खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरम भात, आंबट टोमॅटो डाळ (तामिळ) ~~ मस्त यम्मी दिसती आहे डिश!
सा.खि. आॉ.टा.फे आहे.. पण हिरवा रंग मस्ट.. कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. VB दाणे कुट आणि पूर्ण दाणे मस्त वाटतायत.
हा लहान (मिनी) साबुदाणा आहे का.. नेहमीच्या पद्धतीने करायचा की कसा..

नेहमीचाच साबुदाणा आहे. मला साखि थोडी जास्त शिजलेली हलकीशी चिकट अशीच आवडते, सो मम्मा तशीच बनवते.
मध्ये मध्ये मस्त तळलेले/भाजलेले अख्खे शेंगदाणे छानच लागतात. जर बटाटा घालायचा असेल तर तोही वाफेवर तेल्/तुपात शिजवतो, ऊकडलेला नाही घालत आम्ही

जर बटाटा घालायचा असेल तर तोही वाफेवर तेल्/तुपात शिजवतो, ऊकडलेला नाही घालत आम्ही >> मला पण Happy
मला साखि फार आवडते पण शेंगदाण्याने त्रास होतो Sad .
गरम भात, आंबट टोमॅटो डाळ (तामिळ) ~~ मस्त यम्मी दिसती आहे डिश! >>+१०००
मृणाली , रेसिपी काही विशेष आहे का?

नाही हो साधीच डाळ आहे तुरीची, चिंच टोमॅटो घालून करतात..
गंमत म्हणून तामिळ मधे लिहिले Happy

साखि माझी पण फेवरेट..
पण दाण्याचा कुट,बटाटा, जास्त तेल खूप हेवी होते म्हणून सहा महिन्यातून एकदा बनवते.

काल सकाळी दोन मस्त पाँफ्रेट आणले होते. पण कालचं संध्याकाळचं पावसाळी वातावरण बघून संध्याकाळीच ग्रिल्ड तंदुरी बनवायचा मूड आला.
आधी मॅरिनेशन मग गॅसवर स्काॅच बर्निंग आणि मग ग्रिल...


संडे होमवर्क. यावेळेस खूप कष्ट करून दसर्‍याला सणाचा संपूर्ण स्वयंपाक मी बनवला. अर्थात तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली. नेहमी त्यांना मी स्वयंपाक घरात येउही देत नाही. पण या वेळेस जरा रिस्की होते. श्रीखंड अगदी चक्का घरी तयार करण्या पासून. पुरी, भाजी, कोशिंबीर, चटणी, वरण भात आणि खेकडा भजी. मजा आली.
IMG-20201025-WA0119.jpg
टाइम मॅनेजमेंट जरा गंडल पण तज्ञ मंडळींनी नंतर फटाफट उरलेल्या पुर्‍या करून गाडी टाइमात पोचवली. Happy

विक्रमसिंह
नाव बदलुन "विक्रमादित्य" करा.....सगळच राजेशाही चाललय म्हणुन. ........जबरदस्त !!!

Pages