बाईचे घर कधी तिचे का नसते ?

Submitted by दिव्या१७ on 10 October, 2020 - 09:14

आजच एका वॉट्सअप ग्रुप वर एका मैत्रिणीने तिच्या शेजारची कथा सांगीतली, तिची शेजारीन रडत रडत तिच्या घरी आली कारण काही कारणांमुळे घरात भांडण झाले आणी तिच्या नवर्याने निघून जा माझ्या घरातून म्हणून तिला बाहेर काढले आणी दार बंद करून घेतले, ती मैत्रिणीकडे भावाला फोन करण्यासाठी आली होती तिचा मोबाईलही घरातच होता. त्या बाईने भावाला फोन केला, भाऊ ऑफिसला असल्याने संध्याकाळी येतो म्हणाला तोपर्यंत ती बाई मैत्रिणीकडे होती, भाऊ आला आणी त्याने तिच्या नवऱ्याला समजावून पहिले आणी नंतर बहिणीला घरी घेऊन गेला.

कारण काहीही असुद्या नेहमी नवराच का बायकोला निघून जा तुझ्या घरी सांगतो? आजकाल समाजात बरीच सुधारणा झाली आहे पण तरी बर्याच घरात हे चित्र दिसून येते, अगदी बाई कमवणारी असेल तरीही, आणी बायका ही कशाला उगाच जगाला दिखावा म्हणून सगळे सहन करत असतात, काहींना माहेरचा सपोर्ट नसतो, एकटे कुठे जाणार म्हणून परत नमते घेऊन संसाराला लागतात, पण ती गोष्ट कुठेतरी मनात खुपत असते. आजकाल बाईने एकटे राहणे ही सेफ राहिले नाही.

यावरून प्रश्न पडतो बाईचे खरे घर कोणते? माहेरचे म्हणतात तुझ्याघरी, नवरा म्हणतो जा तुझ्याघरी पण ते घर कुठले? lockdown मुळे तर ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत , म्हणून यावर चर्चा.

Group content visibility: 
Use group defaults

इथल्या पोस्ट्स खूपच चांगल्या आहेत.

'स्त्री स्वतंत्र झाली तेवढी बस झाली, आम्ही शिकू देतो, नोकरी करू देतो तर अजून काय पाहिजे', हा दृष्टिकोन बघितला की वाईट वाटतं. अजून किती पल्ला बाकी आहे ते कळतं. Sad

चॉईसचा मुद्दा तर पटलाच.

स्त्री ला हक्क हवेत म्हणजे तो लढा पुरुषांशी नाही.
स्त्री चे हक्क मागायचे तर पुरुष हा खलनायक ठरवणे हे नाही.
स्त्री वादी म्हणजे पुरुषांचा द्वेष असा अर्थ नाही.
समान जबाबदाऱ्या आणि समान कर्तव्य स्त्री आणि पुरुषांनी पार पाडावीत.
स्त्री आणि पुरुष चे सहजीवन म्हणजेच समानता .
असा अर्थ आहे.
काही स्त्री वादी मूर्ख सारखे पुरुष म्हणजे दुश्मन आणि त्यांच्या शी संघर्ष करणे म्हणजे स्त्री वाद असल्या फालतू विचाराचे वाटप समाजात
पसवत असतात.
पण पुरुष हा स्त्री चा दुश्मन आहे आणि त्याच्या पासून मुक्ती हवी असा विचार रुजला तर संघर्ष होईल आणि ह्या मध्ये .मानव जातीचे नुकसान होईल.
पृथ्वी वरील कोणत्याच प्राण्या मध्ये नर आणि मादी हे एकमेकांचे दुश्मन नसतात तर सहकारी असतात आणि ते सहजीवन जगतात.

घर हे कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नाव वर असते.
घरातील सर्व सभासद चे नाव घराच्या मालकी हक्क मध्ये नसते.
पण त्या घरात राहण्याचा हक्क कायद्यनुसार सर्व कुटुंबातील सदस्य ना असतो
नवरा ,बायको.
मुल
आणि सासू सासरे हे कुटुंब झाले.
घर नावावर असणे म्हणजे घर विकण्याचा हक्क असणे असा होतो कोणत्या ही सदस्य ला घरातून बाहेर काढण्याचा हक्क घर नावावर असले तरी कायद्याने प्राप्त होत नाही.

