मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

@सचिन काळे
तुम्ही मोबाईलवरून मायबोलीमधे लॉगीन न केल्यामुळे हे होते आहे. तुम्ही मोबाईलवरून लॉगीन केल्यावर ही अडचण दूर होईल. लॅपटॉपवर तुम्ही लॉगिन असल्यामुळे ही अडचण येत नाही.

मी पुन्हा one time login link मागवून मोबाईलवरून लॉगीन केले. पण पुन्हा तसेच होत आहे. कृपया मदत करावी.

विरंगुळा या विभागामध्ये नवीन लेखनाचा धागा कसा सुरु करायचा ?

मला तिथे फक्त 'नवीन गप्पांचे पान' सुरु करता येईल असे दिसते आहे.

विरंगुळा या विभागामध्ये नवीन लेखनाचा धागा सुरु करणे अपेक्षित नाही. सहसा लेखनाचा धागा असणारे लेखन "विरंगुळा" नसते असा अनुभव आहे. त्यामुळे अपेक्षित विषयाशी संबंधीत ग्रूपमधे सामील होऊन तिथे लेखनाचा धागा सुरु करावा.

@सचिन काळे
तुम्ही नक्की लॉगीन होत आहात का? लॉगीन झाल्यावर दिसणारे इतर मेनू (उदा. तुमची प्रोफाईल संपादीत करता येणे) मोबाईलवरून दिसतात का? कारण 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रुपमध्ये नवीन' हे पर्याय लॉगीन झाल्यावरच दिसतात.

होय, मी नेहमी मोबाईलवरूनच लॉगिन करतोय. कारण माझ्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप नाही.

मी मोबाईलवरूनच माझे प्रोफाइल पिक्चर अपलोड केलेय, पासवर्ड सुध्दा बदललाय आणि माझ्याबद्दल माहिती भरलीय जी 'माझी विचारपूस' मध्ये दिसतेय. मी मोबाईलवरूनच अनेक ग्रुपचा सभासद झालोय. मोबाईल वरूनच अनेक धाग्यांवर मी प्रतिसादसुद्धा देतोय. हे सर्वकाही मोबाईलवर लॉगिन झाल्यावरच करणे शक्य आहे. म्हणजेच मी नक्कीच मोबाईलवरून लॉगिन आहे.

माझ्या मोबाईलवर मला 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रुपमध्ये नवीन' हे दोन्ही पर्यायसुद्धा दिसताहेत. दोन्ही पाने उघडताहेत. पण फक्त ५ सेकंदाकरिता ती पाने दिसतात आणि ती जाऊन फक्त फर्निचरच्या किंवा कारच्या जाहिरातीचा लोगो दिसत राहतोय. बॅक केले कि पुन्हा 'मायबोलीवर नवीन' पान दिसते.

आणि आता, हे जे काही लिहून मी तुम्हाला पाठवतोय तेसुद्धा मी मोबाईलवरच लिहून पाठवतोय. ह्यावरूनच समजते कि मी मोबाईल वरूनच लॉगिन आहे.

आपण माझी विचारपूस करताहात त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. आपण मला मदत कराल ह्याची मला नक्की खात्री आहे. चूक भूल देणे घेणे. धन्यवाद.

>ती जाऊन फक्त फर्निचरच्या किंवा कारच्या जाहिरातीचा लोगो दिसत राहतोय.
ते दिसल्यावर मग खाली जाऊन स्क्रॉल करता येते आहे का आणि मग काही दिसते आहे का? कदाचीत पुष्कळ स्क्रॉल करावे लागेल.
काही कारणामुळे ती ईमेज जरूरीपेक्षा जास्त जागा घेते आहे का (तुमच्या ब्राऊझरमधे) ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.

मी मोबाईल off on करून पाहिला, दुसऱ्या मोबाईलवरून आणि सॅमसंगच्या दुसऱ्या टॅबवरून लॉगिन करून पाहिले. म्हणजेच ब्राऊसर बदलून पाहिला. पण काहीच फरक नाही. तसंच होतंय.

