बाईचे घर कधी तिचे का नसते ?

Submitted by दिव्या१७ on 10 October, 2020 - 09:14

आजच एका वॉट्सअप ग्रुप वर एका मैत्रिणीने तिच्या शेजारची कथा सांगीतली, तिची शेजारीन रडत रडत तिच्या घरी आली कारण काही कारणांमुळे घरात भांडण झाले आणी तिच्या नवर्याने निघून जा माझ्या घरातून म्हणून तिला बाहेर काढले आणी दार बंद करून घेतले, ती मैत्रिणीकडे भावाला फोन करण्यासाठी आली होती तिचा मोबाईलही घरातच होता. त्या बाईने भावाला फोन केला, भाऊ ऑफिसला असल्याने संध्याकाळी येतो म्हणाला तोपर्यंत ती बाई मैत्रिणीकडे होती, भाऊ आला आणी त्याने तिच्या नवऱ्याला समजावून पहिले आणी नंतर बहिणीला घरी घेऊन गेला.

कारण काहीही असुद्या नेहमी नवराच का बायकोला निघून जा तुझ्या घरी सांगतो? आजकाल समाजात बरीच सुधारणा झाली आहे पण तरी बर्याच घरात हे चित्र दिसून येते, अगदी बाई कमवणारी असेल तरीही, आणी बायका ही कशाला उगाच जगाला दिखावा म्हणून सगळे सहन करत असतात, काहींना माहेरचा सपोर्ट नसतो, एकटे कुठे जाणार म्हणून परत नमते घेऊन संसाराला लागतात, पण ती गोष्ट कुठेतरी मनात खुपत असते. आजकाल बाईने एकटे राहणे ही सेफ राहिले नाही.

यावरून प्रश्न पडतो बाईचे खरे घर कोणते? माहेरचे म्हणतात तुझ्याघरी, नवरा म्हणतो जा तुझ्याघरी पण ते घर कुठले? lockdown मुळे तर ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत , म्हणून यावर चर्चा.

Group content visibility: 
Use group defaults

अतिउच्च आर्थिक गटातील लोक आणि गरीब लोक हेच कुटुंब ह्या व्याख्येत बसतात..
ह्या विषयात ह्या दोन्ही गटातील लोकांचे विचार एकसारखेच असतात.
त्याग करून नाती सांभाळण्यात फक्त हेच दोन गट प्रयत्न करत असतात.
मध्यम वर्गीय आणि उच्य मध्यमवर्गीय हे ह्या पृथ्वी वरचे वाटत च नाहीत ह्यांचे विचार विचित्र असतात.

भरत, "right to live in matrimonial home" ही अतिशय चांगली पोस्ट आहे. प्रत्येक बाईला कायद्याने आप्ल्याला काय हक्क मिळतात हे माहिती हवे. सर्व महिला / मुलींनी वाचली पाहिजे.

प्रत्येक बाईला कायद्याने आप्ल्याला काय हक्क मिळतात हे माहिती हवे. सर्व महिला / मुलींनी वाचली पाहिजे.>>> +100

सर्व लोकांनी आपले हक्क व त्याला अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या यांचे भान ठेवले व तसे आचरण ठेवले तर सगळे संबंध किती आदर्श होतील...

खबरदारीचा उपाय म्हणून घर दोघांच्याही(नवरा बायको) नावावर असावे.म्हणजे कोणीच कोणाला बाहेर काढू शकणार नाही. Technically अर्धे घर बाईचे होईल.
आर्थिक स्वावलंबन हवेच पण बाईने मनाने खमकी असायलाच हवे. नवर्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर " मी कुठेही जाणार नाही " हे निक्षून सांगता आले पाहिजे.

नवरा बायको ह्यांनी एकत्र झोपू नये.
सर्व प्रश्न सुटतील .
सेक्शुअल गरज म्हणून स्त्री पुरुष एकत्र येतात .
नवीन technical प्रगती होईल तेव्हा स्त्री आणि पुरुष ह्यांना एकमेकाची बिलकुल गरज लागणार नाही.
थोड्याच दिवसात स्त्री ही काहीच कामाची राहणार नाही.

Ishita, मी फक्त लिंक पोस्ट केली.
तुम्ही एकटीनेच वाचलेली दिसतेय.
मुलींनीच का? मुलांनीही वाचणे गरजेचे आहे.

घरातील सर्व काम करणारे रोबोट आणि सेक्स ची गरज भागवण्ासाठी कृत्रिम स्त्रिया खूप कमी दिवसात उपलब्ध होतील.
आणि लग्न,कुटुंब हा प्रकार नष्ट होईल.

बाईचे घर नसते म्हणे

1. एप्रिलला पोरांच्या परीक्षा झाल्या की दोन महिने माहेरी जाणे, 10 जूनला हजर

2. मग जून ते सप्टेंबर 3 महिने नांदणे , आणि 5 दिवस गणपती सुट्टीला माहेरी जाऊन येणे

3. मग दिवाळीला ऑक्टोबर महिन्यात परत 15 दिवस माहेरी जाऊन येणे

4. मग परत ख्रिसमस , नवीन वर्ष 3 दिवस माहेरी

5. मग पुन्हा एप्रिल ...... Refer to point no 1

एवढे फिरून परत बाईला घरच नसते म्हणून ढोल बडवत फिरणे

स्त्रिया ना खूप फुकट मिळत आहे.
आई ,वडिलांच्या संपत्ती मध्ये अधिकार.
नवऱ्याच्या संपत्ती मध्ये अधिकार.
स्त्री म्हणून नोकरीत आरक्षण.
निवडणुकीत आरक्षण.
कायदे त्यांच्या बाजू नीच हवेत म्हणून आग्रह.
बलात्कार ह्या स्त्रिया सर्रास करतात पण ह्यांना
ते मान्य नाही. आता पुरुषांनी स्त्री म्हणून त्यांना काहीच सवलती देण्याचं गरज नाही.
खूप दिले आता पर्यंत

उपाशी राव
ह्या मध्ये विनोदी काही नाही

सत्य स्थिती आहे.
आई ,वडील,नवरा ह्यांच्या कष्टाच्या संपत्ती मध्ये स्त्रिया आयत्या बिळा वर नागोबा नाहीत का.,?
निवडणुकी पासून बस मधील जागे पर्यंत ह्यांना सुविधा नाहीत का?

