बाईचे घर कधी तिचे का नसते ?

Submitted by दिव्या१७ on 10 October, 2020 - 09:14

आजच एका वॉट्सअप ग्रुप वर एका मैत्रिणीने तिच्या शेजारची कथा सांगीतली, तिची शेजारीन रडत रडत तिच्या घरी आली कारण काही कारणांमुळे घरात भांडण झाले आणी तिच्या नवर्याने निघून जा माझ्या घरातून म्हणून तिला बाहेर काढले आणी दार बंद करून घेतले, ती मैत्रिणीकडे भावाला फोन करण्यासाठी आली होती तिचा मोबाईलही घरातच होता. त्या बाईने भावाला फोन केला, भाऊ ऑफिसला असल्याने संध्याकाळी येतो म्हणाला तोपर्यंत ती बाई मैत्रिणीकडे होती, भाऊ आला आणी त्याने तिच्या नवऱ्याला समजावून पहिले आणी नंतर बहिणीला घरी घेऊन गेला.

कारण काहीही असुद्या नेहमी नवराच का बायकोला निघून जा तुझ्या घरी सांगतो? आजकाल समाजात बरीच सुधारणा झाली आहे पण तरी बर्याच घरात हे चित्र दिसून येते, अगदी बाई कमवणारी असेल तरीही, आणी बायका ही कशाला उगाच जगाला दिखावा म्हणून सगळे सहन करत असतात, काहींना माहेरचा सपोर्ट नसतो, एकटे कुठे जाणार म्हणून परत नमते घेऊन संसाराला लागतात, पण ती गोष्ट कुठेतरी मनात खुपत असते. आजकाल बाईने एकटे राहणे ही सेफ राहिले नाही.

यावरून प्रश्न पडतो बाईचे खरे घर कोणते? माहेरचे म्हणतात तुझ्याघरी, नवरा म्हणतो जा तुझ्याघरी पण ते घर कुठले? lockdown मुळे तर ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत , म्हणून यावर चर्चा.

Group content visibility: 
Use group defaults

पुरुषांच्या बाबतीत काही कजाग महिला असतीलही, पण पीडीत स्त्रिया आणि पुरुष टक्केवारीत खुप फरक आहे. त्यामुळे कृपया चर्चा भटकवू नका. >> ओके, माफ करा. मला वाटले माझा मुद्दा चर्चेशी रिलेवंट होता. असो. पुढील चर्चेसाठी तुम्हाला शुभेच्छा!

हायझेनबर्ग तुम्ही लगेच ऑफेंड होता राव.
तुमचा मुद्दा बरोबर आहे, मी पण तेच बोलतोय.
थोडा वेळ द्या बाकी लोक पण हेच म्हणतील.

हामझेनबर्ग, कटप्पा.......सहमत

का नाही हि पण दुसरी बाजू असूच शकते कि..
माझी एक मैत्रिण, 35शीच्या आत तीचे स्वतः चे स्वतःच्या नावावर घर आहे. तीचे नवर्याचे भांडण झाले कि ती म्हणते...चालता हो माझ्या घरातून.

मृणाली _/\_
आणि त्या नवर्‍याला तिने रस्त्यावर काढले की त्याला रात्री-बेरात्री आईच्या/भावाच्या घरी जायची भीती वाटते का? का त्याला कुठे सोन्याची पाटली ठेवून एक रात्र हॉटेलात चेक-इन केलं तर उद्या शेजार-पाजारचे, माहेरचे लोक काय म्हणतील ह्याची काळजी वाटते? का जर परत तास-दोन तासाने घरात गेलो तर ती मारहाण करेल आणि मी बचाव करू शकणार नाही अशी शंका येते... का कुठे मित्राबरोबर दारू ढोसून रात्र घालवली तर सकाळी ऑफीसात हँगओव्हरची चिंता वाटते????

Submitted by हायझेनबर्ग on 12 October, 2020 - 00:03 >>> +१११

मलाही वाटते की नाण्याला दोन बाजु असतात, दोन्ही कळायला हव्या.

