शब्दखेळ (3)

Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users


खडस

अरे देवकी स्पेशल कोडे...
अवांतर : मला काय छान वाटतेय असं नाही म्हणायला >>> Happy मजा येतेय ना?

एक शब्द येत होता तो गेला; आता बाकीचे 'शोधावे लागणारे' आहेत

फक्त एकच अक्षर बदला.

आनंद अंतरकर यांचे रत्नकीळ नावाचे पुस्तक वाचत आहे.त्यात काही लेखकांची व्यक्तीचित्रे आहेत.त्यातील श्री.दा.पानवलकरांनी,सरस्वतीकोश चाळताना दिलेले शब्द (१ ते ४) ह्या कोड्यात आहेत,तर रत्नकीळ हा शब्द अंतरकरांनी पुस्तकासाठी वापरलेला आहे.अतिशय सुरेख लेख आहेत.

१. चार अक्षरी शब्द....घोड्याला जलद चालण्याची इशारत करावयाचे काटेरी चाक.
__ब__ज फारसी/ अरबी उगम

२. चार अक्षरी शब्द.....अस्थिपंजर
मरकाड्या

३. तीन अक्षरी शब्द ......विहीरीव्र्च्या रहाटाचे चाक यावर बसवलेले असते.
____डस

४.पाच अक्षरी शब्द..... धोंड्याच्या जाडीचे थेंब पाडणारा पाउस.
__ळ__ धार

५.चार अक्षरी शब्द.....मूल्यवान गोष्टीचा दिव्य उजेड.
रत्नकीळ

Submitted by देवकी on 20 November, 2020 - 16:19

१. तबरेज
३. तडस
सांभाळून घ्या.

अस्मिता,नाही.
फक्त एकेकच शब्द राहिला आहे.
1 मधील पहिल्या अक्षरावर अनुस्वार आहे.
3. पहिले अक्षर बदल.

हीरा,नाही.

Ha ha, मानव.
धोंड्याच्या जाडीचे थेंब लक्षात ठेवा. धोंड्याला अजून काय म्हणतात?

एकदम बरोबर मानव!

आता 1 आणि 3 फक्त राहिले.उद्या पर्यंत सुटलेले असेलही.

सुप्रभात loks,
राहिलेले 2 शब्द सांगू की थांबूया थोडावेळ?

3. हडस

राहिलेले 2 शब्द सांगू की थांबूया थोडावेळ? >>> प्रयत्न चालू आहेत. पण बहुमताने सांगा असे उत्तर आले तर सांगून टाका. पुढचे कोणाला द्यायचे तर देता येईल.

. चार अक्षरी शब्द....घोड्याला जलद चालण्याची इशारत करावयाचे काटेरी चाक.
__ब__ज फारसी/ अरबी उगम

? बकाज आहे का?

मी थांबतोय.
देवकी, ठरवा तुम्हीच.

१. मंबरेज

३. वडस.......रहाटटाचे चाक या तुळईवर बसवलेले असते.

असो.सर्वांचे आभार! आता लवकरच दुसरे कोडे येऊ द्या.

Pages