बाईचे घर कधी तिचे का नसते ?

Submitted by दिव्या१७ on 10 October, 2020 - 09:14

आजच एका वॉट्सअप ग्रुप वर एका मैत्रिणीने तिच्या शेजारची कथा सांगीतली, तिची शेजारीन रडत रडत तिच्या घरी आली कारण काही कारणांमुळे घरात भांडण झाले आणी तिच्या नवर्याने निघून जा माझ्या घरातून म्हणून तिला बाहेर काढले आणी दार बंद करून घेतले, ती मैत्रिणीकडे भावाला फोन करण्यासाठी आली होती तिचा मोबाईलही घरातच होता. त्या बाईने भावाला फोन केला, भाऊ ऑफिसला असल्याने संध्याकाळी येतो म्हणाला तोपर्यंत ती बाई मैत्रिणीकडे होती, भाऊ आला आणी त्याने तिच्या नवऱ्याला समजावून पहिले आणी नंतर बहिणीला घरी घेऊन गेला.

कारण काहीही असुद्या नेहमी नवराच का बायकोला निघून जा तुझ्या घरी सांगतो? आजकाल समाजात बरीच सुधारणा झाली आहे पण तरी बर्याच घरात हे चित्र दिसून येते, अगदी बाई कमवणारी असेल तरीही, आणी बायका ही कशाला उगाच जगाला दिखावा म्हणून सगळे सहन करत असतात, काहींना माहेरचा सपोर्ट नसतो, एकटे कुठे जाणार म्हणून परत नमते घेऊन संसाराला लागतात, पण ती गोष्ट कुठेतरी मनात खुपत असते. आजकाल बाईने एकटे राहणे ही सेफ राहिले नाही.

यावरून प्रश्न पडतो बाईचे खरे घर कोणते? माहेरचे म्हणतात तुझ्याघरी, नवरा म्हणतो जा तुझ्याघरी पण ते घर कुठले? lockdown मुळे तर ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत , म्हणून यावर चर्चा.

Group content visibility: 
Use group defaults

एक गंमत
काल १.३० ला एकाचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. १.३१ ला त्याला फोन केला. नाव सांगितलं. कंपनीचं नाव सांगितलं आणि बोलणं चालू केलं. २ वाक्यानंतर कळलं की बाबा मला राँग नंबर वाली किंवा क्रेडीट कार्ड पर्सनल लोन वाली बाई समजतोय. मग परत कंपनीचे नाव, ओळख देऊन इंटरव्ह्यू चा उल्लेख केला. मग याच्या डोक्यात प्रकाश पडला की ही आपला इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती आहे. तो म्हणाला मी अमित (त्याला आधी ज्याने संपर्क केला होता तो एच आर वाला पुरुष) कडूनच कॉल एक्स्पेक्ट करत होतो Happy
आता १.३० ची व्यवस्थित ठरलेली वेळ, टेक्निकल इंटरव्ह्यू आहे हे माहित आहे, १.३१ ला फोन केला, कंपनीचं नाव सांगितलं तरी बाई इन्टरव्ह्यू घेणार आहे याचा किंचीतही अंदाज नसावा? बायका काय फक्त नौकरी.कॉम वरुन किंवा क्रेडीट कार्ड होम लोन स्विच साठीच फोन करतात का?

मला इन्शुरन्स पॉलिसी विकणाऱ्या बायका फोन करतात

मी म्हटले सारखे सारखे पुरुषांनीच पॉलिसी घेऊन मरायचे का ? तू घे पॉलिसी आणि मला नॉमीनेट कर , कधी घेणार ?

ती अगम्य भाषेत बडबडून बंद झाली

निदान क्लीनेक्स ठेव रे टेबलावर इतपत तरी सल्ला देतं का त्याला???...........
क्लीनेक्स मागायची वेळच नाही यावी जर स्त्रिया संवेदनशील आणि हळव्या नाहीत तर Happy

मृणाली, तुमच्या आधीच्या कंपनीत फार रेड फ्लॅग्स दिसताहेत मला तुमच्या वर्णनावरून! आणि संशोधनाचे काम हे नोकरीपेक्षा फार जास्त चॅलेंजिंग असते त्यामुळे या क्षेत्राचे असे काही वेगळे वैशिष्ट्य नाही की मुली इथे जास्त टिकतात.
घरकाम दुय्यम मानतच नाही मी! निम्म्या पुरूषांनी home maker व्हावे जरूरच. या क्षेत्रात फार स्त्रियांचे वर्चस्व आहे ते कमी व्हायला हवे आहे. खरंतर मुलांच्या संगोपनासाठी म्हणून कोणाला आपले करिअर पूर्णपणे सोडून द्यायची गरज पडू नये. स्त्रिया अधिक सेन्सिटिव्ह, प्रेमळ वगैरे असतात हे एकप्रकारचं कंडिशनिंगच आहे स्वाती ताई म्हणाल्या तसं. शिवाय संशोधन असे सांगते की ज्यांचे आई वडील दोघेही नोकरी/व्यवसाय करतात ती मुले आयुष्यात आणि करीअर मध्ये अधिक यशस्वी होतात! (https://www.forbes.com/sites/kateashford/2015/06/30/working-mother/amp/) तेव्हा मुलांच्या संगोपनात कमी राहते असाही काही भाग नाही.

