खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा आता करून दाखवायचे !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 October, 2020 - 05:05

दसर्‍याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्‍यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.

गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.

मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.

अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !

बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरुष सगळ्या क्षेत्रात आहेत तर स्त्रीने ही असलंच पाहिजे. >> हे असलंच पाहिजे असं म्हणता येईल तरी काय आज? किमान समान संधी तरी मिळते का आज स्त्रीला कोणत्याही क्षेत्रात? आधी समान संधी मिळेल असं बघूया मग स्त्रियांनाच ठरवू देत कोणी काय करायचं ते. स्त्रीला आणि पुरूषांना मिळणाऱ्या संधींमध्ये समानता नाहीये हे स्पष्ट दिसत असताना देखील अशी उटपटांग विधाने करून काय साध्य करता तुम्ही?

बातम्यामधे दाखवतात म्हणून सगळ्या घरांमध्ये असमानता नसते आणि स्त्री नेहमी दुर्बल नसते..>> हे तर इतकं बिनबुडाचं विधान आहे पुन्हा एकदा. म्हणजे उद्या बातम्यांमधे स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी असं काही दाखवलं नाही तर सगळं आलबेल आहे असं समजाल का? बातमीमध्ये कळणं एवढीच तुमची सामाजिक जाणीव मर्यादीत आहे का? स्त्री जर नेहमीच सबल असते तर तिच्यावर इतके रेप का होतात? स्त्रीभ्रूणाचीच हत्या का केली जाते?

कुठल्या घरात स्त्रीला तिचे हक्क मिळत नसतील तर तो त्या घरातील लोकांचा प्रॉब्लेम आहे.आणि तो पण डोमेस्टिक वायोलंस आहे. >> तो त्या घरातील लोकांचा प्रॉब्लेम आहे? म्हणजे? बाकीच्यांनी त्यात पडू नये? शेजारच्या घरात नवरा बायकोला बडवून काढत असेल तर तुम्ही काहीच करणार नाही का?

केवळ आपल्या परीप्रेक्षातून दिसते तेवढीच दुनिया नसते. काही घरांमध्ये स्त्री पुरुष समानतेने आणि गुण्यागोविंदाने राहतात पण त्या घरांची संख्या फार कमी आहे. तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्ही अशा एका घरात राहता पण जरा तुमच्या घराच्या बाहेर डोकावून पहाल तर लक्षात येईल की अनेक घरांत अत्यंत असमान श्रमविभागणी होत असते. स्त्रियांचे अधिकार डावलले जातात. त्यांना स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेण्याची संधी मिळत नाही. You can be grateful for the privileges you have in your life but don't be so close-minded to assume that it is a reality of the entire world around you. By making such sweeping generalizations that are blatantly wrong, you are doing a disservice to the underprivileged women. I request you to remove the rose-tinted glasses and look at the reality. थोडीशी सहसंवेदना आणि सहानुभूती दाखवा अशा मुलींसाठी ज्यांची गर्भातच हत्या होते आजही, ज्यांची शाळा बंद होते मासिक पाळी सुरू झाली की, ज्यांना आपला मनपसंत जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही, ज्यांच्यावर गर्भारपण लादलं जातं वारंवार आणि ज्या पुरुषी वासनांना बळी पडतात. एक माणूस म्हणून एवढी माणूसकी तर दाखवूच शकता तुम्ही. जी मुलगी गर्भातच मेली तिला जगण्याची समान संधी मिळाली नाही एवढे तरी मान्य आहे का?
जेव्हा प्रत्येक स्त्रीला देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही कोणत्याही वेळी घरात अथवा घराबाहेर असताना असुरक्षित वाटणार नाही, जेव्हा प्रत्येक स्त्रीला तिच्या मर्जीने जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल आणि शिक्षणाच्या आणि सर्व प्रकारच्या नोकरी/व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतील तेव्हा मग आपण यावर चर्चा करू शकतो की स्त्रीने अमुक क्षेत्रात का असावं किंवा का असू नये. जर माझ्या पुढ्यात चिकू आणि केळे असेल तर मी आंबा खावा की न खावा ह्या चर्चेला काय अर्थ आहे?

किंबहुना आधी मला सांगा स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात हे ईथे किती जण मान्य करतात? मग पुढचे बोलूया...>> Show me some scientific evidence for this statement. I don't agree with it.

किंबहुना आधी मला सांगा स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात हे ईथे किती जण मान्य करतात? मग पुढचे बोलूया...>> मान्य नाही. पुढचं बोलू नका.

