बाईचे घर कधी तिचे का नसते ?

Submitted by दिव्या१७ on 10 October, 2020 - 09:14

आजच एका वॉट्सअप ग्रुप वर एका मैत्रिणीने तिच्या शेजारची कथा सांगीतली, तिची शेजारीन रडत रडत तिच्या घरी आली कारण काही कारणांमुळे घरात भांडण झाले आणी तिच्या नवर्याने निघून जा माझ्या घरातून म्हणून तिला बाहेर काढले आणी दार बंद करून घेतले, ती मैत्रिणीकडे भावाला फोन करण्यासाठी आली होती तिचा मोबाईलही घरातच होता. त्या बाईने भावाला फोन केला, भाऊ ऑफिसला असल्याने संध्याकाळी येतो म्हणाला तोपर्यंत ती बाई मैत्रिणीकडे होती, भाऊ आला आणी त्याने तिच्या नवऱ्याला समजावून पहिले आणी नंतर बहिणीला घरी घेऊन गेला.

कारण काहीही असुद्या नेहमी नवराच का बायकोला निघून जा तुझ्या घरी सांगतो? आजकाल समाजात बरीच सुधारणा झाली आहे पण तरी बर्याच घरात हे चित्र दिसून येते, अगदी बाई कमवणारी असेल तरीही, आणी बायका ही कशाला उगाच जगाला दिखावा म्हणून सगळे सहन करत असतात, काहींना माहेरचा सपोर्ट नसतो, एकटे कुठे जाणार म्हणून परत नमते घेऊन संसाराला लागतात, पण ती गोष्ट कुठेतरी मनात खुपत असते. आजकाल बाईने एकटे राहणे ही सेफ राहिले नाही.

यावरून प्रश्न पडतो बाईचे खरे घर कोणते? माहेरचे म्हणतात तुझ्याघरी, नवरा म्हणतो जा तुझ्याघरी पण ते घर कुठले? lockdown मुळे तर ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत , म्हणून यावर चर्चा.

Group content visibility: 
Use group defaults

The house has to be in your name. Legally. Like stamp paper sale deed n all? Name has to be as per pan card and aadhar card. Check property registration guidelines. And get it registered in your name . Live like a queen in your own property. Usme kya hai

बाईला 4 घरे असतात

नवर्याचे घर , जिथे तो नोकरी करतो त्याच्याजवळचे त्याचे घर.
नवरयाच्या आई बाबा चे घर.
माहेर.

आणि बाई पोलिसात कोर्टात बोलली की मला अजून एक चौथे घर स्वतंत्र हवे , तर ते

नवऱ्याला दोनच घरे
ऑफिस ऑफिस टाइम मध्ये
आणि आपले घर , उरलेल्या वेळेत

आईबाप , सासू सासरे किती दिवस खायला घालतील ? म्हणून ती दोन्हीही 0 , रहा बोलले तरी नोकरी सोडून रहाता येत नाही

lockdown मुळे तर ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत ....... त्यामुळे नाही ग.फार पूर्वीपासून आहे हे.पण खरेच आहे बाईला घरच नसते.आता अमा म्हणाल्या तसे फार थोड्याच जणींचे असू शकते.सर्वसाधारणपणे पाहिले तर नाहीच. माहेरी सुनावले जाते की तुझ्या घरी काय ते कर.लग्नानंतर नवऱ्याचे किंवा सासुसासऱ्यांचे असते.भांडणात किंवा वादात माझ्या घरातून चालती हो हे बिनदिक्कतपणे नवरा बोलतो.

कधी कधी बायकाच सतत बोलत असतात , मी पुढचे पाऊल टाकते

( मग बाकीचे पुरुष , कुत्री मांजरं मागची पावले टाकत उरपाटी चालतात ? सगळे पुढचेच पाऊल टाकतात )

सद्ध्या ‘आई कुठे काय करते’ मधे हेच दाखवत आहेत. बाबाला वाटते कि हे माझे घर आहे, इथे माझी सत्ता चालणार. ही माझ्या पैशावर, माझ्या जीवावर जगते म्हणून हिने मी म्हणेन तसेच वागले, राहीले पाहीजे. नाहीतर हिला मी कधीही घराबाहेर काढून रस्त्यावर आणू शकतो.
कागदोपत्री घर नावावर नसले तरी बायको म्हणून तिचा नवर्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असतो ना.

कायदेशीर हक्क राहू दे.पण माझ्या घरातून चालती हो हे ऐकणे किती अपमानास्पद आहे.पुरुषप्रधान संस्कृतीचे kitikal स्तोम majavayache.