सीमंतिनी, जिज्ञासा +१
स्त्रीया लीडरशिप रोल मध्ये का नसतात याचं कारण 'करण्याची क्षमता नाही' हे नसून त्यांना तिकडे पोहोचायला अडथळे जास्त असतात आणि ते कमी करण्याचे प्रयत्न अजुन करायची गरज आहे.
मी ज्या कंपनीत काम करायचो तिकडे ऑल हॅन्ड्स मिटिंग मध्ये दरवेळी हटकून एचआरला डिसिजन मेकिंग मध्ये स्त्रीया किती आहेत? आणि त्या वाढाव्या यासाठी गेल्या वर्षात काय प्रयत्न केले? हा प्रश्न विचारला जात असे. मला सुरुवातीच्या ऑल हॅन्ड्स आठवतात जिकडे स्टेजवर बोलताना 'ऑल व्हाईट मेन' असायचे (ही बे-एरिया हाय टेक कंपनीची अवस्था!) ते हळूहळू पीपल ऑफ कलर आणि जेंडर आयडेंटिटी दिसू लागलेले. ह्यात काही प्रमाणात ऑप्टिक्सही असेल पण बदलाची फळं ही नक्की होती.

स्त्रिया अधिक सेन्सिटिव्ह, प्रेमळ वगैरे असतात हे एकप्रकारचं कंडिशनिंगच आहे स्वाती ताई म्हणाल्या तसं. शिवाय संशोधन असे सांगते की ज्यांचे आई वडील दोघेही नोकरी/व्यवसाय करतात ती मुले आयुष्यात आणि करीअर मध्ये अधिक यशस्वी होतात! .....
नाही पटत..असो...माझे मत सगळ्यांना पटलेच पाहिजे असं काही नाहीये Happy

मृणाली, तुमच्या आधीच्या कंपनीत फार रेड फ्लॅग्स दिसताहेत मला तुमच्या वर्णनावरून > >> टोटली. ज्या वर्णनावरून कंपनी कल्चर कडे बोट दाखवायला हवे त्यावरून स्त्रियांकडे बोट दाखवले आहे त्यांच्या प्रतिसादात!

आणि घर सांभाळणे म्हणजे हलके काम हेच आपण आधी डोक्यातून काढले पाहिजे... समाजासाठी चांगले व्यक्तीमत्व असलेले नागरिक बनवणे हे कधीच हलके काम नसु शकते.. >>> हे समानतेचे अजब लॉजिक ऐकले आहे अनेकदा. समानतेच्या रॅपर मधे सनातनी गोळी आहे ही. म्हणजे तुम्ही करताय तेच करायचे. फक्त ते समानच आहे असे यापुढे समजा.

आणि रडल्या बायका तर रडूदेत की. पुरूषांना जर supposedly masculine गोष्टी वापरून - इम्पोजिंग पर्सनॅलिटी, आवाज चढवून, चार अक्षरी शब्द वापरून - कंपनीत प्रगती करता येत असेल, तर बायकांना supposedly feminine गोष्टी वापरून करू दे Happy

अमितच्या पोस्टशीही सहमत.

निदान क्लीनेक्स ठेव रे टेबलावर इतपत तरी सल्ला देतं का त्याला???...........
क्लीनेक्स मागायची वेळच नाही यावी जर स्त्रिया संवेदनशील आणि हळव्या नाहीत तर Happy >> उपरोधाने म्हणाली आहे सी ते वाक्य! असो, मुली रडायला लागतात कारण पुन्हा कंडिशनिंग! मुलींना वाढवताना उगीच रडायला प्रोत्साहन द्यायचं नाही. जर न केलेल्या चुकीसाठी ओरडा बसत असेल तर न घाबरता ठणकावून सांगायला शिकवायचं आणि जर चूक झाली असेल तर न रडता, ती मान्य करून त्यात जी आवश्यक सुधारणा करायला हवी असेल ती करायला शिकवायचे! मग मुली अशा रडूबाई होणार नाहीत.
मात्र खऱ्या जगात मुली खूप तारेवरची कसरत करत कामावर येत असतात. आणि अनेक ठिकाणी एकाच चुकीसाठी मुलींना मुलांपेक्षा अधिक त्रासदायक परीणामांना सामोरे जायला लागू शकतं. तेव्हा मुलींना रडूबाई न बनवण्याच्या बरोबरीने आपल्याला अधिक चांगले workplace culture देखील तयार करायला लागेल!

मृणाली, तुमच्या आधीच्या कंपनीत फार रेड फ्लॅग्स दिसताहेत मला तुमच्या वर्णनावरून .......
'भारतातल्या manufactureing' कंपन्यांबद्दल बोलले मी, जीथे मशीन वर , फिल्डडवर काम करावे लागते..आयटी किंवा शैक्षणिक क्षेत्राबबद्दल नाही..

फारेंड, अमितव चांगल्या पोस्टी. जि, येस मी ते उपरोधाने म्हणाले होते. एच आर धड असेल तर बॉसला असं वागू देणार नाही. पुरूष रडत नाहीत हे त्यांच्या गुणवत्तेचे किंवा सबळतेचे प्रतीक नाही तर त्यांच्यावर झालेले कंडीशनिंग आहे.

