लिक केल्या वर document मधुन image select केली ती अपलोड पण झाली.तसे खाली मेसेज पण दिसते आहे पण ते नवीन विंडो मधुन पुढच्या विंडो वर कसे आणायचे.म्हऩजे send to text area कसे करायचे तो option दिसत नाही.

माझा लेख गुगल वर सर्च होत नाही .....
आणि आपल्या मायबोली वर 'शोध' या मध्ये सुद्धा सर्च होत नाही ...
पूर्ण शीर्षक कॉपी पेस्ट केलं तरच सर्च होतंय.....उपाय सांगा जेणे करून कोणीही सर्च केलं तर तो लेख मिळावा ....

http://www.maayboli.com/node/60125

नमस्कार भरत अणि नन्द्या,
तुमचे मनापासुन आभार, खुपसे लेख, कथा यावर प्रतिसाद देता येतिल आता. (एवढ्यात आज आवरते घेते)

Screenshot_2016-09-14-06-49-43-563.jpeg

या इमेज मध्ये फेसबुकच लाइक बटन आहे ....याचा उपयोग / कारण काय ?????
आणि जर मला फेसबुक वर माझा लेख शेर करायचा असेल तर काय करायला लागेल .???

माझा लेख गुगल वर सर्च होत नाही .....
आणि आपल्या मायबोली वर 'शोध' या मध्ये सुद्धा सर्च होत नाही ...
पूर्ण शीर्षक कॉपी पेस्ट केलं तरच सर्च होतंय.....उपाय सांगा जेणे करून कोणीही सर्च केलं तर तो लेख मिळावा

@jadhavmilind26
>माझा लेख गुगल वर सर्च होत नाही .....
म्हणजे नक्की काय? तुम्ही नक्की कुठले शब्द वापरून सर्च करता आहात ?
>पूर्ण शीर्षक कॉपी पेस्ट केलं तरच सर्च होतंय.
शीर्षकाचा काही भाग दिला तरी सर्च मधे दिसतय. मी आताच थेट गुगल मधे "कोडैक्कानल सायकल प्रवास" असे लिहिले आणि मला तुमचा लेख व्यवस्थित दिसला.

मायबोलीवर लेख प्रकाशीत झाल्यावर गुगल मधे यायला काही दिवस लागू शकतात. तुमचा लेख जास्त लोकप्रिय झाला तर लवकर दिसेल. सध्या मायबोलीवरची मुख्य पाने जी गुगल ला आधिच माहिती आहेत त्यावर तुमच्या लेखाचा गोषवारा आहे ती पाने लगेच ताजी तवानी झाली आहेत त्यामुळे सध्या मुख्य शीर्षक आणि गोषवाराच (पहिले काही शब्द) गुगल आणि इतर सर्च इंजिनना माहिती आहेत.

www.maayboli.com/node/3569
हा धागा मी ९ तारखेला वाचला होता. पण आता पुन्हा उघडायला गेलो तर हा धागा सार्वजनिक वाचनासाठी नाही असं सांगितलं जातंय.
हा धागा कोणत्या गृपमध्ये आहे?

येथे बरेच जण माबोच्या Textual smilies व्यतिरिक्त इतर प्रकारच्या हसणाऱ्या, नाचणाऱ्या, रडणाऱ्या स्मायली कशा प्रकारे टाकतात हे कोणी सांगेल का?

नमस्कार!
मी पूर्वी अनेकवेळा पिकासा वापरून प्रकाशचित्रं लेखनामध्ये टाकली आहेत, पण सध्या पिकासा मध्ये 'get link to this picture' असा पर्याय मिळत नसल्याने प्रचि टाकता येत नाहीत.
'Google Photos' मध्ये 'Get Link' असा option आहे पण तो वापरला तर लेखात चित्र दिसायच्या ऐवजी फक्त लिंक दिसते.

कृपया कोणी मदत करू शकेल का?
धन्यवाद!