आई ,वडील,नवरा ह्यांच्या कष्टाच्या संपत्ती मध्ये स्त्रिया आयत्या बिळा वर नागोबा नाहीत का.,?
>>>

आईची संपत्ती मुलीला आणि वडिलांची मुलाला असा नियम काढायला हवा. म्हणजे या लैंगिक गटाची संपत्ती त्या लैंगिक गटाला जाणार नाही.

हेमंत, तुमचे विनोदी प्रतिसाद मला खूप आवडतात. असेच अजून लिहीत रहा. लिखाण प्रसवत रहा. /s>>>> Rofl

आईची संपत्ती मुलीला आणि वडिलांची मुलाला असा नियम काढायला हवा. म्हणजे या लैंगिक गटाची संपत्ती त्या लैंगिक गटाला जाणार नाही.>>>> Proud आई जर गृहिणी असेल तर ? कारण आई कुठे काय करते असे विचारणारे पण आहेत ना !

आई जर गृहिणी असेल तर ? कारण आई कुठे काय करते असे विचारणारे पण आहेत ना !
>>>
त्या केसमध्ये मुलीला घर देता येईल.
कसेल त्याची जमीन

घर नसते घर नसते म्हणून बोंबलण्यापेक्षा बाईने 3 वर्ष एका जागी राहुन नोकरी करावी

मग कागद घेऊन होम लोण घेऊन एक 1 बी एच के विथ टेरेस बांधावे

मग ढोल बडवून ओरडायचे , जय माहिष्मती

बाई खुर्चीत बसून शिवगामीदेवी होणार
आणि नवरा बिज्जलदेव टेरेसवर दारू पित दुर्बिणीतून इकडे तिकडे बघत बसणार .

एकदम आयडियल कॉम्बिनेशन आहे. उर्मट घमेंडी बाई आणि तिच्यामागे फाफललेला पुरुष हे कॉम्बिनेशन असल्याशिवाय हिंदू कहाणी पूर्ण होत नाही

उर्मट घमेंडी बाई आणि तिच्यामागे फाफललेला पुरुष हे कॉम्बिनेशन असल्याशिवाय हिंदू कहाणी पूर्ण होत नाही >>> Lol

नाही हो....अलादीन मालिकेत पण आहे असे एक जोडपे....बघाच एकदा Biggrin

एखादेच असते

पण आपल्या इतिहासात मात्र हा थम्ब रुल आहे

व्यथित करणारी पोस्ट आहे. सर्व प्रतिसाद वाचले नाहीत.

>> मला यावर काय लिहावे कळत नाही. पण अजूनही अनेक वर्षांनीही याच प्रकारचे किस्से वाचायला मिळतात हे एक समाज म्हणून दु:खदायक आहे.

+111

>>सहज एक प्रश्न मनात आला - इथे किती स्त्रिया (एकट्या राहणाऱ्या किंवा एकट्या पालक असलेल्या स्त्रिया सोडून)
अशा आहेत ज्या लग्न करून एकत्र कुटुंबात म्हणजे नवरा व त्याचे आईबाबा अशा घरात गेल्या आणि सासरच्यांनी त्यांच्या नावावर स्वतःचे घर करून दिले

किंवा त्या गृहिणी होत्या तरीही नवऱ्याने घर विकत घेताना ते यांनी आग्रहपूर्वक स्वतःच्या एकट्याच्या नावावर करून घेतले>>

सासर्‍यांनी सुनेच्या नावावर फ्लॅट करुन देणे असे माझ्या जवळच्या नात्यात दोन घरातून झाले आहे. एकात शहरातील फ्लॅट सुनेच्या नावावर आणि दुसर्‍यात वृद्धापकाळात गैरसोईचे रहाते घर विकून सुनेच्या नावावर सोईसुविधा असलेला फ्लॅट. स्वकष्टाची इस्टेट असली तरी पुढे वील चॅलेंज करणे , दावे असे काही व्हायची शक्यता गृहित धरुन हयातीतच केले. या दोन्ही व्यक्तींनी लेकी आणि सुनांना स्त्रीधन म्हणून सोने, तसेच बँकेत एफडी असेही दिले. सगळे आयुष्य घर-मुलं संभाळण्यात , नवर्‍याच्या नोकरीनुसार अ‍ॅडजस्ट करण्यात गेले, तेव्हा नवरा/पुढे वृद्धापकाळी मुलगा कुणापुढे हात पसरायची वेळ लेकी-सुनांवर नको हा विचार. तसे आमच्याकडे मागल्या पिढीतले नवरे ठराविक रक्कम दर महिना पत्नीचे सेविंग म्हणून बँकेत रिकरिंगला टाकायला देत असत पण तरी सासर्‍यांनीही आर्थिक दृष्ट्या शक्य होते तर केले.

माझ्या एकटीच्या नावावर देशात छोटा फ्लॅट घेण्यास नवर्‍याने पाठिंबा दिला. त्यावरुन बराच गदारोळ झाला, बराच वाईटपणा पदरात पडला मात्र तेव्हाची आमची एकंदरीत कौटुंबिक परीस्थिती अतिशय अनिश्चित होती. व्यवहार म्हणून काही निर्णय घेणे भाग होते. काही विपरित झालेच तर लहान मुलाला संभाळत देशात नव्याने एकटीने सुरवात करताना पत्नीच्या डोक्यावर हक्काचे दोन खोल्यांचे छप्पर असेल तर थोडे सोपे जाईल आणि दुसरे म्हणजे जॉईंट नसल्याने इतरांनी हक्क सांगणे वगैरे धोके नसतील हा त्या मागचा विचार. प्लॅट घेतल्यावरही पुढे काही काळाने 'आम्हाला अचानक पैशाची गरज आहे तेव्हा फ्लॅट विकावा' म्हणून माझ्यावर बरेच दडपण आणायचे प्रयत्न झाले. पण आम्ही ठाम राहीलो, 'बुक्स दाखवा, आम्ही देणी डायरेक्ट फेडू' असे सांगत राहीलो. असो.

