खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा आता करून दाखवायचे !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 October, 2020 - 05:05

दसर्‍याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्‍यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.

गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.

मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.

अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !

बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा, योग्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद

@ स्वाती,
मी नास्तिक असल्याने मला ते काम वाटते. बायको देवधर्म करणारी असल्याने तिला पूजा योग्य प्रकारे झालेली हवीच आहे.
पण जर शास्त्रातच लिहिले असेल की पूजा नवर्‍यानेच करावी तर तिला मलाच विनंती करणे भाग पडते.

अजून एक उदाहरण - छोट्या मुलाची शांती करायला सांगितली आहे. माझे मत पडलेय काही गरज नाही. तसे मला काही प्रॉब्लेम नसतो ईतरांच्या श्रद्धेचा, पण ती फुकटात होणार नाहीये, पैसे खर्च होणार. म्हणून मला नकोय.
अर्थात घरच्यांनी वा बायकोने माझे काही न ऐकता पैसे खर्च करून ती शांती केलीही असती. पण आता गंमत अशी आहे की मुलाला वडिलांच्या मांडीवर बसवूनच ती शांती करायची आहे. भले आईने नऊ महिने पोटात आणि पुढे दूध पाजताना छातीशी कवटाळून त्या जीवाला वाढवले असले तरीही हा मान बापाचाच ! त्यामुळे नाईलाजाने त्यांना फिरून माझीच विनवणी करावी लागत आहे Happy

दसऱ्याला गुरूजी घरी येतात हे नव्यानेच कळले.
>>>>

दसर्‍याची पूजा करायला नाही हो. आमचे घर नवीन. देव्हारा नवीन. देव नवीन. त्यांची देव्हार्‍यात स्थापना करायची होती. म्हणून त्यासाठी दसर्‍याचा शुभमुहुर्त पकडला. आणि त्या कामासाठी गुरुजी बोलावले.

फोटो टाकू का? कारण हा प्रश्न उगाचच बरेच जणांना पडतोय असे वाटतेय Sad

बाकी हे काम दसर्‍याला करायचे नसते असे काही असेल तर प्लीज सांगा आणि संदर्भ द्या, तेवढेच घरच्यांना चिडवता येईल Happy

>>पण जर शास्त्रातच लिहिले असेल >> शास्त्रात बरेच काही भेदभाव करणारे लिहिलेले असते. ते का प्रमाण मानावे? देवावर श्रद्धा असेल तर , असा भेदभाव देव करणार नाही ही देखील खात्री बाळगावी आणि मनोभावे पूजा करावी.

हो असं उत्तर असेल तर तुझी समानतेची कल्पना तपासून घ्यावीस असं सुचवेन. स्वतःच्या opportunistic कृतीला समानतेचं लेबल नको. खरी समानता रीयाने सुचवली आहे. कोणीच जन्मतः स्वयंपाक शिकून येत नाही. It's an acquired skill. जेव्हा पुढच्या वेळी तू पुजेला बसणार नसशील तेव्हा स्वयंपाकाची तयारी एकाहाती सांभाळ. मग इथे अपडेट दे.

जेव्हा पुढच्या वेळी तू पुजेला बसणार नसशील तेव्हा स्वयंपाकाची तयारी एकाहाती सांभाळ. मग इथे अपडेट दे.
>>best ahe he.

पूजेत गोत्र सांगावं लागतं, कुणाचं सांगितलं >> Runmesh can answer for himself.
I tell my dad's since i have been knowing that as my own since childhood. I wont mind my mom's parents either as i identify myself more as that family.
Runmesh can answer for himself.
His story is not at all well created. Lol

मला एक वेगळाच प्रश्न या संदर्भात उपस्थित करायचा आहे.माझ्या ३ बहिणी आहेत. परदेशी असतात. त्यांना हवं तेव्हा माहेरपणाला भारतात घरी येतात. सासरी फारश्या जात नाहीत. दोन्ही कडची कोणतीच जबाबदारी कधीच त्यांना घ्यायची नसते.आई-वडिल काहीच बोलत नाही.तर हे योग्य आहे का?