आणि घर सांभाळणे म्हणजे हलके काम हेच आपण आधी डोक्यातून काढले पाहिजे... समाजासाठी चांगले व्यक्तीमत्व असलेले नागरिक बनवणे हे कधीच हलके काम नसु शकते.. >>> हे काम हलके नसेल तर करू दे की पुरूषांना. का वंचित ठेवताय त्यांना त्यापासून? का कुणी घरातून बाहेर हो म्हणण्याइतकं व्हलन्रेबल करायचं आहे स्वतःला. नोकरी/व्यवसाय केला तर आईपणाच्या देव्हार्‍यातून उतरायची भीती वाटते? चांगले व्यक्तीमत्त्व असलेले नागरिक बनवायला आधीची चांगले व्यक्तीमत्त्व असलेली नागरिक खर्ची पाडायची गरज नाही. It takes a village. मुलांचे संगोपन सगळ्यांनी थोडं थोडं करावं...

पुरुषही रडतात. (फक्त बरेच खाजगीत, लिमिटेड लोकांसमोर.)'एखाद्या माणसाने बोललेली गोष्ट कंपनी एथिक्स मध्ये बसणारी नसेल, ऑफेन्सिव्ह असेल तर ऐकून बाई रडली किंवा पुरुष नाही रडला याने फरक पडू नये. योग्य चॅनल असावे. सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग असावी.
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गोष्ट वेगळी पडते. किंवा कधीकधी शॉप फ्लोअर कल्चर (मशिन्स, आवाज इत्यादी) यामुळे उगीच चढ्या आवाजात बोलण्याचीही सवय असते. वर्कर्स शी एका अमुक प्रकारेच बोललं पाहिजे, नाहीतर लोक मऊ समजतील, दाबतील असं काहीतरी मनात असतं.तेच मग सगळीकडे वागण्यात उतरत जातं. हेही हळूहळू बदलते आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सेन्सिटिव्हीटी ट्रेनिंग, ध्यान, मेडिटेशन. स्त्रेस मॅनेजमेंट ट्रेनिंग होतात.
आयटी मध्येही काही नमुने भेटतात.अगदी शिव्या नाही तरी शिव्या सदृश बोलणे, स्वतः ऑर्डर देऊन जर निर्णय उलटला तर खालच्या माणसांवर दोष टाकणे या गोष्टी होतात. हा स्वभाव आहे.

'भारतातल्या manufactureing' कंपन्यांबद्दल बोलले मी, जीथे मशीन वर , फिल्डडवर काम करावे लागते..आयटी किंवा शैक्षणिक क्षेत्राबबद्दल नाही..>> संशोधन क्षेत्रात देखील भरपूर वेळा फिल्डवर्क करावे लागते. वरदा सांगेलच. मशीनवर मुलींना काम करता येत नाही हे काही मला पटत नाही. इंजिनिअरिंग हे क्षेत्र माहिती नसल्याने जास्त तपशील माहित नाहीत पण जर शिकल्या तर मुलींना लेथ मशीन हाताळता येईल असे वाटते. Girls are into pretty much all the fields and are doing well.

घर संभाळणे , मुलांची जबाबदारी ही स्त्रीची परंपरेने आलेली कामे. त्यासाठी तिला खरे तर लहानपणापासून बोलून, हळू हळू जबाबदारी टाकत तयार केले जायचे. मुलांना जसे परंपरेने आलेले व्यवसाय करण्यासाठी कुटुंबातील इतर पुरुष शिकवून तयार करत तसेच हेही.
घरकाम, अपत्याचे संगोपन, लहान मुले संभाळणे हे पुरुषही सहज करु शकतात. होते काय तर स्त्रीयांचे जे कंडीशनिंग होते त्यामुळे कुठेतरी मनात हे काम माझे हे पक्के होते , शिवाय पुरुषांना(नवर्‍याला) हे जमणारे नाही हे देखील कंडीशनिंग असतेच. यातुनच एखादीने स्वतःपुरते उत्तर शोधले तर मूल आजारी आहे तरी नवर्‍यावर टाकून कामावर आलेय, माझे नसते लक्ष लागले वगैरे टिपण्ण्या असतातच. संगोपनासाठी सवलत देताना केवळ पालक एवढाच निकष हवा, आई म्हणून स्त्री ला सवलत हवी आणि बाबा म्हणून पुरुषालाही सवलत हवी. घरकाम, अपत्याचे संगोपन ही हलकी कामे नाहीच आहेत मात्र त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि ही जबाबदारी संभाळत नोकरी-करीयर करताना दिवसाचे तास मात्र चोविसच असतात. पँडेमिक काळात पैसे देवूनही घरकाम, संगोपनासाठी कुणी उपलब्ध नाही हेही आपण अनुभवले. संसार दोघांचा, अपत्य दोघांचे तेव्हा अर्थार्जन, घरकाम, संगोपन वगैरेसाठी आवश्यक स्किलसेट दोघांकडेही असायला हवा. भले दोघांची स्टाईल वेगळी असेल, अगदी पक्की ५०-५०% वाटणी नसेल पण आपला संसार आणि एकमेकांच्या करीअरसाठी आधार व्हायचेच , सहकार्य करायचेच एवढे ध्येय तर नक्कीच ठेवता येते. सहकार्य करायचेच असे ठरवले की प्रामाणिक प्रयत्नही होतात आणि उपायही शोधले जातात.