आपण जिथे रहातो तिथले कायदे माहित करुन घेणे, मुलामुलींनाही त्याबद्द्ल सांगणे हे फार गरजेचे. मुलगा-मुलगी यापैकी कुणीही पिडीत होवू शकते. उद्या काही विपरित घडलेच तर काय याचा विचार हवा, वेळ आलीच तर त्यातल्या त्यात सुरक्षित कसे रहता येइल , अर्ध्या रात्री कुणाचा आधार वगैरे मनाची तयारी हवी. माझ्या आईच्या सोसायटीत एक उच्च शिक्षित तरुण कपल रहायचे. दोघांचीही बाकी फॅमिली दुसर्‍या राज्यात होती. मुलीचे आईवडील नवा संसार बघायला आले तर माझ्या आईबाबांना मुद्दाम भेटायला आले. ' इथे दोघेच रहाणार, तुम्ही सगळ्यात सिनियर आहात. उद्या काही प्रसंग आलाच तर आमच्या मुलीला तुमची लेक समजून आश्रय द्या, आम्ही येइपर्यंत संभाळा ' अशी विनंती केली. भांडणं झाली तर सबुरीने वागा , अम्मा-बाबुजींचा सल्ला घ्या असं त्या दोघांनाही बजावून गेले.
अमेरीकेसारख्या देशात प्रत्येक राज्याचे वेगळे कायदे आहेत . त्यामुळे तुमच्या राज्यात काय कायदा त्याची माहिती करुन घ्यावी. डिपेंडंट म्हणून येणार तर आधीच ऑनलाईन का होईना तुमचे असे नेटवर्क असावे . हेल्पलाईन्स माहित करुन घ्याव्यात.

भारतात मुलीला वाढवताना ' तू चार दिवसांची पाहूणी, सासरी जाणार' असे ऐकवले जाते तर मुलाला 'तू वारस आहेस ' असे सांगितले जाते. पालकांचे घर हेच मुलाचेही घर असते मात्र मुलीचे माहेर. लग्न झाल्यावर असते ते 'सासर'. काही झाले तरी तिथेच रहायचे आणि सोसायचे हा धाक. त्या घरातच मुलाची आई ' माहेरी हाकलून देवू' ऐकत संसार करत असते. पुढे तिच धमकी सुनेला देते. पत्नी डोक्यावर मिरे वाटेल तेव्हा आक्रमक असणे आवश्यक असे मुलावर शिकवले जाते आणि सासरी गेल्यावर नवरा मुठीत ठेवायला जमले पाहिजे असे मुलीला ऐकवले जाते. नात्यात विश्वास, मैत्र, आदर आवश्यक आहे असे किती घरात मुलांना शिकवले जाते, पालकांच्या वर्तनातून मुलांना दिसते? पतीपत्नीचे मैत्रीचे नाते असेल तर मुलाला ताटाखालचे मांजर म्हणून टोमणे ऐकवले जातात आणि नातवंड ते ऐकत असते. अशा परीस्थितीत वाढणार्‍या मुलामुलीची मानसिकता कशी होत असणार?

मुलगा-मुलगी स्वतःच्या पायावर उभे असले तरी आर्थिक साक्षर असतातच असे नाही, जोडीला भावनिक गुंताही असतो. दुरच्या नात्यातील मुलगी सध्या फ्लॅटचे कर्ज फेडत आहे. प्लॅट सासर्‍यांच्या नावावर. माझ्या आईने सांगितले की कर्जाचा हप्ता आणि इतर घरखर्च यातून तिची स्वतंत्र बचत करायला पैसे उरतच नाहीत, त्याबद्द्ल नवर्‍याकडे चिंता व्यक्त केली की तो म्हणतो हेच का तुझे माझ्यावरचे प्रेम आणि विश्वास. त्यांचे लव मॅरेज आहे. माझ्या आईवडीलांनी तुला स्विकारले आणि तू अविश्वास दाखवतेस हेही टुमणे असते. तिचा सगळा पगार जॉईंट अकाउंटला असेही होते. मध्यंतरी तिने नोकरी बदलली तेव्हा माझ्या सल्ल्याने कंपनी पॉलिसी असे सांगुन तिने एकटीचे अकाउंट उघडले. आता पगार एकटीच्या अकाउंटला आणि मग खर्चाची रक्कम जॉईंट अकाउंटला असे करते. थोडे पैसे एकटीच्या अकाउंटला बाजूला टाकले जात आहेत.
भारतात बरेचदा घराजवळच्या बँकेत सासरचे व्यवहार असतात, अनेक वर्ष व्यवहार असल्याने ओळखी असतात. नव्या सुनेचे व्यवहारही तिथेच सुरु होतात. सुनेने स्वतःच्या कमाईतून एफडी काढली आणि बँक कर्मचार्‍याने सासरच्यांना सांगितले, सुनेला लगेच घरी जाब विचारला गेला असेही प्रकार होतात. आमचा लॉकर आहेच तेव्हा तुझे दागिने त्यातच ठेवू हे देखील सर्रास होते.

