सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29

येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे! Happy

आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!

तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.

सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिट चि कोशिम्बिर:
१ बिट उकदलेल
२. मिथ
३. साखर
४. मिरचि बरिक चिरलेलि

क्रुति:
वरिल सगले जिन्नस एकत्र करुन , वरुन कोथिम्बिर सर्व करा

गाजर किसून घ्यायचे. केशरी गाजर असेल तर जरा परतून्/वाफवून घ्यायचे. त्यात मध, मीठ, पुदिन्याची पाने बारीक चिरून, लिंबाचा रस,, बेदाणे आणि अक्रोडाचा हाताने होईल इतपत चुरा करून घालायचा. फ्रीजमधे गार करून मग खायचे. तोपर्यंत त्यला थोडा रस सुटतो आणि त्यात भिजलेले बेदाणे सही लागतात.

सध्या बाजारात सुंदर चवीची रसरशीत लाल गाजरे मिळत आहेत. त्यांची नेहमीसारखी कोशिंबीर करायचा कंटाळा आला होता. जरा वेगळी चव हवी होती. मग घरातले काही घटक वापरून जरा वेगळ्या चवीचे तोंडीलावणे बनवायचा प्रयत्न केला.
किसलेली गाजरे, सोबत आवडत्या कोणत्याही भाज्या / फळे बारीक चिरून (गोडसर चव असल्यामुळे त्या चवीला साजेशा भाज्या वा फळे निवडावीत. उदा. वाफवलेले मटार, घेवडा, स्वीट कॉर्न, सफरचंदाचे क्यूब्ज, पेअरचे क्यूब्ज वगैरे)
एगलेस मेयॉनेज सॉस, थोडा मस्टर्ड सॉस (किंवा मोहरी पुड), ऑलिव्ह ऑईल, मिरपूड, मीठ, मिक्स्ड हर्ब्ज, लिंबाचा रस.

हे सर्व सलाद ड्रेसिंग एकजीव घोटून घ्यावे. त्यात चिरलेल्या, किसलेल्या भाज्या वा फळे हलक्या हाताने मिसळावीत. जरा मुरवत ठेवावे. वरून हवे असल्यास फळांच्या चकत्यांचे गार्निश करावे. ब्रेड / पोळी बरोबर खावे. किंवा नुसतेच चापावे. गार्लिक टोस्ट, चीज चिली टोस्ट बरोबरही मस्त. किंवा व्हेजी स्टिक्स, ब्रेड स्टिक्ससोबत डिप म्हणूनही छान!

ढोकळा सॅलड
ढोकळा हाताने चुरून घ्या (शिळा असल्यास उत्तम). सिमला मिरची अगदी बारीक चिरून घ्या (फार दाताखाली येता कामा नये). डाळिंबाचे दाणे, बेदाणे आणि भाजलेले तीळ घालून, वरून जिरे-हिंग-कडीपत्त्याची तुपातली फोडणी घालून सगळे एकत्र करून घ्या.
नात्यातले एकजण केटरिंगचा उद्योग करतात, त्यांचा हिट पदार्थ आहे हा.

लग्नाच्या वाढदिवसाला पुण्यातल्या एका प्रसिद्ध oriental restaurant मध्ये जेवायला गेलो होतो. Green papaya salad घेतलं तर ताट भरून कच्च्या पपईचा कीस समोर आला. नावापुरतं मीठ, लिंबू आणि भुरभुर मिरची. सगळं पॅक करून घरी आणलं आणि दुसऱ्या दिवशी फोडणीला टाकून वाफेवरची भाजी केली, सुंदर झाली!

Pages