स्त्रीमुळे पुरुषाला झालेला त्रास पाहिलाय अन पुरुषामुळे स्त्रीला सुद्धा. स्त्रिया जास्त व्हिक्टीम असतील पण त्यांच्या बाजुने कायदे भरपुर आहेत. अन त्याचा गैरफायदा घेतलेल्या बायका बघीतल्या आहेत. गरजेनुसार टिप गाळुन परिस्थितीचा त्यांच्या स्त्री असल्याचा फायदा घेणार्या. सगळ्याच अश्या नसतात पण....

असो,

वरचे ऊदाहरण वाचुन मलातरी वाटते की तिने पुर्ण दिवस शेजार्यांकडे काढण्यापेक्षा, सरळ पोलीसात फोन करायचा होता, घरातही गेली असती, वर एक एनसी करायची नवर्याच्या नावावर. जर कायद्याचा गैरवापर होऊ शकतो तर खरोखर गरजेसाठी का ऊपयोग करु नये?

नवऱ्याने बायकोला घराबाहेर काढले आणि बायकोने नवऱ्याचा छळ केला किंवा त्याला घराबाहेर काढले हे दोन्ही एकाच वादातले मुद्दे असू शकत नाहीत. स्त्रीवरील अन्यायाचे उत्तर पुरूषावरील अन्यायात आणि vice-versa कसे असेल? देव न करो पण जर कधी फॅमिली कोर्टात जाण्याची वेळ आली तर विवाहसंस्था नामक प्रकाराची लक्तरे निघालेली दिसतील. यात स्त्री पुरूष दोन्ही आरोपी आणि पीडित या भूमिकेत दिसतात. स्त्रिया अधिक प्रमाणात पीडित असतात पण त्याचे कारण आपली समाजव्यवस्था आहे ज्यात पुरूषांना अधिक अधिकार आहेत. तेव्हा जर पुरूषांवरील अन्यायाला वाचा फोडायची असेल तर त्यासाठी वेगळा धागा काढला पाहिजे. पुरूषांवरही अन्याय होतो हे सत्य आहे. पण तो स्वतंत्र विचाराचा विषय आहे. It can't be the counter argument for domestic violence against women. स्त्रियांचे घरातील दुय्यम स्थान या विषयावर इथे चर्चा करू.

<<<पण तो स्वतंत्र विचाराचा विषय आहे. It can't be the counter argument for domestic violence against women. >>>+१११

फक्त ईथे वरच्या ऊदाहरणात एकच बाजु कळतीये एव्हढच म्हणन होते

व्हीबी, दुसर्‍या बाजूनी काय माहिती मिळाली म्हणजे नेसत्या वस्त्रानिशी बाईला बाहेर काढणे चूक की बरोबर होते हे तुला ठरवता येईल? एका मैत्रिणीची केस अशी झाली होती पण त्यात सासू जरा बरी निघाली आणि 'तिला असं वार्‍यावर सोडू नको, आपलीच लाज जाते, तिला तिच्या आईच्या घरी पोहोचती कर' म्हणून मुलाला म्हणाली. एक बाई म्हणून इतपत तरी दुसरीला आधार द्यावा.

मागे इथे परदेशातील गावाबद्दल लेख आला होता जे पूर्णपणे स्त्रियांंचे आहे. तिची मर्जी असेल त्यानुसारच पुरुष तिथे वावरू /राहू शकतात. त्या लेखाची आठवण झाली.
कुटुंबाने / समाजाने निराधार केलेल्या स्त्रिया एकत्र येत गेल्याने या गावाची निर्मिती झाली.

सीमंतिनी, नेसत्या वस्त्रनिशी बाहेर काढणे चूकच, म्हणून मी लिहिलंय सुद्धा की तिने तेव्हा लगेच पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी होती. उगा संसार टिकावा म्हणून इतका त्रास, अपमान सहन करणे चुकीचेच आहे. काय अर्थ आहे अश्या संसारात? नंतर त्याने घरात घेतले तरी तो पुन्हा असा वागूच शकतो की? उलट जीवाला धोका होऊ शकतो. मग जर ती योग्य आहे तर का करू नये पोलीस तक्रार? अब्रूचे दाखले तर अजून चुकीचे, लोक तर दोन्ही बाजूने बोलणार. असेही नवऱ्याने घराबाहेर काढली म्हणून चर्चा तर होतेच आपल्या समाजात. मग का सहन करायचे?