खरं आहे स्वाती2.
मुळात आर्थिक स्वातंत्र्य हा मुख्य मुद्दा आहे.ते लग्नानंतर नसेल तर हळूहळू शिकून, गोड बोलून, काही कामे अंगावर घेऊन मिळवायचे आहे.
'बाहेरची कामं पुरुषांची घरची बायकांची' ही स्पष्ट रेषा आहे ती तोडायची आहे.दोन्ही बाजूंकडून.कधीकधी बाई म्हणून मी नवऱ्याने ताट पाणी घ्यावं, थोडी मदत करावी अशी अपेक्षा करेन. पण बाई म्हणून 'लॉंग ड्राईव्ह नवऱ्यानेच करावं, कार सर्व्हिसिंग नवऱ्यानेच करुन आणावं' अश्या अपेक्षा ठेवेन. सध्या हे करत असले तरी यातली हिपोक्रसी मला जाणवते.आत्म परीक्षण करून हे चित्र हळूहळू बायकांनीही बदलायचं आहे.आपण एकमेकांचे सहकारी बनू, एक मॅनेजर दुसरा टीममेट किंवा दोघे वेगवेगळ्या डिपार्टमेंट चे मॅनेजर आणि एकमेकांशी मीटिंग मध्ये भांडतायत असे असू नये.

Submitted by स्वाती२ on 16 October, 2020 - 09:27 >> स्वाती, प्रतिसादातले ऊदाहरण फार एकांगी आणि ऊगीचच विक्टिमायझेशन आहे असे वाटले.
ह्या ऊदाहरणातली स्त्री लग्नाआधी नोकरी करत नव्हती का? लग्नाआधी नोकरीतले पगाराचे पैसे कुठल्या अकाऊंटमध्ये जात असत? आईबाबांनी मुलीचे ईंडिपेंडंट अकाऊंट ऊघडू नये असाही काही नियम नाही. हे सगळे नसेल तर मुलीच्या वडिलांची मानसिकता नवरा आणि सासरच्या वडिलांपेक्षा फार वेगळी नाही, असे का म्हणू नये?
आपण आर्थिक बाबतीत जबाबदार आणि जागरूक असायला हवे हे शिक्षण मुलींना माहेरीच मिळणे जरूरी आहे म्हणजे पुढे आर्थिक परावलंबनातून सासरी येणारे प्रॉब्लेम्स कमी होतील. आयुष्यात कधी आर्थिक जबाबदारी घेतली नसेल, तुमच्या वागण्या बोलण्यात त्या बाबतीत रोखठोकपणा दिसत नसेल तर कोणीही तुम्हाला ती जबाबदारी आणि त्या अनुषंगाने कुटुंबावर राखता येणारा कंट्रोल देणार नाही. ही जबाबदारी म्हणजे कुटुंबियांच्या नाड्या आपल्याकडे ठेवणे आपल्या हातात ठेवणे असा सरळ सरळ अर्थ आहे हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य असतांना आपल्या कमतरता झाकण्यापेक्षा विक्टिम म्हणवून घेणे सोपे आहे.

थोडक्यात ऑफिसमध्ये संधी असतांना जबाबदारी, पुढाकार मागून न घेणारे लोक, अचानक प्रमोशनची संधी ऊपलब्ध झाली आणि ती दुसर्‍याला मिळाली की जसा गळा काढतात तसे वाटले हे एकंदर प्रकरण आणि चर्चा.
(मुद्दा सेन्सिटिव आहे आणि प्रतिसाद थोडा टोकदार झाला आहे ह्याची कल्पना आहे)

हाब,
लग्नाआधी मुलीचे स्वतंत्र अकाउंट होते. लव्ह मॅरेज झाले, ज्याला विरोध होता, बर्‍याच प्रयत्नांनी सासरची मंडळी तयार झाली आणि पार पडले. लग्नानंतर जिथे रहायला गेली तिथे नवर्‍यासोबत जॉईंट अकाउंट, पगार त्या खात्यात जमा वगैरे सर्व नव्याच्या नवलाईत झाले. पुढे कर्जाचे हप्ते वगैरे अजून काही महिन्यांनी सुरु झाले. तिने हळू हळू मार्ग काढला, काढत आहे. तिचा नवराही आर्थिक दृष्ट्या फारसा साक्षर नाही. फ्लॅट वडीलांच्या नावावर आहे. पत्नीच्या पगारातून(आपल्या संसारातून) हप्ते जातायत तेव्हा पुढे हा फ्लॅट आपल्याला असे तो धरुन चालतोय, तो फ्लॅट वडील त्यांच्या दुसर्‍या अपत्याला देवू शकतात ही शक्यता तो लक्षात घेवू इच्छित नाही. मुलीला मी विक्टिम म्हणतच नाहीये. मी वर भावनिक गुंता असे लिहिले आहेच.

लग्नाआधी मुली कितीही आर्थिक साक्षर असल्या तरी 'तू जुळवून घे' हा मास्टरकोड असतोच. काय बाबतीत मी जुळवून घेणार नाही हा प्रश्न कधी स्वतःला विचारलेला नसतो. इथे समान जबाबदारी असा एक सूर दिसत आहे. आर्थिक समानता हवी पण कशा पद्धतीने? - टक्केवारीनुसार. म्हणजे जर घराचा खर्च रू २०० आहे. पती रू २०० कमावतो नि पत्नी रू१०० कमावते तर तुझे १०० नि माझे १०० ही समानता नाही. कारण खर्चाची समानता आली तरी इथे पती जास्त सेव्हींग करत आहे. हळूहळू त्याचे पारडे जड होते. तुझे ~१३४, नि माझे ~६६ अशी विभागणी केली तर त्यात समानता आहे. कर्जाच्या बाबतीतही तेच.

असे बारकावे मुलीशी कोणी चर्चा करत नाही. चाळीशीची सीता 'आई, पोटात घे' म्हणते नि ती पूजनीय आहे असेच संस्कार करत रहातो. सीतेने एक बीएचके/स्टुडीयो तिच्या मिळकतीवर घेतला असता तर लाखो बायांची परिस्थिती आज वेगळी असती...

चाळीशीची सीता 'आई, पोटात घे' म्हणते नि ती पूजनीय आहे असेच संस्कार करत रहातो. सीतेने एक बीएचके/स्टुडीयो तिच्या मिळकतीवर घेतला असता तर लाखो बायांची परिस्थिती आज वेगळी असती...>>अगदी हाच प्रश्न पडला होता मला, एकदा आजीला विचारलं पण होतं मी रामाने लोकांच ऐकून तिला घराबाहेर काढलं तर ती रानात का गेली?मी घरातून जाणार नाहीच असं का म्हटलं नाही तिने?
नवरा बायकोच्या मध्ये तिसर्याचं माणसाचं का ऐकलं त्याने?

