खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा आता करून दाखवायचे !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 October, 2020 - 05:05

दसर्‍याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्‍यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.

गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.

मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.

अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !

बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग ऋन्मेष तू आर्यन खान किंवा अबराम जोशी किंवा शाहरूख स्वप्नील खान-जोशी अशी भारी नावे घेऊ शकतोस.
>>>>>

नाव भारी वगैरे काही नसते. त्या व्यक्ती भारी आहेत. त्या आवडत्या आहेत. त्यांचा आदर्श जरूर ठेवावा. नाव आपल्या आवडीचे, सोपे, सुटसुटीत, बोलायला गंमत वाटेल असे ठेवावे.

अरे असे कसे? शाहरूख स्वप्नील देव आहेत ना तुझे... आवडत्या देवावरून गणेश, गोविंद, शिवा, सरस्वती, पार्वती अशी नावे ठेवायची परंपराच आहे आपली. ऋन्मेष अबराम खान असे नाव शोभेल तुला.
नाही तर 'लोका सांगे देवपुराण आणि आपण मात्र कोरडे पाषाण' असा प्रकार दिसतो आहे तुझ्या बाबतीत.

हायझेनबर्ग तुमचा माझ्याबाबतचा अभ्यास कमी पडत आहे.
आणि याची मलाच लाज वाटतेय, कारण मी कुठेतरी कमी पडतोय अजूनही जर माझ्याबद्दलच्या ईतक्या बेसिक गोष्टी अजूनही जुन्याजाणत्या सक्रिय माबोकरांना माहीत नसतील तर Sad

असो,

१) मुळातच मी नास्तिक आहे. देव मानत नाही. मग तो दगडातला असो, वा व्यक्तीतील असो, वा निराकार असो.

२) मी शाहरूखचा चाहता आहे, भक्त नाही - हे आपण खालील धाग्यात पाहू शकता.
जर काही संशय असेल तर वर देखील काढू शकता. आपले तिथे स्वागत आहे Happy

https://www.maayboli.com/node/66805
भक्त आणि चाहते !

माझ्या फार आवडीचा विषय आहे हा.. नोट करून ठेवतो, यावर वेगळा धागा काढतो Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 31 October, 2020 >> नक्की काढा नवा धागा. आजकाल जास्त अंतराने येतात तुमचे धागे. वयोमानामुळे असं होत असावं.

कशासाठी स्त्रीपुरुष समानता?
अजूनही अन्नुतरीत प्रश्न..
आंब्याच्या झाडाला आंबेच येणार कितीही प्रयत्न केला तरी संत्री लागणार नाहीत.जगात आंबा पण पाहिजे आणि संत्री पण पाहिजे.. जर तुम्ही आंब्याला संत्र्यासारखे बनवायला जाल तर त्या आंब्याचा खरेपणा हरवून जाल आणि सेम फॉर वाईस वर्सा..मग का निसर्गाच्या विरोधात जाऊन उगीच स्त्रीपुरुष समानतेचा धोशा लावायचा??
याने साध्य काहीच होणार नाही पण कॉम्प्लीकेशन्स नक्कीच वाढतील..
Inequality sits in our minds and doesn't exit in real. Just by seeing one or two examples don't assume that world is unequal and don't try to change the nature. Nature is very beautiful and creation of each and every living part is have its own uniqueness and that uniqueness is require to balance the nature.
We know that world is changed a lot and it is assumed that money is topmost priority but the real thing is peace.
The families who feel the money is topmost priority, the inequalities rise in such families.
As a thumbrule men and women support each other as a path of peacefull life and add value to the society.
The supporting and peaceloving families only can give good next generation to the society.

आंब्याच्या झाडाला आंबेच येणार कितीही प्रयत्न केला तरी संत्री लागणार नाहीत.
>>
Seriously?
Will like to write on your reply mrunalini.
Let me see how much bandwidth i get today.