तेच तर

आणि नवर्याने घर बुक केले आहे , किंवा आधीच आहे हे बघूनच बहुतांशी बायका लग्न करतात , मग नाव बायकोचे कसे लागेल ?

चॉईसचा मुद्दा तर पटलाच. >> धन्यवाद चिऊ.

व्यवहार नि व्यवसायाचा प्रश्न असेल की स्त्री-पुरूष समान आहेत. स्त्री-पुरूष भिन्न आहेत आणि आपआपल्या जागी श्रेष्ठ आहेत हा विचार करणार्‍यांसाठी काही प्रश्न -
अन्न-वस्त्र-निवारा ह्या त्याच्या मूलभूत गरजा आहेत. तुझ्या गरजा काय वेगळ्या आहेत?
आर्थिक देणी दिली नाहीत (घरभाडे, वीज बिल इ.) तर त्याच्या सुविधा बंद होतील. तुला बँक, वीजकंपनी स्त्री/पुरूष म्हणून सुविधा देणार आहे काय?
प्रेम-आपुलकी-एकनिष्ठता हे त्याला अपेक्षित आहे. तुला ह्या गोष्टींची अ‍ॅलर्जी आहे??

भिन्न आहेत ते फक्त लैंगिकदृष्ट्या. आणि फार थोड्या व्यवसायात लैंगिकतेचा प्रश्न येतो (उदा: सरोगेट मदर, स्पर्म डोनर इ.) एरवी स्त्री-पुरूष व्यवसायात नि व्यवहारात काय भिन्न आहे ते समजवा मला!!

{स्त्री-पुरूष भिन्न आहेत आणि आपआपल्या जागी श्रेष्ठ आहेत हा विचार करणार्‍यांसाठी काही प्रश्न }
असं इथे कोणी लिहिलंय का?
मी सगळे प्रतिसाद वाचलेले नाहीत. पण जेवढे वाचलेत त्यात दिसलं नाही.

भरतजी, अशा अर्थाचे लिहीले आहे. नाव घेवून कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही. ह्या चर्चेच्या निमित्ताने प्रत्येकाने आपली धारणा तपासावी एवढच...
भरतजी, आपली आधीची पोस्ट छान होती.

तसं नाही मृणाली. हे काय नळावरचं भांडण नाही की आपण झिंज्या उपटणार... सोडूनच देणार. दुसर्‍या धाग्यावर मिळून धमाल करणार. पण मी अवघड किंवा अप्रिय प्रश्न विचारले म्हणून विषय तोडायचा असं कशाला?

ह्या चर्चेच्या निमित्ताने प्रत्येकाने आपली धारणा तपासावी एवढच >>> एक्झॅक्टली! हे काही वैयक्तिक भांडण नाही. कोणावर वैयक्तिक ताशेरे न ओढता वाद-प्रतिवाद करण्याकरताच तर हे धागे आहेत.

स्त्री व पुरूष भिन्न व आपापल्या जागी श्रेष्ठ - ही समानता नव्हे. तसेच समानतेची मागणी होते ती स्त्रिया कमी पडतात म्हणून नाही, तर संधी व हक्क समान नाहीत म्हणून.

घरातली व बाहेरची सर्व कामे आपापल्या जागी श्रेष्ठ वगैरे आहेत आणि ती कोणीही केली तरी सारखेच आहे, दोन्हीकडे स्त्रिया व पुरूषांना समान संधी व हक्क (आणि सेम कामाला सेम पगार Happy ) असायला हवेत - ही समानता आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Separate_but_equal

थॅंक्स फा. 'सेपेरेट बट इक्वल' एकदम चपखल आहे इथे. Happy त्यानिमित्ताने १४ वी दुरुस्ती आणि त्याबद्द्लच्या केसेस वाचनात आल्या.