कागदोपत्री घर नावावर नसले तरी बायको म्हणून तिचा नवर्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असतो ना. >>>> कायदेशीर हक्क असलाच पाहिजे. पण खरी मेख अशी आहे जेव्हा जा माझ्या घरातून असं बोललं जातं तेव्हा त्या क्षणी तो हक्क सिद्ध करून दाखवता येत नाही ना. त्या क्षणी कागदोपत्री नाव नवऱ्याचे असते.
पण माझ्या घरातून चालती हो हे ऐकणे किती अपमानास्पद आहे.पुरुषप्रधान संस्कृतीचे kitikal स्तोम majavayache. >> > + 1

पण खरी मेख अशी आहे जेव्हा जा माझ्या घरातून असं बोललं जातं तेव्हा >> "बोलावलंस तरी नाहीच तुझ्या उकीरड्यात रहाणार" म्हणून चालते होण्याची बाईत धमक नसते.
अमा +१००
देवकी +१ आहे अपमान पण काय करणार. बोलणार्‍याचे तोंड धरू शकत नाही. जिथे आपल्याला मान आहे तिथे रहावं. मग ते माहेरी असो, सासरी असो, स्वतंत्र एकटे असो की लिव्ह-इन मध्ये असो...

मला नाही वाटत असे सर्रास घडत .
काही अपवाद घरात असे प्रसंग घडतात.
आणि ते चुकीचे च आहे त्या प्रकारच्या लोकांना शिक्षा मिळायला च हवी.
पण ह्याचा अर्थ हा नाही की सर्रास सर्व पुरुष स्त्रिया ना मान देत नाहीत आणि सगळ्या स्त्रीया ह्या सोशिक असतात आणि त्या आपल्या आवडी निवडी चे बलिदान देवून घर चालवत असतात.
हा मोठा अंध विश्वास पण आहे की स्त्रिया ह्या पीडित च असतात.

अगदी तोंडावर निघून जा माझ्या घरातून असं नवरा नाही बोलला तरी.…
लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी सासू-सासरे बऱ्याच गोष्टी परस्पर ठरवतात, मुलाला सांगतील पण सुनेला कशाला सांगायचं,ती तर बाहेरून आलीये/आमचं घर आहे असा पवित्रा असतो
आणि तिकडे माहेरी तर आई असेपर्यँत एकवेळ जाणवत नसेल,पण वहिनी/भाऊ मानभावी पणाने येत जा अधून -मधून असं आमंत्रण(?) देतात..
साध्या साध्या प्रसंगातून जाणवतं एवढं नक्की..

मोठं झाल्यावर झाड उपटून दुसरीकडे लावलं की होतं तशी अवस्था असते एकंदरीत

कागदोपत्री घर नावावर नसले तरी बायको म्हणून तिचा नवर्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असतो ना.
>>>>

हा ॲक्चुअली नवरयावरही अन्याय नाही का?
कि याऊलट ही असते का?.. बायकोच्या प्रॉपर्टीवर नवरयाचा हक्कहीअसतो का?

जिथे आपल्याला मान आहे तिथे रहावं. ....१००% खरंय
+७८६
फक्त यात प्रेम आपुलकी जिव्हाळाही जोडा जर ते नात्यांबाबत असेल.

मान किंवा प्रेम हे एका व्यक्ती वर अवलंबून नसते.
दोघांनी सुद्धा एकमेकाच्या मान ठेवायचा असतो.

स्त्री आणि पुरुष समान आहेत असे म्हणायचे .
आणि स्त्री म्हणून extra सुविधा आणि हक्क सुद्धा हवेत हा आग्रह थरायचा ही दुटप्पी भूमिका झाली.
स्त्री म्हणून त्यांना गाडीत बसण्यास सीट उपलब्ध असावी.
स्त्री म्हणून त्यांचा पुरुषांनी मान ठेवायला हवा त्यांनी नाही ठेवला तरी .
स्त्री म्हणून सर्व कायद्यात स्त्री ही पीडित च असावी आणि पुरुष हा अत्याचार करणारा.
अशा अनेक अपेक्षा ठेवून परत स्त्री पुरुष समानता हवी असे नेमके उलटे वक्तव्य स्त्रिया का करतात.

Happy सज्ञान मिळवत्या मुलाला जर वडीलांनी 'चालता हो माझ्या घरातून' म्हणले आणि त्याने स्वतंत्र बिरहाड ( र ला ह जोडाक्षर जमेना इथे!!) केलं तर त्यांच्या नात्यात प्रेम नव्हते असे कुणी म्हणणार नाही. प्रेम लई असेल पण मान नसेल तर एकत्र रहाणे कठीण असते. एक-दोन वेळा प्रेमापोटी असलं ऐकेल मुलगा पण वारंवार झालं तर होतात वेगळे. मग स्त्रीचा विषय आला की "प्रेम आपुलकी जिव्हाळाही जोडा" असं का बरं? जेन्यूईन प्रश्न आहे, राग किंवा उपहासाने किंवा र्हेटोरिक (परत जोडाक्षर जमेना!!) म्हणून विचारत नाहीये.