तुमच्या वरच्या पोस्ट ने आजीचा तो "वायाच जाणार ही कार्टी"type लूक आठवला अगदी

Biggrin राम-सीता तसे का वागले ह्याचा उहापोह मी नाही करू शकणार पण - "पैसा नसेल तर देवावरही आईचा धावा करायची वेळ येते आणि मी तुला आयुष्यभर पूरी पडणार नाही." हे मुलांना जरूर सांगेन....

Submitted by स्वाती२ on 16 October, 2020 - 10:47 >> ओके म्हणजे आधी प्रेमभावनेपुढे आर्थिक स्वातंत्र्याकडे आणि ते नसल्याने पुढील आयुष्यावर येणार्‍या अडचणींकडे दुर्लक्ष केले. आणि जेव्हा आर्थिक परवलंबित्वाची जाणीव झाली तेव्हा अचानक आर्थिक स्वातंत्र्य आधीच्या समर्पण भावनेपेक्षा जास्त महत्वाचे झाले.
नवरा प्रेमविवाह करून गिल्ट मध्ये आहे आणि आता घरच्यांचा अ‍ॅक्सेप्टन्स साठी स्वतःची आणि बायकोची अर्थिक मिळकत दोघांच्याही नावावर नसलेल्या प्रॉपर्टीवर पणाला लावत आहे. त्यात मला कुठेही 'स्त्रीला तिचे घर असते का?' ह्या मागचा विचार दिसला नाही. ऊद्या ह्या ऊदाहरणातल्या स्त्रीने घराचा हप्ता भरण्यास नकार दिला तर तिला नवर्‍यासहित सगळ्यांनी घरातून जा असे सांगितले तरी मला फार नवल वाटणार नाही. तिच्य परिस्थितीला तिची धरसोड वृत्तीच कारण ठरली म्हणता येईल.

तुम्ही म्हणालात तसे स्त्रियांचा (कमावत्या) भावनिक गुंता हे त्यांच्या आर्थिक परवलंबित्वाचे एक महत्वाचे कारण आहे... पितृसत्ताक पद्धतीत बहुतांष पुरूषांचा 'ना बीवी ना बच्चा...सबसे बडा रुपय्या' असा अजेंडा क्लिअर असतो...आणि त्याच बळावर ते सत्ता गाजवतात. स्त्री ने हे वयाची पंचवीस एक वर्षे स्वतःच्या घरात बघितलेले असते तरीही ती वेळ आपल्यावर येऊ नये असा प्रयत्न ती करत नसेल तर तिच्या स्थितीसाठी पुरुषांना नावे ठेवणे, यं ना त्यंव कारणे देणे निरर्थक आहे असे मला वाटते.

राम-सीता तसे का वागले ह्याचा उहापोह मी नाही करू शकणार पण ->>नाही ओ सीमंतिनी, ते सगळं मी आजीला विचारलं होतो,आता तो 1bhk वाला पण प्रश्न मला तेव्हा सुचला असता तर आजीने मला हकलूनच दिले असते नक्की Rofl

हाब. अहो पण कधीतरी पुरुषाचा attitude बरोबर आहे का याचा विचार करा की! स्त्री तिच्या चुकांतून शिकत नाही पण पुरूष बदलले तर ही व्यवस्था अधिक equitable होईल असे नाही का वाटत? इथे नवरा त्याच्या गिल्टपायी तिला तिने हप्ते भरायला लावतोय आणि उद्या त्यांचं नाही पटलं तर नवरा आणि त्याचे आईवडील सुनेला बाहेर काढू शकतात ही शक्यता तरीही आहेच! स्त्रियांनी पुरूषप्रधान संस्कृतीचे तोटे लक्षात घेऊन smartly वागायला शिकलं पाहिजे पण ही इतकी biased संस्कृती तिला धक्का पण पोचता कामा नये? सगळ्या गोष्टी या स्त्रियांना का कायम भोगायला लागतात? कधीतरी ही समाजव्यवस्था बदलली पाहिजे असाही उपाय येऊ द्या की! की स्त्रीने कायम tiptoed चाललं पाहिजे या landmines मध्ये?

Biggrin आदू, मी पण आजीला माझा वन बीएचके झाल्यावर प्रश्न केले Wink हाकललं आजीने तर प्रॉब्लेम नको...

हाब, पुरूष पैशाच्या बळावर सत्ता गाजवतात हा गैरसमज आहे. पैसा हा एक भाग झाला. समाजात सुरक्षितता असणे, शिक्षणासाठी कुटूंबाकडून संसाधने सहज मिळणे, अगदी गरम सैपाक मि़ळणे अशा अनेक लहान लहान गोष्टीतून बळ मिळत असते. बलवान माणूस जर सत्ता गाजवू लागला तर त्याला बोल लावायचा नाही??? ही कुठली माणूसकी... बलवानाने इतरांना सबळ करावे (वरचढ नाही) असेच वागणे हवे ना?? ती माणूसकी झाली...

राम सीता आले

आता वाल्याही येऊ दे

नवर्याशी भांडून माहेरी जाणाऱ्या बायकांची अवस्था वाल्या कोळी सारखी असते , जोवर तिचा पगार असतो तोवर माहेरचे लोक आमचा वाल्या आमचा वाल्या म्हणतात,
पण यदाकदाचित पगार गेला तर मग कोण वाल्या , कुठला वाल्या , सुरू होते.