व्यवहार नि व्यवसायाचा प्रश्न असेल की स्त्री-पुरूष समान आहेत.>> 100% पटले

स्त्री-पुरूष भिन्न आहेत आणि आपआपल्या जागी श्रेष्ठ आहेत हा विचार >> हेही एक प्रकारचे कंडिशनिंगच आहे

समानतेची मागणी होते ती स्त्रिया कमी पडतात म्हणून नाही, तर संधी व हक्क समान नाहीत म्हणून.>> Exactly

<घरातली व बाहेरची सर्व कामे आपापल्या जागी श्रेष्ठ वगैरे आहेत आणि ती कोणीही केली तरी सारखेच आहे, दोन्हीकडे स्त्रिया व पुरूषांना समान संधी व हक्क (आणि सेम कामाला सेम पगार Happy ) असायला हवेत - ही समानता आहे.>
जोवर तुम्ही कुटुंब व्यव स्थेत समानता आणत नाही तोवर बाहेर कितीही समानता असू दे त्याचा उपयोग नाही.

सुरुवात
१. अर्थकारण - आपलं, तुझं आणि माझं. निर्णयांत सहभाग.
२. कौटुंबिक जबाबदार्‍या (यात दोघांचे आईवडीलही आले- ते जबाबदारी ठरतील तेव्हा) उचलण्यात समानता.

या दोन्ही गोष्टींची समान वाटणी होत नसेल तर त्याबद्दलची तुमची कारणं स्पष्ट हवीत आणि स्पष्ट केलेली असावीत. कोणालाही अपराधभावना आणि वरचष्मा नको.
३. मुलांवर समानतेचे संस्कार. उद्या जावई मुलीपेक्षा उंच, मोठा, अधिक शिकलेला ,अधिक कमावता आणि सून या उलट हवी अशी अपेक्षा नको. लग्नाळू असाल तर स्वतःबाबत हा आगह नको.

स्त्री आणि पुरुष दोघे मिळून मुलांना जन्म देतात त्यांचे पालन पोषण फक्त पैसे खर्च करून होत नाही.
त्यांना चांगल्या सवयी लावणे,चांगले संस्कार करणे,त्यांनी शिक्षण,खेळ,छंद ह्या मध्ये चांगली प्रगती करावी ह्या साठी पालकांची भूमिका महत्त्वाची असते.
जिथे दोघे ही पालक नोकरी धंद्या निमित बाहेर असतात.
तेव्हा नवरा आणि बायको एकमेकावर जबाबदारी ढकलत असतात.
तेव्हा नकी स्त्री आणि पुरुष ह्यांची काय भूमिका असावी.
करिअर की मुलांचे संगोपन ह्या प्रश्न मध्ये प्राधान्य कशा ला दिले जावे.
आणि स्त्री आणि पुरुष कोणी ही जबाबदारी घ्यावी असे वाटते.

जोवर तुम्ही कुटुंब व्यव स्थेत समानता आणत नाही तोवर बाहेर कितीही समानता असू दे त्याचा उपयोग नाही. >> +१११ भरत, संपूर्ण पोस्ट आवडली.
जिथे दोघे ही पालक नोकरी धंद्या निमित बाहेर असतात.
तेव्हा नवरा आणि बायको एकमेकावर जबाबदारी ढकलत असतात.>> हे असं व्हायला नको ना खरंतर. ज्या जबाबदार्‍या नको वाटतात आणि टाळणं शक्य आहे त्या घेऊ नयेत. उदाहरणार्थ मुले. मुलांना वाढवणं ही मोठी जबाबदारी आहे आणि जर ती मनापासून शेअर करता येणार नसेल तर घेऊ नये. पण बाकी ज्या छोट्या पण आवश्यक जबाबदार्‍या असतात जसे स्वयंपाक, भांडी घासणे, घराची देखभाल ज्या सतत करणे एका व्यक्तीला बोअर होऊ शकते त्या शेअर करता येतील. जबाबदारी कोणी घ्यावी यामध्ये स्त्री का पुरूष असा प्रश्न पडू नये. दोघेही सज्ञान व्यक्ती आहेत तेव्हा परस्परसंमतीने आणि आदराने जबाबदारी वाटून घ्यावी.

