अज्ञातवासी - भाग ८ - अपहरण!

Submitted by अज्ञातवासी on 5 November, 2020 - 13:33

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

पात्र परिचय -
https://www.maayboli.com/node/77179

भाग ७ https://www.maayboli.com/node/77171

भाग ६
https://www.maayboli.com/node/77161

भाग ५
https://www.maayboli.com/node/77156

भाग ४
https://www.maayboli.com/node/77152

भाग ३
https://www.maayboli.com/node/77137

भाग २
https://www.maayboli.com/node/77129

भाग १
https://www.maayboli.com/node/77125

मुंबईच्या एका हॉटेलात बरेचजण बसले होते.
"जाधव साहेब, बऱ्याच दिवसांनी."
"काय करणार नाशिकमधून पळावं लागलं."
"ऐकलं आम्हीही, इब्राहिम आता नाशिक चालवतोय म्हणे."
"हो!"
"मग जाधव साहेब, तुमचं काय आता?" एकजण हसला.
"बघू. सध्यातरी नाशिकच्या बाहेरच राहिलेलं चांगलं. बाकी, काय चाललंय अजून."
"काही नाही साहेब. थंड पडलंय सगळं. शेलरांना सांगा, मालाची तजवीज करायला."
"थंड काय, इब्राहिमने घरोघर मशीनगन वाटल्यात. तुम्ही तर तेजीत असाल..."
"मशीनगन?" समोरचा चक्रावला.
"का? काय झालं?"
"साहेब, गेल्या सहा महिन्यात एकही मशीनगन नाशिकला गेलेली नाही!"
जाधव पूर्णपणे चक्रावला.
◆◆◆◆◆
"दादा, लोक खोटं बोलणार नाही."
"माहितीये शेखावत. पण मशीनगन येतायेत कुठून?"
"दादा मुंबईशिवाय पर्याय नाही."
"नाही शेखावत. मागे तुसुद्धा मशीनगन बनवायचा प्रयत्न केला होता. थोड्यावरून प्रकरण बारगळलं. आठवतंय?"
"हो दादा, थोडक्यात राहिलं ते. खलील आणि मी कितीतरी रात्री घालवल्यात..."
"खलील???"
"दादा???"
"खलील कुठे आहे?"
"वर्षभरापूर्वीच रिटायर झालाय."
"राहतो कुठे?"
"इथेच, नाशकातच. खुप हुशार माणूस दादा. रशियन लोकांना जश्या बंदुका बनवता येणार नाही, तशा खलीलने बनवल्या."
"...आणि मशीनगनही बनवली."
"काय दादा??"
"शेखावत, मशीनगनही बनवली. तुझा अर्धवट प्रयोग त्याने पूर्ण केला. शोधून काढ हा खलील. मला भेटायचंय त्याला."
शेखावत आता पूर्णपणे हादरला होता.
★★★★★
रंगीत गल्ल्या, रंगीत रात्र.
हवेलीही मोठी रंगीत. रंगीत मंद दिवे, रंगीत गालिचे, रंगीत झुंबर व रंगीत वातावरण!
"काय दादासाहेब हा शौक असेल तुम्हाला असं वाटलं नव्हतं."
"डिसुझा, तू मूर्ख आहेस. काही कामाशिवाय दादासाहेब अश्या गल्लीत येतील का?" सायखेडकर ओरडलाच.
"सायखेडकर, डिसुझा, सरळ हवेलीत घुसा. जो धिंगाणा घालायचा तो घाला. मात्र कामाशिवाय बाहेर पडू नका."
"दादासाहेब हे काय सांगतायेत तुम्ही? अहो असलं काही आम्ही करत नाही."
"मध्ये जाऊन काहीही करू नका. फक्त जाऊन लक्ष ठेवा. सावज आलं तर त्याला हवेलीबाहेर घेरायचय, लक्षात असू द्या."
दोघेही नाईलाजाने चालते झाले.
★★★★★
"तुम्ही हवेलीत न जाता इकडं?"
"का तुला धंदा नकोय."
"नाही म्हणजे, तालेवार दिसतायत."
