बारीक रवा २ वाट्या
बेसन १ वाटी
साजूक तूप १ वाटी
साखर दोन वाट्या
पाणी (पाकासाठी) एक वाटी
भरपूर केशर आणि वेलची
तूपावर रवा भाजून घ्या खमंग ..
मग त्यातच बेसन घालून भाजा, खमंग, हाताला अगदी हलकं लागेल, रंगही बदामी यायला हवा ..
भाजून झाल्यावर हीट बंद करा ..
मग दुसर्या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करा ..
पाक झाला की तो रवा-बेसन मिश्रणात घाला, बरोबर केशर आणि वेलची पूड घाला ..
हे मिश्रण जसजसं गार होईल तसतसं आळत(?) जातं .. संपूर्ण गार झालं की लाडू वळा .. वळताना एक केशराची काडी लावा .. असं केलं तर फार सुंदर दिसतात लाडू ..
सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ..
ह्याच पाकाला काकू शेपूट येणारा पाक म्हणते म्हणजे चमच्याने पाक टेस्ट केला की तो भांड्यात पडताना शेपूट येतं ..
ह्या रेसिपीने माझे लाडू आतापर्यंत कधीही फसलेले नाहीत, काकूने रेसिपी देताना फसणार नाहीत अशी ग्वाही दिली होती ..
कालच केले आहेत. मस्त झालेत!!!
कालच केले आहेत. मस्त झालेत!!! इथे फोटो कसा टाकु??
पाक गरम अस ताना बेसन टाकावे
पाक गरम अस ताना बेसन टाकावे का ?
१ वआति तुपात दोनि भाजाय्चे का
१ वआति तुपात दोनि भाजाय्चे का
छान पाककृती ! आजच केले छान
छान पाककृती !
आजच केले छान झाले. इथे फोटो कसा टाकायचा?
(No subject)
मस्त!
मस्त!
जुना तूपाचा स्टॉक संपवला!
जुना तूपाचा स्टॉक संपवला!
सगळं जुळून आलं तर फार मस्त
सगळं जुळून आलं तर फार मस्त
लागतात हे लाडू ->>> बघायला पाहिजे जुळून येतात की नाही
सशल, थँक्यु, पर्फेक्ट रेसिपी
सशल, थँक्यु! पर्फेक्ट रेसिपी आहे हि.
तूप कढवल्यावर खाली राहिलेली बेरी पण घातली मी लाडवाच्या भाजलेल्या मिश्रणात. तूप कमी घेतलं ( निम्मं), बाकी सेम तू दिलेलं प्रमाण.
रंग थोडा डार्क शेड मध्ये आला बेरी घातल्याने, पण चवीला फार छान झालेत लाडू!
हा फोटो
माझे चवीला खूप मस्त झालेत
माझे चवीला खूप मस्त झालेत
पण पाक कमी झालाय बहुतेक,कोरड पडलं होत मिश्रण
तरी पण मी त्यात परत पाक करून घातलाय आता बघू काय होतंय नैतर दुधाचा हात आहेच
पण माझे बरेच प्रकार एका झटक्यात भारी होत नाही,माकाचू च जास्त होतात,पण तरी इथल्या बाकीच्या मा पण काचू पोस्ट बघितल्या की बळ मिळतं,की नै बै सगळ्या सुगरणी नसतात,माझ्या बोटीत पण खूप आहेत
अरे मी पाक वाढवला तर जास्तच
अरे मी पाक वाढवला तर जास्तच मऊ झाले, आणि खडे पण झाले आहेत थोडे
काय करू आता
मी मिश्रण मिक्सर मधून फिरवलं आहे,खडे गायब ,मस्त मऊ टेक्चर आलंय
फक्त आता लाडू वळता येतात का बघू ,त्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलं आहे सध्या
हुर्रे जमले।,मस्त झाले एकदम
वरचे माकाचू प्रतिसाद काढून टाकत नाही,एखादी माझ्यासारखी असेल तर होईल उपयोग
वळताना एक केशराची काडी लावा .
वळताना एक केशराची काडी लावा .. >>> हे असं काही करणार्यांना सलाम! बेसनलाडवाला वरुन एक बेदाणा लावणे पण मला कठीण जाते.त्यमुळे मी तसा कधीच प्रयत्न केला नाही आणि इथे तर १ केशराची काडी लावायची आहे!
IMG_20200713_170715.jpg (61
<
(No subject)
मीपुणेकर आणि आदु सुरेख
मीपुणेकर आणि आदु सुरेख दिसताहेत लाडू. मीही करून बघणार आहे आता.
सगळ्यांचे लाडू भारी दिसताहेत!
सगळ्यांचे लाडू भारी दिसताहेत!
जनहितार्थ धागा वर आणत आहे.
जनहितार्थ धागा वर आणत आहे.
दिवाळी फराळाची सुरवात सशलच्या या नो फेल रवा बेसन लाडूने झाली. या वेळी दुप्पट प्रमाणात केले लाडू.
तुपाची बेरी घालून रवा बेसन लाडू या आधी केले होते ती खरपूस चव जास्त आवडली.