यात खरेतर आपले कायदे खूप जुने आहेत. UKमध्ये घटस्फोट झाला आणि घर नवर्याचे नावे असेल तरिही घर बायको आणि मुलांना रहायला मिळते आणि पोटगी पण द्यावी लागते. नवर्यला आपली एकटे रहायची सोय करावी लागते. म्हणूनच ते लोक लिव इन राहून मगच लग्नाचा विचार करतात. यात मुलांची जबाबदारी घेणार्या पालकांनाच घर मिळते मग ती आई असो की वडिल. असे कायदे काळानुसार बदलले तर कोणी कोणाला घराबाहेर काढायचे हे विचार करुन मग बोलेल.

Equal rights equal opportunities. Every girl should first see to it that she has enough education and it skills to survive on her own in this world. Become financially responsible and independent. So that no guy can insult her self respect like this. You can work towards this goal at any age. Skill level. How can anyone live with a guy after he insults like this? Swabhiman aahe ki nahi.

मग स्त्रीचा विषय आला की "प्रेम आपुलकी जिव्हाळाही जोडा" असं का बरं?
>>>

मी प्रेम आणि मान दोन्ही हवं म्हटले. दोघांपैकी एक नाही Happy
म्हणजे मान मिळत असेल पण प्रेम नाही हे कामाच्या जागी ठिक आहे. पण नात्यात असे नसावे. अन्यथा त्या नात्यात राहण्यातही अर्थ नाही.
आणि मी हे स्त्रियांसाठीच असे नाही तर दोघांसाठी लिहिले आहे.

लेखातील उदाहरणात जी बाई आहे ती जरी परत घरी गेली असली तरी तिच्या जिवाला धोका असू शकतो. एकदा हाकललेली परत आली म्हणून नवरा वैतागलेला असेल तर तिला मारहाण सुरू करेल की ज्याने ती आपण हून निघून जाईल. त्यातही तिला आधाराला भाउ होता. असे लोक नसलेल्या बायका काय करतील. जरा सोसून रहा. पुरुष असेच वागणार, मन मारून जग हे सल्ले विचित्र आहेत. पॅट्रिआर्की होल एंड सोल स्वीकारून काही ही होत नाही. नुकसानच. एक बाजू गप्प राहिली तर सुखानेच होतील सर्व संसार. त्यात काही अर्थ नाही.

Happy अमा, मारहाणीचीही गरज नसते. सासरच्या चार लोकात बाई एकटी असते. अनेकवेळा मिळवतीही नसते. तिची मानसिक, आर्थिक, शारिरीक कोंडी करणे सोपे असते. एक बाजू गप्प राहिली म्हणून सुखाने संसार होईल असे अजिबात नसते. गप्प राहिली म्हणून सोयीस्कर वेळी तिला टाकून दिली, जाळून दिली प्रकार घडतात.

संसारात प्रेम असावे हा आदर्शवाद झाला. आजही अनेक जागी ठरवून लग्न (अरेंज मॅरेज) होते. पुरेशी ओळख नसते त्यातच जबाबदार्‍या पडतात. 'एक दोन वेळा कधी तोंड उचकटून सांगितलं म्हणून समजलं तरी की त्याचं माझ्यावर प्रेम होतं' अशी परिस्थिती असते. एकत्र कुटूंब असेल तर अजूनच वेगळे प्रकार. प्रेम असलं, नसलं तरी घरी आलेल्या कटकट्या पाहुण्याला आपण कधी "चालता हो" म्हणत नाही. तुमचं कधीचं तिकीट काढायचं, पुढचा काय प्लॅन असंच अदबीने विचारू. मग आपल्यासाठी घरदार सोडून आलेल्या आपल्याच बायकोला कसं म्हणवतं असं??

कारण सोपं आहे की बाई स्वत:चं घर घेण्याचा विचार फार कमी करते.
जनरली विचार असा की लग्न झालं की नवर्याचं घर तिचंच आहे मग तिचं स्वत:चं घर कशाला?
उत्तम कमावणार्या एकट्या मुलीही पटकन एक घर घेऊया असा विचार करत नाहीत. किंवा पालकही एन्करेज करत नाहीत फारसं.

हां आजकाल को ऍप्लिकंट होतात शक्य असेल तिथे. चालती हो म्हणण्याची आणि ऐकून घेण्याची शक्यता कमी या केसेसमध्ये.