स्वाती प्रतिसाद पटला..

घर संभाळणे , मुलांची जबाबदारी ही स्त्रीची परंपरेने आलेली कामे. त्यासाठी तिला खरे तर लहानपणापासून बोलून, हळू हळू जबाबदारी टाकत तयार केले जायचे.......।

पण हे नाही पटले....सगळ्यांंच्या बाबतीत असे नसते..
माझ्या आईला अजूनही वाईट वाटते कि मी करियर सोडून होम मेकर बनले. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे.... लहाणपनापासून लग्न, मुल या गोष्टी कधीच शिकवल्या गेल्या नाही आम्हा दोघी बहिणींना...
बहिणीचे छान करियर सुरु आहे..तो तीचा चॉईस.

मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत मी ८ वर्षे काम केले आहे. शॉप फ्लोअर, स्टोअर्स, मटेरियल मूव्हमेण्ट वगैरे अगदी जवळून पाहिले आहे. शारिरिक क्षमता, तंत्रज्ञानाचे शिक्षण व त्या कामाची आवड हे असेल तर त्यातले कोणतेही काम स्त्रियांना न करण्यासारखे नाही. खरे तर आवड हाही निकष नाही. कारण ते पुरूष ते करतात ते ही सगळे काही फार आवडीने करतात असे नाही.

स्त्रिया पोलिस आहेत, लष्करात आहेत, गोळाफेकीपासून ते क्रिकेट पर्यंत खेळात आहेत, बांधकामे, रोजगाराची कामे, अगदी दगड फोडणे वगैरे सुद्धा करतात. ही बाकीची कामे त्यांना काही जड नाहीत.

पण हे नाही पटले....सगळ्यांंच्या बाबतीत असे नसते..>>आता नसते पण पूर्वी होते. आता लग्न झाले की एकदम अपेक्षांचे ओझे टाकले जाते. प्रत्यक्ष घरकाम करावे लागले नाही तरी कामाला माणसे नेमून घर सुरळीत चालवावी ही अपेक्षा असते आणि ती सिस्टिम बिघडली तर अर्थार्जनासाठी करतो ते काम संभाळून किंवा प्रसंगी बाजूला ठेवून घर सुरळीत चालवावे अशी अपेक्षा असते.

अमितव, फारेण्ड, स्वाती2, छान पोस्ट्स.

वीसेक वर्षांपूर्वी ऑफिसच्या रस्त्यावर एका सिग्नल आधी लोहारांच्या चारपाच झोपड्या होत्या. लाल सिग्नल असला की बरेचदा या झोपड्यांसमोर थांबणे व्हायचे. तिथे लोहार तापलेली वस्तू चिमट्याने ऍन्विलवर धरायचे आणि बायका भल्या मोठ्या घणाने अगदी एक्सपर्टली त्यावर घाव घालायचे हे मी पहायचो. हे चांगलेच कष्टाचे काम आहे. त्या अगदी सहजतेने करत. ते पाहून शारीरिक ताकतीने कमी पडतात बायका हे कुणी म्हणाले नसते.

2013 साली prevention of sexual harassment of women at work place संबंधीत कायदा पास झाला त्याखाली कम्पन्यांना POSH कमिटी स्थापन करणे अनिवार्य आहे आणि ह्या कमिटीत मेजॉरिटी महिला असणे अनिवार्य आहे. बऱ्याच कम्पन्यांमध्ये त्यावेळी ह्या कायद्याच्या अवेअरनेस संबंधी वर्कशॉप घेतली होती. काही मॅन्युफ़ेक्चरिंग/ लहान आयटी कंपन्याची इतकी वाईट अवस्था होती की कमिटी स्थापन व्हावी एवढया महिला पण त्यांच्याकडे नव्हत्या. बहुतांश एच आर वाले कशाला अजून ही कटकट असेच ह्याकडे बघत होते. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण हा अजून एक खूप मोठा विषय आहे.

माझी आधीची बॉस बरेच अस्थायी प्रश्न मुलींना हायर करताना विचारायची त्यात एक दोन ठरलेले प्रश्न म्हणजे लगीन कधी करणार? आणि लगीन झालं असेल तर फॅमिली स्टार्ट करायचा विचार आहे का??

बऱ्याच ठिकाणी असते अजून >> +१००
घरातील आबालवृद्धांचे पालन करायचे म्हणून स्त्रीने सहमतीने, आपखुशीने काही काळ नोकरी सोडणे हा चॉईस झाला. पण दीर्घकाळ ते करणे हे चॉईस नाही तर रस्टी स्किलसेट आहे. व्यवसाय/नोकरी मिळवायची धमक असताना व्यवसाय/नोकरी सोडून घरी रहाणे हा चॉईस. Rusty skillset घेवून घरी रहाणे ह्यात निवडस्वातंत्र्य कुठले? वेळ आली तर मिळवू असा आत्मविश्वास असणे वेगळे आणि खरचं हजार-बाराशे रूपये मिळवणे वेगळे.