> Show me some scientific evidence for this statement. I don't agree with
स्त्री आणि पुरुष ह्यांची मानसिक ,शारीरिक,
जडणघडण एकच असते हे सिध्द करा.
एकाच घटनेकडे स्त्री आणि पुरुष एकच दृष्टिकोनातून बघतात हे सिध्द करा.

जसे जगात माणसाच्या विविध जाती आहेत.
उदाहरण
जसे
प्राण्यात विविध जाती असतात खीलार बैल,जर्सी गाय,जाफराबादी म्हैस,पंढरपुरी म्हैस.
एकाच प्रजाती मध्ये अनेक जाती असतात त्यांचे गुणधर्म वेगळे असतात.
तसे माणसात पण विविध जाती आहेत आणि त्यांचे गुणधर्म पण वेगळे आहेत.
सरळ आहे स्त्री आणि पुरुषात विविधता आहे .

>>किंबहुना आधी मला सांगा स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात हे ईथे किती जण मान्य करतात? मग पुढचे बोलूया...>> असे काही नैसर्गिकरीत्या नसते.

प्रतिप्रश्न करून काही सिद्ध होत नाही हेमंत. Null hypothesis always assumes no difference unless you prove otherwise. So the burden of proof is on the person claiming that there is difference.
स्वाती ताई, धन्यवाद! तुमच्या प्रतिसादांतला पेशन्स आणि मॅच्युरिटी दोन्हीसाठी हॅट्स ऑफ! तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे माझ्यासारख्या इंपेशंट व्यक्तीला!

प्राण्यात विविध जाती असतात खीलार बैल,जर्सी गाय,जाफराबादी म्हैस,पंढरपुरी म्हैस. >> तुम्ही जीवशास्त्र हा विषय कितवीपर्यंत शिकला आहात नक्की? माणसांच्या जाती? खिलार बैल आणि जर्सी गाय? Is there some Maayboli laughter challenge announcement that I have missed?

भारतीय आणि आफ्रिकन ह्यांच्या शारीरिक क्षमता वेगवेगळ्या आहेत.
फक्त भेदभाव होवू नसते म्हणून ते मान्य केले जात नाही.
आता पर्यंतच चे सर्व शोध युरोपियन लोकांनी लावले आहेत आफ्रिकन किंवा asian लोकांनी नाही लावले.
बोधिक क्षमतेत पण फरक आहे फक्त ते उघड मान्य करणे समाज हिताचे नाही.
खूप उदाहरणे आहेत.

>>आता पर्यंतच चे सर्व शोध युरोपियन लोकांनी लावले आहेत आफ्रिकन किंवा asian लोकांनी नाही लावले.
बोधिक क्षमतेत पण फरक आहे फक्त ते उघड मान्य करणे समाज हिताचे नाही.>>
हे आता फार होत आहे! खाली यादी देत आहे आफ्रिकन वंशाच्या व्यक्तींची.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_African-American_inventors_and_sci...

बोधिक क्षमतेत पण फरक आहे फक्त ते उघड मान्य करणे समाज हिताचे नाही.
>>>
याचा ढळढळीत पुरावा याच पोस्टमध्ये उपलब्ध आहे पण तो उघडपणे मान्य करणे माझ्या आयडीच्या हिताचे नाही.

तुम्ही जीवशास्त्र हा विषय कितवीपर्यंत शिकला आहात नक्की? माणसांच्या जाती? खिलार बैल आणि जर्सी गाय? Is there some Maayboli laughter challenge announcement that I have missed?
एकाच प्रजाती मध्ये वेगवेगळे गुणधर्म असणाऱ्या उपजाती असतात हे त्या माझ्या पोस्ट मध्ये लिहला आहे.
माणसाच्या एकच प्रजाती मध्ये वेगवेगळे गुणधर्म,क्षमता असणाऱ्या उपजाती ( मग तो, वातावरण अन्न,ह्यांचा परिणाम असेल ) आहेत हे कोणी अमान्य कसे करू शकत.
पण मानवी हिता साठी फक्त ते नाकारणे गरजेचं आहे नाहीतर भेदभाव होईल.

