शब्दखेळ (3)

Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पानीपत ?
(टांग / लाथ मारून पाणी काढणे या अर्थी पाणी

दाणादाण;
धूळदाण >> नाही. क्लू नीट वाचा.
टांग मारून लोण चढवा, तरीही सपशेल पराभव.
दिल्लीची मुंबईसमोर धूळधाण झाली, पानिपत झाले, दिल्ली चीतपट झाली. म्हणजे दिल्लीने काय केले. Happy

यात कुमार वादग्रस्त गीत गातात. राग्गाउ नका बर का.>> तूष्टता /रुष्टता (ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी)
पण शब्द किती अक्षरी हवा आहे

तूष्टता /रुष्टता >> नाही

क्लू. : इथे आई पण हात जोडते.
हा अजून एक क्लू अजून एका शब्दा साठी आहे.

दिल्लीने मुंबईपुढे सपशेल लोटांगण घातले.

क्लू. : इथे आई पण हात जोडते. (६)
पण हे त्यांचे आडनाव नाही हो. Happy

करमरकर ... उगाच आपले !

करवीरकर
कोल्हापूरची देवी आई या अर्थाने

विक्रम
तुमचे एक शेवटचे राहिलेले सांगून टाकता काय ?
म्हणजे अन्य कोणाला नवीन देता येईल.

अजून एक नविन शब्द : यात कुमार वाग्रस्त गीत गातात. राग्गाउ नका बर का. Happy
राग्गाउ राग गाउ
उत्तर - मारवा

छान होते.
मारवा मनात होते पण जुळवता नाही आले.

७ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)

२३ पुल्लिंगी पकडतो तर स्त्रीलिंगी आग्रही.
२४ याने स्फोटक ठासायाचे

६७ जगण्यासाठी करावा लागतो
५२ यातून पाणी सहज सरकले

६५४ याच्यासाठी ५ तरी स्वर हवेत.

१२३४५६७ अव्यवस्थित कारकुनी

23 गळ ?

Pages