प्रत्यक्ष घरकाम करावे लागले नाही तरी कामाला माणसे नेमून घर सुरळीत चालवावी ही अपेक्षा असते आणि ती सिस्टिम बिघडली तर अर्थार्जनासाठी करतो ते काम संभाळून किंवा प्रसंगी बाजूला ठेवून घर सुरळीत चालवावे अशी अपेक्षा असते.>>>>

+1000

पुरुषांनी घरात मदत करणे व घराची जबाबदारी घेणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मदत करणारा स्वतःच्या लहरीवर त्याला वाटेल तेव्हाच मदत करतो पण जबाबदारी असते तेव्हा तुम्हाला करायचे असो, नसो, करावेच लागते. रात्री बाहेरून आल्यावर सैपाकघरात जाऊन खाण्याची काहीतरी व्यवस्था चटकन स्त्रीच पाहते, कारण जबाबदारी तिची आहे. नवराही करतो, पण ती मदत असते. जबाबदारी म्हणून जे पुरुष करतात त्यांचे पालन खूप चांगले झालेले आहे.

घराची गरज म्हणून स्त्री अर्थार्जन करत असली तर तिचे पैसे घरातल्या एकत्र किटीत लगेच येतात. म्हणजे स्त्री अर्थार्जन करायला लागल्यापासून तिचे पैसे घरात वापरायचे हे कॅण्डीशनिंग झालेले आहे. पण त्याचवेळी तिची म्हणून जी जबाबदारी आधीपासून ठरली होती त्यात तिने नवी जबाबदारी घेतल्यावर काही बदल घडला नाही. उलट ती जुनी जबाबदारी नीट पार पाडतेय का हे आवर्जून पाहिले जाते. असे करणारी स्त्री आदर्श स्त्री म्हणून नावाजली जाते. हे कंडिशनिंग इतके हाडीमासी भिनलेय की जिला ह्या दोन्ही जबाबदाऱ्या पेलत नाहीत त्या स्त्रीलाच कधीकधी गिल्ट येतो.

घर कोणाच्याही नावावर असले तरी घरातुन चालती हो म्हणणे हे स्थावर मालमत्तेवर आपलाच हक्क हे पुरुषांचे कंडिशनिंग Happy Happy

<<रात्री बाहेरून आल्यावर सैपाकघरात जाऊन खाण्याची काहीतरी व्यवस्था चटकन स्त्रीच पाहते, कारण जबाबदारी तिची आहे. नवराही करतो, पण ती मदत असते. >> अगदी खरय.

<<उलट ती जुनी जबाबदारी नीट पार पाडतेय का हे आवर्जून पाहिले जाते. असे करणारी स्त्री आदर्श स्त्री म्हणून नावाजली जाते. हे कंडिशनिंग इतके हाडीमासी भिनलेय की जिला ह्या दोन्ही जबाबदाऱ्या पेलत नाहीत त्या स्त्रीलाच कधीकधी गिल्ट येतो.>> हे असं का झालंय? म्हणजे टीव्ही पेपर मध्ये कथामध्ये नायिका असते, तिचे डायलॉग असतात मी घरचं सगळं करून नोकरीं करीन. हे कोणी रुजवला काय माहित. ज्या स्त्रिया सुरुवातीला बाहेर पडून job करु लागल्या त्यांनी? पण आता नाही जमत हो.. मग काही काही स्त्रिया म्हणतात जाऊदेणा का मरमर करायची, घरातलं करा, जॉब करा आणि वरून comparison असतंच. ती ही पहा अशी करते, ती ही पहा सासूचा शब्द खाली पडत नाही, ती ही पहा तिची सासू तिची पूजा करते.. अरे मरूदे ना. आम्ही नाही करत तर नाही.. सगळ्यांची मन सांभाळ, नोकरी करा, घरचं सगळं करा आणि कसला स्वाभिमान मिळतो? त्याची किमत किती केव्हडी मोठी मोजायची?

Proud

बाईचे पैसे सासरचे खातात !

एवढे कोण आहेत तुमच्या घरात ? नवरा , बायको , एखादे मूळ इतकाच आजकाल पसारा असतो , मागच्या पिढतळ्यांची घरे वेगळी झालेली असतात
कोण आहेत इतके घरात ?

आपल्या पगारात सासर पोसले जाईल इतका पगार असेलच तर पुन्हा पगारवाला नवरा लागतो कशाला ? माहेरीच नोकरी करत आपल्या माणसात रहायचे आणि नवर्यालाही माहेरीच घेऊन जायचे

व्यवसाय/नोकरी मिळवायची धमक असताना व्यवसाय/नोकरी सोडून घरी रहाणे हा चॉईस. >> १००% पटलं. अशी धमक असलेली स्त्री घरात राहिली तर नवरा सहसा 'घरातून चालती हो' असं म्हणण्याची हिंमत दाखवू शकत नाही.

घर कोणाच्याही नावावर असले तरी घरातुन चालती हो म्हणणे हे स्थावर मालमत्तेवर आपलाच हक्क हे पुरुषांचे कंडिशनिंग .... Perfect.

