खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा आता करून दाखवायचे !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 October, 2020 - 05:05

दसर्‍याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्‍यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.

गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.

मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.

अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !

बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी स्वयंपाकाबाबतीत बोलायचे तर एक लाईफस्किल म्हणून बेसीक स्वयंपाक प्रत्येकानेच शिकून घ्यावा >> अनुमोदन. ऋ तुम्ही हे लाईफस्किल म्हणून शिका.. उद्या जर बायकोला नोकरी करावीशी वाटली आणि तुम्हाला घरी राहून मुलांना सांभाळावे लागले तर उपयोगी पडेलच की.

जिज्ञासा>>> पालथ्या घड्यावर पाणी का ओतताय?

ज्या पती-पत्नीला आपसात जसं रुचतं ते करावं...बाहेरचे कोण सुचवणारे?>>> मग इकडे धागा कशाला काढलाय, भजी तळायला?

हि कसली डोम्बलाची समानता? म्हणे पुजेचा कन्टाळा आला तर बायको ला करू देईन आणि बाकी तयारी ही तीच करणार कारण तिला त्यात रस आहे Wink म्हणजे सर्व तिच करणार, हे बरय.
आणि इतरानी लॉजिक दखवले तरी मी स्वैपाक का करावा यावर अडून बसायचे, जसे काही रोज स्वैपाक करत बसायचे आहेत, गोष्ट पूजेच्या दिवसाची चाललीये ना?

स्वयंपाक करणे ही सर्वात मोठी समस्या बनवली आहे इथे.
आताच्या जाहिराती च्या युगात किती घरात पारंपरिक पूर्ण जेवण बनते.
सकाळी उपमा किंवा पोहा नाश्ता.
दुपारी भाकरी किंवा. चपाती,भाजी बनते.
रात्री किती घरात रोज पूर्ण जेवण बनते.
बहुसंख्य शहरी नोकरी वाले.
ब्रेड,पाव,मॅगी,पास्ता,बर्गर, वरच दिवस काढत असतात.
वरती multivitamin गोळ्या आहेतच,डाएट च्या गोड लेबल खाली salad आहेच.
30 वर्षाच्या आत .
Bp,sugar, लठ्ठ पना, ह्याची शिकार झालेल्या लोकांचे. प्रमाण शहरी लोकांत जास्त आहे.
नाही तर फक्त o फिगर च्या नावाखाली हाडांचा सापळा असलेली लोक आहेत.
तंदुरस्त ,चपळ,निरोगी तरुण पिढी आजूबाजूला बघायला तरी मिळत आहे का.
21 वर्षाचा मुलगी किंवा मुलगा तारुण्यात असल्या सारखा वाटतो का.
प्रगत देशात लठ्ठ पणाच्या समस्या जास्त आहेत.

आशू२९ Biggrin सहीच आहेस!

जाऊ दे ग, मी स्वैपाक का करावा यावर अडून बसला तर बसू दे... He will have to play catch-up eventually. ह्या वर्षी नैवेद्य स्पर्धेत पुरूष आयडीला बक्षीस होते. बायकोबरोबर मिळून ४ तासात सैपाक केला अशी पोस्टही होती. इतर मदत करणार्‍या आयडींच्याही पोस्टी होत्या तिथे. भले विजेत्याच्या डोक्यात 'समानता' शब्दही नसेल, भक्ती, बक्षीस म्हणून केले असेल. पण भक्तीसाठी, बक्षीसासाठी, मुलांसाठी अशा कुठल्याही कारणासाठी मी चार तास बायकोबरोबर झटेन अशी वृत्ती असणे, वर्तन असणे म्हणजे समानता. जग कुठे चाललं नि आपण कुठे राहिलो हे रून्मेषला कळेल तेव्हा कळेल. त्याने लिहीले आहे प्रवास सुक्याकडे असणार. तेवढं सध्या पुरेसे आहे.

Runmesh
महिन्यातून किती दिवस नाश्ता,lunch,dinner घरात बनवला जातो .
आणि किती दिवस हॉटेल मध्ये,किंवा फास्ट फूड वर दिवस ढकलतो.
जेवण बनवणे ही काही मोठी समस्या नाही.
आणि स्त्री पुरुष समानता ही जेवण बनवण्या वर अवलंबून नाही.