का निसर्गाच्या विरोधात जाऊन उगीच स्त्रीपुरुष समानतेचा धोशा लावायचा??किती दुटप्पी वाक्य Rofl

निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे पुरुषांनी गर्भधारणा करून मुले जन्माला घालावी असा इथे अट्टहास आहे असा आपला समज झाला आहे का??
की उगाचच प्रतिसाद वाढवायला म्हणून हे वाक्य Lol

मी पाच मिनिटे वेड्यासारखी हसतेय! इथे लिहायचं नाही ठरवलं होतं पण मृणाली तुम्हाला थँक्यू म्हणायचंय! इतकं हसवल्याबद्दल!
त्या आंबे आणि संत्र्यामध्ये बायका आंबे की संत्री हे पण सांगून टाका! या रूलप्रमाणे बायकांना मुली आणि पुरूषांना मुले व्हायला हवीत नाही का? इतकं बेसिक मध्ये गंडलेलं लॉजिक वाचनात आलं नव्हतं या आधी! हाहाहा can't stop laughing!

जाऊ दे ना, एवढ्यावर निपटलं हे काय कमी नशीब आपलं... नायतर "कशाला निसर्गाच्या विरोधात जाऊन कपडे घालायचा धोशा लावायचा" म्हणायचं कुणी नि झावळ्या लावून झूम मिटींगला यायचे.... Wink Biggrin

ओके मृणाली, आंबा संत्र ह्या झाडांच्या वेगवेगळ्या genus-species उर्फ जाती आहेत. ते समान नाही. स्त्री-पुरूष हे दोघे मनुष्य जातीत Homo sapiens मध्ये येतात. त्यामुळे समानतेचा धोशा लावायला बायोलॉजिकल बेसिस शोधत असशील तर तो आहे. तो शास्त्रीय आधार मान्य करायचा का नाही हे स्वातंत्र्य तुला आहे. आग्रह नाही. Happy
फक्त लैंगिक बाबीत स्त्री-पुरूष वेगळे आहेत म्हणून इतर बाबीत (सामाजिक, आर्थिक इ) त्यांना वेगळे ठेवावे असे मत आहे काय? नक्की काय म्हणायचे होते?????

स्त्री आणि पुरुष ह्यांची भावनिक,शारीरिक,मानसिक रचना निसर्गतःच वेगळी असते.अगदी लैंगिक भावना पण वेगळ्या असतात.शारीरिक क्षमता पण वेगळ्या असतात.
हे शास्त्रीय दृष्टी नी सुद्धा बरोबर आहे.

पूर्वी स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना शिक्षण नव्हते. त्यामुळे ठराविक कामे वगळता स्त्रियांना नोकऱ्या मिळणेही शक्य नव्हते आणि करूही देत नव्हते. सती प्रथा होती नंतर, विधवा स्त्रीने केशवपन करणे पांढरी साडी नेसणे वगैरे प्रकार होते, ती दुसरे लग्न करू शकत नव्हती. घरच्या संपत्तीत स्त्रियांना वाटा नव्हता. वगैरे वगैरे.
या सर्वात स्त्री पुरुष असमानता नव्हती असं तुम्हाला वाटतं का? की तेव्हाही " As thumbrule men and women were supporting each other as a path of peacefull life and were adding value to the society." सो तेव्हा जे काही होतं त्यावेळी योग्य होतं असं वाटतं?

जर असमानता होती असं वाटत असेल, तर मग हळूहळू बदल होत गेले आणि आज आपण एका टप्प्यावर आहोत.
हे बदल घडत असताना नेमक्या कुठल्या टप्प्यावर ती स्त्री-पुरुष असमानता संपली आणि फक्त जे काही नैसर्गिक फरक आहेत असं म्हणता ते राहिलेत असं तुम्हाला वाटतं?

निसर्गत: (निसर्गतःच, मुलांना वाढवताना जे शिकवले त्यामुळे झालेले नव्हे) नेमके काय फरक आहेत स्त्री आणि पुरुषांंच्या जीवनातील कर्तव्यांमध्ये, क्षमतेमध्ये, स्किल्समध्ये म्हणजे आपण ही कामे/कर्तव्ये स्त्रियांची, ही पुरुषांची, ही दोघांचीही असे म्हणु शकतो?

आणि फक्त जे काही नैसर्गिक फरक आहेत असं म्हणता ते राहिलेत असं तुम्हाला वाटतं?
>>>>

मला वाटते त्यांना त्या नैसर्गिक फरकाबद्दलच भाष्य करायचे असावे.
पण त्यांची पोस्ट वाचताच विपर्यास करायची चढाओढ ईथे लागणार याची कल्पना मला आलेली.