फा, separate but equal च्या लिंकसाठी धन्यवाद! सगळ्या oppressions ना एकाच प्रकारे justify करण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं.
Pay parity चा मुद्दा पण महत्वाचा आहे जो आपल्याकडे फक्त नटनट्यांच्या बाबतीत चर्चिला गेला मध्यंतरी.

आणि स्त्री आणि पुरुष कोणी ही जबाबदारी घ्यावी असे वाटते.>> पुरुषने ऑफ कोर्स. स्पर्म त्याचे आहे. आणि तिने नौ महिने मेहेरबानी करून ते बाळ पोटात वाढवून त्याच्या ओटीत ठेवले आहे. आता पुढचे काय ते त्यानेच बघावे. आहेत हो करणारे. घर त्यांच्या नावावर तर थोडी भांडी धुणी डायपर चेंज मुलाचा फॉर्मुला बनव नॅ व भरव णे खेळायला नेणे, होम वर्क करून घेणे संस्कार करणे त्यानेच करावे ना.

मला तर असा अनुभव आहे स्वतः मुलं विषयी निसर्गतः आई आणि वडील ह्यांना प्रेम असते आणि ते सर्व च प्र्याण्यात दिसते ते त्याच्या मुलाचे संगोपन दोघे मिळून करत असतात.
त्याच्या रडण्याचा,आजारपणाचा त्रास आई वडिलांना होत नाही.
ह्या नैसर्गिक भावना आहेत.
आणि पुरुष आणि स्त्री दोघांच्या एक सारख्या आहेत.
पण मुल ही वडीलान पेक्षा आई ला जास्त attach असतात.
पण संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे
म्हणजेच आई वडिलांना आपल्या वाईट सवयी घरा बाहेर ठेवणे.
आपले मतभेद आणि त्या मधून होणारे भांडण मुलांसमोर करू नये.
त्याच्या साठी वेळ काढणे त्याच्या शी गप्पा मारणे.
इत्यादी.
हे दोघांनी मिळून करणे गरजेचे आहे.
मुल हिंसक होत चालली आहेत.
नैराश्यात जात आहेत .
अशी उदाहरण जगात दिसू लागली आहेत.

पुनरुत्पादन करणे आणि वंश पुढे वाढवणे ह्या साठी आवशक्या ती मानसिक,शारीरिक, जेनेटिक व्यवस्था निसर्गाने केलेली आहे
शेवटी मानवी देह हा पण chemical लोच्या आहे.
तुम्ही काहीच ठरवू शकत नाही जे घडेल ते निसर्गाच्या मर्जी नी.
सेक्स मध्ये मज्जा नसती तर मानव जात कधीच नष्ट झाली असती.
कसलीच मज्जा नसेल ,आकर्षण नसेल तर फक्त वंश वाढवायला कोणी सेक्स केलाच नसता.

ज्या जबाबदार्‍या नको वाटतात आणि टाळणं शक्य आहे त्या घेऊ नयेत. उदाहरणार्थ मुले. मुलांना वाढवणं ही मोठी जबाबदारी आहे आणि जर ती मनापासून शेअर करता येणार नसेल तर घेऊ नये.

+1000

आणि यासाठीच 'आईपणाची नैसर्गिक उर्मी' वगैरे थोतांड सातत्याने expose करणं गरजेचं आहे. 'मला इतकी मोठी जबाबदारी अडीच दशक निभावणं शक्य नाही' हे लक्षात घेऊन मूल होऊ न देणं हेही अतिशय जबाबदार मातृत्व आणि पालकत्व आहे. मुलं जन्माला घालून जबाबदारी न घेण्यापेक्षा तर कितीतरी जास्त.

अरे पण ती उर्मी नैसर्गिक असतेच... काही फेमिनिस्ट बायका सोडल्या तर ( त्यांचे ऑल रेडी सगळे करून झालेले असते आणि मग फेमिनिसम स्वीकारलेला असतो सगळे एन्जॉय करून.)