जिज्ञासा,
प्रेम, नाते संबंध आपल्या जागी आणि आर्थिक व्यवहार आपल्या जागी. आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार = सत्ता, हुकूमत हे हजारो वर्षे चालत आलेले समीकरण आहे. पुरूषांना आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार सोडण्याबद्दल काहीही ईन्सेटिंव मिळत नसेल तर ते कधीही त्या बाबतीत आपला अ‍ॅटिट्यूड सोडणार नाहीत.... मिळेल तिथे ते आपला हा हक्क बजावत राहणार.
समाज व्यवस्था बदलण्याचा कुठलाही फायदा पुरुषांना मिळणार नाही तर ते ही व्यवस्था बदलू देणार नाही. हीच अवस्था काही वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाबद्दल होती.... पुराणातली गार्गी मैत्रेयींची ऊदाहरणे, जिजाऊ, ताराबाईंसारख्या कर्तबगार स्त्रयांची ऊदाहरणे असून सुद्धा पुरुषांनी समाज व्यवस्था बदलू दिली नाही....ते पुढेही स्वतःहून ती बदलणार नाही. भावनिक आवाहन करून क्रांतिकारी बदल घडत नसतात... अन्यथा शोषण, हिंसचार समजात तग धरून राहिलेच नसते.
ह्यासाठी स्त्रियांनीच आपल्या आर्थिक स्वातंत्र्याबाबत काय जागरूक रहायला हवे ...हे स्वातंत्र्य अबाधित राहील त्यासाठी पावले ऊचलायला हवीत आणि जोडीदार निवडतांना ह्या मुद्द्यांचा ऊहापोह करून चर्चा घडून आणावी. त्यासाठी आईबाबांनी मुलींना ही शिकवण द्यायला हवी... पण मुलगी म्हणजे दुसर्‍या घराची अमानत एवढा संकुचित विचार आईबाबांचा असेल तर लग्न संस्थे आधी ही मानसिकता पालकांची मानसिकता बदलायला हवी. जागरूकता लहान वयात आली तर टिकुन राहील... एकदा मुलींची आर्थिक बाबतीत परावलंबित्वाची आणि पुरुषांची वर्चस्वाची भावना लोपली की तुम्हाला अपेक्षित असलेले स्थित्यंतर नक्की घडून येईल.

आपल्या मुलीची आर्थिक परावलंबत्वामुळे वाईट अवस्था होऊ शकते म्हणून किती मुलींना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या आईबाबांनी आर्थिक साक्षर केले? ऐपत नसली तरी आर्थिक स्वातंत्र्य किती महत्वाचे आहे त्याचे महत्व सांगितले? छोट्या छोट्या गोष्टीतून हे आर्थिक मुल्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याकडे ऊघडणारे दार असे संस्कार केले?

पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे तरी काय.... कधी मुद्दाम, कधी अनावधानाने किंवा मोस्टली जडघडणीतून आलेला 'फुटकळ कर्तुत्वातून अर्थार्जन करतो ह्याचा तोरा'...बरोबर? मग शिकल्यानंतर असे कर्तुत्व स्त्रियाही दाखवू शकतातच की... फक्त त्यांनी आपला भावनिक गुंता (जो कधी मुद्दाम, कधी अनावधानाने किंवा मोस्टली जडघडणीतून त्यांच्यावर लादला जातो) आधी सोडवायला हवा. आपण सोडवला असल्यास वयात येणार्‍या ईतर मुलींना तो सोडवण्यास मदत करायला हवी...पुरुष सुधारतील ह्या विश्वासावर अवलंबून राहू नये.

मी रामाने लोकांच ऐकून तिला घराबाहेर काढलं तर ती रानात का गेली?मी घरातून जाणार नाहीच असं का म्हटलं नाही तिने?>>>>

रामाने तिला भावाच्या हाती रानात धाडले आणि तिकडे गेल्यावर तिला सत्य सांगायची जबाबदारीही त्याच्याच गळ्यात टाकली. आपण अयोग्य करतोय हे माहीत असल्यामुळे तिला स्वतःच हे सांगायची त्याची हिम्मत झाली नसावी. सीता वैतागली असणार पण गर्भवती असल्याने तिने स्वतःला सांभाळले असेल, नाहीतर तेव्हाच तिला भूमातेला हाक मारता आली असती.

हाबचं म्हणणं पटतंय.
आणि मुली हाच विचार करुन जागृक होत असलेल्या 'ब्राह्मण मुलांना उपवर मुलींची कमतरता' लेखातील शेवटच्या बुरसटलेल्या प्रतिसादातून वाटतात. लग्न झाल्यावर स्वतंत्र रहात असलेला मुलगा, त्याच्या नावावर घर, खेड्यात रहाणारा नको इ. अटी सामाजिक बदलांबरोबर आर्थिक शहाणपण असल्याने आलेल्या असव्यात असं वाटून गेलं.
आर्थिक आणि कायद्याची सखोल माहिती ही प्रत्येकाने आपल्या अपत्यास द्यावीच द्यावी. जे आपल्या हक्काचं आहे ते त्या मुलीनेही सोडून जाणं टाळण्यासाठी खमकेपणा शिकवावा. सगळेच खमके बनू शकणार नाहीत हे ध्यानात घेता आपल्याकडे खमकेपण नाही हे माहित जरी असलं तरी पुष्कळ होईल कदाचित.
अनेक ठिकाणी लग्नानंतर रहात असलेले घर ऑटोमॅटिकली दोघांचा हक्क बनते. त्यावर त्यांच्यापैकी एकाचे नाव असले तरीही. लग्नापूर्वी घेतलेले आणि रहात नसलेले घराच्याही लग्नानंतर झालेल्या किंमतीच्या अप्रिसिएशन वर दोघांचा हक्क असतो. हे कायदे स्वाती२ म्हणताहेत तसे जागेप्रमाणे बदलतात. त्याची माहिती असावीच.

हाब, केवळ आर्थिक ताकदीचा प्रश्न नाहीये हा. नाहीतर दोघेही कमावते असून घर न कमावत्या सासऱ्यांच्या नावावर असूच शकले नसते. Patriarchy is deeply rooted in the mind of the world. It's a mindset change that has to occur irrespective of gender. या व्यवस्थेत पुरूषांना जसा फायदा मिळतो तसे प्रेशर ही राहते. जर दोन्ही बाजूंनी gender equity चे प्रयत्न होऊ शकले तर एक चांगला समतोल साधला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ मुलींना सक्षम करून फायदा नाही. मुलांना देखील सजग केले पाहिजे. सुदैवाने असे बदल मी पाहते आहे. नवीन पिढीतली मुले खरंच जास्त सजग आहेत. फक्त या बदलांचा वेग वाढला पाहिजे.