थोडक्यात काय तर तुम्ही फायनान्शिअली आणि ओव्हरऑल इंडिपेडंट, खमक्या असाल तर तुमच्यावर ही वेळ येण्याची शक्यता कमी.
लग्न झाल्यावर नवरा चांगला असेल तर आपलं घर भाड्याने देऊ शकतोच की

थोडक्यात काय तर तुम्ही फायनान्शिअली आणि ओव्हरऑल इंडिपेडंट, खमक्या असाल तर तुमच्यावर ही वेळ येण्याची शक्यता कमी.>>>>सहमत, पैसा म्हणजे सगळं काही आहे या जगात. पैसे नसतील तर सख्खे लोक्स पण विचारात नाहीत(काही अपवाद असतील). आपल्याकडे पैसे आले की लोकांना लगेच ते दिसतात मग पैसे वेगवेगळ्या कार्याच्या वेळी घरातल्यांना देणं हे कर्तव्य आहे हे मनावर बिंबवून आपल्याला लुटतात. समोरचा कसाही वागला तरी चालेल पण पैसेवाल्याने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे ही मेंटलीटी असते लोकांची. कर्तव्य म्हणजे काय तर दुसऱ्यांना पैसे देणे.बरेच लोक्स बोलतात ना कशाला पाहिजे पैसा दोन वेळचं पोट भरण्यासाठी पैसा असेल तर भरपूर आहे वैगरे वैगरे त्यांचं बरोबर आहे पैसे भले आपल्यासाठी महत्वाचे नसतील, पण हे ही सत्य आहे की आपण ज्या दुनियेत राहतो तिथे पैसेच सगळं काही आहे.

राईट... कुणी बायकोला चालती हो म्हणणे तर रोज मरे त्याला कोण रडे प्रकार आहे. त्यात डोळे भरून यावे असं काही नाही. मात्र मायबोलीकरात एकमत होणे म्हणजे... लॉकडाऊनमुळे तर ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत Happy .

अमा व बोकलत यांच्याशी सहमत .
आर्थिक स्वावलंबन हवेच हवे.
अजून एक म्हणजे चालती हो असं कुणी (घराचा कागदोपत्री मालक/त्यांचे नातलग) आपमतलबी विनाकारण बोलत असेल तर त्यास जशास तसे उत्तर देण्याची धमक हवी (थोडक्यात ज्या घरात आपण आपले म्हणूनराहतोय व राबतोय तिथे खमकेपणा पाहिजेचत्यासाठी मानसिक दृष्ट्या खंबीर हवं.) हे माझे मत.

BTW काल १० Oct हा world mental health day असतो

एक केस अशी पाहण्यात आहे की फायनान्शियल इंडीपेन्डट असलेल्या स्री कडे गावाहून सासुसासरे आलेयत. मुल लहान, ती स्त्री आणि नवरा वर्क from होम असतात . house help कोविडमुळे घेता येत नाही तरी ती बिचारी सगळं घरचं करून वेळ मिळेल तसे काम करत आहे, आणि सासूसासरे फक्त एकवेळचा स्वयंपाक आणि थोडाफार घरातले सामान आणून मग सगळे आम्हीच करतो ही कशी कमी पडत आहे कसे हीचे घरात.लक्ष नाही असे नवर्याच्या मनावर ठसवण्यात यशस्वी झालेत!! दर 15दिवसांनी तिघं विरूध्द ती अशी वादावादी असतेच..lockdown मुळे 24 तास सतत एकमेकांची तोंडे बघण्याने यात भरच पडत असेल हे नक्की!

सगळे आम्हीच करतो ही कशी कमी पडत आहे कसे हीचे घरात.लक्ष नाही असे नवर्याच्या मनावर ठसवण्यात यशस्वी झालेत!! >> नवरा पण घरीच आहे तर स्वतःच्या डोळ्यांनी वस्तुस्थिती बघत असेलच की.

झोपलेल्याचं सोंग घेतलंय अशा माणसाला उठवता येत नाही. नवरा सोयिस्करपणे कळत नसल्याचं दाखवत असेल.
@अमा, @बोकलत, @सिमंतिनी >>++1

सहज एक प्रश्न मनात आला - इथे किती स्त्रिया (एकट्या राहणाऱ्या किंवा एकट्या पालक असलेल्या स्त्रिया सोडून)
अशा आहेत ज्या लग्न करून एकत्र कुटुंबात म्हणजे नवरा व त्याचे आईबाबा अशा घरात गेल्या आणि सासरच्यांनी त्यांच्या नावावर स्वतःचे घर करून दिले

किंवा त्या गृहिणी होत्या तरीही नवऱ्याने घर विकत घेताना ते यांनी आग्रहपूर्वक स्वतःच्या एकट्याच्या नावावर करून घेतले

किंवा त्यांनी लग्नाआधीच स्वतः घर घेतले होते व नंतर नवऱ्यासकट स्वतःच्या घरात राहायचा आग्रह धरला व सासरच्यांनी तो आनंदाने मान्य केला

किंवा

या आर्थीकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी व नवराही आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही घर एकटीच्या नावावर घेतले.

शेवटच्या सिनारिओत खूप जणी येतील, पण आधीच्या सिनरिओत कितीजनी आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. ज्या पहिल्या सिनरिओत असतील त्यांच्या सासरच्यांना साष्टांग नमस्कार. मी स्वतः हा सिनरिओ पाहिला नाहीय अजून पण मुलाच्या नावावर वेगळे घर विकत घेऊन सुनेला तिकडे संसार उभा करायला मदत करणारी सासू ओळखीत आहे.