'मायबोली मास्टरशेफ - घोषणा' >>>> 'मायबोली गणेशोस्त्व - २०१६ संयोजन' याकरीता सदसत्व कसे घ्यावे ? कृपया या बाबत मला मदत करावी. धन्यवाद.

उषा, ५ सप्टेंबर रोजी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' हा ग्रुप सुरु होईल, तेव्हा त्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि तुमची स्पर्धेतली पाककृती लिहा. संयोजन हा ग्रुप फक्त संयोजकांसाठी आहे.

माझ्या मोबाईलवर मला 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रुपमध्ये नवीन' हे दोन्ही पर्यायसुद्धा दिसताहेत. दोन्ही पाने उघडताहेत. पण फक्त ५ सेकंदाकरिता ती पाने दिसतात आणि ती जाऊन फक्त फर्निचरच्या किंवा कारच्या जाहिरातीचा लोगो दिसत राहतोय. बॅक केले कि पुन्हा 'मायबोलीवर नवीन' पान दिसते. >>>> माझ्या अडचणीचे निवारण अद्याप झालेले नाही. कृपया मदत करावी.

@सचिन काळे,
तुम्हाला का अडचण येते आहे हे कळत नाहिये. तुम्ही जे वर्णन केले आहे त्यावरून तुमचे लॉगीन नीट होत नाही इतकेच समजू शकते आहे.

मोबाईलवरून हा प्रॉब्लेम मलापण येतो. पण मी माझ्यासाठी नवीन हा विभाग जास्त वापरात नसल्याने कधी इथे लिहिले नाही. मी मायबोलीवर कायम मोबाईलवरूनच वापरतो. फक्त सचिन काळे यांना कारची जाहिरात दिसते त्या ऐवजी मला मायबोलीची छोट्या जाहिराती इमेज दिसते इतकाच काय तो फरक. पण पान स्क्रोल न होणे, दोन तीन सेकंदांसाठी पान दिसून नंतर नुसताच जाहिरात दिसणे प्रॉब्लेम सेम आहे.

प्रॉब्लेम लॉग इनचा नसावा. मी लॉग इन केलेले आहे.

मोबाईलवरून मायबोली वापरणाऱ्या बऱ्याच जणांना हा प्रश्न भेडसावत असावा असा माझा अंदाज आहे. अशांनी येथे कळविले तर प्रश्न सुटण्यास मदत होईल. मला वाटते, कदाचित मायबोली साईटमद्ये काही त्रुटी असावी. वेबमास्टर, आपल्या धोरणात बसत असेल तर, मी आपणांस पासवर्ड कुठे आणि कसा कळवावा हे सांगणे. आपण तो मोबाईलमद्ये वापरून पहावा. ज्यायोगे आपणांस दुरुस्ती करणे शक्य होईल. नंतर मी पासवर्ड बदलेन.

एकूणातच मोबाईलवरून मायबोली वापर सोपा व्हावा म्हणून काही प्रयत्न सुरु आहे. मायबोलीचे ऊर्ध्वश्रेणिकरण पूर्ण झाल्यावर हा प्रश्न सुटतो का ते पाहता येईल.

ठीक आहे. वाट पाहतो. आशा करतो की सर्वकाही व्यवस्थित होईल.