एक तटस्थ वाचक म्हणून मला असे जाणवते की इथे ऋन्मेष ला वादविवादात कोणीच हरवू शकत नाही म्हणून TRP वगैरे सारखे आरोप केले जातात

ज्या पती-पत्नीला आपसात जसं रुचतं ते करावं...बाहेरचे कोण सुचवणारे?>>> मग इकडे धागा कशाला काढलाय, भजी तळायला?>>>

सिक्सर!!!!!!! बॉल थेट स्टेडियमच्या बाहेर...

बाकी धाग्याचे शीर्षक आणि मजकूर यांचा काहीही ताळमेळ नाही. दोन्ही एकत्र वाचले की लिहिणार्याला समानता म्हणजे काय हे कळलेच नाही असे म्हणावे लागते.

अर्थात धागाकर्त्याला याच्याशी काहीच देणेघेणे नाही याची कल्पना आहे. त्याला 1000 प्रतिसाद मिळाले की बँकेत 1 करोड असल्याचा आनंद मिळतो. मिळुदे...आपण लगे हाथ व मूड असेल तसा आनंद वाटत जावे, अन्यथा दुर्लक्ष करावे.

एक तटस्थ वाचक म्हणून मला असे जाणवते की इथे ऋन्मेष ला वादविवादात कोणीच हरवू शकत नाही म्हणून TRP वगैरे सारखे आरोप केले जातात>>>>

वादात उतरताना दोन्ही बाजूंचे ध्येय एकच असावे लागते. इथे धागाकर्ता प्रतिसाद वाढावेत म्हणून वडाची साल वांग्याला लावत बसलेला असतो, त्याला वादात रस नसतो तर 1000 प्रतिसादात रस असतो. बाकीचे लोक मात्र लिहिलेल्या विषयावर बोलत असतात. इथे जिंकणे हरवणे हा उद्देश कधी नसतोच.

वडाची साल वांग्याला >> Happy वड्याचे तेल वांग्यावर किंवा वडाची साल पिंपळाला ऐवजी "वडाची साल वांग्याला" हे रून्मेष धाग्यांचे बेष्ट वर्णन आहे!! Biggrin

जसे काही रोज स्वैपाक करत बसायचे आहेत, गोष्ट पूजेच्या दिवसाची चाललीये ना?
Submitted by aashu29 on 31 October, 2020 - 20:51
>>>

वेलकम टू चर्चा Happy

माझा मुळातच देव धर्म शास्त्रावर विश्वास नसल्याने मला मुळातच ती पूजा झाली नसती तरी चालले असते
त्या केसमध्ये नैवेद्याचा प्रश्नच आला नसता Happy

असो, तरी मी पूजेला एकटाच बसलो नव्हतो. ममगिरी करत माझी बायकोही बसली होती. त्यामुळे त्यावेळी ती देखील पूजेत अडकलेली होती. याचा अर्थ स्वयंपाकघरात कोणीतरी हवे जे काय हवे काय नको हे बघेल ती जबाबदारी तिसर्‍याच व्यक्तीने घेतली होती.
मी फक्त माझी आणि बायकोची जागा अदलाबदल करण्याबद्दल बोलत होतो.
पण त्या केसमध्येही दोघे पुर्णकाळ पूजेत अडकले राहणारच होतो.
स्वयंपाकघराचा आणि काय हवे नको याचा ताबा त्या तिसर्‍या व्यक्तीकडे कायम राहणार होता.
त्यामुळे ज्याच्या सुपीक डोक्यातून हा स्वयंपाकाचा मुद्दा आला आहे तोच गंडलेला आहे Happy

असो
@ ऑल
चर्चा पुढे नेऊया
फॅक्टच बघूया

किती घरांमध्ये स्वयंपाकाची निम्मी वा जास्त जबाबदारी पुरुष घेतात याचे आकडे चेक करूया.
चेक करूया म्हणजे तुम्हीच आपापल्या आजूबाजूच्या अनुभवावरून हे सांगा

आता काढलाच आहे स्वयंपाकाचा मुद्दा तर पुर्ण करूया. आता सोक्षमोक्ष लाऊनच टाकूया.

गेल्या वर्षी याच सुमारास मॉल मधे दोन लेकींना घेवून असेच एक बाबा आले होते. रंगीत लिप ग्लॉस वगैरे खरेदी सुरु होती. मुलींनी सिलेक्ट केलेल्या वस्तू दाखवून ते बाबा इतर स्त्रीयांना हे अ‍ॅप्रोप्रिएट आहे का विचारत होते. मुलींचे 'माझ्या सगळ्या मैत्रीणी..' म्हणत हट्ट करणे, बाबाचे 'तू अजून लहान आहेस...' म्हणत कुरकुरणे, आम्हाला विचारुन खात्री करणे हे सगळे बघणेच इतके आनंददायी होते की बस्स!

