सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29

येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे! Happy

आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!

तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.

सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाअन

वा! मस्त धागा! मला ही अकु सारखेच - भाजी नसली तरी कोशिंबीर ही हवीच. नविन कुठली पा.कृ. आठवली तर लिहिन.

फारच मस्त धागा.
ह्या माझ्या मावशीच्या पद्धतीच्या २ रेसिपी.
१. मोड काढून १च शिट्टी देवून शिजवलेले मूग + १ मोठी किसलेली/बारीक चिरलेलीकच्ची लसूण पाकळी + किसलेलं गाजर + चिरलेला टोमाटो + किंचित कांदा चिरून + मीठ + मिरपूड + कोथिंबीर + लिंबू रस

२. मोड काढून शिजवलेली चवळी + उकडलेला बटाटा चिरून + कच्ची बारीक चिरलेली सिमला मिरची + दही + मीठ + अगदी किंचित मस्टर्ड पावडर + कोथिंबीर

:दिनेशदांच्या आणि बाकी सर्वांच्या वाहवण्याची वाट पाहाणारी बाहुली:

किसलेली गाजरं, भिजवलेली मुगाची डाळ, बारीक चिरलेली कोथींबीर, मीठ, साखर आणि लिंबाचा रस नीट कालवायचं. त्यावर हिंग, मोहरी, जीरे, आणि हिरव्या मिरचीची फोडणी घालायची.

दिसायला सुंदर, चवीला छान आणि अगदी हेल्दी कोशींबीर होते.

मस्स्स्स्स्त धागा... बरेच वेगवेगळे प्रकार येताहेत. मी नेहमीच्याच करते म्हणुन माझ्याकडे नवीन काही नाही भर घालायला.
दिनेशदा अजुन वाहवले कसे नाहीत (वाहवले असाल म्हणुन आशेने वाचत होते). Happy

चटणी फ्यान क्लबाच्या माहितीसाठी धन्यवाद, सिंड्रेला! खरच माहिती नव्हतं मला! तो पण धागा मस्ताय!

तो फक्त मिरच्यांचा धागा आहे. तिकडे दोडके नकोत.
सॅलड, कोशिंबीर, रायते सगळं एकच. चटणी हा वेगळा प्रकार आहे. फॅन्सना कन्फ्यूज करु नका.

नाही.
करण्याची पद्धत, करण्याचे प्रमाण, वाढण्याची जागा आणि खाण्याचे प्रमाण सगळ्यांत फरक आहे. Happy

वाढण्याची जागा आणि खाण्याचे प्रमाण अत्यंत महत्वाचे Happy

बित्तु, चटणीत मिरच्या वाढवा आणि त्या फॅन क्ल्बात खपवा. इथे जरा मुळुमुळु प्रकार राहु देत कसं Wink

स्लर्प पोट भरल्यावर वाचतेय तरी तोंडाला पाणी सुटलय Proud

मी बर्‍याचदा काकडी+टोमॅटो+लाल्/पांढरा मुळा+मुळ्याची +पालकची+लेट्युसची पानं बारिक चिरुन(ह्यातले जे घरात असतील ते सगळे)+बीटरुट+गाजर्+कांदा+कोबी हे सगळं एकत्र करुन कोशिंबिर करते (बाकी नेहमीचच खोबरं, दाण्याचं कुट, मीठ, साखर, लिंबू आणि वरुन थोड्याश्या तुपाची मिरची घातलेली फोडणी/ नुसतीच बीना फोडणीची मिरची तुकडे केलेली) त्यात असतील घरात तर अनार दाणे

बाकी वर लिहिलेले देसी सॅलड प्रकार आवडतातच.

ललीने एका गटगला आणलेलं कॉन्टीनेंटल सॅलड पण मस्त होतं. लले डिटेल्स टाक प्लीज Happy

अरुंधती ताई , अगदी बाल मैत्रीण भेटल्यावर जसा आनंद होतो तसा हा धागा बघुन आनंद झाला. मस्त.

अजुन एक.. व्हेज कोलस्लॉ सॅलड..

कोबी आणी गाजर.. किसुन घ्यायच त्यात.. मेयॉनीज्..आणी एकदम चिल्ड.. खाय्चं Happy
मी त्यात कोथींबीर /पुदीना/इटालीयन हर्ब्स पन घालते... सहीच लागत...

इथे आफ्रिकेत आम्ही अजूनही कोळसा वापरतो. (नाही नाही गॅस वगैरे सगळे असते, मुबलक मिळतो म्हणून वापरतो.)
तर त्यावरचे काही चटकदार पदार्थ. इथे अननस मस्त मिळतात, खूप गोड असतात. क्वचित एखादा कच्चा आणला जातो. मग तो आम्ही सरळ निखार्‍यावर भाजतो. मग सोलून, कुस्करुन त्यात तिखट आणि कांदा घालून खायचे.