असो,
पण हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
नैसर्गिक फरकामुळे जी सो कॉलड असमानता कायम राहणार त्यात काय काय येऊ शकते?
यावर चर्चा व्हायला हवी.
कारण बरेचदा तो निसर्गाने केलेला भेद आणि त्या अनुषंगाने जीवनशैलीत होणारे फरकही स्त्री पुरुष समानतेच्या सदराखाली अमान्य केले जातात.

मी विपर्यास केला नाही, त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्या अनुषंगाने प्रश्न विचारले आहेत.

Inequality sits in our minds and doesn't exit in real( इन रिअ‍ॅलिटी पाहिजे)
Just by seeing one or two examples don't assume that द world is unequal and don't try to change the nature. असे कोणीच म्हणत नाही. आहोत तसेच प्रत्येक स्त्रीला अ‍ॅक्सेप्ट करा व तिला तिच्या मनासारखे जगायचा चॉइस किंवा हक्क प्रत्यक्षात आणायला पाहिजे.

Nature is very beautiful and creation of each and every living part is have ( हॅज पाहिजे इज हॅव हे चुकीचे आहे)
its own uniqueness.and that uniqueness is required to balanced बॅलन्स the द नाही पाहिजे nature. म्हण्जे सर्व प्राणि उत्क्रांती वगैरे का निसर्ग आपल्या गतीने चालतोच आहे. सर्व प्राणी आपापल्या माद्यांना छान वागवतात. माणसातच गंडलं आहे कारण
पॅट्रा र्कि अल बिलीफ आणी मी सुपीरेअर आहे असे अगदी ऑर्डिनरी बाप्याला पण वाट्त असते. कशाच्या तरी जोरावर. त्याची काही गरज नाही गैरसमज डोक्यात बसवले गेले आहेत.

We know that world is ( हॅज पाहिजे) changed a lot and it is assumed that money is topmost priority but the real thing is peace. पीस कसली डोमेस्टिक का युद्धे नसल्याने होणा री पीस. ग्लोबल पीस. वगैरे? नक्की कहना क्या चाहती हो.

The families who feel the money is topmost priority, the inequalities rise in such families. हे स्वीपिन्ग जनरलायझेशन आहे वरच्या धाग्यातल्या केस मध्ये तर त्यांची मनी ही प्रायोरिटी नाही. पण इनिक्वालिटी आहे नं . आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणायला पैसे लागतात. नाही तर आहेच ह्यांच्या क्रेडिट कार्डेने शॉपिन्ग. मला जगायला लागणारा पैसा मी मिळवला तर काय प्रॉब्लेम आहे? प्ल्स माझे नवर्‍यावर प्रेम पण आहे. सो!

As अ thumbrule men and women support each other as a path of peacefull life and add value to the society. वाक्य पूर्ण गंडले आहे. सिंगल ब्रम्हचारी लोक आता देशाच्या उच्च पदावर आहेत. व खूप मोठे योग दान देत आहेत समाजाला.
The supporting and peaceloving families only can give good next generation to the society. प्रचंड स्वीपिन्ग जनरलायझेशन.

मी विपर्यास केला नाही, त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्या अनुषंगाने प्रश्न विचारले आहेत.
>>>>>

हो नक्कीच आपण करत नव्हता. ईतर काही पोस्टमध्ये तसे वाटले. आणि विपर्यास करून पुढे गेलेली चर्चा डोक्यावर जाऊन आदळते. म्हणून तर आपल्या पोस्टमधील योग्य ते वाक्य कोट केले आणि चर्चेला दिशा दिली...

सध्या ऑफिसमध्ये आहे. मिटींग चालू होईल एक महत्वाची लवकरच. रात्री सविस्तर लिहेन. त्याआधी ईतर पोस्ट वाचण्यातही मजा आहे Happy

मी विपर्यास केला नाही, त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्या अनुषंगाने प्रश्न विचारले आहेत.
>>>>>

हो नक्कीच आपण करत नव्हता. ईतर काही पोस्टमध्ये तसे वाटले. आणि विपर्यास करून पुढे गेलेली चर्चा डोक्यावर जाऊन आदळते. म्हणून तर आपल्या पोस्टमधील योग्य ते वाक्य कोट केले आणि चर्चेला दिशा दिली...