Submitted by स्वाती२ on 31 October, 2020 - 19:02

>>>>>

मी यावर ईतके लिहू शकतो की ग्रंथ भरेल .. मी आधी कसा होतो आणि बाप झाल्यावर कसा बदललो आणि मुलीसाठी काय काय करू लागलो… माझ्या फार आवडीचा विषय आहे हा.. नोट करून ठेवतो, यावर वेगळा धागा काढतो Happy

ज्या पती-पत्नीला आपसात जसं रुचतं ते करावं...बाहेरचे कोण सुचवणारे?>>> मग इकडे धागा कशाला काढलाय, भजी तळायला?>>>

>>>>

१) कारण बाहेरचे लोकं सुचवतात, त्यांनी ते सुचवायचे थांबवावे हे त्यांना समजण्यासाठी धागा काढणे गरजेचे होते Happy
२) बाहेरच्यांनी सुचवले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे हे येथील पतीपत्नींना समजावे या उद्देशाने धागा काढला होता Happy
३) बाहेरच्यांनी सुचवण्यात काही गैर नाही हे आजही कित्येकांना वाटते याचाच अर्थ धाग्याची गरज होती हे सिद्ध झाले Happy

तू काही वेगळे धागे काढू नको
एका पण धाग्यात तुझी मत स्पष्ट नसतात.
स्त्री पुरुष समानतेच्या धाग्यावर ..
वडील आणि मुलीचे भावनिक संबंध ह्या वर पोस्ट टाकत लोकांना भावनिक लाटेत
वाहवत ठेवतोस.
अपत्य विषयी प्रेम निर्माण होणे ही नैसर्गिक भावना जवळ जवळ सर्व प्राणी मात्रत असते.
त्या साठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही.
आणि ती भावना मुल ठराविक वयात येण्या पर्यंत च मर्यादित असते.
जो पर्यंत ते निरागस असते.ती पण नैसर्गिक च भावना असते.

पण भक्तीसाठी, बक्षीसासाठी, मुलांसाठी अशा कुठल्याही कारणासाठी मी चार तास बायकोबरोबर झटेन अशी वृत्ती असणे, वर्तन असणे म्हणजे समानता. जग कुठे चाललं नि आपण कुठे राहिलो हे रून्मेषला कळेल तेव्हा कळेल.
>>>

म्हणजे मी मला स्वयंपाक जमत नाही वा त्याची आवड नाही म्हणताच जगात स्वयंपाकच एक काम आहे ज्यात बायकोबरोबर झटले जाते, ते नाही तर मग बाकी ईतर मी कितीही झटलो तरी ते व्यर्थ आहे ..
कि मग जो स्वयंपाकात बायकोला मदत करत नाही तो ईतर कश्यात करत नसण्नारच हे जज करणे झाले पुन्हा...

सिरीअसली,
सारे जग स्वयंपाकघराकडे चालले आहे आणि मी हॉल, बेडरूम, बाथरूम, बाल्कनी मध्येच राहिलोय असे आता मला वाटू लागलेय Happy

तू काही वेगळे धागे काढू नको>>
कधीकधी माबोवर लिहायची पण भीती वाटते. आपल्या कुठल्या वाक्यावरून अभिषेक दादा नवा धागा काढतील कोण जाणे.

तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा इश्यू नाही. स्वयंपाक करण्याची आवड/कंटाळा उपजत असतो त्यात cultural, social condition ung चा काही संबंध नसतो असे समजणे हा इश्यू आहे. तुम्ही दोघे पूजा करताना स्वयंपाकघराशी related जबाबदारी सांभाळणारा घरातला पुरुष होता की स्त्री? ते तुमच्या बाळांनि नोट केले नाही ग्यारंटी आहे का? बाळे दररोज स्वयंपाक करताना कोणाला बघतात? कामाची विभागणी अगदी तराजूत ठेउन balanced असली तरी कोणती कामे कोण करत आहे हे बाळांना दिसतंय? "ऑफिस" चे काम करायला नेमका बाप च असतो व स्वयंपाक करायला आई असते कारण "तिला तर आवड च आहे" असे सतत दिसत राहिले तर काय होते? आपल्या बाबाला पूजेचा इतका कंटाळा / वैताग आला की शेवटी वौतागातून त्याने आईला पूजा करायला सांगितले याचा काय अर्थ बाळे लावतील?
स्त्री पुरुष समानतेचि एव्हडी आच असेल तर आपली पोरे पूर्ण नाव सांगा म्हणले की काय नाव सांगतात हे बघा. तिथे बापाचे नाव आणि आडनाव आहे त्याचे काय करायचे? परत ते आडनाव फक्त बापाची जात सांगते/imply करते. मग बाळांची आई म्हणाली की तिला तर काही प्रॉब्लेम नाही असे नाव असण्यात तेव्हा तिला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सगळे आलबेल असते का? तिला काही प्रॉब्लेम नसणे हाच एक प्रॉब्लेम असू शकतो त्याची काय कारणे असू शकतात याचा विचार केला का? तुम्ही जाऊ दे. असला विचार तुमच्या मुलांना करायला शिकवणार का?
एक reaction म्हणून तिरिमिरीत स्त्री पुरुष समानता आचरणात आणणे symbolic असते. Proactive काही केले तर मूळ धरते. पण ते इतके continuous and subtle असते की इथे सांगता येणार नाही. हा मोठाच तोटा! मग काय निवडणार?

हे काहीच न केल्या चे मोठ्ठे फायदे असतात. सगलयात मोठा फायदा - आम्ही तर आमच्या मुलीला मुलगी म्हणून काहीच conditioning केले नाही. आता ती जे काय करते ते एकदम स्वतःच्या आवडी ने करते असे सोशल मीडिया वर छातीठोकपणे सांगता येते.

तिथे बापाचे नाव आणि आडनाव आहे त्याचे काय करायचे
>>>

आमच्या पोरांना पुर्ण नावात आई बाप दोघांचे नाव लावायला शिकवले आहे.
आडनाव मात्र माझेच येते. कारण लग्नानंतर बायकोनेही माझे आडनाव घेतले आहे. तिथे उगाच दोन्ही आडनावे सांगून नाव कॉम्प्लीकेटेड करण्यात अर्थ नाही. अन्यथा दर पिढिनुसार ही आडनावे दुपटीने वाढत जातील Happy

आड्नावावरून जात कळते ह् मात्र खरे आहे
पूजेतही उगाच हे गोत्र कूळ वगैरे विचारणे बंद करायला हवे आता..
कोणत्या गोत्र कुळात जातीत धर्मात जन्मणे आपल्या हातात नाही तर कशाला तो अभिमान बाळगायचा किंवा कश्याला तो टॅग आपल्या नावासमोर चिकटवायचा..
आडनावाच्या जागी मेलाअयडीसारखे युनिक नाव लावणे ऊत्तम असे मला वाटते.

स्त्री पुरुष हा भेद तरी निसर्गाने बनवला आहे. त्यामुळे आपण कितीही ठरवले तरी प्रॅक्टीकली टोटल समानता अशक्य आहे..
पण हे जाती वगैरे तर मानवनिर्मित आहेत.. ते अनावश्यक आपण पाळतोय.. जात हा प्रकारच नष्ट करणे शक्य आहे. दुर्दैवाने ते देखील आपल्याला जमत नाहीये. तर आपण काय डोंबलाचा स्त्री पुरुष भेद नष्ट करणार आहोत अजून हजारो वर्षे याच चर्चा चालणार आणि तेव्हाही या विषयावर चर्चा घडवणारयावर टीआरपीचे आरोप होणार..

कारण लग्नानंतर बायकोनेही माझे आडनाव घेतले आहे. >>>>> बरोबर! हे तुम्हाला आणि तिला मान्य झाले हेच ते conditioning. चला बरे झाले ते एक पटले तुम्हाला. स्वतःचे सोडून बायकोचे आडनाव घेता आले असते हे तुम्हाला कळले. पोरांनाही एकच आडनाव झाले असते. नाहीतर काही लोक कॉम्प्लिकेशन नको म्हणून सोयीची सुधारणा करतात आणि जाहिरात करतात. सुपीक जमिनीत कोंभ त्याची गावभर बोंब.