कांदा, अख्खा लसूण, लाल ओल्या मिरच्या, हे सगळे असेच निखार्‍यावर भाजायचे. मग सोलून एकत्र कुस्करायचे. मीठ घालायचे. दुसरे काही लागत नाही घालायला.

अवाकाडो, पपया पण इथे मुबलक. त्याचे तूकडे करायचे, वरुन लिंबू पिळायचा. चिली फ्लेक्स आणि मीठ टाकायचे. बस.

पिकलेल्या केळ्याच्या शिकरणा बरोबर आपले बालपण गेले. मोठेपणी करताना, शिकरणात दही, हिरवी मिरची आणि थोडी मोहरी व मीठ घालायचे (आता त्याला शिकरण नाही ना म्हणता येणार)

खमंग काकडी हा असाच मस्त प्रकार. यासाठी काकडी कोचवूनच घ्यायला पाहिजे. मग त्याला थोडे साजूक तूप लावायचे. मग दाण्याचे कूट, हिरवी मिरची, दही आणि कोथिंबीर, वरुन जिर्‍याची फोडणी, वेळ असेल तर ओले खोबरे.

बुंदिच्या रायत्यासाठी दह्यात आधी कोवळे पडवळ किसून टाकायचे. मिरची मिठाबरोबर ठेचून टाकायची, जिर्‍याची पूड टाकायची आणि आयत्यावेळी बुंदी टाकायच्या.

चिकाळ कैर्‍या कोळश्यावर भाजायच्या, त्याचा गर काढून त्यात फक्त तिखट, मीठ आणि गूळ घालायचा. काजूची बोंडे उकडून घ्यायची आणि त्याचेही असेच रायते करायचे.

भारीच तोंपासू आहे हा धागा!
मला सॅलड वगैरे जेवणाला रिप्लेसमेंट म्हणून पण आवडतं...
पण...

पण...

पण...

जर ते आयतं असेल तर!! Wink

बाकी कोशिंबिरी वगैरे खूप आवडतात. रोज असते को. जेवणात.
आता मलापण सॅलड घरी करायला जमेल!!

जुन्या हितगुज वर टाकली आहे ऑलरेडी, ही माझी आवडती सॅलेड रेसिपी:

मोड आलेल्या मुगाचं सॅलेड :

साहित्य : २ bowl मोड आलेले मूग ( कच्चे )
3/4 th cup किसलेली कोबी
3/4 th cup किसलेले गाजर
एक वाटी डाळींबाचे दाणे
२ tsp भाजलेले तीळ
लिंबाचा रस चवी प्रमाणे
फ़ोडणी साठी : जीरे - कढीपत्ता - मिर्ची - हिंग .
Garnishing साठी : किसलेले पनीर (optional)

किसलेले गाजर आणि किसलेली कोबी मोड आलेल्या मूगा मधे mix करायची .
त्यात वाटीभर सोललेल्या डाळींबाचे दाणे घालायचे .
२ tsp तीळ भाजून ते यात mix करायचे .
मग हिरवी मिर्ची कढी पत्याची फोडणी देउन लिंबू पिळून, चवी पुरतं मीठ घालून mix करायचे .
किसलेले पनीर टाकून गार्निश करा.
मस्त रंगीबेरंगी दिसतं सॅलेड .बहुदा ही recipe कधीतरी कालनिर्णय मधे आली होती .

( लालु,
जुन्या हितगुज वर आहे म्हणून नवा धागा सुरु केला नाही Proud )

अरे वा सही बीबी!

माझ्या सॅलडच्या रेसिपीज - http://vadanikavalgheta.blogspot.com/search/label/Salad-Koshimbir

इथे पण २ रेसिपीज आहेत माझ्या - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93028.html?1145285314

पालेभाज्यांचा खुडा/खुळा

कोसंबरी - पारंपारीक कर्नाटकी कोशिंबीर

ऑरेंज - स्पिनाच सॅलड

मोड आलेल्या मुगाचं सॅलॅड - DJ ला झब्बू! :p
( ही माझी आवडती पद्धत)

मोड आलेले मूग (आवडत असल्यास थोडे शिजवून)
मक्याचे दाणे (शिजवून)
वेगवेगळ्या रंगाच्या (यलो, रेड, ग्रीन, ऑरेंज) बेल पेपर्स
टोमॅटो
कांदा
कोथींबीर
मीठ
लिंबू
चाट मसाला

सगळं एकत्र करून आनंद घ्या .. एकदम हेल्दी! Happy

मोड आलेल्या मुगाचं सॅलड : डिजे, सशलला झब्बू. Happy

एका साऊथ इंडियन मैत्रिणीने सांगितलेली रेसिपी.
मोड आलेले मूग (हवे असल्यास कुकरमध्ये एक शिट्टी करुन चालतील) , फोडणीकरता तेल, हिंग, हळद, मोहरी, कढिपत्ता, लाल सुक्या मिरच्या, ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू वरुन घ्यायला.