त्याने नोटांची गड्डी तिच्यासमोर टाकली.
"गपचूप झोपून राहा."
गड्डी बघून तिचे डोळे विस्फारले.
"तुम्ही काहिबी करणार नाहीत?"
"नाही, पण आवाज करू नको..."
तिने पटकन नोटा उचलल्या, व ती आतल्या खोलीत निघून गेली.
★★★★
खिडकीतून जवळच हवेली दिसत होती. हवेलीजवळ एक कॉन्टेसा थांबली. तिच्यातून काही जण खाली उतरले.
आणि त्यांच्यामागोमाग एक उंच माणूस!
"इब्राहिम!" दादासाहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
★★★★
"आपको कुछ करनेका नही था तो आये क्यू इधर? उधर खिडकीमै बैठे है कबसे..."
एक बाई सायखेडकरवर करवादत होती.
तिकडे डीसुझाचीही तीच परिस्थिती होती. मात्र अजूनही त्याचीही नजर खिडकीबाहेरच होती.
...मात्र आता इब्राहिमला बघून त्यांचे डोळे लकाकले.
◆◆◆◆◆
खिडकीतून एक मंद झुळूक आत आली, आणि दादासाहेबांच अंग थरारलं.
त्यांनी खिडकीतून नेम धरला. नेम अवघड होता. सावज अजूनही टप्प्यात नव्हतं, मात्र वेळ कमी होता...
एक दीर्घ श्वास घेऊन त्यांनी लागोपाठ चार गोळ्या चालवल्या.
नेम अचूक लागला...
◆◆◆◆◆
जुलैला अख्तर, हवेलीची मालकीण.
जुलैलाने भल्याभल्याना घायळ केलं होतं, आणि जुलैलाला इब्राहिमने...
इब्राहिमच्या प्रेमात तिने तरुणपणातच धंदा सोडला. मात्र हवेली ताब्यात घेतली.
आज जुलैला इब्राहिमच्या कुशीत विसावली होती.
"जुलैला, साहिर ठीक आहे ना?"
"तुमचाच लडका आहे इब्राहिमसाब, ठीकच राहणार."
"हमारा लडका...आने मत देना उसको वापीस. स्कुल चांगलं आहे ना हैद्राबादचं."
"सगळ्यात टॉपचं स्कुल आहे. अफसर बनके निकलेगा."
"तेच पाहिजे. माझ्या धंद्याची सावली नको त्याच्यावर."
"आप तो अभी नासिकके बादशाह है!"
"पता नही. पर आज तुम इस बादशाह की राणी हो."
...आणि त्याने जुलैलाला घट्ट कवटाळलं.
★★★★★
मध्यरात्री इब्राहिम खाली उतरला. जुलैला खिडकीतून त्याच्याकडे बघत होते.
सायखेडकर आणि डिसुझा केव्हाच खाली अली होते, आणि जवळच अंधारात दबा धरून बसले होते.
...निवांतपणे इब्राहिम खाली उतरला, मात्र पुढच्याच क्षणी त्याची माणसे तिथे नसलेली पाहून तो सावध झाला.
"जुलैला धोका हुवा है," तो ओरडला.
...त्याक्षणी त्याला बंदुकीची नळी मागून टोचली...
"गप्प बस, आणि गप्प चल."
इब्राहिम शहारला...
क्षणभर बंदूक बाजूला गेल्याची त्याला जाणीव झाली...
तो उलट फिरणार तेवढ्यात त्याच्या डोक्यात बंदुकीच्या दस्त्याचा सणसणीत प्रहार झाला...
...इब्राहिम जागीच कोसळला...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लिखाण. एखादा चित्रपट पाहतोय असेच वाटले. तुमची हि कथा बॉलीवूड मध्ये चित्रपट म्हणून नक्कीच चालेल

@प्रवीणजी - धन्यवाद!
@उनाडटप्पू - धन्यवाद!
@रुपालिजी - धन्यवाद!
@मृणाली - धन्यवाद!
@क्रांती - धन्यवाद!
@आसा - धन्यवाद!
@सुखदा - धन्यवाद!

पुढील भाग टाकला आहे.