आपण मायबोलीचे ऊर्ध्वश्रेणिकरण करीतच आहात, तर एक सूचना करतो. जमल्यास अंमलात आणावी. समजा, सद्या काय होते की 'मायबोलीवर नवीन' पान उघडले असता तेथील लेखासमोर दिसते कि ५० प्रतिसादांपैकी ९ नवीन प्रतिसाद आलेत. त्यावर टिचकी मारली तर प्रथम सम्बंधित लेखाचे पान उघडते. मग आपण पुष्कळ स्क्रोल करीत खाली (लेखाच्या शेवटी) यायचे. खाली १,२,३,४ .... 'शेवट' दिसते. आपण 'शेवट' ह्यावर टिचकी मारायची. पुन्हा लेखासहित शेवटचे पान उघडते. मग आपण पुन्हा स्क्रोल करीत लेखाच्या खाली यायचे. तेथे आपणांस ९ नवीन प्रतिसाद दृष्टीस पडतात.
ह्याऐवजी ५० प्रतिसादांपैकी ९ नवीन ह्यावर टिचकी मारली तर आपणांस सरळ ९ नवीन प्रतिसादांपैकी १ ला नवीन प्रतिसाद दृष्टीस पडावयास हवा. कारण आपण लेख आणि पूर्वीचे प्रतिसाद तर अगोदर वाचलेलेच असतात. आपणांस ९ नवीन प्रतिसाद वाचण्याचीच उत्सुकता असते. हि सूचना अंमलात आणल्याने वेळेची आणि श्रमाची बचत होईल. तसेच मनाच्या तगमगीतून (frustration) सुटका होऊ शकते. ( There should be user friendly application मराठी प्रतिशब्द????).
लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न केलाय. आपण जाणकार आहातच. कृपया राग मानू नये. चुकभुल देणे, घेणे.

सचिनजी, ही सुविधा आधीपासूनच अस्तित्वात आहे.
समजा तुम्हाला एखाद्या धाग्याला '९ नवीन' प्रतिसाद आलेले दिसले तर त्या धाग्याच्या शीर्षकावर क्लिक न करता त्या '९ नवीन' यावर क्लिक केले तर तुम्हाला आधीच्या प्रतिसादांचे पान न दिसता नवीन प्रतिसादांचे पान दिसेल.

माफ करावे. हे काही माझ्या लक्ष्यात आले नव्हते. निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले फार फार धन्यवाद.

स.न. नंद्या४३

>> स. न.
>> मायबोलीवर emoticons कुठले कुठले वापरता येतात? कसे?

कृपया मदतपुस्तिकेतले हे पान बघणार का ?

तसेच प्रतिसाद लिहीतो त्या चौकोनाखाली लगेचच दोन लिंक आहेत.

>> मजकूरात image किंवा link द्या.
आणि
>> Textual smileys will be replaced with graphical ones.

त्याही बघाव्यात ही विनंती.

I am learning/ trying to write in Marathi.
If some spelling error happens> I delete that word and try to rewrite but then, after every keystroke that same word(deleted) appears like this: ज्फ्ह्ग्क्ज्फ्ध्ग्फ्द्क्झ्मंइइफ्ह्ग्क्ज्फ्ध्ग्फ्द्क्झ्मंइ्फ्ह्ग्क्ज्फ्ध्ग्फ्द्क्झ्मंज्फ्ह्ग्क्ज्फ्ध्ग्फ्द्क्झ्म

Thanks in advance.

शिरिन_२०१०, हे असं गुगल क्रोमवर होतं. तुम्ही दुसरा ब्राउसर वापरू शकता. किंवा क्रोममध्ये काही डिलिट करून नवं टाइप करण्यापूर्वी एकदा स्पेसबार दाबा.

नमस्कार शिरिन_२०१०

वरती भरत यांनी सांगितलेले दोन उपाय आहेत.
१. बॅकस्पेस वापरून पुन्हा टाईप करण्या आधी एकदा स्पेसबार दाबा.
२. इतर ब्राउजर वापरून पहा.
किंवा. अजून एक उपाय आहे.

मदतपुस्तिकेतल्या या पानावर दाखवल्याप्रमाणे प्रश्नचिन्हाशेजारील निळ्या सफरचंदावर क्लिक केले असता जी विंडो उघडते, तिथे रोमन टाइपिंग करून देवनागरी टेक्स्ट उमटेल, हा उपाय तुम्ही वापरून पाहू शकता.

अजून काही मदत हवी असल्यास जरूर येथे लिहा.

Pages