आपण पितृसत्ताक समाजात राहतो त्यात घरातील पुरुषांनी स्त्रियांना असे बोलणे नवे नाही. या स्त्रियांत आई, बायको, मुलगी सगळ्या येतात. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवीच, पण ती तशी असेल आणि घरही तिच्या नावावर असेल तरी ह्या बोलण्यातून सुटका होत नाही. जेव्हा आईबाबाच मुलीला असे बोलतात तेव्हा ते ऐकणारा भाऊ पुढे जाऊन स्वतःच्या मुलीला व बायकोला असे ऐकवणारच. लगेच घर सोडून बाहेर पडा किंवा नवऱ्याला लाथ मारून बाहेर फेका वगैरे उपाय लिहिताना चांगले वाटले तरी प्रत्यक्षात उतरवायला कठीण जातात.

मूळ धाग्यात लिहिलाय तो प्रसंग माझ्या एका कलीगच्या वाट्याला आला होता. तिच्या नवऱ्याने स्वतःच्या आर्थिक इनसेक्युरिटीजच्या नैराश्यात माझ्या कलीगला घराबाहेर जा म्हणून सांगून तो स्वतः घरातून निघून गेला. उशिरा रात्री की भल्या पहाटे शेजाऱ्यांना उठवून मी मुलीला घेऊन माहेरी जातेय असे सांगायची नामुष्की तिच्यावर ओढवली कारण माझ्या मुलीला हिने पळवून नेले असा आरोप तो करेल ही भीती. डोके फिरलेल्या पतीवर पित्याने मात केली आणि शेवटी बरीच वादावादी होऊन तो दाती तृण धरून सासरी आला व केवळ मुलीसाठी असे सांगून बायकोला परत घेऊन गेला. अर्थात माझ्या कलीगने यातून योग्य तो धडा घेऊन पुढे जेव्हा काही कारणांमुळे घर विकून नवे घेतले तेव्हा स्वतःचे नावही घरावर घालून घेतले.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असली तरी लगेच घर सोडून बाहेर पडा किंवा संसाराला लाथ मारा अशी कुणाचीच इच्छा नसते. विसंवादी सूर असले तर समेवर येतील ही आशा असतेच. पण सामोपचार-तडजोड-बिचारी-बिचारी इ स्टेप्समध्ये आयुष्यातील 'प्राईम टाईम' वाया जातो हे खरे आहे. जर 'तो मला टाकून देईल', 'सासरचे लोक माहेरची बदनामी करतील', 'मुलांचे हाल होतील' इ इ ची टांगती तलवार नसती तर तू असे काय असे मोठे तीर मारणार आहेस आयुष्यात हा प्रश्न बाईने जरूर स्वतःला विचारावा. तिला उत्तर सापडलं तर नवर्‍यासहित पुष्कळ आयुष्य सुखी होतील.

जर 'तो मला टाकून देईल', 'सासरचे लोक माहेरची बदनामी करतील', 'मुलांचे हाल होतील' इ इ ची टांगती तलवार नसती तर तू असे काय असे मोठे तीर मारणार आहेस आयुष्यात हा प्रश्न बाईने जरूर स्वतःला विचारावा. तिला उत्तर सापडलं तर नवर्‍यासहित पुष्कळ आयुष्य सुखी होतील.>>>>

सहमत.

@सिमंतिनी , वरील प्रतिसाद नाही पटला. कमावती किंवा न कमावती असो, तिने तीर नाहीच मारला किंवा तीर वगैरे मारायची ईच्छा नसेल तिची तर ती बाई काय 'कुणीही यावे अन टपली मारून जावे' याच लायकीची असते काय?
'चालती हो' असे म्हणणार्या नवर्याचे तीर कोण आणि कुठे मोजतं?

होऊस wife असेन तरी स्त्री खमकी हवी. आपल मत खंबीर पणे मांडता यावे लागते आणि शेवटी आपण वेळ कशी आहे हा वर पण खूप गोष्टी अवलंबून असतात

झोपलेल्याचं सोंग घेतलंय अशा माणसाला उठवता येत नाही. नवरा सोयिस्करपणे कळत नसल्याचं दाखवत असेल.>> सहमत! नवरा पटले तरी हिच्या बाजूने काही खंबीरपणे बोलत नसावा. हीने स्वतः साठी स्टँड घेतला की तु बोलत नाहीस डोक्यावर बसवलेय.. इ््या वयात एवढे करूनही ऐकावे लागते.. असे ईमोशनल कार्डही खेळले जाते.

कमावत्या स्त्रीला तुझी मुलं आम्ही सांभाळतो / नवरा (आमचा मुलगा) घरात हातभार लावतो म्हणून तु नोकरी करू शकतेस .. किंवा आम्हाला काही गरज नाही तुझ्या पगाराची हे ऐकवणारेही कमी नाहीत.