देवपुजेला बसल्यानंतर मंत्रपठण सुरू असताना दमछाक होणं, घशातून आवाज फुटायचा बंद होणं, शरीरातील त्राण निघून जाणं, धूप-उदबत्ती सहन न होणं, कोण काय म्हणतंय-बोलतंय हे न समजणं ही सगळी अंगात भूतबीत शिरल्याची लक्षणं आहेत. एकदा चेक करून घ्या. Lol Light 1 घ्या.

जेव्हा पुढच्या वेळी तू पुजेला बसणार नसशील तेव्हा स्वयंपाकाची तयारी एकाहाती सांभाळ. मग इथे अपडेट दे. >> अरे काय हे... त्याच्याकडून कशाला अपडेट मागताय?? जे जेवले त्यांच्याकडून मागा... Happy Wink भेळ-बिळ करतो की तो...

I wont mind my mom's parents either as i identify myself more as that family. >> Happy मग माशी कुठे शिंकते ?? Happy

हे धागे पाहिले की मला कोण जाणे पण Kardashians आठवतात.. >>असं नाही म्हणायचं बरं Wink Light 1 ... Keeping up with Kardashians सोपे आहे. Keeping up with Runmesh म्हणजे कश्याला... Wink

Kardashians अतरंगी आहेत पण लई भन्नाट बिझनेसवीमेन आहेत...

>>>>दोन्ही कडची कोणतीच जबाबदारी कधीच त्यांना घ्यायची नसते.आई-वडिल काहीच बोलत नाही.तर हे योग्य आहे का?>>> जबाबदारी घेत नसतील अर मग प्रॉपर्टीत वाटाही मागू नये हेमावैम.

शास्त्रात बरेच काही भेदभाव करणारे लिहिलेले असते. ते का प्रमाण मानावे?
>>
श्रद्धा आणि विश्वास ! एकदा मानले की मग वाद नाही घातले जात.

कोणीच जन्मतः स्वयंपाक शिकून येत नाही. It's an acquired skill. जेव्हा पुढच्या वेळी तू पुजेला बसणार नसशील तेव्हा स्वयंपाकाची तयारी एकाहाती सांभाळ. मग इथे अपडेट दे.
Submitted by जिज्ञासा on 29 October, 2020 - 20:25
>>>>>>

माफ करा, पण मला ही ठोकळेबाज समानता वाटते. म्हणजे स्वयंपाक ही कला आहे. एक छंद आहे. जर मला तो जमत नसेल आणि मला त्याची आवडही नसेल तर मी उगाच स्त्री पुरुष समानता दाखवायला म्हणून स्वयंपाक करावा का? त्यापेक्षा मी ती कामे करेन जी मला जमतात आणि स्वयंपाक माझ्या बायकोला आणि आईला करू देईन ज्यांना तो चांगला जमतो आणि विविध पदार्थ करायची आवडही आहे. टोटल घरकामे आम्ही वाटूनच घेतो. फक्त ज्याला जे छान जमते त्याने ते करावे यालाच सहजीवन म्हणतात ना? उगाच सगळी कामे अर्धी अर्धी करण्यात काय हशील आहे?

बाकी कालच भेलचा छान फोटो टाकलाय बघा खाऊगल्लीवर. रावडाचिवडा मसालाभात आणि मॅगीचे धागे आहेत माझे माबोवर. घरी जेव्हा मॅगी बनते तेव्हा मीच करतो, जेव्हा कॉफी बनते तेव्हा मीच करतो. भूक लागली की माझे मी हाफफ्राय बनवून खातो. जे जमते ते करतोच. पण उगाच समानता दाखवायला म्हणून सणाच्या दिवशी माझ्या हातचे कच्चेपक्के जेवण लोकांना खाऊ घालण्यात काय हशील आहे?

>>>>उगाच सगळी कामे अर्धी अर्धी करण्यात काय हशील आहे?>>> अस्कसं अस्कसं Wink केल्याने होत आहे रे .......काम केले तरच शिकाल ना.

