बाईचे घर कधी तिचे का नसते ?

Submitted by दिव्या१७ on 10 October, 2020 - 09:14

आजच एका वॉट्सअप ग्रुप वर एका मैत्रिणीने तिच्या शेजारची कथा सांगीतली, तिची शेजारीन रडत रडत तिच्या घरी आली कारण काही कारणांमुळे घरात भांडण झाले आणी तिच्या नवर्याने निघून जा माझ्या घरातून म्हणून तिला बाहेर काढले आणी दार बंद करून घेतले, ती मैत्रिणीकडे भावाला फोन करण्यासाठी आली होती तिचा मोबाईलही घरातच होता. त्या बाईने भावाला फोन केला, भाऊ ऑफिसला असल्याने संध्याकाळी येतो म्हणाला तोपर्यंत ती बाई मैत्रिणीकडे होती, भाऊ आला आणी त्याने तिच्या नवऱ्याला समजावून पहिले आणी नंतर बहिणीला घरी घेऊन गेला.

कारण काहीही असुद्या नेहमी नवराच का बायकोला निघून जा तुझ्या घरी सांगतो? आजकाल समाजात बरीच सुधारणा झाली आहे पण तरी बर्याच घरात हे चित्र दिसून येते, अगदी बाई कमवणारी असेल तरीही, आणी बायका ही कशाला उगाच जगाला दिखावा म्हणून सगळे सहन करत असतात, काहींना माहेरचा सपोर्ट नसतो, एकटे कुठे जाणार म्हणून परत नमते घेऊन संसाराला लागतात, पण ती गोष्ट कुठेतरी मनात खुपत असते. आजकाल बाईने एकटे राहणे ही सेफ राहिले नाही.

यावरून प्रश्न पडतो बाईचे खरे घर कोणते? माहेरचे म्हणतात तुझ्याघरी, नवरा म्हणतो जा तुझ्याघरी पण ते घर कुठले? lockdown मुळे तर ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत , म्हणून यावर चर्चा.

Group content visibility: 
Use group defaults

जिज्ञासा.... Happy Happy

ते संशोधक आहेत (आईडी नाही). कृत्रिम स्त्रिया निर्माण झाल्या आहेत त्यामुळे यापुढे जगाला स्त्रीची गरज भासणार नाही व ती रद्दीत निघणार हे लेटेस्ट संशोधन त्यांनी वर मांडले आहे.

साधना Happy
जि, रागावू नकोस पण एक विचार करून बघ काही आयडींना प्रतिसाद देण्यापूर्वी - हायझेनबर्ग, रून्मेष सारखे आयडी स्त्रियांच्या भल्याची जबाबदारी स्रियांचीच अशी काहीशी भूमिका घेतात. तिथे त्यांच्याशी चर्चा करण्यात अर्थ आहे कारण स्त्रियांचे ही भले व्हावे अशी वृत्ती आहे. वेळप्रसंगी हे लोक दोन फालतूचे शब्द ऐकवतील, अनिच्छेने का होईना पण आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना मदतही करतील. पण ज्या आयडींचे मत स्त्रिया रिप्लेसेबल असे टोकाचे आहे तिथे प्रतिक्रिया देवून काय हाशील? ते मध्यावर येतील अशी आशा आहे???

सी, अशा लोकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे खरंतर पण कधीकधी वाटते की असे दुर्लक्ष करून आपण असे विचार passively पसरू तर देत नाही ना?

Submitted by सीमंतिनी on 17 October, 2020 - 10:19 >> एवढंच म्हणेन की माझे प्रतिसाद वरवर वाचल्याने माझ्याबाबतीत तुमचा तर्क चुकला आहे.
व्यक्तीबद्दल जजमेंट द्यायचेच असल्यास थेट त्या व्यक्तीलाच ते द्यावे... एका व्यक्तीबद्दल आपले जजमेंट दुसर्‍या व्यक्तीला पास करू नये हा नियम मी पाळतो. तुम्हीही तो पाळावा अशी अपेक्षा आहे, आग्रह नाही.

ओके, जजमेंट नव्हते... आपल्या पोस्टींचा मला लागलेला अर्थ होता. माझी चूक झाली असल्यास आणि कुणी दुखावले गेले असल्यास क्षमा मागते. बाकी थेट "जजमेंट" आधी दिलेले आहे. आपल्या पोस्टींबद्दल थेट आपल्यालाही लिहीले आहे.