अन कारणे म्हणाल तर बरीच असू शकतील, ज्याचा त्रास अनावर होऊन स्त्री असो वा पुरूष दोघेही आपली सद्सद्विवेक बुद्धी विसरून असे वागू शकतील.
आपण विचारही करू शकत नाही अश्या गोष्टी घडतात, अन्यथा गुन्हे घडलेच नसते.
हे सगळे असे इकडे मांडून कळणे कठीण आहे. अन्याय कुणावरही होवो तो होणे अन सहन करणे दोन्ही चुकीचे असे माझे मत आहे,

मला यावर काय लिहावे कळत नाही. पण अजूनही अनेक वर्षांनीही याच प्रकारचे किस्से वाचायला मिळतात हे एक समाज म्हणून दु:खदायक आहे. माझा हा प्रतिसाद एका वर्गापुरता मर्यादित आहे. समाजात अश्या अनेक स्त्रिया वेगळ्या वर्गातल्या आहे ज्यांना इतकाही अ‍ॅक्सेस नाहीये. त्यांचे प्रश्न गंभीर आहेत.
यातले नेसत्या वस्त्रानिशी बाहेर , मोबाईल पण जवळ नसणे वगैरे मुद्दे आपण क्षणभर बाजूला ठेवू. (यात आजूबाजूच्यांची तात्पुरती मदत मिळू शकेल.)
कोणी कोणाला एक क्षणात बेघर करणे, सर्व होत्याचे नव्हते करुन रस्त्यावर आणणे याला काही बेसिक सावध उपाय करता येतील
१. आर्थिक स्वातंत्र्य (आपले कमवत असलेले काही पैसे स्वतःच्या गुप्त जागी/गुप्त अकाऊंट मध्ये ठेवणे.)
२. कमवत नसल्यास आपल्या स्त्री धन/ असेट पैकी काही हिस्सा अत्यंत सुरक्षित ठेवणे, जो विकून/ गहाण ठेवून अडचणीत पैसा उभा करता येईल.
३. शक्य असल्यास नवे घर घेत असताना घरावर आपलेही नाव टाकणे(आणि याबरोबर येणारी जबाबदारी म्हणजेच हप्ते भरण्याचा निम्मा भागही उचलणे.)
४. 'सगळं पैश्याचं, बाहेरचं मॅटर ते बघतात' हा अप्रोच न ठेवता पैश्याची मॅटर आपणही बघावी, त्यात लागेल तो हातभार, (बँक मध्ये जाणे, अमुक गोष्टीला लागणारी डॉक्युमेंट, प्रपोजल याचा अभ्यास करणे, बिलं भरणे इत्यादी.)
५. जनरल मध्ये आर्थिक बाबीतला अभ्यास वाढवणे.
६. स्वतःची विश्वासू संस्था/ ओळखीत भिशी चालू करता आल्यास उत्तम.
७. स्वतःचं ओळखीतून नेटवर्क, त्यातून छोटे मोठे उद्योग चालू करावे. जितक्या अधिक लोकांशी संपर्क तितके अमुक बाबतीत कसे वागावे याचे शहाणपण, अधिक कणखरता येत जाते.
८. 'नवरा/प्रिय व्यक्ती म्हणजे जग' असं नसून एका मोठ्या जगातला तो एक महत्वाचा भाग.
९. अजूनही बाई आणि तिच्याबरोबरचा पुरुष असे कार किंवा घर खरेदी करायला गेल्यास बाई पैसे देणार असली तरी सर्व गोष्टी पुरुषाकडे बघून त्यालाच समजवल्या जातात. सेल्स्मनस/ ऑफीस मधील या ठराविक वागण्याला अनेक कारणं असतात.
अ. बाईला समजावलं तरी तिला कळणार नाही.
ब. बाईला कळलं तरी बरोबरचा पुरुष निर्णय गव्हर्न करेल आणि एनीवे बाईशी बोलायचा उपयोग होणार नाही.
क. बाईला कळलं, पैसे ती देणार असली तरी तिच्याशी थेट बोलणं बरोबरच्या पुरुषाला फ्लर्र्टींग सारखं वाटेल. आणि या सर्व कंडीशनिंग ला त्या लोकांना आलेले काही भूत अनुभव अश्या वागण्याला जबाबदार असतील.
स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात हे कंडीशनिंग बदलायचं आहे. एखाद्या गोष्टीतलं ज्ञान, आत्मविश्वास अनुभवातून मिळवायचा आहे.
(ही स्थिती सर्व मोठ्या शहरांमध्ये अलरेडी बदललेली आहे. तरीही काही तुरळक अनुभव येतात.)
अधिकाधीक स्त्रियांनी शक्य असल्यास स्वतःची प्रॉपर्टी खरेदी करणे. त्यासंबंधित निर्णय, पैश्यांची जमवाजमव स्वतः करणे. मुख्य म्हणजे ग्राऊंड स्टडी वाढवणे.