>>स्पर्म त्याचे आहे. आणि तिने नौ महिने मेहेरबानी करून ते बाळ पोटात वाढवून त्याच्या ओटीत ठेवले आहे. >> मेहेरबानी करुन ओटीत वगैरे टाकले असेल तर त्या ओटीत टाकण्याचा काय तो मोबदला घेऊन त्या बाईने चालते व्हावे. पिरिएड.

अमितव, मी ही असेच काही लिहिणार होतो. मग त्यांनी कुणाची कॉमेंट कोट केलीय हे पाहिले आणि वाटले की हे उपहासाने लीहिले असावे बहुतेक.

मला नाही वाटतं तो प्रतिसाद अमाने सिरीयसली लिहीला आहे. गुड न्यूज सिनेमाची स्क्रीप्ट असल्यासारखा आहे Happy
मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कुणी घ्यावी ह्याला कुकी कटर फिक्स्ड फॉर्म्यूला नाही. आई-बापाने मिळून निर्णय घ्यायचा आहे. मग त्यात आजी-आजोबा, एखादे जवळ रहाणारे नातेवाईक (आत्या, मामा इ) , पाळणाघरे, वेळप्रसंगी बोर्डींग स्कूल असे अनेक पर्याय आहेत. जोडप्याच्या पहिल्या अपत्याला जे चालले ते दुसर्‍या/तिसर्‍याला चालेल असेही नसते. हे टीमवर्क आहे. प्रसंगानुसार निर्णय घेतले जातात.

सनव, +१
कितीही आईपणा किंवा बापपणाची उर्मी असली तरी ती दोन अडिच दशके टिकत नाही कोणाचीच. नंतर मग ती जबाबदारीच असते आणि जर ती निभावून नेण्याची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताकद नसली तर असे पालक हे मुलांचे आयुष्य उध्वस्त करू शकतात. जर फॉस्टर केअरमधल्या मुलांच्या कहाण्या ऐकल्यात तर अनेक आया व्यसनी आणि बापाचा पत्ता नाही असे बेजबाबदार पालकत्व पहायला मिळेल.
च्रप्स, कृपया फेमिनिस्ट बायका म्हणजे अमुक अमुक असल्या व्याख्या टाळा. त्यामुळे समाजाच्या विकासात या स्त्रियांनी दिलेले योगदान कमी होत नाही पण तुमची मानसिकता काय आहे ते मात्र नक्की कळून येते. तेव्हा झाकली मूठ सव्वा लाखाची राहीलेली बरी.

मुलाची मानसिक गरज आणि ती उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती.
मुलाची शारीरिक वाढ आणि त्या साठी उचलायची जबाबदारी.
मुलाची मानसिक जडणघडण आणि त्या साठी उचलायची जबाबदारी.
अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात.
आणि त्या पुरवण्या साठी व्यक्ती ठरलेल्या असतात.

सेक्स ही नैसर्गिक उर्मी. त्यातुन येणारी प्रेग्नंसी हा परीणाम, ही नैसर्गिक उर्मी नाही. प्रेग्नंसीत गर्भाची काळजी आणि नंतर ते अपत्य वाढविण्याची धडपड ही नैसर्गिक उर्मी - वंश सातत्य रहावे म्हणून . त्यात माणसाचे बाळ जगण्यासाठी अधिक काळ आई/कळपावर अवलंबून साहाजिकच ते टिकावे म्हणून मेंदूत रसायनेही त्यासाठी साथ देणारी.
आईपणाची नैसर्गिक उर्मी हे झालेले कंडीशनिंग. पालकत्व ही मोठी जबाबदारी आहे. पूर्वी संततीनियमनासाठी स्त्रीयांच्या हातात काही उपाय नव्हते तेव्हा एकापाठोपाठ एक बाळंतपणे काय आईपणाच्या उर्मीतून होत असत का?

अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात.
आणि त्या पुरवण्या साठी व्यक्ती ठरलेल्या असतात. >> आणि हे सगळं कोणी ठरवलंय बरं?

>>अरे पण ती उर्मी नैसर्गिक असतेच... काही फेमिनिस्ट बायका सोडल्या तर ( त्यांचे ऑल रेडी सगळे करून झालेले असते आणि मग फेमिनिसम स्वीकारलेला असतो सगळे एन्जॉय करून.)>> काहीही.
फेमिनिझम ही विचारधारा आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही फेमिनिस्ट असू शकतात.