पूजेत गोत्र सांगावं लागतं, कुणाचं सांगितलं?
>>>>
या पूजेला बहुधा नाही विचारले. वास्तुशांतीला विचारले असावे.
असो, मला नाही आठवत, माझा जात धर्म गोत्र कुळ वगैरे कश्यावरच विश्वास नाही आणि माझे ते काय आहे हे जाणून घेण्यात वा लक्षात ठेवण्यात मला रस देखील नाही. असे काही विचारले की मागून आईवडील उत्तर देतात.

अस्कसं अस्कसं Wink केल्याने होत आहे रे .......काम केले तरच शिकाल ना.
>>>>>>
आता मी रात्री बारा साडेबारापर्यंत ऑफिसचे काम करून आता मायबोलीवर आलोय. बायको कधीचेच जेवण उरकून गेले दोन तास मस्तपैकी स्टारगोल्डवर छिछोरे बघतेय. मी सुद्धा आता शेवट बघतोय ईथे लिहिता लिहिता. तर मी असा विचार मनात आणू का की बरेय हे जेवण बनवायचे काम, उरकले लगेच आणि बसली पिक्चर बघायला. आणि मी ईथे मरमर काम करतोय उद्याची डेडलाईन फॉलो करायला… मुळीच नाही. उलट तिने छान अंडा बिर्याणी बनवली, मी कौतुक करत खाल्ली. उगाच स्त्री पुरुष समानता दाखवायच्या नादात का सुखासुखी लाईफ कॉम्प्लिकेटेड करू … असो, कौतुकाने त्या बिर्याणीचाही फोटो काढलाय. तो पुराव्याला टाकू शकतो Happy

नवीन घराच्या शुभेच्छा ऋन्मेष.

आमच्या वाई च्या अभ्यंकर गुरुजींनी अनेक स्त्रियांना आणि सर्व जातीच्या माणसांना शिकवले.
ज्याची इच्छा असेल त्या प्रत्येकाला मी शिकवेन असे ते म्हणायचे.
देव सगळीकडे (जात, लिंग भेद न मानता) जातो , तर वेद का जाऊ शकत नाहीत, असेही म्हणायचे.
हे त्यांनी खूप पूर्वीपासून केले. >>>वाह, ग्रेट. स्तुत्य विचार.

माफ करा, पण मला ही ठोकळेबाज समानता वाटते. म्हणजे स्वयंपाक ही कला आहे. एक छंद आहे. जर मला तो जमत नसेल आणि मला त्याची आवडही नसेल तर मी उगाच स्त्री पुरुष समानता दाखवायला म्हणून स्वयंपाक करावा का? >> नाही, तुला आवड नसेल तर नको करूस स्वयंपाक. पण तुला जमत नसेल तर चांगला स्वयंपाक शिकून मात्र घे. आणि तुला रोज स्वयंपाक कर असं नाहीच सांगितलं. ज्या दिवशी पूजा असेल त्या दिवशी तरी किमान स्वयंपाक कर असं सुचवलं आहे.
जेव्हा गुरुजी आणि यजमान थोडं गरम पाणी हवंय, गुरूजींनी चहा चालेल, मध आहे का, प्रसादाचा शिरा कुठे आहे नैवेद्य दाखवायची वेळ झाली असे सांगतात तेव्हा योग्य त्या गोष्टी तयार ठेवायला स्वयंपाकघरात कोणीतरी काम करत असतं. नाहीतरी तू अश्रद्ध मनाने आणि केवळ उपचार म्हणून गंधफूलेअक्षता वाहणार. या half-hearted कर्माचं फळही तसंच मिळणार. त्यापेक्षा तुझ्या बायकोची जर देवावर श्रद्धा आहे तर तिने पूजेचे यजमानपद घ्यावे हे छानच आहे. If you are ready to switch roles then take up her role. जर तुला आणि तुझ्या बायकोला असं वाटत असेल की तिने पूजेला बसावं तर त्या दिवशी ही एक आघाडी तू सांभाळ. आईवर जबाबदारी टाकून समानतेचे धागे काढू नकोस एवढंच सुचवायचं आहे.
नीट शिकलं तर कोणीही बऱ्यापैकी स्वयंपाक करू शकतं. उद्या तुझ्या बॉसने मला चार दिवस स्वयंपाक करून दाखव असं सांगितलं तर त्यालाही कला वगैरे बहाणे सांगशील का?