लेखात लिहिलेल्या केस मध्ये सोयीस्कर रित्या एकच बाजू मांडून एकाच व्यक्तीप्रति कणव दाटून येईल असे लिहिले आहे वाटले.आणि सोशल कंडिशनिंगचा प्रभाव की काय, ह्या कौटुंबिक कलहाचे डिटेल्स माहीत नसताना प्रतिसादांतून ती कणव प्रकर्षाने दिसली.

कारण काहीही असुद्या नेहमी नवराच का बायकोला निघून जा तुझ्या घरी सांगतो?>> फारच सोयीस्कर विधान आहे. कारण हेच सगळ्यात महत्त्वाचे आहे.
कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता, बेजबाबदार आर्थिक व्यवहार ते adultery अशा कित्येक केसेस मध्ये स्त्रियांनी पुरुषांसाठी घराची दारे बंद केलेली आहेत. लोकल महिला कल्याण समित्या सुद्धा ह्या कामी पीडित स्त्रियांची मदत करतात. (काही केसेस मध्ये नवऱ्याकडून घराचा ताबा वा हिस्सा मिळवून देण्यासाठी पैसे घेऊन सुद्धा ह्या समित्या काम करतात हे सत्य आहे.. पण तो वेगळा विषय झाला. )
असे घडण्याचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात जास्त कमी असेल हे मान्य... भारतात पुरुषांपेक्षा स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात कौटुंबिक अन्यायाने पीडित आहेत हे सुद्धा खरे. हा झाला एक जनरल भाग.

घर/कुटुंब दोघांचे असते, ह्यात जसे नवर्‍याकडून तसेच बायकोकडून सुद्धा वर उल्लेखलेले गुन्हे होऊन घराचे/कुटुंबाचे अस्तित्व धोक्यात येईल असे काही घडून आले असण्याची शक्यता असू शकते. तेव्हा नवऱ्याकडून बायकोसाठी घराचे दार बंद होऊ शकते. आणि काही वेळा हिंसाचार घडून येण्याआधी आपल्या भल्यासाठी असे तात्पुरते घर सोडणे हितावह असते.

मुद्दा इतकाच की हे केस बाय केस बेसिसवर बघावे. सोयीस्कर डिटेल्स मांडून सोयीस्कर अर्थ काढून एकांगी चर्चा करण्यात काय हशील?
स्त्री आणि पुरुष दोघांच्या victimization ची भरपूर उदाहरणे देता येतात.

बोलणे आणि करणे ह्या मध्ये खूप अंतर आहे.
वयाच्या 35 वर्षाच्या आत स्वतःचे घर विकत घेण्याची कुवत 1 percent च स्त्री किंवा पुरुष मध्ये येत असेल.
बाकी तर हयात गेली तरी स्वतःचे घर घेवू शकत नाहीत.
आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे हे बोलण्या एवढे सोपे नाही.
जे आहेत स्वलंबी ते कधी ही परावलंबी होवू शकतात एवढी जगाची आर्थिक स्थिती अस्थिर आहे.
लग्न करायचे असेल,स्वतः चे कुटुंब हवं असे वाटतं असेल तर सहजीवनाची तयारी असावी
वेळ पडल्यास नात टिकवण्यासाठी माघार घेण्याची तयारी असावी
आणि स्वतः च इगो आणि स्वतःच्या च गुर्मीत राहायचं असेल तर त्या व्यक्ती नी लग्न किंवा relation मध्ये राहूच नये.
स्वतः एकटे राहवे आणि स्वच्छंद जीवन जगावे.

Happy क्यूटी, That's the point. ह्या उदाहरणात "माझ्या घरातून चालती हो" म्हणणारा नवरा स्वतः चे तीर मोजतोय. इतर कुणी ते मोजायची गरज नाही. घराचे भाडे किंवा हफ्ते भरणे हे आपले कर्तव्य नाही तर मी तुझ्यावर केलेले उपकार (मोठा तीर मारला) अशा अर्थाने तो वागत आहे. बाईला जर असा "माझं" घर हा confidence असेल तर फोन करून भावाला नाही तर चावीवाल्याला बोलावेल. "बाहेर काढलंस तर कुलूप उघडून घरात येईन कारण हे माझं ही घर आहे" ह्याची जाणीव तिलाच नाही, तर इतरांना काय बोल लावायचे.
सतत "अरेला कारे" केलं तर संसार मोडेल पण असं स्वतःच्या योगदानाला सतत कमी लेखत गेलं तरी तो टिकणार नाही.

>> कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता, बेजबाबदार आर्थिक व्यवहार ते adultery अशा कित्येक केसेस मध्ये स्त्रियांनी पुरुषांसाठी घराची दारे बंद केलेली आहेत. >>
आणि माझ्या आईला चहा हातात दिला नाहीस, तुझ्या वडीलांकडुन तू घरासाठी पैसे आणत नाही आहेस, तू ह्या घरात काही कमवुन आणत नाहीस, तू आज स्वयंपाक नीट केला नाहीस, तुझ्या माहेरी न सांगता का जाऊन आलीस, अश्या केसेस मध्ये पुरुषांनी बायकांना घराबाहेर काढलेलं आहे. काही घरात हे वारंवार होतं.

आणि अश्या अनेक केसेसमध्ये स्त्रीच घर कुठचं? असा धागाकर्तीचा प्रश्ण आहे.

पुरुषांच्या बाबतीत काही कजाग महिला असतीलही, पण पीडीत स्त्रिया आणि पुरुष टक्केवारीत खुप फरक आहे. त्यामुळे कृपया चर्चा भटकवू नका.

मला कळत नाही की ह्यातुन आपण आपल्या लेकीला हे शिकवत नाही का की तुझा नवरा तुला कधीही घराबाहेर काढेल आणि तू नाक मुठीत धरुन परत परत अपमानित व्हायला जात रहा? जर हे वारंवार होत असेल तर त्या बाईने परत का जावं? गावाहून आलेल्या सासु सासर्‍यांशी, घराबाहेर काढणार्‍या नवर्‍याशी कसं वागायचं हे स्त्रिया कधी शिकणार?

जे आपलं आहे ते टिकवण्यासाठी खमकं व्हायला हवं, मग तुम्ही कमवा की कमवू नका.

संसारात प्रेम असावे हा आदर्शवाद झाला. आजही अनेक जागी ठरवून लग्न (अरेंज मॅरेज) होते. पुरेशी ओळख नसते
>>>>>>

भारतात ईतके सामाजिक आणि आर्थिक स्तर आहेत ना की सगळ्यांची चर्चा एकच धाग्यात करणे खरे तर आचरटपणा आहे. पण तरीही आपण सारेच हा करतो कारण हा विषय सर्वांना रिलेट होतो आणि सर्वांना यावर बोलायची खुमखुमी येते.
तरीही मी जे बोललो ते सर्वसाधारणपणे मी ज्या गटात मोडतो त्या गटाला समोर ठेऊनच. आणि मला नाही वाटत माझ्या गटात हा काही आदर्शवाद झाला. प्रेमविवाह म्हणाल तर माझ्या पिढीत आमच्या पुर्ण खानदानात जे सतरा अठरा विवाह झाले त्यात फक्त एकच ठरवून झालेय. ते सुद्धा एका भावाचे ज्याच्या कॉलेजकाळात गर्लफ्रेंडस होत्या, त्यामुळे ठरवतानाही त्याच्या पसंतीनेच ठरवले गेले.

असो,
मुळात पुरुष कमावता आणि स्त्री न कमावणारी असेल आणि तिला मान सन्मानही हवा असेल तर दोघांच्या नात्यात प्रेम असण्याला पर्याय नाही. अन्यथा मी दुसरया घरची पोरगी माझ्या घरात आणून तिला पोसतोय हा विचार पुरुषाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तो येऊ नये अशी अपेक्षा धरणे हा आदर्शवाद झाला Happy

अन्यथा मी दुसरया घरची पोरगी माझ्या घरात आणून तिला पोसतोय हा विचार पुरुषाच्या मनात येणे स्वाभाविक आहे>> मिसोजिनी अलर्ट.

रामतीर्थ कर बाईंचे व्हिडो बघून आलात का? का पहिल्यापासूनच .... कठीण आहे पण व्यक्त व्हा. मग स्त्रीयांना घरकामाचे पैसे मिळावेत व्गैरे बाफ तोंड्देखले काढले होते का?

दुसृया घरची पोरगी ही एक सज्ञान व्यक्ति आहे. तिच्या कडे शिक्षण आणि किंवा आपल्या हाताने आपले पोषण करायचे स्किल आहेत. मेन बायको करून आणतात ती कश्याला? तर शरीर सुखाची हक्काची सोय म्हणून . उरलेले साडे तेवीस तास तिने काही ही करावे मेन म्हणजे माझे घर, माझे नातेवाईक माझी मुले ह्यांचे संगोपन, त्यांचे सर्व नखरे सांभाळणे घरचे कुळाचार संभाळणे झाडू पोछा करून माझे घर साफ करावे. माझे सर्व नखरे सांभाळावेत. व रात्री फ्रेश शरीर व मनाने सेवेसी हजर असावे. तिचे मन शरीर भावनिक गरजांशी मला काय देणे घेणे. त्यामुळे ती काही किंवा सर्व बाबतीत डिपेंडंट असणे फार आवश्यक स्वतंत्र मुलगी हे काही किंवा एकही करनार नाही. किंवा तिची बाजू मांडेल. हे बरोबर नाही. त्यात मुलीवर ( दुसृयाच्या पोरगीवर)अन्याय होत असेल वगैरे शंका बबड्या पुरुषोत्तमाच्या मनात कशाला यावी.