१०. माहेर वेगळ्या गावात असेल तर निदान एक-दोन दिवस काहीही प्रश्न न विचारता आसरा देईल अशी एकतरी जीवाभावाची मैत्रीण सासरच्या गावात असावी. ज्या गावात आपलं कुणीच नाही तिथे लग्न करण्यापूर्वी दोन वेळा तरी विचार करा.

मी_अनु चांगली पोस्ट.

(ही स्थिती सर्व मोठ्या शहरांमध्ये अलरेडी बदललेली आहे. तरीही काही तुरळक अनुभव येतात.)

घरात white goods घ्यायच्या असतील आणि त्याचा वापर घरातली स्त्रीच करणार असेल, तर त्याबाबतचा निर्णय , घ्यायची की नाही, इथपासून कोण घेतो?
याच्या उत्तरावर पुढला प्रश्न ठरेल

व्हाईट गुडसः (हे एक आपले जवळपास च्या क्लास चे निरीक्षण)
१०००० च्या वरची वस्तू असेल तर पुरुष घेतो. त्याच्या आतली असेल तर निर्णय बाई घेते.
मला स्वतःला इलेक्ट्रॉनिक गुड चे निर्णय घ्यायला आवडत नाहीत कारण अभ्यास नाही, एलेक्ट्रॉनिक शोरुम्स मध्ये निरुद्देश जाऊन अभ्यास करायला आवडत नाही. पण अभ्यास वाढवला तर हे निर्णय मी घेईन.
परत एकदा: व्यासंग वाढणे गरजेचे आहे.

तसा विचार केला स्त्री चा स्वभाव अत्यंत संकुचित असतो.
किती तरी उच्च शिक्षित,श्रीमंत उद्योगपती,बलशाली नेते ह्यांनी ज्या स्त्रिया शी लग्न केले आहे त्या अतिशय सामान्य स्त्रिया आहेत.
ना बुद्धिमान आहेत, ना श्रीमंत आहेत,
तरी पुरुषांनी त्यांना बायको म्हणून स्वीकारले आहे.
तेच उलट स्थिती निर्माण केली तर स्त्री असा गरीब,अशिक्षित,सामान्य जोडीदार निवडूच शकत नाही.
पुरुषांची मैत्री आयुष्यभर टिकते पण स्त्रिया ची मैत्री जास्त दिवस टिकत नाही.
दुसऱ्या चे चांगले त्या बघूच शकत नाहीत.
ट्रेन मध्ये पुरुषांच्या compartment मध्ये जेवढी भांडण होत नाहीत त्या पेक्षा किती तरी जास्त स्त्रिया च्या कंपार्टमेंट मध्ये होतात.
दोन bhavu एकत्र राहतील न भांडता पण दोन बहिणी एकत्र राहू शकत नाहीत.
कटू आहे पण सत्य आहे.