अरे काय करियर करियर लावले आहे... नऊ ते पाच पाट्या टाकायला जाणार आणि म्हणणार करियर...
मृणाल यांच्या मताशी सहमत आहे...

इथे स्वतःचा चॉइस म्हणून घरी राहणार्‍यांना जज करायचे नाहीये. प्रत्येकाचा आपापला निर्णय.
आर्थिक दृष्ट्या शक्य, स्वतःला आवडत असेल तर नक्की राहावे.
सध्या मोठ्या मोठ्या कंपनीज अश्या संसार मूल बाळ मुले, एल्डरली केअर मुळे ४-५ वर्षे जॉब गॅप वाल्यांसाठी रिक्रुटमेंट राबवत आहेत.(नंतर त्यातल्या त्यात कमी पगारात त्यांना अत्यंत सिन्सीयर बायका वर्क फोर्स म्हणून मिळणार आहेत. ज्यांना आपल्या कामाची किंमत आहे आणि बर्‍याच गॅप मुळे आता नव्याने काही करायची उमेदही.)
माझी मैत्रिण ४.५ वर्षे गॅप घेऊन आता व्यवस्थित नव्या टेक्नॉलॉजी मध्ये चांगली जम बसवून आहे. मेहनत करावी लागली.

इथे स्वतःचा चॉइस म्हणून घरी राहणार्‍यांना जज करायचे नाहीये. प्रत्येकाचा आपापला निर्णय.
आर्थिक दृष्ट्या शक्य, स्वतःला आवडत असेल तर नक्की राहावे...........

+111

आपल्या पगारात सासर पोसले जाईल इतका पगार असेलच तर पुन्हा पगारवाला नवरा लागतो कशाला ? माहेरीच नोकरी करत आपल्या माणसात रहायचे आणि नवर्यालाही माहेरीच घेऊन जायचे >> अहो ब्लॅककॅट, यात आणि सध्याच्या परिस्थितीत काय फरक आहे सांगा मला? जे सध्या बहुतेक पुरूष करतात ते बहुतेक स्त्रिया करायला लागल्या म्हणजे समानता का? हे असे निरर्थक प्रतिसाद लिहून काय साध्य होते?

घर आणि workplace ह्या वेगवेगळ्या जागा आहेत.
नोकरी व्यवसाय करणे आणि पैसे कमविणे हे आपण करतो ते कशासाठी आपल्या घरासाठी च ना दोन्ही गोष्टी एकमेकाशी पूरक आहेत.
घर म्हणजे फक्त वास्तू नसते तिथे आल्यावर आपला सर्व थकवा दूर होतो.
कुटुंब ही अशी जागा आहे तिथे तुम्ही पूर्णतः सुरक्षित असता.
घर ,कुटुंब ही अशी जागा तिथे तुमची लोक असतात ती तुमचा फायदा घेत नाहीत,तुमच्या चुका शोधून तुम्हाला अडचणीत आणत नाहीत.
घर,कुटुंब अशी जागा आहे तिथे मानसिक स्वस्थ मिळते,
घर,कुटंब अशी जागा आहे तिथे तुम्ही त्रासात अडचणीत असताना निस्वार्थी पण मदत करणारी लोक असतात.
घर आणि कुटुंब अशी जगा आहे तेथील सर्व लोक तुमच्या विषयी असलेले मतभेद सोडून अडचणी च्या वेळी तुमच्या पाठी खंभिर पने
उभे राहतात.
त्या मुळे घर,कुटुंब हे खूप महत्त्वाचे आहे तेथील वातावरण निरोगी ,प्रेमळ, जिव्ह्याळ्याचे असणे खूप गरजेचे आहे आणि ते तसे टिकविणे घरातील सर्वांची जबाबदारी आहे.
काम ,करणे आणि पैसे कमविणे हीच फक्त व्यक्ती ची गरज आहे आणि सुंदर ,प्रेमळ कुटुंब ही गरज नाही असा विचार जे स्त्री,पुरुष करत आहेत त्यांची विचार करायची पद्धत साफ चुकीची आहे.
आणि इथे काही आयडी पैसे कमविणे हेच कुटुंब पेक्षा महत्वाचे आहे असा विचार मांडत आहेत.
जीवनाच्या अनेक टप्प्या वर व्यक्तीच्या गरजा बदलत असतात .
एकाच परिस्थिती आयुष्यभर कायम नसते .
आज शरीराने सशक्त असणारा व्यक्ती उद्या आजाराने,अपघाताने, वया मुळे ,मानसिक धक्का मुळे गलितगात्र होवू शकतो तेव्हा तुमचे व्यावसायिक मित्र, तुमच्या मदतीला कदापि येत नाहीत,.
मदतीला येते ते तुमचे कुटुंब.
तेव्हा कुटुंब सर्वांनी मिळून सांभाळा ,तुम्हाला कधीच संकटात एकटे वाटणार नाही.

हेमंत, तुमचे सर्व म्हणणे अगदी बरोबर आहे. पण दुर्दैवाने अनेकदा स्त्रीला हे सर्व तिच्या घरात अनुभवायला मिळत नाही. ही परिस्थिती बदलावी म्हणून तर ही चर्चा चालू आहे ना?