उगाच स्त्री पुरुष समानता दाखवायच्या नादात का सुखासुखी लाईफ कॉम्प्लिकेटेड करू …>> इथेच सगळं गाडं अडलंय स्त्री पुरुष समानतेचं! मी मला सोयीचं वाटेल तेवढंच करणार आणि त्यालाच समानता म्हणणार! खरी स्त्री पुरुष समानता दाखवायची झाली तर लाईफ कॉम्पिकेट करावे लागेल ना मग नकोच ते! आणि हे फक्त मी पुरूषांना उद्देशून म्हणत नाहीये हे स्त्री पुरुष दोघांच्याही बाबतीत दिसून येतं.

रुणमेष ग्रुप ऑफ आयडीज म्हणजे कार्डा शिअन्स हे जाम आवडले आहे. ह ह पुवा. कौतिकाची चार फुले वाहा आणि पुढे चला. बाफचा अजून काही उद्देश नाही स्टिल लाफिन्ग.

भूक लागली की माझे मी हाफफ्राय बनवून खातो >> 'माझे' हाफफ्राय वाचून पक्ष्याला त्याच्या वजनाइतके स्वतःचे मांस काढून देणाऱ्या शिबी राजाची गोष्ट आठवली. नंतर लक्षात आलं, ऋन्मेषच्या बाबांना हाफफ्राय हे 'माझे मी बनवून खातो' असं म्हणायचं आहे! शब्दांची ऑर्डर पुढे-मागे झाल्याने अर्थघोटाळा झाला.

मग माशी कुठे शिंकते ?? Happy >> its d same way i dont go out of d way to change- my surname to my maternal grandparent's.
Also since both my parents use same gotra and surname - i use d same.
When i pray everyday, i call all 3 kuldaivatas as my own. (Mom, dad and husband). More d merrier Happy

Jidnyasa - bang on.
Runmesh ,इंटरेस नसलेल्या बाईला कोणी विचारत नाही,
" पूजा आहे तू स्वयंपाक करशील का? "
तिचा देवावर विश्वास असो वा नसो, स्वयंपाक आवडो वा ना आवडो, नोकरी करत असो वा नसो स्वयंपाक करावेच लागते जबाबदारीने.
त्यामुळे, जिज्ञासा म्हणते त्याप्रमाणे , बायकोला पूजेला बसवून स्वयंपाकाची जबाबदारी घेऊन - एक आदर्श घालून देच तू समस्त पुरुषांना. Happy

तिचा देवावर विश्वास असो वा नसो, स्वयंपाक आवडो वा ना आवडो, नोकरी करत असो वा नसो स्वयंपाक करावेच लागते जबाबदारीने.
>>> जनरलायझेशन नको.. भरपूर बायका आहेत या जगात जे हे काहीही करत नाहीत...

जेव्हा गुरुजी आणि यजमान थोडं गरम पाणी हवंय, गुरूजींनी चहा चालेल, मध आहे का, प्रसादाचा शिरा कुठे आहे नैवेद्य दाखवायची वेळ झाली असे सांगतात तेव्हा योग्य त्या गोष्टी तयार ठेवायला स्वयंपाकघरात कोणीतरी काम करत असतं. >>
लिस्टीत गोमूत्र पण प्लीज टाकावे. लहान बाटलीत कुणी रस्त्यावरच्या गाईच आणतं, कधी गवळी देवून जातो, कधी सीलबंद बाटली दुकानातून येते. कसं ही आलं तरी ऐनवेळी ते बाथरूम मध्ये ठेवलं की देवघरात की फ्रिजमध्ये इ आठवायला एक माणूस लागतं...भटजी अक्षत वहायला लावतात मग माऊलीला गोमूत्र कुठे ते आठवतं... शास्त्र असतं ते!!

@ जिज्ञासा,
बायकोला पूजेला बसायची संधी देण्यास जेवणाचे मीच बघितले पाहिजे असे का गरजेचे आहे? जर मला ती गोष्ट येत नसेल आणि आईवरही तो भार टाकायचा नसेल वा ती उपलब्ध नसेल तर जेवण ऑर्डरही करू शकतोच. वा स्वयंपाकी बोलावू शकतो.