बाईने जर घरी 'आई मी किनई एक बिझनेस सुरू करणार आहे त्यात माझे दिवसातले १५-१६ तास जातील, आणि असं किमान १०-१८ वर्ष चालेल बरं का. माझा अर्धा पगार जाईल ह्या बिझनेसमध्ये पण तू बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वर असणार आहेस!' हे म्हणलं तर किती गदारोळ होईल.
पण हेच सगळं बिझनेस ऐवजी भावना कालवलेलं अपत्यासाठी असेल तर किती तिची वाहवा होईल. म्हणजे तिने जरा तरी ऑबजेक्टीवली विचार करून 'आई, नाही पुरला पगार तर गं' म्हणाली तर 'म्हशीला शिंग जड नसतात' अशा आशयाची उत्तरे येतात. आईपणाची परिकथा कधी बंद होणार? आईपण हा समृद्ध करणारा अनुभव आहे हे निश्चित पण काळापरत्वे त्यात थोडी ऑबजेक्टीव्हीटी गरजेची आहे.

>> शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताकद नसली तर असे पालक हे मुलांचे आयुष्य उध्वस्त करू शकतात.>> अगेन उध्वस्त झालं कोणाचं आयुष्य तर होऊदे! व्यसनी आया, बापाचा पत्ता नाही तर नसूदे.
मूल जन्माला घालायचं का नाही हा त्या आई बाबांचा आणि फक्त आणि फक्त आई बाबांचा निर्णय असला पाहिजे. त्यात कु.णी.ही. ना स्टेटने, ना हितचिंतकांनी ना कुणीच किंचितही ढवळाढवळ करू नये. फिजिकल अब्युज/ मेंटल अब्युज झाला तर कायदा आणि सुव्यसस्था आहे काळजी घ्यायला. ती परफेक्ट नाही तर ती करायला काय जे श्रम करायचे ते करू.
किती/ केव्हा मुलं जन्माला घालायची? ती कशी वाढवायची? त्यांना काय बालपण द्यायचं ते आई बाप बघतील. त्यांचे निर्णय स्क्यू करायला इंसेटिव्ह जरूर द्यावे. पण त्यांना जज करू नये. ते मुलांना तुम्हाला आवडतं तसं वाढवत नाहीत तर त्यांच्या मुलांना ताब्यात घ्या, आणि रेसिडेन्शिअल शाळा काढा इ. प्रकार पूर्वी करुन त्याचे भयानक परिणाम दिसले आहेत. जग परफेक्ट नाही, कोणाला चांगला अनुभव येईल, कोणी कठिण काळातुन जाऊन वेगळं परस्पेक्टिव्ह बघुन जग सुधारतील, कुणी त्यातुन कधीच वर येणार नाही. सो बी इट!

सांभाळणे जमत नसेल,स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात भौतिक सुखांचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल.
आपण मुलाला सभाळण्यास सक्षम नसू तर .
मुल न होवून देणे हा निर्णय अतिशय योग्य च आहे.
पण ह्या अशा निर्णय घेणाऱ्या व्यक्ती वृध्द होतील,शारीरिक विकलांग होतील वया नुसार.
तेव्हा त्यांच्या मदतीला काय यंत्रणा असावी.
आपण किती ही नाकारले तरी आयुष्यात हा विकलांग होण्याचा प्रसंग अटळ आहे तो येणारच.
सिंह,हत्ती किंवा अनेक प्राण्यात अशा वृध्द शारीरिक कमजोर सदस्य साठी व्यवस्था असते.
कारण अशा ह्या विकलांग,समाज बांधव चा शेजारी पाजारी,समाज ह्यांना त्रास होणार.
तो त्यांनी का सहन करावा.
ह्या अशा अनाध विकलांग व्यक्ती सरकारी यंत्रणेवर बोजा होणार त्याचा खर्च बाकी लोक का उचलतील.