रामाने तिला भावाच्या हाती रानात धाडले आणि तिकडे गेल्यावर तिला सत्य सांगायची जबाबदारीही त्याच्याच गळ्यात टाकली.>>> पण घरी परत जाऊन भांडण करून मग हवे तर निघता किंवा तिथेच हट्टाने राहता आले असते की,पण नाही ना पहिल्यापासून हे बापाचे घर आणि ते नवऱ्याचं घर हेच बिंबवल्यावर नक्की का भांडायचे हेच सीतेला समजलं नसेल
आता हे मी खूपच अवांतर केलंय, सॉरी Happy

It's a mindset change that has to occur irrespective of gender. >> तह तेव्हाच होतो जेव्हा दोन्ही बाजू तुल्यबळ असतात किंवा त्या दोघांना गमावण्यासारखे बरेच काही असते.
अलिकडेपर्यंत स्त्री आणि पुरुषाचा विवाहसंस्थेतला तह असा होता की... मी अर्थार्जन करेल आणि आर्थि बाबीतले सगळे निर्णय घेईन (पुरूष कमॉडिटी - पैसा) तू माझ्या सहित माझ्या आणि आपल्या बाकी कुटुंबाची काळजी घे. (स्त्री कमॉडिटी -समर्पण, शुश्रुषाभाव)

आता शिक्षणाच्या सर्वदूर प्रसारानंतर, स्त्रिया वर्कफोर्स मध्ये प्रचंड मोठ्या संख्येने दाखल झाल्याने, एकंदर भौतिक गोष्टींना पहिल्यापेक्षा खूप महत्व प्राप्त झाल्याने (पैसा ह्या कमॉडिटीचे अ‍ॅप्रिसिएशन) आणि ऊलटीकडे समर्पण, शुश्रुषाभाव ही भावना आणि तिला आयुष्य वाहून घेणे हे आता स्त्री व्यक्तीस्वातंत्र्याच्या जाणिवेच्या आड येऊ लागल्याने (समर्पण, शुश्रुषाभाव ह्या कमॉडिटीच्या किंमती घसरल्या) , तसेच (समर्पण, शुश्रुषाभाव) ही कमॉडिटी पैशाने विकत घेता येते हे कळाल्याने (मेड्स, नोकर) ....एकंदर जुन्या तहाची कलमे कुचकामी ठरत आहेत.

जोवर मुलांच्या जडघडणीत तहाची नवी कलमे रूजत नाहीत तोवर स्थित्यंतर दिसून येणार नाही.... वयात आलेल्या (तहाच्या जुन्या कलमानुसार आयुष्य बघितलेल्या आणि जगलेल्या) पुरूषांना तहाची नवी कलमे शिकवून समजणार नाहीत, ती त्यांना समजतील आणि ते ती मोठ्या दिलाने स्वीकारतील हा आशावाद भाबडा आहे. त्यासाठी जडणघडणीत असणार्‍या मुलांना आणि मुलींना आपणच तहाची नवी कलमे समजावयाला हवीत.

पुन्ह लिहितो प्रेम, जिव्हाळा, नाते संबंध, आपपरभाव, आत्न्मसन्मान, समर्पण भावना ह्या सगळे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट गोष्टी आपल्या जागी .... त्यांचा पैसा ह्य कमॉडिटीशी संबंध जोडू नये...जसे आता पर्स्नल फोन असणे हा व्व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय झाला आहे ... जर फोन असणे ही बाब एवढ्या चटकन आत्मसात होऊ शकते (कारण ती एक विजिबल कमॉडिटी आहे) तर आस्र्हिक साक्षरता आणि त्यानिगडीत स्वातंत्र्य हा सुद्धा व्व्यक्तीस्वातंत्र्याचा आयाम आहे तो ज्याचा त्यानेच जपायला हवा.

हो आदू, अवांतर झाले. आधी म्हणल्याप्रमाणे देव असे का वागले, तसे का वागले हा मुद्दा नाही. पैसा देवालाही चुकला नाही आणि पालक म्हणून आपण पुरे पडणार नाही, सबब आत्मनिर्भर असणे हा विचार महत्त्वाचा.
आपल्या हक्काचं जे काही आहे त्याचे भान असणे अतिशय गरजेचे आहे. ८०% महिला ज्या घराबाहेर पडल्या त्यांना पुढे स्टॉकींग, मारहाण इ त्रास होतो. त्यामुळे बरेचवेळा नात्यातून बाहेर पडताना त्याला त्याचे वाटेल असे काहीही न घेणे श्रेयस्कर असते. नाते संपले तरी प्रॉपर्टी किंवा मुले अशा शेयर्ड गोष्टींमुळे त्रास संपत नाही. नात्यात असतांना along the way स्त्रीला माझं काय आहे ह्याचे भान हवे आणि त्याची जाणीव घरातील इतरांना असावी.

पुन्ह लिहितो प्रेम, जिव्हाळा, नाते संबंध, आपपरभाव, आत्न्मसन्मान, समर्पण भावना ह्या सगळे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट गोष्टी आपल्या जागी .... त्यांचा पैसा ह्य कमॉडिटीशी संबंध जोडू नये...>> हे कागदावर खरे आणि योग्य आहे आणि मलाही पटते पण हे प्रत्यक्षात घडत नाही आणि घडणारही नाही. कारण पैसा ही कमॉडिटी कधी कधी या सर्व भावनांना override करते. म्हणून संपत्तीवरून भावंडात, नवरा बायकोत आणि जवळपास प्रत्येक नात्यात भांडणे होतात.