आणि प्रश्न लाईफ कॉम्प्लिकेटेड करायचा नसून अनावश्यक कारणासाठी गरज नसताना कॉम्प्लीकेटेड करायचा आहे. म्हणजे सारी घरकामे आम्ही ज्याला जे चांगले जमतेय त्यानुसार निम्म्मी निम्मी केली आहेत. पण फक्त उगाच लोकांना वाटू नये की स्वयंपाक हे काम हा कसा घरच्या बाईवरच ढकलतोय याने त्यातही अमुकतमुक वाटा उचलायला हवा. म्हणून लोकांना दाखवायला मी तो वाटा उचलणे गरजेचे आहे का?

किंबहुना माझ्या बायकोलाही स्वयंपक येत नसता वा तिला आवड नसती तर आम्ही रोजच्यासाठीही स्वयंपाकी ठेवला असता. किंवा ते परवडणारे नसते तर प्रत्येकाला दोघांनी जमेल तसा वाटा उचलला असता. ज्याला त्यातल्या त्यात जास्त चांगले जमले असते त्याने जास्त वाटा उचलला असता.

जरा खोलात विचार केलात तर जाणवेल की ज्या पुरुषाला स्वयंपाक येत नाही त्याच्यावर तुम्ही सरसकट असा शिक्का मारत आहात की तो स्त्री पुरुष असमानता करतोय.

असो,
मला वाटते हाच आपला एक मेंटल ब्लॉक आहे की चूलमूल वर्षानुवर्षे बाई सांभाळतेय तर जेव्हा या दोन्हीत घरचा पुरुष अर्धा वाटा घेईल तेव्हाच ती समानता नाहीतर त्याचे ते ढोंगच. मग बाकी तो घरातली लाख कामे करू दे त्याला अर्थ नाही. स्वयंपाकच करायला हवा. जमत नसेल तरी शिकायला हवा. आवड नसेल तर लाऊन घ्यायला हवी. पण स्वयंपाक केला पाहिजेच.

किती ती जज करायची घाई असे नाही वाटत का?

हे मी माझ्या पर्टीक्युलर केस साठी नाही तर समस्त पुरुष जातीच्या वतीने लिहितोय

तिचा देवावर विश्वास असो वा नसो, स्वयंपाक आवडो वा ना आवडो, नोकरी करत असो वा नसो स्वयंपाक करावेच लागते जबाबदारीने.
>>> जनरलायझेशन नको.. भरपूर बायका आहेत या जगात जे हे काहीही करत नाहीत..

>>>>>>

+७८६
च्रप्स
जर कोणी बाईवर ईच्छेविरुद्ध स्वयंपाक लादत असेल तर ते चूकच.
पण तिने आपल्या आवडीनुसार घरकामाचे वाटे करताना स्वयंपाक आपल्या वाट्यात घेतला हि शक्यता असूच शकत नाही असे गृहीत धरूनच हि स्वयंपाकाची चर्चा चालू आहे असे वाटते.

ईथे बाईची ईच्छा नसेल तर ती मुलाला जन्मही देत नाही हल्ली तर हे स्वयंपाक जबरदस्ती करायला लावणे वगैरे गेला तो काळ.

Runmesh
स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?
पुरुष आणि स्त्री
पती पत्नी असतात
आई मुलगा असतात
बहीण bhavu असतात.
मित्र मैत्रिणी असतात.
प्रियकर प्रेयसी असतात.
सहकारी असतात .
मुलगी आणि बाप

ह्या सर्व नात्यात समानता कोठे नाही?
आई ही परमेश्वर पेक्षा पण जास्त आदरणीय व्यक्ती असते असे पुरुष मानतात.
आई हीच जननी असते आणि पूजनीय असते हेच पुरुष समजतात.
बहीण साठी स्वतःच्या जीवाचे बलिदान करणारे पुरुष कमी नाहीत.
स्त्री चे संरक्षण हे बहिणी म्हणून च केले जाते.
मुलगी ही पित्या साठी अतिशय प्रिय असते मुला पेक्षा मुलगी पित्याच्या जास्त जवळ असते .
नक्की स्त्री समानता runmesh
तुला कोणत्या नात्यात हवी आहे

Pages