हेमंत 33, तुम्ही इस्टेटीच्या वादातून भावाने भावाचा खून केला, चहाच्या दुकानावर रोखून बघतो म्हणून 3 तरुणांनी एका माणसाचा खून केला वगैरे पेपरातल्या बातम्या वाचलया असतील.

हेमंत 33, तुम्ही इस्टेटीच्या वादातून भावाने भावाचा खून केला, चहाच्या दुकानावर रोखून बघतो म्हणून 3 तरुणांनी एका माणसाचा खून केला वगैरे पेपरातल्या बातम्या वाचलया असतील.

नाही नाही ते तंबुतल्या मल्टिमीटरने *** करंट मोजुन पाहणार्‍यातले आहेत. म्हणुन ते केव्हाही काहीही प्रतिसाद लिहु शकतात.

रामतीर्थ कर बाईंचे व्हिडो बघून आलात का? का पहिल्यापासूनच .... कठीण आहे पण व्यक्त व्हा. मग स्त्रीयांना घरकामाचे पैसे मिळावेत व्गैरे बाफ तोंड्देखले काढले होते का?
>>>>

कुठला बाफ अमा? मी काढलेला का?

असो, मलाही एक मुलगी आहे. आणि ती सुद्धा प्रचंड लाडाकोडात वाढवलेली आहे.
तिच्यावर अशी कुठलीही वेळ येऊ नये यासाठी मी समाजातील पुरुषांना सुधरवायच्या फंदात न पडता तिलाच सक्षम बनवायचा प्रयत्न करेन ईतके सिंपल आहे हे..
निसर्गाचा नियम आहे. हर बडी मछली छोटी मछली को खाती है. स्त्री दुर्बल राहिली तर पुरुष सत्ता गाजवणारच. कडवट असले तरी सत्य आहे. आणि हे सत्य मी सांगतोय याचा अर्थ त्या वृत्तीचे समर्थन करतोय असे होत नाही. पण उगाच वास्तवाशी फारकत घेत का चर्चा करावी...

मी अनु यांची पोस्ट उत्तम !

आई वडील मुलांना काही च बनवू शकत नाहीत फक्त अपेक्षा ठेवू शकतात..त्यांची तीच त्यांच्या तकती नुसार आणि नशीब नुसार घडत असतात.

सहज एक प्रश्न मनात आला - इथे किती स्त्रिया (एकट्या राहणाऱ्या किंवा एकट्या पालक असलेल्या स्त्रिया सोडून)
अशा आहेत ज्या लग्न करून एकत्र कुटुंबात म्हणजे नवरा व त्याचे आईबाबा अशा घरात गेल्या आणि सासरच्यांनी त्यांच्या नावावर स्वतःचे घर करून दिले >>

ह्या सिनारिओत माझी बायडी येते, सगळी नविन प्रॉपर्टी हिच्या नावावर आहे, एका घराचं भाड हिच्या अकाऊंट मधे जाते. राहत घराच् टायटल वांद्यात असल्यामूळे ते बाकी आहे. मॅकक्जीमम हीच्या नावावर केल्यामूळे हिला वेगळीच शंका. म्हण्टल घ्या ... नावावर करावं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम. तशी ती नको म्हणत असतांना देखिल, मीच बळजबरी तिच्या नावावर केलय.

अजून एक लव जिहादी एड

हिंदू स्त्री व मुसलमान पुरुषाचे घर

शुक्रवार (अक्टूबर 9, 2020) को ‘तनिष्क ज्वेलरी’ का एक नया प्रचार वीडियो आया, जिसमें एक गर्भवती हिन्दू महिला की मुस्लिम परिवार में गोदभराई की रस्म दिखाई गई है। इस वीडियो में दिखाया गया है कि गहनों से लदी हुई एक महिला गोदभराई की रस्म के लिए तैयार हो रही है। जानने लायक बात ये है कि ‘तनिष्क ज्वेलरी’ की इस वीडियो में एक जिस जोड़े को दिखाया गया है, वो इंटरफेथ कपल होता है, अर्थात पति-पत्नी अलग-अलग धर्म के होते हैं।

https://hindi.opindia.com/national/tanishq-advertisement-video-pregnant-...