मूल जन्माला घालायचं का नाही हा त्या आई बाबांचा आणि फक्त आणि फक्त आई बाबांचा निर्णय असला पाहिजे. >> अर्थातच! म्हणूनच तो निर्णय "नैसर्गिक उर्मी" वगैरे ephemeral गोष्टींवर अवलंबून घेऊ नये.

मुल होणे ही नैसर्गिक ऊर्मी च आहे.
ते नाकारणे शक्यच नाही.
सेक्स ची तीव्र इच्छा ही फक्त मुल जन्मास येण्यासाठी च असते.
सेक्स ची ऊर्मी नैसर्गिक पने नष्ट झाली तर मुल जन्माला घालण्याच वेडेपण कोणीच करणार नाही.

मुळातच लग्न, कुटूंबव्यवस्था, आईपण (तथाकथित नैसर्गिक उर्मी वगैरे ) सगळेच overrated आहे. हे असे(च) झाले(च) पाहिजे (च) असा अट्टाहास, सामाजिक दबाव इ.इ. conditioning आहे. उदा. मूल झाले की स्त्रीचे सार्थक इ. मलातरी nonsense वाटते.
इथे मला मातांचा अनादर अजिबात करायचा नाही. पण एखाद्या दुर्दैवी जोडप्याला मूल होत नसेल तर gossip करणे, त्यांना कळत नकळत टोमणे मारणे इ. अतिशय अयोग्य आहे हेमावैम. यामुळे त्यांच्या दुःखात किती भर पडत असेल.

आपण मुलाला सभाळण्यास सक्षम नसू तर .
मुल न होवून देणे हा निर्णय अतिशय योग्य च आहे.
पण ह्या अशा निर्णय घेणाऱ्या व्यक्ती वृध्द होतील,शारीरिक विकलांग होतील वया नुसार>> आपल्याला म्हातारपणी आधार मिळावा म्हणून स्वतः (आर्थिक/मानसिक/सामाजिक/वैचारिक )सक्षम नसताना मूल जन्माला घालणे हा कमालीचा स्वार्थीपणा आहे

हल्लीच्या काळी सेक्स आणि मूल जन्माला घालणं याचा फारसा संबंध राहिला नाही असं ऐकून आहे. It's all outsourced to the labs now !
Sex ची ऊर्मी नष्ट झाली की स्त्री आणि पुरुष एकत्र का येतील?
लग्न तरी का करतील?
एकमेकाशी प्रेमाने का वागतील?
आणि हे सर्व घडलेच नाही तर .
30 ते 40 लाख एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री का खर्च करेल?
तेवढ्या पैशात किती तरी दारू पिता येईल,आणि किती तरी प्रकारची भौतिक सुख विकत घेता येतील.

सेक्स ची तीव्र इच्छा ही फक्त मुल जन्मास येण्यासाठी च असते.>>>

निर्भयावर बलात्कार करणार्यांनी याच कारणासाठी बलात्कार केला होता का? त्याआधी व त्यानंतरचे बलात्काराही यासाठीच झाले व होताहेत का?

उत्तरांची अपेक्षा नाही पण फुकट लिहायला मिळतेय म्हणून आपण काय बरळतोय हे एकदा बघा.

साधना
थोडा विचार केला तर लक्षात येईल.
समाज,कुटुंब,सरकार ,निती ,अनिती.
नैतिकता ,अनैतिकता ह्या कृत्रिम term आहेत.
त्या नैसर्गिक नाहीत.
माणसाला थोडी बुध्दी जास्त असल्या मुळे माणसाचे जीवन सुख कारक होण्यासाठी त्या निर्माण केल्या आणि अमलात आणल्या.
पण उत्पत्ती ही नैसर्गिक आहे ती कृत्रिम ऊर्मी नाही.
माणसाचे जीवन सुखी होण्यासाठी ज्या term निर्माण केल्या आहेत ज्या संस्था निर्माण केल्या आहेत.
त्या तुमच्या अनियंत्रित नैसर्गिक ऊर्मी ला आळा घालण्ाकरिता आहेत.
जेव्हा आजची पिढी त्या संस्था नष्ट करण्यात अग्रभागी असेल तर पुढे काय वाढून ठेवले जाईल त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे.
म्हणून त्या भाषेत माझी पोस्ट आहे.