>>मुळात घरकामे शेअर करताना हे काम तुला चांगले जमते तर तू कर आणि जे मला चांगले जमते तर मी कर हा ॲटीट्यूड ठेऊन जर घरच्या बाईने स्वयंपाक स्विकारला तर त्यात गैर काय.
स्वयंपाक हे स्त्रियांचेच काम आहे या समजातून तिच्या वाट्याला तो आला आहे हे समजायची घाई का.>>
सर्व घरकामे, यात साधा स्वयंपाकही आला , ही जगायला आवश्यक कौशल्ये आहेत. तेव्हा ती एका सामान्य दर्जाइतपत सर्वांनाच येणे अपेक्षित. चांगले जमते म्हणजे त्या बेसीक लेवलच्या वरचे. पुरुषाला स्वयंपाक येतच नाहीये, शिकायची इच्छाही नाहीये आणि त्याने म्हणायचे की ज्याला जे चांगले जमते ते या न्यायाने स्त्रीने स्वयंपाक स्विकारलाय तर ती नुसती सारवासारव.

आजही केर-वारा, पाणी भरणे, स्वयंपाक, लहान मुलांना/भावंडांना सांभाळणे वगैरे कामे ही फक्त स्त्रीची समजली जातात, अनेक घरांतून ही जबाबदारी शाळकरी मुलींवर टाकली जाते, त्यांचे शालेय शिक्षण देखील या जबाबदार्‍या संभाळत चालते. यातूनच अभ्यासाला वेळ न मिळणे, शाळेला उशीर/अनुपस्थिती, शिक्षण थांबणे हे होते.

आजही केर-वारा, पाणी भरणे, स्वयंपाक, लहान मुलांना/भावंडांना सांभाळणे वगैरे कामे ही फक्त स्त्रीची समजली जातात, अनेक घरांतून ही जबाबदारी शाळकरी मुलींवर टाकली जाते, त्यांचे शालेय शिक्षण देखील या जबाबदार्‍या संभाळत चालते. यातूनच अभ्यासाला वेळ न मिळणे, शाळेला उशीर/अनुपस्थिती, शिक्षण थांबणे हे होते.
>>>>

नक्कीच समजली जातात.
आणि हेच तर मी केव्हापासून सांगतोय.
कारण आजही काही घरात ही कामे स्त्रियांची समजली जातात म्हणून ज्या घरात ती समजली जात नाही त्या घरात जर एखादी स्त्री कामाच्या वाटणीत स्वयंपाक घेत असेल तर तिथेही स्त्री पुरुष असमानतेचा शिक्का मारायची घाई होते.

तुमच्याच पोस्टमधील वाक्य घेतो - ...….
"
पाणी भरणे, स्वयंपाक, लहान मुलांना/भावंडांना सांभाळणे वगैरे कामे
"

यातले स्वयंपाक मला जमत नसल्याने मी जेमतेम मला जमेल तसेच करतो.

पाण्याचा तसा आमच्याकडे प्रॉब्लेम नसतो. पण कधी वेळ आलीच तर शारीरीक क्षमतेचा विचार करता बादल्या बादल्या पाणी उचलायचे काम आमच्याकडे कुठलीही कुरबुर न करता मी माझ्या वाटणीला घेतो.

आणि मुलांच्या जबाबदारीचे म्हणाल तर अगदी कालच कामाच्या फेरवाटणीत लहान मुलाच्या आंघोळीची जबाबदारी बायकोने घेतली. आणि त्याच्या सूसू, शीशीची जबाबदारी माझ्यावर आली. आता मी स्वतः आंघोळ करतो तर मुलाला का नाही घालू शकत हा प्रश्न उद्भवेलच. पण तो आंघोळीच्या वेळी जो त्रास देतो त्यामुळे मला नाही जमत त्याचे तोंड आणि डोके धुवायला. नाकातोंडात पाणी आणि साबण जायची भिती राहते, पण तेच सूसू शीशी धुताना मात्र माझ्या डोक्यातही येत नाही वा कधी आले नाही की हे काम सो कॉलड स्त्रियांची समजली जाणार्‍या कामामध्ये मोडते.

आणि हेच मॉरल आहे. आधी ते शिक्के मिटवा अमुक तमुक कामे स्त्रियांची आणि अमुकतमुक पुरुषांची.. जोपर्यंत हे वर्गीकरण तुमच्या डोक्यात आहे तोपर्यंत तुमच्या घरात स्त्री पुरुष समानता मोजून मापूनच येणार. तडजोड करतच येणार. बघा आम्ही कशी स्त्री पुरुष समानता जपतो हे मिरवतच येणार….

किंबहुना आधी मला सांगा स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात हे ईथे किती जण मान्य करतात? मग पुढचे बोलूया...>> Show me some scientific evidence for this statement. I don't agree with it.