येथे बरेच जण माबोच्या Textual smilies व्यतिरिक्त इतर प्रकारच्या हसणाऱ्या, नाचणाऱ्या, रडणाऱ्या स्मायली कशा प्रकारे टाकतात हे कोणी सांगेल का?

>> मी तरी इतर बाह्य साईट्स वरुन HTML कोड्स कॉपी पेस्ट करून इथे टाकते.

उदाहरणार्थ: http://www.sherv.net/happy-emoticons.html या साईटवरच्या कोणत्याही आवडत्या स्मायलीवर क्लीक करा. त्या स्मायलीचे स्वतंत्र पेज उघडेल. त्यावर 'गेट कोड्स'वर क्लीक केल्यावर जो HTML कोड दिसेल तो Ctrl + A ने संपूर्ण सिलेक्ट करून इथे कॉपी पेस्ट करा. तुम्हाला इथे ती स्मायली दिसू लागेल. ट्राय करा बरे.

त.टी. वर दिलेल्या स्मायली साईटसारख्या असंख्य इतर साईट्सही आंतरजालावर उपलब्ध आहेत.
उदा. http://www.freesmileys.org/, https://www.pic4ever.com/ इत्यादी इत्यादी.

Good Luck

कृपया, अजून एका शंकेचं निरसन करावे. मायबोलीवर एखादा लेख नंतर वाचण्याकरिता bookmark करण्याची सोय आहे का? आणि तो कसा करतात. Confused face

कृपया, अजून एका शंकेचं निरसन करावे. मायबोलीवर एखादा लेख नंतर वाचण्याकरिता bookmark करण्याची सोय आहे का? आणि तो कसा करतात.

>> माझ्यामते सध्या फक्त असे १० च लेख बुकमार्क करता येतात आपले आपल्याला..
त्यासाठी लेखाखाली निवडक १०त नोंदवा हि सोय वापरता येते. तिथे टिक करा.

यापेक्षा सोपा उपाय म्हणजे क्रोम किंवा फायरफॉक्समध्ये बुकमार्क्स बार वर सरळ 'मायबोली' असे एक फोल्डर बनवुन आपणच एक एक लेख बुकमार्क करून टाकावा. यामध्ये तुम्हाला कितीही लेख बुकमार्क करता येतील.

यापेक्षा सोपा उपाय म्हणजे क्रोम किंवा फायरफॉक्समध्ये बुकमार्क्स बार वर सरळ 'मायबोली' असे एक फोल्डर बनवुन आपणच एक एक लेख बुकमार्क करून टाकावा. >>>@पियू, मी असंच केलं. क्रोममध्ये मायबोली फोल्डर बनवला आणि लेख बुकमार्क केले. पण एक गंमत सांगू का? मी लेख बुकमार्क केल्याबरोबर तो आटोमॅटिक मायबोली फोल्डर मध्येच जाऊन सेव्ह होतोय. त्याला Maayboli फोल्डरचा path द्यावा लागत नाहीए. Chrome ला कसं काय कळतंय, मला लेख कुठे सेव्ह करायचाय ते?!!! सगळीच गंमतच आहे, नाही? लई भारी!!! Rofl

नाही, ते डिफॉल्ट लोकेशन आहे. क्रोम तुम्हाला नेहेमी लास्ट सेव्हड बुकमार्क चा पाथ देते. तुम्ही एखाद्या दुसर्‍या साईट-पेज ला बुकमार्क करून पाहा, ओल्ड सेव्ह्ड लोकेशन क्रोम स्जेस्ट करेल...

Srd , व्यक्तिगत संपर्क वेगळा आणि विचारपूस वेगळी. व्यक्तिगत संपर्क म्हणजे तुम्ही मायबोलीसाठी वापरत असलेल्या इमेलद्वारे संपर्क. विचारपूस मायबोलीवरच असते. त्याबद्दल तुम्हाला इमेलने सूचना येण्याचीही सोय आहे.

Pages