शब्दखेळ (3)

Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यासाठी लिहिलं >>>> सरळच लिहायचं ना मग.... >> मग इतरांची मजा निम्मी झाली असती. आणि खर म्हणजे तो तुम्हालाही उलटा क्लू होता. तुमची स्मायली अपेक्षित होती फक्त. Happy

Happy आलं आपल्याला तर लिहून टाकायचं हो बिनधास्त ... तसंही फार लोक नव्हते सोडवत कोडे
जागतिक + वाईट प्रथा म्हटल्यावर तेच एक आठवते लगेच.
आता पुढे निराकरण / प्रबोधन / जागृती याअर्थी काही असावे
पण काय ५ अक्षरे ते सुचत नाहीये. तूरडाळ विशेष अडकलीये.
लिहा तुम्हाला सुचलं तर....

वंशवाद + ५

पूर्ण करा:

अविचाराने
सुधारणांचा
जनतेपेक्षा
निरोपासाठी
तूरडाळीच्या

निरोपासाठी = नि
अविचाराने = रा
सुधारणांचा =धा
तूरडाळीच्या = र
जनतेपेक्षा = न
वंशवादनिराधारन ??

वंशभेदनिराधारन ??
नाही

निराधारन असा मराठी शब्द आहे ?

शब्दाचे रूप असाही विचार करा ....

निराधारन असा शब्द आहे ? >> नाही हो
अविचाराने = वि
निरोपासाठी = रो
सुधारणांचा =धा
तूरडाळीच्या = तू
जनतेपेक्षा = न
वंशवादविरोधातून

ओके, विरोधातून होते का... जनचळवळीचे कारण असेल हे नाही सुचले
जनचळवळीचे परिणाम आठवत बसले.

गूढ चा पहिलाच प्रयत्न.

१. मिथ्याग्रहापुढे वजनदार बोलल्याने सहज संवाद होतो ( ५)

२.

    युद्धामध्ये ऊ व उलटा दात ठेवतो शहाणा ( ६)>>>>>
    समजूतदार

    ३. पुन्हा मार देऊन फिरू (५) >>>> फेरफटका

    ४. स्वादिष्ट खाल्ल्याने सारेच कपाळ ठणकत त्यातून आले (५)

२. युद्धामध्ये ऊ व उलटा दात ठेवतो शहाणा ( ६) ------ समजूतदार
शहाणा = समजदार
युद्ध = समर
त्यात

+
उलटा दात = तदा
सम(ज+ऊ)(तदा)र = समजूतदार (= पुन्हा शहाणाच)

मिथ्याग्रहापुढे -- यातील मिथ्याग्रह कसा घ्यायचाय?
मिथ्या आग्रह = हट्ट दुराग्रह
की
मिथ्या ग्रह = चुकीचा ग्रह (पूर्वग्रहसारखा)

१. * * * भाष
असे बघा
आणि जरा वाढवून देतो

१. मिथ्याग्रहापुढे वजनदार बोलल्याने कुठूनही सहज संवाद होतो ( ५)

Pages