सध्या ऑफिसमध्ये आहे. मिटींग चालू होईल एक महत्वाची लवकरच. रात्री सविस्तर लिहेन. त्याआधी ईतर पोस्ट वाचण्यातही मजा आहे Happy

>>कशासाठी स्त्रीपुरुष समानता?
अजूनही अन्नुतरीत प्रश्न..
आंब्याच्या झाडाला आंबेच येणार कितीही प्रयत्न केला तरी संत्री लागणार नाहीत.जगात आंबा पण पाहिजे आणि संत्री पण पाहिजे.. जर तुम्ही आंब्याला संत्र्यासारखे बनवायला जाल तर त्या आंब्याचा खरेपणा हरवून जाल आणि सेम फॉर वाईस वर्सा..मग का निसर्गाच्या विरोधात जाऊन उगीच स्त्रीपुरुष समानतेचा धोशा लावायचा??
याने साध्य काहीच होणार नाही पण कॉम्प्लीकेशन्स नक्कीच वाढतील..>>
गल्लत होत आहे. आंबा आणि संत्र या झाडांच्या दोन जाती झाल्या. माणूस ही प्रजाती आणि त्यात स्त्री, पुरुष, .. हे लिंग . झाड म्हणून तुलना करायची झाली तर Dioecious झाडांप्रमाणे. पर्सिमोन किंवा गिंकोच्या झाडात जसे मेल झाड आणि फिमेल झाड असते तसे.

Inequality sits in our minds and doesn't exit in real. Just by seeing one or two examples don't assume that world is unequal and don't try to change the nature. Nature is very beautiful and creation of each and every living part is have its own uniqueness and that uniqueness is require to balance the nature>>
असमानता मनात असते असे तुम्हीच लिहित आहात. तर ती मनातली असमानता दूर नको का व्हायला ? निसर्ग सुंदरच असतो पण मानवी समाजात लिंग, वंश, धर्म, जात, भाषा, प्रांत वगैरे अनेक घटकांवर आधारित भेदभाव चालतो, तो काही नैसर्गिक नाही. तो मानवाने निर्माण केलेला आहे. आणि तो दूर करायलाच हवा.
इथे आपण लिंगावर आधारित भेदभावाबद्द्ल बोलत आहोत. इथे समानता म्हणजे जीवशास्त्रीय दृष्ट्या जे वेगळेपण आहे ते नाकारणे नव्हे तर ते वेगळेपण मान्य करुन प्रत्येकाला एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या पूर्ण कुवतीनुसार जे संभाव्य स्थान आहे तिथे पोहोचता येणे. त्यात केवळ स्त्री /पुरुष/ तिसरा पर्याय आहे म्हणून अडथळे उभे केले जात असतील तर ते दूर करणे, जीवशास्त्रीय भेदामुळे जर अडथळा निर्माण होत असेल तर आधारचे जाळे उपलब्ध करुन तो कमी करणे.
>>We know that world is changed a lot and it is assumed that money is topmost priority but the real thing is peace.>>
ही जी peace आहे ती काही फुकट मिळत नाही. त्याचे ही मूल्य आहे. तुमच्या आयुष्यावर तुमचा काहीही अधिकार नाही कारण तुम्ही स्त्री /पुरुष्/तिसरा पर्याय आहात, अशा परीस्थितीत peace कुठे आहे? पैसा, सत्ता ही चलनी नाणी काही आजची नाहीत ती पूर्वीही होतीच. त्याच्या जोरावर जुलूम हा देखील नवा नाही. जसे अहिंसा हे शस्त्र दुबळ्यांचे नाही तसेच ही peace देखील मिळवायला सबल असणे गरजेचे. एक व्यक्ती म्हणून पैसा किती महत्वाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे, मात्र स्त्री म्हणून जर पैसे कमावायचा अधिकारच नसेल, केलेल्या कामाच्या मोबदल्यात भेदभाव असेल, पैसे कमवायची साधनेच मर्यादित केली गेली असतील तर तो अन्याय झाला. निसर्गाने दिलेली जबाबदारी पार पाडताना जर पैसे कमावणे यासाठी वेगळे आधारचे जाळे आवश्यक असेल ( जसे की पूर्ण पगारासह पालक म्हणून रजा आणि इतर बरेच काही) तर ते उपलब्ध होणे गरजेचे.