इथे आता टीआरपी चे आरोप स्पेसिफिकली तुमच्यावर होत आहेत की नाही? शिवाय मायबोलीवर तुमच्यावर हे आरोप हटकून होतात की नाही? मग "चर्चा करणाऱ्या सगळ्यांवर टीआरपी चे आरोप होतात" ही चापळुसी नाही करायची गडे!

आता समानतेवर बोलताना निसर्गा ने केलेले भेद बोललात. त्यातही "स्त्री पुरुष" एव्हडेच बोलता. तेव्हड्यात प्रॅक्टिकल समानतेवर पोहोचला सुदधा! sex आणि gender आणि sexual orientation यांच्या फरका बद्दल आणि overlap बद्दल विचार करता की नाही? Gender based असमानता काय काय रुपात आहे हेच माहिती नाही तर प्रॅक्टिकल समानता आणणार कशी?
जनाब खौफ खुद की जाहिलीयत का नही बल्कि इतमाद का रखो। आमचे अब्बू म्हणायचे.

अतिशय किरकोळ प्रश्न मांडले जात आहेत .
एक तर स्वयंपाक घरातच बरेच अडकले आहेत आता नावात अडकले आहेत.
मुलांना ते जसे वागतील तसे वागू देणे हे पालकत्व ची जबाबदारी काय असते हे माहीत नसण्याचे लक्षण आहे.

कारण लग्नानंतर बायकोनेही माझे आडनाव घेतले आहे. >>>>> बरोबर! हे तुम्हाला आणि तिला मान्य झाले हेच ते conditioning. चला बरे झाले ते एक पटले तुम्हाला. स्वतःचे सोडून बायकोचे आडनाव घेता आले असते हे तुम्हाला कळले.
>>>>

आपले सोडून बायकोचे आडवान घेता येते का नक्की? मला माहीत नाही म्हणून विचारतोय. असे करताना कोणी पाहिले नाही ओळखीचे? कायद्यात असे करायची तरतूद आहे का?

आपले सोडून बायकोचे आडवान घेता येते का नक्की? मला माहीत नाही म्हणून विचारतोय. असे करताना कोणी पाहिले नाही ओळखीचे? कायद्यात असे करायची तरतूद आहे का?,

>>>>

कायद्याने कोणीही कधीही काहीही नाव घेऊ शकते

रूनमेष
तुमच्या सासऱ्या ना विचार घर जावई करून घेतात का ते तुम्हाला.
बायकोच्या घरी नांदायला जा बायकोच्या घरी.
पण पाहिले ते तुम्हाला ठेवतात का त्यांच्या घरात ते विचारा.
आणि माय बोली समोर नवीन आदर्श ठेवा.
आणि नाव विषयी म्हणाल तर कोणते ही नावं ,आड नाव ,कोणता ही धर्म तुम्ही स्वीकारू शकता.
फक्त जात बदलता येणार नाही.
आरक्षण चा मामला आहे.

सगळ्या समानतावादी पुरूषांनी दिवाळीची साफसफाई - झाड्लोट करायला सुरूवात करा; आस्तिक-नास्तिक / दिवाळी साजरी करणारे- न करणारे , अग्दी सगळ्यांनी

रूनमेष
तुमच्या सासऱ्या ना विचार घर जावई करून घेतात का ते तुम्हाला.
बायकोच्या घरी नांदायला जा बायकोच्या घरी.
पण पाहिले ते तुम्हाला ठेवतात का त्यांच्या घरात ते विचारा.
आणि माय बोली समोर नवीन आदर्श ठेवा.
>>>>>

हे माझे करून झालेय.
मी नवी मुंबईत आलो तेव्हा महिनाभर राहिलोय सासुरवाडीला घरजावई बनून. त्यानंतर चार वर्षे सासुरवाडीच्या शेजारीच भाड्याने घर घेतले. पण रोज संध्याकाळी पोरांना घेऊन तिथेच पडीक असायचो. यात काही विशेष नाहीये.

सगळ्या समानतावादी पुरूषांनी दिवाळीची साफसफाई - झाड्लोट करायला सुरूवात करा;
>>>>

यावर तर वेगळा धागा निघायला हवा.
ईथे उगाच सगळे विषय एक होत आहेत.

तुम्हाला हवे ते नाव घेउ शकता. उदा princess consuela banana hammock >> मग ऋन्मेष तू आर्यन खान किंवा अबराम जोशी किंवा शाहरूख स्वप्नील खान-जोशी अशी भारी नावे घेऊ शकतोस.

Pages