Submitted by जिज्ञासा on 4 November, 2020 - 22:42
>>>>>

यावर वेगळा धागा टाकतो ! Happy

स्वयंपाकाच्या मुद्द्यावरून ही स्त्रीची नैसर्गिक आवड असा मुद्दा लिहिणार्‍यांना हाटेलात गेल्यावर ईथे स्त्रिया का स्वयंपाक करीत नाहीत असा नैसर्गिक प्रश्न पडत नाही का?
हाटेलातले पुरूष शेफ्/आचारी/स्वयंपाकी घरी जाऊन पुन्हा बायकोसाठी, मुलाबाळांसाठी, आईवडिलांसाठी रांधत असतील का असाही एक नैसर्गिक प्रश्न पडला पाहिजे खरा.

स्वयंपाकाच्या मुद्द्यावरून ही स्त्रीची नैसर्गिक आवड असा मुद्दा लिहिणार्‍यांना
>>>>>
पुन्हा विपर्यास Happy
स्वयंपाक ही स्त्रियांची नैसर्गिक आवड असते असे कुठेच दावा केलेला नाही.
एखाद्या स्त्री ची स्वयंपाक ही आवड असेल तर .. किंवा तिला छान जमत असेल तर… ईतकेच म्हटले आहे
तुम्ही स्त्री असा अव पुरुष बरेच गोष्टी तुम्हाला अश्याही कराव्या लागतात ज्यांची तुम्हाला आवड असेलच असे नाही, पण त्या तुम्हाला तुमच्या जोडीदारापेक्षा छान जमत असतात म्हणून तुम्हाला कराव्या लागतात.

ऋन्मेष,
मुळात स्त्री-पुरुष समानता ही मिरवायची बाबच नाही. जे वर्तन नैतिकदृष्ट्या योग्य आहे ते मिरवायला कशाला हवे?

मी घरकामाची वाटणी रोज मोजून-मापून समानच व्हायला हवी असे म्हणतच नाहीये. घरकाम म्हणजे घर सुरळीत चालवण्यासाठी जी काही कामे असतात ती सगळीच, यात घरातली कामेही आली आणि बाहेरचीही. जर एक पार्टी त्यातली काही कामे करणारच नसेल, मला जमतच नाही म्हणून हात झटकणार असेल आणि ती कामे दुसर्‍या पार्टीच्या वाट्याला येणार असतील तर त्यात दुसर्‍या पार्टीला ती कामे करणे एक प्रकारे भाग पडते. इथे मी स्वयंपाकाबद्दल लिहिले कारण तुमचा आधीचा प्रतिसाद स्वयंपाकाबद्द्ल होता. उद्या कुणी बॅकेची कामं मला जमत नाहीत, ती कामे जोडीदार करतो म्हणाले तरी मी ती कामे शिकून घ्यावीत असेच म्हणेन.

२००
>>
इलेक्टोरल का पॉप्युलर? Happy

इथे मी स्वयंपाकाबद्दल लिहिले कारण तुमचा आधीचा प्रतिसाद स्वयंपाकाबद्द्ल होता.
>>>>
स्वयंपाकाचे मी लिहिले नाही खरे तर, तर ते मला सुचवण्यात आले की मी स्वयंपाक करावा. आणि मग त्यावरून चर्चा स्वयंपाकावरच रेंगाळली कारण ते स्त्रियांचे काम समजले जाणे या कॅटेगरीत मोडते. हेच जर बँकेचे काम असते आणि ते मी मला जमत नाही बोललो असतो तर फार तर माझ्या अज्ञानावर हसून लोकं पुढे गेली असती. ते माझ्या बायकोला वा घरातल्या स्त्रियांना करावे लागते म्हणून कोणी बोलून दाखवले नसते, विषय तिथेच थांबला असता. वाढला तो स्वयंपाक या कामामुळे Happy

ऋन्मेष,
मुळात स्त्री-पुरुष समानता ही मिरवायची बाबच नाही. जे वर्तन नैतिकदृष्ट्या योग्य आहे ते मिरवायला कशाला हवे?
>>>>>