स्त्रीयांनी करियर करू नये असं मी कुठेही म्हटले नाहीये..मी स्वतः सहा वर्षे MNC मधे,चांगल्या पोस्टवर, चांगल्या पगारावर नोकरी केलीए.पण काही कारणामुळे जर करता येत नसेल तर तीथे घरी बसलीए असं का म्हटलं जातं??

स्त्री पुरुष समानता हि कन्सेप्ट येते म्हणजे तीथेच accept केलं जातं कि स्त्री कमी पडतेय..मी आधी ही म्हटले आहे.. दोघेही भिन्न आणि श्रेष्ठ आहे..

हेमंत म्हणताएत ते बरोबर आहे...
मग मी पण तर तेच म्हणतेय ना.. एक जण जर कमवतोय तर दुसर्याने घर सांभाळणे, मुले स़ाभाळणे, घरातले वातावरण प्रसन्न आनंदी ठेवणे यात चुकीचे काय आहे??

काहीच चुकीचे नाही एकाने कुणीतरी घराची जबाबदारी सांभाळली तर. प्रश्न कुठे निर्माण होतात?
1. घर सांभाळण्याचा आर्थिक मोबदला नसल्याने आणि इतर काहीही अर्थप्राप्तीचा मार्ग नसल्याने अचानक काहीही संकट उद्भवल्यास किंवा इतरही वेळी हक्काचे पैसे हाताशी नसणे.
2. घर सांभाळण्याच्या जबाबदारीची किंमत नसल्याने इतरांकडून अथवा समाजाकडून अपमान होणे (नवऱ्याच्या जीवावर बसून खाते, इंजिनिअरींगची एक सीट वाया घालवली वगैरे वगैरे)
3. कायदेशीररीत्या स्वतःच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता मुख्यतः घर नसल्याने येणारी अनिश्चितता
जर या गोष्टी घडणार नसतील तर स्त्री किंवा पुरुष या दोघांपैकी कोणीही स्वेच्छेने होम मेकर झाले तर छानच आहे.
माझे वैयक्तिक मत असे की आपल्या बुद्धीचा आणि वेळेचा यथाशक्ती समाजाला उपयोग व्हावा. त्यातून अर्थाजन व्हावे अशी अपेक्षा नसली तरी आपल्याला करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी घरकाम हे खूप वेळखाऊ काम होतं. मुलं भरपूर, यंत्रांची मदत नाही. त्यामुळे त्यातच सगळा वेळ जात होता. पण आता चित्र तसं नाही. आयुष्य अधिक सोपे सुटसुटीत झाले आहे. मुलांचे संगोपन, घराची जबाबदारी या साऱ्या गोष्टींसकट आपण काही तरी समाजाचे देणे फेडू शकलो तर जग अधिक सुंदर होईल. आपल्या आवडीच्या विषयात प्रामाणिकपणे करिअर करणे ही देखील एकप्रकारे देशसेवाच आहे. ते करायचे नसेल आणि स्वतःच्या आर्थिक स्वावलंबनाची खात्री असेल तर काही तरी वेगळे करता येईल.

मृणाल ह्यांचे प्रतिसाद वाचले एक व्यक्ति म्हणून मोठा मानसिक प्रवास पुढे आहे.............

अमा, क्रुपया पर्सनल जजमेंन्ट करू नये.
इथे तुम्ही तुमची मतं मांडा आणि माझी मते मी मांडू शकते..
माझी मते इतरांना पटली पाहिजेत किंवा इतरांची मते मी पटवून घेतली पाहिजेत असं इथे नसावे.

इथे स्वतःचा चॉइस म्हणून घरी राहणार्‍यांना जज करायचे नाहीये. प्रत्येकाचा आपापला निर्णय. >> Happy मी_अनु, जज कुणाला करत नाही पण या निमित्ताने वेगळे विचार ऐकायला मिळतात. थोडा वेगळा विचार मांडते. बघ पटतो का-
"चॉईस" म्हणून एखादे वर्ष घरातली कामे करत रहाणे वेगळे नि "चॉईस"च्या नावाखाली आपल्या आयुष्यातील २०-२५ वर्षे घरातील कामांवर खर्च करणे वेगळे. इंग्लिश विंग्लिश मधली शशी गोडबोले सारखी बाई करते तो "चॉईस" कारण वेळ पडल्यास तिच्या स्वतःच्या गरजांसाठी पैसा आहे तिच्याकडे, लाडूचा स्कीलसेट आहे, परिस्थिती बदलायला लागणारे मनुष्यबळ (उदा: सासूशी आपुलकीचे संबंध असणे इ) आहे तिच्याकडे. आपला व्यवसाय घरापेक्षा मोठा करायचा नाही हा चॉईस आहे तिचा.