1) घरातील निर्णय प्रक्रियेत स्त्री ला सहभागी करून घेतले जात नाही.
2) स्त्री ल घरातील सर्व काम करून,मुलांचे करून नोकरी पण करावी लागते त्या मुळे तिच्या वर अन्याय होतो
3) नवऱ्याच्या आई वडील ना त्यांच्या संसारात स्थान नसावे ,त्यांची कोणतीच जबाबदारी नसावी.
4) त्यांच्या नावावर घर नसते स्त्री चे घर कधी होणार.
5)स्त्री म्हणून त्यांच्या वर बंधन लादली जातात.
हीच नेहमीच च कारण स्त्री वर अन्याय कसा होतो हे सांगण्या साठी दिली जाते.
1) घरातील निर्णय प्रक्रियेत इथे असणाऱ्या किती स्त्रियांना सहभागी करून घेतले जात नाही.
आताच्या पिढीत तरी अशी उदाहरणे दुर्मिळ च.
2) स्त्री ला घरातील सर्व काम करावी लागतात हे सत्य आहे.
पण स्त्री नोकरी करणारी नसेल तर तिनी घर सांभाळून एक बाजू उचलावी आणि नवऱ्याने नोकरी ,व्यवसाय करून दुसरी जबाबदारी उचलणे हे कामाचे वाटप अन्यायकारक कसे?
दोघे नोकरी करत असतील आणि आवक चांगली असेल तर नोकरांनी कामावर ठेवली की घर काम कोणी करायची हा प्रश्न च येत नाही.
आवक कमी असेल तर दोघांनी मिळून करावी ही न्याय मागणी आहे.
3) सासू सासर्या पासून वेगळे लगेच राहवे ही स्त्री ची आग्रही मागणी असते .
पण मुलगा म्हणून मुलाला आई वडिलांची जबाबदारी नाकारता येत नाही.
जबाबदारी च नको असे स्त्री ला वाटत असेल तर सासरच्या स्थावर मालमत्तेवर हक्क असावा ह्या मागणीला काही अर्थ नाही.
जबाबदारी सोडा आणि हक्क पण सोडा.
तरी सासऱ्याच्य मालमत्तेवर स्त्री ला हक्क दिला गेला आहे.
अजुन कोणता हक्क दिला म्हणजे अन्याय दूर होईल.
लग्न झाल्या बरोबर नवऱ्याच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेवर स्त्री चा हक्क प्राप्त होतो.
हा तसा पुरुषांवर अन्याय आहे.
फक्त आणि फक्त नवऱ्याने स्वतः कमावलेल्या संपत्ती वरच बायको म्हणून स्त्री ला हक्क ध्या असे स्वाभिमानी स्त्री नी बोलले पाहिजे.
मला असे एक घर आता दाखवा ज्या घरात मुलगी म्हणून तिला शिक्षण दिले नाही.
मुलगी म्हणून तिला घरातील वस्तू वरचा हक्क नाकारला आहे.
एक पण घर नसेल.
मग कुठे अन्याय होतोय.
अपवाद उदाहरणे असू शकतात पण ती खूपच कमी मोजकीच असतात.

म्हणूनच स्त्रीने आर्थिक दृष्ट्या कायम सक्षम असावे. लग्नाच्या आधी किव्वा नंतर हि जॉब लागला किव्वा काही व्यवसाय करत असेल तर आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर लगेचच स्वतःच्या नावावर घर घेण्याचा विचार करावा आणि तो अमलात आणावा. मुलीच्या आई- वडिलांनी पण घर घेण्यात तिला मदत करावी . न जाणो अशी काही परिस्तिथी आलीच तर तिला तिचे स्वतःचे घर असावे. मग ते घर खूप लांब पण त्यामुळेच स्वस्त असेल तरी चालेल

या केस मधले जोडपे तरुण असणार पण खूप लेट एज मध्ये सुद्धा नवऱ्याने बायकोला घराबाहेर जा असे सांगणारे नवरे असतात. माझ्या मामीने एक किस्सा सांगितला . तिच्या सोसायटीतला . तिच्या भिशीतल्या मॅडमचा एक किस्सा . नवरा बायको दोघे नोकरी करणारे . दोघांनी घर घेतले पण नवर्याच्या एकट्याच्या नावावर घेतले . अर्थातच त्यामुळे लोनचे हप्ते नवर्याच्या एकट्याच्या पगारातून जात होते आणि बाईंचा पगार घरखर्चावर खर्च होत होता. लोन बरेच वर्ष होते आणि नवरा फक्त लोन चे हप्ते भरत होता . बाई पण नोकरी करत होत्याच . रिटायर झाल्यानंतर उशिरा च्या वयात नवरा कुठल्याही बारीक सारीक कुरबुरीनंतर बायकोला सांगायला लागला " घर माझ्या नावावर आहे. तू घराबाहेर बाहेर जा " तरी बाई सांगायच्या अहो घर खर्च - मुलांची शिक्षण सगळी माझ्या पगारातून झाली . तरी नवरा बारीक सारीक कारणावरून बाहेर जा चा धोशा लावायचा . आता काय बोलणार ?