एक्झॅक्टली मी हेच म्हणालो माझ्या पोस्टमध्ये Happy

ती समानता जपताना मग जी कामाची वाटणी झालीय त्यात आपण स्वयंपाकाचे काम जे वर्षानुवर्षे आपल्या समाजात बायकांचे समजले जातेय ते पुन्हा आपल्या बायकोवरच टाकतोय हा विचार मनात शिवलाही नाही पाहिजे. ते तुमच्या डोक्यातही नाही पाहिजे. की आपण स्त्री पुरुष समानता राखायला काही करत आहोत.
घर दोघांचे आहे, जबाबदारी दोघांची आहे, जमेल तशी वाटून घेतली, ईतकेच डोक्यात हवे.
यातल्या एका कामाला म्हणजे स्वयंपाकाला मी नाही बोलू शकतो कारण मी ईतर कामे करू शकतोय, जर मी ती देखील करू शकलो नसतो तर मला ती किंवा स्वयंपाक किंवा आणखी काही शिकावेच लागले असते जेणेकरून मी माझ्या वाटणीची जबाबदारी उचलू शकेन.

आणखी एक मुद्दा सहज आठवला की लग्नाआधी एकमेकांना काय येते काय नाही, आणि कोण काय करू शकते, आणि करणार हे जाणून घ्यायचे स्वातंत्र्य तर स्त्री पुरुष दोघांनाही आहेच. त्यामुळे तो विचारही करावा लग्नाआधी. आपला जोडीदार फारसा कामाचा नाही हे माहीत असूनही कोणी लवमॅरेज करत असेल तर मग भोगा आपल्या कर्माची फळे. आणि काढा स्त्री पुरुष समानतेच्या नावाने गळे Happy

कु. ऋ चे प्रतिसाद वाचून समर्थांनी मूर्खांची इतकी लक्षणे सांगून सुद्धा अजून बरीचशी शिल्लक आहेत या वाक्याची आठवण झाली!
मला बँकेची कामे येतात म्हणून मी बँकेची कामे करतो आणि मला स्वयंपाक येत नाही म्हणून माझी बायको स्वयंपाक करते आणि ही वाटणी समानच कशी आहे. केवळ मी स्वयंपाक करत नाही म्हणून माझ्यावर लगेच असमानतेचे आरोप करता असा गळा काढणे हे वेड पांघरून पेडगावला जाणे आहे. यात कुठे आणि कशी असमानता आहे हे अनेक प्रतिसादांत स्पष्ट लिहिलेले आहे पण ते समजून घ्यायचेच नाही असा पवित्रा. कारण मग धाग्याला काही टिआरपी उरणार नाही.
वर आता एका अशाच महाबिनडोक गृहितकावर वेगळा धागा काढला आहे. आशुचँप म्हणतात ती हीच सिक मेंटॅलिटी. मी चर्चा घडवून आणतो असा आव आणायचा, कोणत्याही लॉजिकल मुद्द्यावर सहमती दर्शवायची नाही, उलट काड्या टाकत धागा पेटता कसा राहील एवढे बघायचे. याला कोणतेही विषय वर्ज्य नाहीत. ज्या असमानतेमुळे आज हजारो लाखो स्त्रियांवर अत्याचार घडत आहेत तो विषय देखिल केवळ टिआरपी साठी वापरायचा यातून अत्यंत विकृत अशी मेंटॅलिटी दिसते.

विकृती लक्षात आल्याबद्दल अभिनंदन.

प्रतिसादांचे दाणापाणी देणं बंद करा. हे केल्यापासून मी फार सुखी आहे. शिवाय पोस्ट्ही पटकन ओळखता येत असल्याने चटकन उडी मारून पुढे जाता येतं.

जे कोण डेडिकेटेड फॅन आहेत त्यांच्यासोबत रासक्रीडा करू द्या.

विषय महत्त्वाचा असला तर वेगळा धागा काढून लिहा. तिथे घाण करायला आलं तर संपूर्ण दुर्लक्ष करा.

कुठल्या गावात बायकांना मोबाईल वापरू देत नाहीत तर तिथले लोक चुकीचे आहेत, ती असमानता नसून हा गुन्हा आहे. >> Happy हो पण गुन्हा ठरला कशामुळे तर घटनेने समान अधिकार दिले म्हणूनच ना. समानता हे पायाभूत तत्त्व अनेक कायदे, योजना, धोरणे ह्यात गरजेचे आहे.