या उलट शुभमंगल इ सिनेमा मधली सीमा पाहवा घरी असते हा काय चॉईस नाही. Rusty skillset, inflexible mindset इ मुळे त्या कॅरॅक्टरची employability काय आहे? अत्यल्प! तशा स्त्रीने "हा माझा चॉईस" म्हणणे पटतच नाही. चॉईस मध्ये तुला Alternative हवे, मग निर्णय घ्यायचा आहे. मी पोळ्या करेन, इतरांची मुले सांभाळेन इ इ म्हणणे वेगळे पण तसा व्यवसाय करणार्‍या एका तरी स्त्रीशी बोलून बिझनेस प्लॅन/फ्लेक्स वर्क प्लॅन तयार आहे काय?? प्रोजेक्टेड इन्कम काय पुढच्या क्वार्टरचे?? (असले प्रश्न विचारले की कुणाकुणाला राग येतो. त्यांची मी आधीच माफी मागते! हेतू दुखवायचा नाही तर आपण जे शब्द वापरतो त्याचा जरा अवेअरनेस हवा.)

अर्थात आता मी जे काय करते त्याला मी "चॉईस" म्हणेन हा चॉईस बाईला आहे हे मी मान्य करते Happy

जिज्ञासा, सिमंतिनी डंटे रहो. >> धन्यवाद अमा, means a lot. इथे मी किंवा जि आणि इतर सर्व उपयुक्त पोस्टी टाकणार्‍या आय डींना फक्त लिहायचं आहे. दगड खाणे, बर्फात पिकेटींग असल्या हक्कासाठीच्या लढाया वाट्याला नाहीत. निदान शाब्दिक वार, अनुल्लेख इ झेलू Wink

लंपन चांगली पोस्ट.

हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
'चॉईस' हा दोन्ही बाजू मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यावरच संदर्भ राखून असतो.
स्वस्त, मुबलक पेट्रोल उपलब्ध आहे, गाडी आहे, गाडी चालवायला मोकळे रस्ते आहेत, भटकायची हौस/ गरज आणि शारिरिक क्षमता आहे, मुबलक वेळ आहे आणि मग तुम्ही इंधन वाचवायचे म्हणून गाडीतुन न जाता घरी बसलात, सायकलने गेलात, पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरलात तर त्याला चॉईस म्हणता येईल.
आणि म्हणूनच परवडत नसताना केलेली काटकसर आणि सगळं मुबलक प्रमाणात असताना केलेली काटकसर ह्यात गुणात्मक फरक आहे. दोन्ही काटकसरीच पण मनाची अवस्था/ हेतू मात्र भिन्न आहेत. आपल्या मनाला मुरड प्रत्येकाला कधिना कधी, कुठल्याना कुठल्या निर्णयांत घालाविच लागते. पण ती मुरड असेल तर (प्रत्येकवेळी असेलच असेही अर्थातच नाही) त्याला ग्लोरिफाय मात्र करू नये. किमान स्वतःच्या मनाशी तरी प्रामाणिक राहून मनातल्या मनात ती मुरड आहे याची जाणिव जरुर ठेवावी.

अमा, धन्यवाद! सी म्हणते ते अगदी खरं आहे. शंभर दिडशे वर्षांपूर्वी स्त्रियांनी हक्कांसाठी जो लढा दिला त्यापुढे आपले आजचे लढे कितीतरी कमी कष्टाचे. इतके कृतज्ञ वाटते त्या सगळ्या समाज सुधारकांचा विचार केल्यावर __/\__
सावित्रीबाई फुले यांनी शेण दगड शिव्याशाप काय काय झेलले. आज मुलीचे शिक्षण, करीअर हे सगळे किती गृहीत धरले जाते पण या सगळ्या pathbreakers नी हिंमत दाखवली नसती तर यातले काहीच शक्य झाले नसते. पण अजून समानता आली नाहीये आणि जोवर ती येत नाही तोवर या लढ्याला आपल्या परीने आपण पुढे नेले पाहिजे. And I must do my bit! नाहीतर तो कृतघ्नपणा ठरेल.

<1. घर सांभाळण्याचा आर्थिक मोबदला नसल्याने आणि इतर काहीही अर्थप्राप्तीचा मार्ग नसल्याने अचानक काहीही संकट उद्भवल्यास किंवा इतरही वेळी हक्काचे पैसे हाताशी नसणे.
2. घर सांभाळण्याच्या जबाबदारीची किंमत नसल्याने इतरांकडून अथवा समाजाकडून अपमान होणे (नवऱ्याच्या जीवावर बसून खाते, इंजिनिअरींगची एक सीट वाया घालवली वगैरे वगैरे)
3. कायदेशीररीत्या स्वतःच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता मुख्यतः घर नसल्याने येणारी अनिश्चितता >

हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. गृहिणीपदाचे ग्लोरिफिकेशन, लग्नाच्या भावनिक नात्यात व्यवहार कसा आणायचा या गोष्टींचं पांघरूण या मुद्द्यांवर नको.

जिज्ञासा यांच्या प्रतिसादातला पुढचा भागही या वरच्या मुद्द्यांबद्दल काही एक निश्चित निर्णय घेऊनच मांडायचा आहे.

मास्टर शेफ ऑस्ट्रेलियामध्ये स्पर्धकांचं प्रोफेशन सांगितलं जातं. मुलं झालेल्या काही स्त्रियांची ओळख स्टे होम मॉम अशी सांगितली जाते.

भारतीय वंशाचा लोकी ( लोकनाथन असावा) याची ओळख स्टे होम फादर अशी सांगितली गेली. ( आता ती बदलली असावी. त्याचे रेस्टॉरंट वगैरे झाले असेल)

Pages