मी_अनु, यांच्या चेकलिस्ट्सा ठी एक प्रश्न
मुले झाल्यावर त्यांच्या संगोपनासाठी स्त्रीने नोकरी सोडावी असे ठरल्यास, तिच्या वैयक्तिक आर्थिक स्थैर्यासाठी म्हणून तिला काही नियमित भरपाई मिळत राहायला हवी. पटतंय का?

हम्म
पटतंय.पण हे ठरवणार कसं आणि कधी?
Maybe you are leading me to some point, that I am not yet grasping.
हे सर्व पटण्या सारखंच आहे.पण अंमलबजावणी होतेय की नाही हे कोण आणि कसं मॉनिटर करणार?

प्रश्न मी_अनु साठी होता तरी जरा मधे बोलते - नाही पटलं.
तिच्या वैयक्तिक आर्थिक स्थैर्यासाठी म्हणून तिला भरपाई दिली तरी त्यात तिचे परावलंबित्व कमी होत नाही. ती बाबा देणार असं मी गृहित धरत आहे कारण पोस्टीत स्पष्ट उल्लेख नाही. मला वाटतं- उलट बाबाने आपल्या मुलांच्या प्रेमापोटी काही तास त्यांना द्यावे ज्यात आई जाऊन अर्थार्जन करू शकेल (उदा: एखादा विकेंड जॉब, किंवा ऑनलाईन जॉब, किंवा व्यवसाय.). अगदीच काही परिस्थिती गंभीर असेल - जसे मुले व वृद्ध पालक मिळून ४ जणे आहेत ज्यांना आळीपाळीने प्रत्येकाला न्हाऊ-खाऊ घालावे लागत आहे किंवा आईच आजारी आहे - तर सुचवलेला मार्ग ठीक वाटतो.

< Maybe you are leading me to some point, that I am not yet grasping>

बरोबर.

मागे एकदा वेगळ्याच विषयावरच्या चर्चेत या मुद्द्यावर बराच उहापोह झाला होता.तत्वतः पटण्यासारखे असले तरी अंमलबजावणी कठीण.

https://www.maayboli.com/node/67125?page=7

प्रश्न सगळ्यांसाठीच होता.

दोन्ही प्रश्न परावलंबित्वाबद्दल नव्हते. तुम्ही त्या स्त्रीला इक्वल मानता का नाही? डिसिजन मेकिंगमध्ये ती असते की नाही? मतभेद झाले तर काय करता?
शेवटी विवाह हा एक करार आहे. तो मोडायची वेळ आली तर काय त्याच्या शर्ती आधीपासूनच ठरलेल्या असाव्यात. ज्यांना शक्य आहे त्यांनी पायंडा पाडा. बाकीचे येतील मागून.

माझ्या एका मायबोलीकर मित्राने त्याच्या बायकोला - उद्या आपण वेगळे झालो तर तुला स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे असं म्हणत नोकरी, बचत, गुंतवणूक या सगळ्या बाबतीत तिचे प्रबोधन केले आणि त्यावर तिला निर्णयक्षम बनवले.

याबद्दलचा भोचक प्रश्न मी त्याला मायबोलीवरचेच काही धागे (त्याचे नाही. तो सध्या मायबोलीवर नाही) वाचल्यावर विचारला होता. की तुझ्या घरच्या आणि स्वतःच्या संबंधीच्या निर्णयात बायकोचा किती सहभाग असतो?

मी_अनु, तुम्ही माझ्या ज्या धाग्याची लिंक दिली तशाच विषयासंबंधी आणखी एक धागा नुकताच आला होता. आणखी एक हिंट

बहिणी वडलांच्या प्रॉपर्टीत वाटा मागायला आल्या तरी भावांची तोंडं वाकडी होतात ईथे.
तिथे नवरयाकडून फार अपेक्षा झाल्यात

उद्या आपण वेगळे झालो तर तुला स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे असं म्हणत नोकरी, बचत, गुंतवणूक या सगळ्या बाबतीत तिचे प्रबोधन केले आणि त्यावर तिला निर्णयक्षम बनवले. >> Happy मित्राचे नाव रिचर्ड ब्रान्सन होते काय ?? Happy त्याचे वाक्य आहे - “Train people well enough so they can leave, treat them well enough so they don't want to.”