काही देशात स्त्रियांना गाडी चालवायचा अधिकार नव्हता. अमेरिकेसारख्या प्रगत देशात १९७४ पर्यंत (म्हणजे तुमच्या आईच्या पिढीत) स्त्रियांना क्रेडीट कार्ड मिळत नसे. हे सगळं घटनाबाह्य नव्हते म्हणजे त्याबद्दल कुठेही दाद मागता येत नाही. पोलिसात गेलात तर "बाई, त्यांना क्रेडीट कार्ड नाकारायचं स्वातंत्र्य आहे. तुलना करू नका आणि कॉपी करू नका.. कि पुरुष सगळ्या क्षेत्रात आहेत तर स्त्रीने ही असलंच पाहिजे.." ऐकावं लागलं असतं. अनेक जणींनी/जणांनी अनेक लढे दिले, समानतेचा धोशा लावला तेव्हा कुठे स्त्री काही क्षेत्रात पुढे आली आहे. पुरुष सगळ्या क्षेत्रात आहेत तर स्त्रीला ही ती संधी असलीच पाहिजे आणि उलटही. काही व्यवसाय "पिंक कॉलर" म्हणवले जातात उदा: नर्सिंग. तिथे पुरूष यायला हवे. नाहीतर "पिंक कॉलर" व्यवसाय अल्प उत्पन्न रहातात.

Everyone has written whatever i may would have written. So i m not writing now as i said earlier to mrunalini.

@ भरत,
आपण प्रतिसाद देत नाही पण धागा फॉलो करता आणि मला वाटते हे जास्त महत्वाचे आहे.

@ जिज्ञासा,
यात कुठे आणि कशी असमानता आहे हे अनेक प्रतिसादांत स्पष्ट लिहिलेले आहे पण ते समजून घ्यायचेच नाही असा पवित्रा.
>>>>>>
हेच मी उलटेही म्हणू शकतो. मुळात आपलाच विचार बरोबर आणि समोरच्याचा चूक हे ठरवूनच तुम्ही चर्चेत उतराल तर समोरचा ऐकत नाही म्हणजे काय अशी चीडचिड होणारच.
मलाही तुमचे विचार चुकीचे वाटत आहेत, आणि मी ते माझ्या परीने खोडत आहे.
आणि हा माझा मुर्खपणा असेल तर तो मला आयुष्यभर करायला आवडेल Happy

बाकी ती समर्थांनी सांगितलेली मुर्खांची लक्षणे कोणी मला सांगेल का? काळाच्या कसोटीवर चेक करायला हवीत एकदा. तसेही नुसते समर्थांनी सांगितले म्हणजे बरोबरच असेल असेही नाही. ईटरेस्टींग असेल तर वेगळा धागा काढता येईल.

@ सीमंतिनी,
कायदे हे माणसांनीच बनवलेले असतात. जर समाजात पुरुषांचे वर्चस्व असेल, संस्कृती पुरुषप्रधान असेल तर कायदेही तसेच बनणार हे स्वाभाविक आहे.
कहने को तो ये शहर है, लेकीन यहा जंगल का कानून चलता है.
लोकशाहीतही एक हुकुमशाही लपलेली असतेच.
बळी हा नेहमी दुर्बलांचाच जातो.
समानता तेव्हाच शक्य आहे जेव्हा आधी स्त्री सक्षमीकरण होईल.
अन्यथा पुरुषांनीच मोठे मन दाखावून स्त्रियांना समान हक्क द्यावेत अशी अपेक्षा ठेवावी लागेल.
मला तर वाटते स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करण्याऐवजी आपले स्वतःचे स्किल सेट डेव्हलप करावे.
उदाहरणार्थ स्वयंपाक हे स्त्रियांचे काम जर वर्षानुवर्षे समजले जात होते तर आता ते काम झिडकारण्याऐवजी त्या कामाचे मह्त्व वाढवले तर आपसूक त्यात एक्स्पर्ट असणार्‍या स्त्रियांचे महत्व वाढेल.
मी आहे म्हणून तुला चांगले चुंगले खायला मिळतेय हा अ‍ॅटीट्यूड ठेवायचा आणि नवर्‍यालाही हे पटवून द्यायचे. नव्हे ते त्याला पटलेलेच असते, पण हे स्त्रियांचे कर्तव्यच आहे असा टॅग मारून तो ते नाकारत असतो जे त्याच्या सोयीचे असते.
एखादी स्त्री घरकाम करत असेल तर तिला तिच्या घरकामाचे काय महत्व आहे याची जाणीव करून द्यावी. जी आजवर पुरुषप्रधान समाजाने सोयीस्कर होऊ दिली नाहीये.
तिने अर्धे घरकाम नवर्‍याला देऊन स्वताही पैसे कमवायला घराबाहेर पडावे हे सोल्युशन सरसकट सगळीकडे कामाचे नाही. जिथे गरज नाही तिथे संसाराची घडी का विस्कटायची...

Pages