Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देवकी तुम्हीच (आणि इतरांनी)
देवकी तुम्हीच (आणि इतरांनी) सोडवले की मी आपला एक काना दिला बस.
छान
छान
मानी नव्हता माहित;
मानी नव्हता माहित;
दव dew या अर्थी माहित, दव म्हणजे रान नव्हता ओळखीचा
दावानल, वडवानल, दावाग्नि, वणवा सोडून दिले कारण २ अक्षरी नव्हते
बाकी शब्द माहितीतले असूनही नाही आठवले.
गावमुकादमानी बोलीभाषेत वापरात आहे? कोशात नाही मिळाला...
दव - वणवा , अरण्य
दव - वणवा , अरण्य
गावमुकादमानी - शब्दरत्नाकर मधून .
७ अक्षरी शब्द सोडविण्यात ७ जणांचा सहभाग होता हा सुंदर योग !
मानी नव्हता माहित;
मानी नव्हता माहित;
दव dew या अर्थी माहित, दव म्हणजे रान नव्हता ओळखीचा...... +१.
ज्ञानी वरून दिलेल्या क्लूने पुढे मजा आली.
होय, मजा आली
होय, मजा आली
सहज म्हणून..
दव वरून दिवा शब्द आला असेल काय ? दीपपेक्षा जवळ वाटतो !

मी एक छोटेसे कोडे देते.खरंतर
मी एक छोटेसे कोडे देते.खरंतर कॉपी केलेय.
१. चार अक्षरी शब्द....घोड्याला जलद चालण्याची इशारत करावयाचे काटेरी चाक.
__ब__ज
२. चार अक्षरी शब्द.....अस्थिपंजर
म__ __ड्या
३. तीन अक्षरी शब्द ......विहीरीव्र्च्या रहाटाचे चाक यावर बसवलेले असते.
__ड__
४.पाच अक्षरी शब्द..... धोंड्याच्या जाडीचे थेंब पाडणारा पाउस.
__ळ__ धा__
५.चार अक्षरी शब्द.....मूल्यवान गोष्टीचा दिव्य उजेड.
र__ __ ळ
३ गाडगे
३ गाडगे
५ रत्नढाळ
नाही.रहाटाचे चाक यावर बसवलेले
नाही.रहाटाचे चाक यावर बसवलेले
५ रत्नढाळ...... नाही,पण एकदम
५ रत्नढाळ...... नाही,पण एकदम जवळ आलाय.
रत्ननीळ
रत्ननीळ / प्रभा
नाही.फक्त एकच अक्षर दुरुस्त
नाही.फक्त एकच अक्षर दुरुस्त करा.
रत्ननील
रत्ननील
४ हा ६ अक्षरी की ५ ?
४ हा ६ अक्षरी की ५ ?
रत्नकीळ
रत्नकीळ
हीरा, बरोब्बर!
हीरा, बरोब्बर!
रत्नाचा दिव्य उजेड.
४ हा ६ अक्षरी की ५ ?>>>>>> क्षमस्व. ५ अक्षरीच आहे.दुरुस्ती केली आहे.
१. चार अक्षरी शब्द...
१.फारसी/अरबी उगम
४ वळवाधार
४ वळवाधार
2) मरकुड्या मरगुड्या
2) मरकुड्या मरगुड्या मरतुड्या
वळवाधार>>>> नाही.
वळवाधार>>>> नाही.
मरकुड्या मरगुड्या मरतुड्या>>>>> नाही,पण जवळ आलात.एकच शब्द हवा.
मरमड्या
मरमड्या/ गड्या
३ आडगे / गा
३ आडगे / गा
दोन्ही नाही. गाडगे,रहाट
दोन्ही नाही. गाडगे,रहाट याऐवजी ज्यवर दोरी ठेवली जाते त्या सळईचे नाव हवे आहे.
अवांतर : मला काय छान वाटतेय असं नाही म्हणायला
असं नाही म्हणायला >>>
असं नाही म्हणायला >>>
आनंद घ्याच !
३ अडणा
३ अडणा
अडणा नव्हे.
अडणा नव्हे.
१. चार अक्षरी शब्द...
१. चार अक्षरी शब्द....घोड्याला जलद चालण्याची इशारत करावयाचे काटेरी चाक.
__ब__ज फारसी/ अरबी उगम
२. चार अक्षरी शब्द.....अस्थिपंजर
मर __ड्या
३. तीन अक्षरी शब्द ......विहीरीव्र्च्या रहाटाचे चाक यावर बसवलेले असते.
____डस
४.पाच अक्षरी शब्द..... धोंड्याच्या जाडीचे थेंब पाडणारा पाउस.
__ळ__ धार
५.चार अक्षरी शब्द.....मूल्यवान गोष्टीचा दिव्य उजेड.
रत्नकीळ
मरकाड्या
२
मरकाड्या
2 मरतुकड्या
।
मरकाड्या>>. बरोबर डॉक्टर!
मरकाड्या>>. बरोबर डॉक्टर!
Pages