भरत
मला आता सध्या आठवत नाहीये
तुम्हाला सापडली असल्यास लिंक द्या.

एक भारत समाचार म्हणून यु पीचे न्युज चॅनेल आहे. त्यात आज ही बातमी पाहिली.

एका विधवेला घरातून बाहेर काढण्या साठी तिच्या सासर्‍याने तिच्या खोलीला आग लावली. मग बंब आला आग विझवली. ह्याच्या आधी ही तिला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न झाले आहेत. तिच्या नवर्‍याचा जो प्रॉपर्टी शेतजमी न ह्यात हक्क असेल तो तिला मिळायला हवा. पण असे हाकल ण्याचे प्रय्त्न होतात. पुढे तिला जाळून टाकले तरी कोण काय म्हणेल. असे प्रश्न आहेत. असे सासरचे असतात.

भाड्या नी घर देताना जसे agreement करतो तसेच agreement स्त्री पुरुषांनी एकत्र राहताना करायला हवे.
फक्त कोण कोणाला काय सेवा देते त्या नुसार पैसे paid करायचं.
जेवणाचा,राहण्याचा खर्च वाटून तसा paid करायचा.
बाकी कोणाला कसलाच हक्क नसेल.
Agreement मधील अटी पाळली नाही तर ते रद्द होईल.
नुकसान भरपाई वैगेरे काही मिळणार नाही.
मुल ज्यांना हवी आहेत त्यांनी sperm,aani eggs खरेदी करून टेस्ट tube baby tayar कराव्यात.
सर्व प्रश्न मिटतील.
कोण कोणावर अन्याय करतोय हा प्रश्न कायमचा सुटेल.

मध्यप्रदेशातल्या बायकोला मारहाण करणाऱ्या बड्या पोलिस अधिकाऱ्यांचे विचारममौक्तिक ऐकलेत का?
https://youtu.be/8fLHLh93xbs
१२ वर्षांपूर्वी तिने माझ्याविरुद्ध तक्रार केली होती. पण त्यानंतरही ती माझ्याच घरात राहते आहे, माझ्या पैशाने परदेश सहली करते आहे.

दुसरी बाजू ऐकून घेतली पाहिजे. तिला मारपीट आवडत असेल. .... सुशिक्षित, उच्च आर्थिक सामाजिक स्तरातले आहेत म्हणजे त्यांच्या नात्याचा पाया प्रेमच असेल नाहीतर कशाला कोण १२ वर्ष दुसर्‍याची मुलगी पोसणार, नाही का? आणि कोण कशाला तिथे रहाणार. तिलाच आवडत असेल Wink Happy

(नसेल तर त्या डॉग ट्रेनरचा पगार काप आधी म्हणावं तिला. दोन कुत्रे पण एक चावेना त्या मारपीट करणार्‍या बाबाला...)

२-३ महिन्यापूर्वी गुलाबो-सिताबो पाहिला होता. फार आवडला नव्हता, जरा रटाळच होता. पण ही इथली चर्चा वाचून आता त्या सिनेमाविषयी New found appreciation आले आहे...

इथल्या बऱ्याच पोस्ट ह्या सत्य परिस्थिती शी विपरीत आहेत.
नात्यात असणारा जिव्हाळा,प्रेम ह्याचा आर्थिक स्थिती आणि शिक्षण ह्याचा काही संबंध नाही.
फक्त mature पना संयम ह्या दोन गोष्टी च नाते संबंध कसे असतील हे ठरवतात.
शिक्षित आणि आर्थिक बाबतीत चांगली स्थिती असणारी लोक सुसंस्कृत आणि सभ्य असतील ह्याची बिलकुल खात्री नाही.
उलट हीच लोक असभ्य असतात.त्यांची नाती खूप सैल असतात.

Pages