>>The families who feel the money is topmost priority, the inequalities rise in such families.
As a thumbrule men and women support each other as a path of peacefull life and add value to the society.
The supporting and peaceloving families only can give good next generation to the society.>>
एखाद्या कुटुंबात पैसा हीच सर्वात महत्वाची गोष्ट असते तिथे तो कुठल्या मार्गाने आला याचाही विधिनिषेध नसतो. अनैतिक मार्गाने मिळवलेला पैसा हा समानता देणार नाहीच, तो अन्याय, दमन यासाठीच वापरला जाणार. पण आपण इथे व्यवस्थित शारीरिक-बौद्धिक कष्ट करुन मिळवलेल्या, नैतिकमार्गाने मिळवलेल्या पैशाबद्दल बोलतोय ना? असा पैसा मिळवायचा अधिकार एक व्यक्ती म्हणून प्रत्येकालाच आहे. त्या पलिकडे जावून आपली बौद्धिक कुवत वापरुन संपत्ती निर्माण करणे, इतरांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, आपला देश समृद्ध आणि बलवान करणे असे काही करता आले तर अतिव भाग्याचे. केवळ लिंग अमुक म्हणून ही सर्व शक्यता तुम्हाला नाकारली जाणार असेल तर ते योग्य नाही.
स्त्री -पुरुष एकमेकांचे आधार असावेत हे योग्यच पण त्यासाठी या दोन्ही घटकांना त्यांच्या पूर्ण कुवतीनुसार सबल होता येणे गरजेचे नाही का? एक घटक जाणूनबुजून दुबळा ठेवला, एका घटकाच्या सबल होण्यात अडथळे आणले तर तो दुसर्‍याचा आधार कसा बनेल?

@स्वाती२
उत्तम पोस्ट.तुम्ही हसला नाहीत तर छान समजावून सांगितलेत हे आवडले. याला उत्तम वैचारिक बैठक लागते.

मानव, अमा, चांगल्या पोस्ट.

फार दूरचे सती इ दाखले जाऊ दे. जरा २-३ वर्षापूर्वीच उत्तर प्रदेशात एका ग्रामपंचायतीने महिलांनी सार्वजनिक जागी मोबाईल वापरला तर दंड अशा पद्धतीचा नियम केला. पुरूषांना अशी मनाई नाही. ह्याचं लोणं जर सगळीकडे पसरलं असतं आणि आपल्याला इथे अशा पोस्टी टाकायला त्रास झाला असता तर क्षणात उमगलं असतं की कोण आंबा नि कोण संत्र नि कोण उसाचं चिपाड ...
वन ऑर टू एक्सापल्स वरून कोण मत बनवत नाही. आकडेवारीच सांगायची तर भारतात दर वर्षी violence against women चे नोंदवलेले ३००००० केसेस आहेत. (न नोंदवलेल्या किती ते देवच जाणे). ह्याची तुलनाच करायची झाली तर अशी हानी ९० सालच्या गल्फ युद्धात झाली होती. असं "युद्ध" दरवर्षी देशात घडत आहे. समानतेचा धोशा लावला नाही तर हे सगळं कसं संपणार????

मानव, अमा यांचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत....

सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मला असं वाटतय की माझ्या पोस्टचा चुकिचा अर्थ काढला गेला आहे.