स्वतःचे घर सोडा तिची थोडीशी स्पेस देखिल नसते. स्त्रियांच्या नावावर बँक अकाउंट सुद्ध्हा नसावे असे ही विचार ट्विटर वर खुले आम व्यक्त होत असतात. दिव्या हा खूप मोठा लढा आहे. पण कायद्याने घर मालकी चा बायकांना हक्क आहे.

आपल्याकडे व्हर्बल अब्युज, शरीर सूख नाकारणे, बायकोच्या नोकरीत पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव अडथळे आणणे तिला धर्म कार्यात घरच्या कुळाचारात आई वडिलांच्या सेवेत पार अडकवून टाकणे व त्यात नावे ठेवणे घरकामात मदत न करणे ह्याला आपल्याकडॅ पूर्ण अ‍ॅक्सेप्टन्स आहे. हे चॅलेंज केले गेले पाहिजे.

चांगली चर्चा चालू आहे.

माझा वैयक्तिक अनुभव असा, कि शिक्षित असो वा अडाणी, स्त्री मनाने खमकी असली पाहिजे. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत सासरच्यांवर छाप पाडण्यासाठी म्हणून स्त्रिया बऱ्याच गोष्टी स्वतः वर लादून घेतात. मग ते इतरांना आराम देऊन सर्व कामे स्वतः करणे असेल किंवा आपले मत ठामपणे व्यक्त न करणे असेल (अर्थात सासरच्यांनी विचारले तर मत व्यक्त करायचे, नाही विचारले, तर स्वतः होऊन मत व्यक्त करून माझेही काही मत आहे, ही जाणीव करून द्यायची. )किंवा घरातील खरेदीत /निर्णयात सहभाग घेणे असेल. एकदा आपण चुकीची सुरुवात केली, कि नवऱ्यासहित घरातील सर्वजण त्या गोष्टीचा फायदा घेत च राहतात. आणि मग त्या इमेज पेक्षा वेगळे वागलेले पचनी पडत नाही कुणाच्या.
स्वतः कमावत्या असूनही सासू /नवऱ्याकडे पगार द्याव्या लागणाऱ्या मैत्रिणी आहेत तसेच "आमच्या ह्यांना सर्व गोष्टी अशाच व्हाव्या लागतात ", असे कौतुकाने सांगत स्वतः दिवसभर राबणाऱ्या पण आहेत. मग कालांतराने हे जाचक होऊ लागते, तेव्हा आवाज काढायला गेल्या, कि "शिंगे फुटली /कोणीतरी गुरु भेटला /अतिशहाणी झालीस "अशी मुक्ताफळे उधळून भांडणे होतात, कधी मारहाणही. तोवर बहुतेक दा मुले मोठी झालेली असतात, त्यांच्यासमोर अपमान नको, लग्नाला इतकी वर्षे झाल्यावर नातेवाइकांसमोर तमाशा नको, आपल्यालाच लोक नावे ठेवतील, म्हणून बहुतेक जणी गप्प बसतात आणि ही अन्यायाची साखळी चालूच राहते. मानसिक गुलामगिरी जात नाही स्त्रियांच्या मनातली, तोवर दुर्दैवाने हे असेच चालू राहणार.

टांगती तलवार नसती तर तू असे काय असे मोठे तीर मारणार आहेस आयुष्यात हा प्रश्न बाईने जरूर स्वतःला विचारावा.>> नक्कीच. पण स्वत:च्या स्पेस मध्ये शांतपणे बसून एक कप कॉफी पिणे ह्यात किती सूख आहे? हे अनुभवल्याशिवाय कळनार नाही. पुरुषोत्तम अशे किती तीर मारतात जीवनात? अब्युज सहन करत मन मारत जगण्यात काय हशील आहे. प्राइम टाइम इज एव्हरी सिंगल डे ऑफ हर लाइफ.

फेमिनिसम जोरात
जे उदाहरण दिले आहे तिची दुसरी बाजू माहीत आहे का? असे पण झाले असेल की ती बाई भांडताना स्वतः म्हणाली असेल की तुमच्यासारख्या माणसाबरोबर संसार करण्यापेक्ष... वगैरे वगैरे..
तुमच्यासोबत एकही क्षण मला राहायची इचछा नाही.
.मी चालले घर सोडून.. आणि स्वतःच घर सोडून आली असेल.
भावाला फोन केला असेल.
भाऊ म्हणाला असेल हीच नेहमीचेच आहे.
तुझे तू निस्तर. येऊन समजावले असेल.
ऐकले नाही. माहेरी घेऊन गेला.

असे झाले असेल असे नाही. अशी एक शक्यता असू शकते.

Pages