खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स रूचा.
या आमच्या कडे डोसे खायला. Happy

पिन्कि, मी ३ वाटी तांदूळ + १ वाटी व्होल उडद डाळ असे घेते +अर्धा छोटा चमचा मेथीदाणे.
3 तास भिजवते,चार-पाच तास फरमेन्ट करते.(ओव्हरनाईट फर्मेन्टेशन नाही करत, त्याने दुसर्या दिवशी थोडे आंबटसर होतात म्हणून.)
ग्राईंड करताना त्यात दोन टेबलस्पून शिजवलेला भात घालते. (भिजवताना नाही) छान रंग येतो आणि चव पण छान लागते.

मृणाल तांदूळ कोणता.
व्होल उरद दाल मीही वापरते.
माझी टाटाची आहे.
महाग आहे बरीच.
पण माझ्या इडल्या त्यानेच सॉफ्ट आणि फ्लफी होतात.

मी अर्धा इडली राईस आणि अर्धा रॉ राईस घेते (रॉ राईस-रेशनवर मिळतो त्या टाईपचा तांदूळ ज्याचा आपण भात बनवू शकत नाही पण डोसे छान बनतात.)

@kazumi nawin aahaat na? Chhan foto.warcha I'd hi tumchach ka? Japanese aahe watata
@ lawanya biryani apratim

लावण्या, मटण अन रस्सा अप्रतिम, तोपासू, अगदी लालगाळू प्रकार, भाकरी किंवा इडली/उंडया सोबत भारी लागेल.

बिर्याणी पण छान, तरी बिर्याणी प्रकार इतकासा आवडत नाही,

मटण रस्सा खरच भारी

सगळे पदार्थ एकदम भारीच दिसतायत.. बुधवार सार्थकी लागला.. खाऊगल्लीत आल्यासारखे वाटले.. हळूहळू दिवाळीचे पदार्थ पण यायला लागतील..

Kuzumi सुरमई फ्राय मस्तच..

लावण्या मटन एकदम झणझणीत, बिर्याणी तोंपासु...

Lovely आकाशी रंगाचा गुलाबजाम केक सही दिसतोय माऊमैया...

@ श्रवू, हा केक दिसतो का बघा...
बाहुली नकली आणि विकतची आहे...
बाकीचे सारे घरगुती आणि हवे तेवढे खाऊ शकता...
स्ट्रॉबेरी फ्लेवर..
हे काम अर्थातच माझे नसून बायकोचे Happy

1603916241093.jpg1603916268726.jpg

हो मानसी
मला जे नाव हवं होतं ते available नव्हत म्हणून जपानी मध्ये लिहिले. नाव बदलले तरी वर ते जपानी मधलच नाव दाखवत आहेत.

मृणाली धन्यवाद

Bhelpuri मस्त दिसतेय

कशाला उघडला मी आज हा धागा.
आज तो गुरुवार हय. उपास के दिन मांसाहार देखके तोंडको पाणी आया तो चलता क्या????

जेम्स बॉण्ड फक्त ते तोंडाला आलेले पाणी गिळायचे नाही.. मग चालतंय कि.. आणि ते सगळे पदार्थ कालचे आहेत.. उपवासाला कालचं परवाच चालत नाही..

मी अर्धा इडली राईस आणि अर्धा रॉ राईस घेते (रॉ राईस-रेशनवर मिळतो त्या टाईपचा तांदूळ ज्याचा आपण भात बनवू शकत नाही पण डोसे छान बनतात.)>>ओह्ह ओके धन्यवाद

Pages