निसर्गाने फळ,वनस्पती, प्राणी आणि मानव प्राणी सगळ्यांना युनिक बनवलं आहे. निसर्गाने नाही ठरवलं कोण ग्रेट आणि कोण नाही..आपण माणसांनी बनवलेले आहेत सगळे भेद.
कुठल्या गावात बायकांना मोबाईल वापरू देत नाहीत तर तिथले लोक चुकीचे आहेत, ती असमानता नसून हा गुन्हा आहे.
कुठल्या घरात स्त्रीला तिचे हक्क मिळत नसतील तर तो त्या घरातील लोकांचा प्रॉब्लेम आहे.आणि तो पण डोमेस्टिक वायोलंस आहे.
मला फक्त इतके च म्हणायचं होते की तुलना करू नका आणि कॉपी करू नका.. कि पुरुष सगळ्या क्षेत्रात आहेत तर स्त्रीने ही असलंच पाहिजे.. जर तीला आवड असेल तर 50% का 100% स्त्रिया असु देत सगळ्या क्षेत्रात.
आपण लोकल बातम्यांना ऐट्रक्ट होऊन निष्कर्ष काढतो. बातम्यामधे दाखवतात म्हणून सगळ्या घरांमध्ये असमानता नसते आणि स्त्री नेहमी दुर्बल नसते..
खूप घरांमधे एकमेकांना आदर देऊन, कामं शेअर करून आनंदाने राहतात लोकं.

खूप घरांमधे एकमेकांना आदर देऊन, कामं शेअर करून आनंदाने राहतात लोकं.
>>>>>

+७८६
मुळात घरकामे शेअर करताना हे काम तुला चांगले जमते तर तू कर आणि जे मला चांगले जमते तर मी कर हा ॲटीट्यूड ठेऊन जर घरच्या बाईने स्वयंपाक स्विकारला तर त्यात गैर काय.
स्वयंपाक हे स्त्रियांचेच काम आहे या समजातून तिच्या वाट्याला तो आला आहे हे समजायची घाई का.

कालच मी एका धाग्यावर वाचले की भारतात ईंजिनीअर्सचा सुळसुळाट झाला आहे कारण प्रत्येक आईला आपल्या मुलांना ईंजिनीअर बनवायचे आहे. म्हणजे आई.. बघा हं एक स्त्री ठरवते आपल्या मुलांचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य.. मग ती आई आता आपल्या मुलांना मग तो मुलगा असो वा मुलगी त्यांना पुस्तकी अभ्यास शिकवायच्या मागे लागल्यात न की स्वयंपाक. जे एकेकाळी व्हायचे कारण पुरुष कमावते होते आणि स्त्रिया घर सांभाळायच्या. तर यात आपल्या मुलांना जे पुढे येणे गरजेचे आहे ते शिकवण्याकडे लोकांचा कल होता. हो, ती असमानताच होती जी समाजाने स्विकारली होती.
पण आता परीस्थिती बदलली आहे. आता एखादी आई आपल्या मुलीला नक्कीच बोलत नसेल की स्वयंपाक शिकून घे बाई नवरयाच्या घरी जाऊन तुला तेच करायचे आहे... तसेच स्वयंपाकाची आवड असणारया आपल्या मुलालाही स्वयंपाकघरात येण्यापासून अडवत नसेल..

पण समजा एका घरात दोन मुले आहेत. एक मुलगा आणि मुलगी. पण त्यातल्या मुलीलाच स्वयंपाकाची आवड आहे. तर तिला तो ईतक्यासाठीच शिकवू नये का की उगाच लोकं आपल्यावर स्त्री पुरुष असमानता जपल्याचा शिक्का मारतील.

जर एखाद्या मुलाला गाड्यांनी खेळायला आवडत असेल, आणि त्याच्या बहिणीला बाहुला आवडत असतील तर स्त्री पुरुष समानता जपायच्या नादात त्यांची हि आवड मारायची का? मुलीच्या हातात बळजबरी गाड्या कोंबायच्या की मुलानेही बाहुल्या खेळवल्या पाहिजेत असा हट्ट धरायचा?

किंबहुना आधी मला सांगा स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात हे ईथे किती जण मान्य करतात? मग पुढचे बोलूया...
कारण मला वाटते स्त्री पुरुष समानता म्हणजे सर्व कामे स्त्री पुरुष दोघांनी मिळून करणे नाही तर जे काम घरची स्त्री आवडीने करतेय त्या कामाचा आदर असणे. त्याला तितकेच समान लेखले जाणे. तिला ते काम तिच्या आवडीने, मर्जीने करण्याचे स्वातंत्र्य असणे होय !

Pages