अगदी कमी तेलाची फोडणी करुन त्यात हिंग, हळ्द, मोहरी, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून मोड आलेले मूग परतावेत. झाकण घालून चांगली वाफ काढावी. चवीपुअरतं मिठं घालून भरपूर खोबरं, कोथिंबीर घालावी. लिंबू पिळून गरम गरम हाणावं.

मस्तच धागा...
कांद्याची कोवळी पात चिरुन त्यात दाण्याचे कुट्,मिठ,साखर,लिंबु. (मिठा एवजी सैंधव घातले तर अजुन छान) एकत्र करायचे. सुरेख लागते.

फ्लॉवर किसुन वाफवुन त्यात मिरची-मिठ वाटुन, साखर, खोबर, कोथिंबीर आणी लिंबु/दही घालावे.

बत्ताशाची कोशिंबीर- लहान बत्तासे गरम तुपात बुडवुन घ्यायचे. दही फेटुन त्यात सैंधव,चाट मसाला आणी खोबर, कोथिंबीर, मिरची वाटुन लावायचे त्यात वरील बत्तासे घालुन खायचे.
ह्याच दह्यात काकडी खिसुन घातली तर छान लागते.

धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद अकु.

अरे वा छान धागा Happy

माझ्या कडून

दोन तीन उकडलेले बटाटे कुस्करुन , एक अगदी बारीक चकत्या करुन काकडी, एक चकत्या करुन फिश सॉसेज, मायोनेज (किती ते सांगता यायचं नाही पण थोडं) , थोडा स्वीट कॉर्न, मीठ.

हे सगळं चांगलं एकत्र करुन थोडावेळ फ्रिज मधे ठेवुन मग आईस्क्रिम स्क्युप ने वाढायचं.
नोंदः फिश सॉसेजला जरा जास्त वास येतो पण चव गोडसर असते. ते आव्डत असेल तरच करा.

अजुन एक
तीळकुट चार मोठे चमचे, दोन चमचे सोया सॉस, दोन तीन मोठे चमचे जपानीज मिरीन. हे एकत्र करायचे. फार घट्ट वाटले तर अजुन मिरीन घाला. जास्तीचा सोया सॉस हवा असल्यास चव घेऊन मगच घाला.
अर्धवट उकडलेल्या बिन्स, किंवा पालक किंवा ब्रोकोली (एका वेळी एकच भाजी)
वरचे मिश्रण भाजीला सगळीकडे लागेल असे मिक्स करुन थोडावेळ ठेवुन मग खा.

हा प्रकार मात्र सॅलड इतका खुप खाण्याचा नाही. तोंडी लावणे म्हणुन खा.
मिरिन ची चव गोडसर असते.

अरे सहीच आयडियाज आहेत सगळ्यांच्या Happy

दिनेशदा, तुमच्या सफरचंद, लेट्युस, व्हाईटसॉस सॅलॅड मधे डाळिंबाचे दाणे मस्त लागतात. मला अस सॅलेड थोड गोडसरच आवडतं.

इथे असंख्य प्रकारची सॅलॅड ड्रेसिंग्स मिळतात.. आणि लेट्युस्/सॅलॅड्स चे विविध प्रकार... मस्त मस्त कॉम्बोज करुन खाता येतं. मी त्यात टॉमेटो, काकडी, गाजर, बीट, कच्चा कॅप्सीकम (रेड्/ग्रीन), किसलेला कोबी, किसलेल ब्रोकोलीच देठ, अ‍ॅव्हाकाडो वगैरे जे असेल ते घालतेच पण त्याबरोबर कधी कधी मुग, मेथी वगैरेचे स्प्राऊट्स किंवा शिजवलेले छोले, राजमा, लामा वगैरे बीन्स (कधी कॅन्ड, किंवा घरी उसळ/छोले केले तर थोडे काढुन ठेवते दुसर्‍या दिवशीच्या सॅलेड साठी ) घालते.

लेट्युस + पातळ उभा चिरलेला कांदा + टोमेटो च्या फोडी + कॅप्सीकम चे तुकडे + फेटा चीज चे तुकडे + ऑलिव्ह्ज (ऑप्शनल) + रेड वाईन व्हिनेगर + ताजी भरडलेली मिरेपूड आणि चविला मीठ वरतुन थोडे ऑऑ.... आ हा हा:)

अकु, मलाही भाज्या नसतिल तरी चालेल. नुसत्या कोशिंबीरीवर जेवण होईल Happy

टीप्स :

-कुठल्याही सॅलेड वर ड्रेसिंग घालताना ते अगदी सर्व्ह करायच्या आधी घालाव म्हणजे सॅलेडमधले अन्य पदार्थ मऊ पडत नाहीत.. स्पेशली लेट्य्स वगैरे.

-सॅलेड्समधे घालायचे घटक फार बारीक बारीक चिरु नयेत... थोडे चंकी (फा को नको Proud ) ठेवावेत... सॅलॅड जास्तवेळ क्रंची रहात.

Pages