साधना, +१
मुद्दे उरले नाहीत की असे फाटे फोडले जातात विषयाला. There is no valid argument here.

थोडा विचार केला तर लक्षात येईल.
समाज,कुटुंब,सरकार ,निती ,अनिती.
नैतिकता ,अनैतिकता ह्या कृत्रिम term आहेत.
त्या नैसर्गिक नाहीत.
माणसाला थोडी बुध्दी जास्त असल्या मुळे माणसाचे जीवन सुख कारक होण्यासाठी त्या निर्माण केल्या आणि अमलात आणल्या.>>>>

माणसाचे जीवन सुख कारक होण्यासाठी नाही तर माणसाला माणसावर अंमल गाजवता यावा यासाठी ह्या कृत्रिम टर्म्स निर्माण झाल्या. अंमल गाजवण्यासाठी आपली पार्टी मोठी, आपल्या पक्षात जास्त लोक हवेत ही गरज निर्माण झाली. नवे जीव स्त्री जन्माला घालते, त्यामुळे ती आपल्या कह्यात हवी म्हणून स्त्रीवर मालकीहक्क निर्माण झाला. आणि आज हजारो वर्षानंतरही तो डोक्यातून गेलेला नाही. धाग्याचा विषय हा मालकीहक्क हा आहे.

ह्या संस्था निर्माण होऊन काही फारसे चांगले झालेले हजारो वर्षात दिसलेले नाही. मानवाने त्याला मिळालेली थोडी जास्त बुद्धी वापरून तो जगण्यासाठी ज्याच्यावर अवलंबून आहे त्या पर्यावरणाचा सत्यानाश लावलेला आहे. आज मानवी बुद्धी वापरून निर्माण केलेले कृत्रिम जग ठप्प होऊन पडलेले आहे. आणि हे जग ठप्प करणाऱ्या त्या न दिसणाऱ्या विषाणूवर गेले 10 महिने शोधूनही अजून औषध मिळालेले नाही. जास्तीच्या बुद्धीचा काय उपयोग झाला? हे साथीचे रोग मानव व त्याने पाळलेल्या प्राण्यांवर येतात फक्त, जंगली प्राण्यांना व जंगली झाडांवर कधी आलेले ऐकले नाहीत Happy Happy ह्या जास्तीच्या बुद्धीने निर्माण केलेल्या संस्था मोडल्या तर फारसे वाईट काही होणार नाही.

एक झोम्बि चावला की सगळे झोम्बि होतात

देशाचा पंत प्रधानच संसार सोडून फरारी , त्यामुळे जनतेलाही घर ही क्षुद्र वस्तू आहे असे वाटणे स्वाभाविक आहे

सर्व संस्था ह्या मानवी हिता साठीच आहेत.
निसर्गाचा कायदा बळी तो काम पिळी हा आहे.
ह्या कृत्रिम माणसाने माणसाच्या सुख साठी निर्माण केलेल्या संस्था च मुल,म्हातारी माणसं,कमजोर माणसं ह्यांचे रक्षण करतात त्याच संस्था नष्ट केल्या तर समाजातील कमजोर घटकांचे रक्षण कोण करणार.
माणूस मेला काय आणि जिवंत राहिला काय.
त्याच्या वर अत्याचार झाले काय आणि नाही झाले काय .
ह्याचा निसर्गाला काही फरक पडत नाही.
म्हणून अनेक वर्ष मोठ्या कष्टांनी उभ्या केलेल्या संस्था नष्ट करण्याच्या भानगडीत अपुऱ्या विचाराने करू नका.

मुले जन्माला घालू नयेत असे तावातावाने म्हणणाऱ्या किती बायका आहेत इथे की ज्यांनी स्वतः मुले जन्माला घातली नाहीत?
हाच माझा मुद्दा होता...सगळे करून सावरून, मदरहुड एन्जॉय करून झाले.. चला आता फेमिनिस्ट बना...
नवीन पिढीला उपदेश द्या की मूल जन्माला घालणे कसे चूक...

Pages