रामसीतेचे उदाहरणच ईथे गैरलागू आहे. राम एक महान कर्तुत्ववान पुरुष होता तर सीतेची ओळख त्याची पत्नी म्हणूनच.
जसे एखादा अंबानीटाईप्स कर्तुत्ववान उद्योगपती असेल तर तो आपल्याला लग्नासाठी योग्य अशी कर्तुत्ववान स्त्री कुठे शोधत बसणार. तो एखादी सुशील सुंदर तोलामोलाच्या घरातील मुलगी बघणार. तिला आदर देणार आणि तिच्याकडून प्रेम मिळवणार. सदर चर्चा अश्या जोडप्यांना दूरदूरपर्यंत लागू नाही. त्यांचे आयुष्यही वेगळे, नवराबायकोंचे नातेही वेगळे आणि त्यातील प्रॉब्लेमही वेगळे..

बाकी रामायण स्क्रिप्टेड होते. जसे आयपीएल चालू आहे. पुढे योगायोगाने लवकुश आपल्या वडिलांसमोर युद्धाला येणार हा मनमोहन देसाई टाईप्स्स फिल्मी योगायोग तेव्हाही वाल्मिकी यांना टाळता आला नाही Happy

म्हणून संपत्तीवरून भावंडात, नवरा बायकोत आणि जवळपास प्रत्येक नात्यात भांडणे होतात
>>>>

+७८६
.यामागे आणखी एक हुमायून नेचर सुद्धा असते.
जर एखाद्या अनोळखी माणसाकडे बक्कळ पैसा असेल तर आपल्याला त्याचे काही वाटत नाही. पण तोच आपल्या भावाकडे असेल तर मत्सर जागा होतो.

>>
ओके म्हणजे आधी प्रेमभावनेपुढे आर्थिक स्वातंत्र्याकडे आणि ते नसल्याने पुढील आयुष्यावर येणार्‍या अडचणींकडे दुर्लक्ष केले. आणि जेव्हा आर्थिक परवलंबित्वाची जाणीव झाली तेव्हा अचानक आर्थिक स्वातंत्र्य आधीच्या समर्पण भावनेपेक्षा जास्त महत्वाचे झाले.
>>
लग्न झाल्यावर गुड फेथ मधे एकत्र अकाउंट उघडले. घरखर्च दोघे मिळून चालवू आणि तशीच बचतही करु हा हेतू. पण जे घर तुमच्या नावावरच नाही त्याच्यावरचे कर्ज फेडायचे , स्वतःची बचत अशी होतच नाही आणि हे सगळे माझे तुझ्यावर प्रेम आहे ना मग.... असे म्हणत नवरा भाग पाडतो म्हणून . यात समर्पण कुठून आले? समर्पण हे स्वतःहून केलेले असते. नवर्‍यापेक्षा तिचा पगार जास्त आहे, दोघांच्या एकत्र उत्पन्नातून आपल्या संसारासाठी थोडी बचत आणि सासर्‍यांना कर्जफेडीसाठी थोडी मदत असे करायला या मुलीचीही तयारी आहे. मात्र प्रेमाच्या समर्पणाच्या नावाखाली सगळेच दान करायचे, आपल्या उद्याचा डोळसपणे विचार करायचा नाही याला तिचा आक्षेप आहे. असो. हळू हळू काढेल ती मार्ग.

जसे एखादा अंबानीटाईप्स कर्तुत्ववान उद्योगपती असेल तर तो आपल्याला लग्नासाठी योग्य अशी कर्तुत्ववान स्त्री कुठे शोधत बसणार. तो एखादी सुशील सुंदर तोलामोलाच्या घरातील मुलगी बघणार. तिला आदर देणार आणि तिच्याकडून प्रेम मिळवणार. सदर चर्चा अश्या जोडप्यांना दूरदूरपर्यंत लागू नाही. त्यांचे आयुष्यही वेगळे, नवराबायकोंचे नातेही वेगळे आणि त्यातील प्रॉब्लेमही वेगळे.. >> Happy
पण सोल्यूशन नेहमी सेमच असते. बाईला पडते घ्यावे लागते/घेते. बेझोसने सोडले तर बायकोला ५०% वाटा मिळाला नाही, कायदा तसा असूनही. लढण्याची क्षमता, इच्छा इ कमीच पडते का काय माहिती नाही. म्हणून इथे चर्चा करायची. इथल्या चर्चेने मेकेन्झीला फायदा नाही हे माहिती आहे पण कुणी भविष्यातील मेकेन्झी असेल तर वाचेलही...

Hemant 33 @ आई ,वडील,नवरा ह्यांच्या कष्टाच्या संपत्ती मध्ये स्त्रिया आयत्या बिळा वर नागोबा नाहीत का.,? अस बोलत आहेत की फक्त बायको ही काहीच करत नाही ती आई पण आधी कोणाची तरी बायको असते की आणि तस ही अशीच मानसिकता असेन तर लग्न करू नय.

कोणाला विरोध करत नाही.
पण एक साधा प्रश्न.
इथे असणारे आयडी त्यांच्या घरात काम करायला येणाऱ्या मोलकरणीला किती पगार देतात.7000 वर कोणीच देत नसेल.
2000 ते 7000 ह्या range madhye.
त्याच्या दुप्पट पैसे खर्च केले तर 24 तास घरकाम करणारी व्यक्ती उपलब्ध होईल.
बाकी काही खर्च नाही,कोणते हक्क नाहीत,घरातील कोणत्याच वस्तू वर अधिकार नाहीत.
मुळात जिथे दोघे नवरा बायको नोकरी करतात तिथे घरकाम हा वादाचा मुद्धा असायलाच नको.
घरकाम करण्यासाठी बाई ठेवा .पैसे खर्च होतील.
पण भांडण तर होणार नाहीत.

त्याच्या दुप्पट पैसे खर्च केले तर 24 तास घरकाम करणारी व्यक्ती उपलब्ध होईल. >> बेस्ट! चांगले विनोद करता. सगळ्या धाग्यांवर तुमच्या फार विनोदी पोस्ट्स वाचायला मिळतात. वाचकांच्या मनोरंजनासाठी तुम्ही लिहित रहा!

Pages