हे या वेळचे रवा बेसन लाडू
विनापाकाचे rava लाडू.1 kilo
विनापाकाचे rava लाडू.1 kilo रव्याला 1 वाटी कणिक भाजून घातली.फोटोवर जाऊ नका.फोटो यथा तथा आहे पण लाडू तसे नाहीत.
फराळ तर मागवला पण “सशल“ची
फराळ तर मागवला पण “सशल“ची आठवण झाली
आज मी केले रवा बेसन लाडू. याच
आज मी केले रवा बेसन लाडू. याच प्रमाणाने केले. पाक वगैरे व्यवस्थित जमला. ४-५ तास लागले मिश्रण आळायला. लाडू चांगले बांधले गेले.
पण साखर थोडी जास्त वाटली मला. फार गोड झालेत.
पुढच्या वेळी करताना दीडच वाटी घालून पाहावी म्हणते. त्याने पाकावर आणि मिश्रणाच्या कन्सिसटंसीवर काही परिणाम होईल का?
मी काल तुमच्या पद्धतीने करून
मी काल तुमच्या पद्धतीने करून पाहिले लाडू. चव टेक्चर मस्त झाले एकदम. फक्त झालं काय. जरा उशीरा करायला घेतले. त्यामुळे रात्री लाडू वळत बसायचा कंटाळा आल्याने तसेच पाकात मिश्रण मुरवत ठेवून दिले. म्हटलं छान आळेल. तर आज सकाळी एक मोठा अभेद्य खडक झाला होता त्याचा. रडुच यायला लागलं माकाचु वर जावे काय वाटू लागले. म्हटलं सगळी मेहेनत गेली की काय वाया!
पण शांत डोक्याने विचार केला की गॅसच्या मंद आचेवर पातेलं थोडावेळ ठेवलं. वरून थोडं कोमट दुध शिंपडलं. झाकण ठेवून दिलं. ५ -७ मिनिटाने त्या खडकाला पाझर फुटला चमच्याने टणाटण प्रहार करत तो खडक फोड्ला. आता बर्यापैकी चमचा घुसणेबल मिश्रण व्हायला लागलं आणी जीव पातेल्यात पडला मग वळणे वगैरे सोपस्कार नीट पार पडले. अशी ही लाडवांची कहाणी सुफळ संपूर्ण!
सुंदर झालेत. दगडातही देव आहे
सुंदर झालेत. दगडातही देव आहे गं
(No subject)
मी पण या पद्धतीने केले.
मी पण या पद्धतीने केले. धन्यवाद. चांगले झाले. अर्ध्या/ पाऊण तासातच वळायला लागले. शेवटच्या 5/ 6 लाडवाना मात्र दुधाचा हबका मारायला लागला थोडा भगरा झाल्याने.
src="/files/u69959/20201113
माझ्या लाडवाची पाककृती सशल आणि अंजली_१२ दोघींची मिळून आहे.
छान झालेत ssj !!
छान झालेत ssj !!
लाडू भारी दिसत आहेत.
लाडू भारी दिसत आहेत.
मी केले होते तेव्हा दगड झालेला. बत्त्याने फोडला. पण खाताना विरघळत होता. मग अजून नवे प्रयोग नाही केले. चॅाकलेटचे जसे ओबडधोबड तुकडे खायला चालतात तसेच रवाबेसनाचे तुकडे चालवून घ्या असे सांगून संपवले.
अशा वेळी तो अभेद्य खडक डब्यात
अशा वेळी तो अभेद्य खडक डब्यात घालून घट्ट झाकण लावून कुकर मध्ये ठेवायचा आणि २-३ शिट्या य़ेऊ द्यायच्या (कुकरच्या). कुकर थंड झाला की आत पाणी न पडू देता डबा उघडायचा आणि लाडू वळायचे. अजूनही घट्ट वाटल्यास दुधाचा शिपका मारायचा. हे सगळे माकाचु वरूनच आलेले अनुभव आहेत. असे चुकून मग सुधारलेले लाडू खाऊन जेव्हा लोक रेसिप्या विचारतात तेव्हा काय सांगावं असा प्रश्न पडतो. आधी चुकवायचे आणि मग सुधारायचे…
तुप थिजत आणि साखरेने घट्ट होत
तुप थिजत आणि साखरेने घट्ट होत मिश्रण अशावेळेस मायक्रोव्हेव्ह मधे ठेवुन ३०सेकन्द गरम करायच, कोरड वाटलच तर दुधाचा शिपका द्य्यायचा .
रवा बेसन भाजताना केशर घातले
रवा बेसन भाजताना केशर घातले की चांगला रंग येतो लाडवाला ही जुन्या पुस्तकात सापडलेली टीप.
अशा वेळी तो अभेद्य खडक डब्यात घालून घट्ट झाकण लावून कुकर मध्ये ठेवायचा >>>>>>>>>> पुढच्या वेळी चुकू नये हीच इच्छा! पण झालंच असं तर लक्षात ठेवेन.
Pages