घराच्या बाहेर जा असे बोलणे आणि घरातून बाहेर काढणे ह्या मध्ये फरक आहे.
रागाच्या भरात तो तसा बोलला असेल .
आणि त्याच्या बायकोने शांत पने ऐकुन घेतलं असेल काहीच प्रतुतर दिले नसेल त्याची निंदा नालस्ती केली नसेल असे कसे वाटत.
रागाच्या भरात दोघे ही एकमेकाला दोष देत भांडले असतिल.
घराच्या बाहेर नवरा बायकोला काढू शकत नाही तिचा अर्धा हक्क असतो घरावर अगदी सासर्याच्य घरावर पण सरकार नी स्त्री ला हक्क दिला आहे.
आणि घरगुती हिंसाचार कायदा आहेच बिना चोकशी पुरुषांना तुरुंगवास घडण्यासाठी.
एकच बाजू कधीच चुकीची नसते आणि एकच बाजू कधी बरोबर नसते.

@ सीमंतिनी
सोशलसाईटचा प्रॉब्लेम असा आहे की ईथे जो आदर्शवादी लिहितो मग भले आदर्शवादी वागत का नसेना तरी त्याची वाहवा होते.
पण जो आजूबाजूव्या एकूणच वातावरणाचा विचार करून प्रॅक्टीकल लिहितो त्याला नेहमी आदर्शवाद सुनावला जातो. मग भले तो त्याच्या आयुष्यात आधीपासूनच आदर्शवादीच वागत का असेना Happy

तुम्ही आपल्या जागी योग्यच आहात Happy

घराच्या बाहेर जा असे बोलणे आणि घरातून बाहेर काढणे ह्या मध्ये फरक आहे >> मान्य आहे पण इतके वर्ष संसार केल्यानंतर सारखे किव्वा बरेचदा असे बोलणे बरोबर आहे का ? हा म्हणजे त्या बाईंचा अपमानच आहे. अरे घरखर्च त्या करत होत्या . मुलांची सगळी शिक्षण / आजारपण / दुखणी / नातेवाईकांचा पाहुणचार सगळं जर बाईने केलं असेल तर भले तुमच्या एकट्याच्या नावावर घर असले तरी असे सारखे म्हणणे अपमानास्पदच आहे . असं तरी नवऱ्याने का म्हणावं ? आणि इतक्या लेट एज मध्ये ? इतके वर्ष संसार झाल्यावर ?

माझ्या पोस्ट वाचून काही लोकांनी विचार केला असेल हा आयडी स्त्री विरोधी आहे.
पण माझे घर माझ्या बायकोच्या नावावर घेतले आहे.
जमिनी मधील काही जमीन बायकोच्या नावावर केली आहे.
मी लवकर घरी आलो तर भांडी साफ करण्या पासून झाडू पण मारतो पण बायको घरी नसताना ती घरी असेल तर मला ती काहीच घरातील काम करून देत नाही.
माझ्या मुलाला पण घरातील काम करायची सवय त्याला पण लावली आहे . फक्त बोलणे आणि प्रत्यक्षात आयुष्यात तसे राहणे ह्या मध्ये फरक आहे..
पण बायको म्हणून ती तिची सर्व कर्तव्य पूर्ण करते..
माझ्या बहिणी,आई वडील ह्यांच्या शी तिचे अतिशय चांगले संबंध आहेत.
जोडीदार वर विश्वास च नसेल,आपुलकी नसेल,प्रेम नसेल फक्त व्यवहार असेल तर त्या नात्याला काही अर्थ नाही.
सरळ वेगळे होणे हा चांगला मार्ग आहे.

पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे तरी काय.... कधी मुद्दाम, कधी अनावधानाने किंवा मोस्टली जडघडणीतून आलेला 'फुटकळ कर्तुत्वातून अर्थार्जन करतो ह्याचा तोरा'...बरोबर>> जरा उशीरा उत्तर देते आहे. पुरूषप्रधान संस्कृती म्हणजे केवळ अर्थाजनातून आलेला तोरा नाही. कोणत्या बळावर एक आठ वर्षाचं पोरगं आपल्या आईला तू उंबरठ्याच्या आत रहा. मी पुरूष आहे आणि मी दरवाजा उघडणार असं ऐकवतो? पुरूषप्रधान संस्कृती हे हजारो वर्षे स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मनाचं झालेलं कंडिशनिंग/ब्रेनवॉशिंग आहे. मी कमावतो आणि तू घर सांभाळ ही equality मधून, समजून घेऊन निर्माण झालेली व्यवस्था होती असं नाही. पर्यायच नव्हता स्त्रियांना या व्यवस्थेत दुसरं काही करण्याचा. सगळी विकासाची दारं बंद करून जो त्यातला त्यात जमण्यासारखा पर्याय होता तो स्त्रियांच्या वाट्याला आला. त्या घरकामाला आर्थिक मोबदला तर दूरच पण कधी प्रतिष्ठाही मिळाली नाही शेकडो वर्षे!
थप्पड सिनेमाच्या निमित्ताने एका मुलाखतीत अनुभव सिन्हा म्हणाला की जर पुरूष काही बायकांची कामे करत असेल आणि कोणी बाई म्हणाली की राहू दे नको करूस तर त्यावेळी एक वाक्य सर्रास वापरलं जातं - अरे कोई बात नहीं| ये करूंगा तो छोटा नहीं हो जाऊंगा! This expression is the best example of how we feel that housework is something inferior! बघायला गेलं तर शेकड्याने अशी उदाहरणे सापडतील. आताच्या लक्ष्मीबॉम्बच्या ट्रेलर मध्ये अक्षयकुमार पण ऐकवतो - मला कोणी भूताचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं तर मी बांगड्या भरेन! बांगड्या भरणे म्हणजे थोडक्यात पराभव स्विकारणे!
ही व्यवस्था पुरूषांनी स्त्रियांवर लादली असं नाही पण त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही व्यवस्था चालू दिली आणि स्त्रियांनी पण कधी ही व्यवस्था मोडून काढली नाही. आजही अनेक जणींना यातील अनेक गोष्टी गैर वाटत नाहीत. But it is a lopsided system that is ingrained to the core. जी थोडी लोकं यातील असमानता पाहू शकली आणि ज्यांनी बदलाचे प्रयत्न केले त्यांच्यामुळे आज किमान थोडीफार जागृती निर्माण झाली आहे. There is still a long way to go to create an equitable system for both men and women.
मी नुकतेच एका वेगळ्या संदर्भात माओचे प्रसिद्ध विधान वाचले - चीनच्या प्रगतीसाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही योगदान दिले पाहिजे या विचाराने त्याने सर्वांना समान संधी मिळेल अशी व्यवस्था उभी केली. तेव्हा त्याने हे प्रसिद्ध विधान केले होते की women hold up half the sky! निम्मे आकाश स्त्रियांचे आहे! माओचे इतर विचार आणि वर्तणूक याकडे न बघता जर केवळ या वाक्याचा विचार केला तर हे खूप powerful वाक्य आहे. केवळ अर्ध्या आकाशावर त्यांचा हक्क आहे असं नाही तर त्याची जबाबदारी पण आहे. त्यामुळेच आज चीनमध्ये प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने कामे करताना दिसतात. स्त्रियांना जर कायमच असे अर्धे आकाश मिळाले असते तर आजचे जग खूप वेगळे आणि अधिक चांगले झाले असते असे मला निश्चितच वाटते.

दवणीय अंड्यानी हे सुद्धा उचलले
आता या पोस्टला तिथे किती महिला मुली स्त्रिया दवणीय समजून हसताहेत हे बघणे रोचक.

IMG_20201018_173434.jpg

नसेल सोप
म्हणून काय मोजून सगळे अनुस्वार खायचे का?अनुस्वार खाऊन आयुष्य सोप होणारे का?

शिवाजीराजांनी टाकसाळीत होन छापले/बनवले तेव्हा ते लिंगनिरपेक्ष होते... मुलगा होन, मुलगी होन असं काही नव्हतं...

सीमंतिनी Happy
To hone your skills सारखं होन युवर मुलगी .

'पोर' चं मात्र 'पोरं' केलंय. हे म्हणजे 'तण-मण-धण देशाच्या चरनी अर्पन करन्याची प्रतिज्ञा' केल्यासारखं झालं Wink

यात दोन वेगवेगळे स्टेटमेंट केले आहेत
१. इंस्टा अ‍ॅट ब्रान्डेड--- गर्ल्स सासरच्या घरात परक्याच पोरं आहे. आणी
२. अ‍ॅडमिन टीना नेमके स्वतचं असं अस्तित्व कुठे आहे ?

अशा आहेत ज्या लग्न करून एकत्र कुटुंबात म्हणजे नवरा व त्याचे आईबाबा अशा घरात गेल्या आणि सासरच्यांनी त्यांच्या नावावर स्वतःचे घर करून दिले>>
माझ्या आजोबांनी असे केलेले माझ्या आईच्या आणि काकुच्या नावावर. नंतर भावाभावात काही वाद नको म्हणुन जुने घर विकुन नवे घेतानाच तसे केले. आजोबा आजि आमच्याकडे रहायला होते म्हणुन मोठे घर आईच्या नावावर आणि लहान घर काकुच्या नावावर आणि डिफरन्सचे जी अमाऊंट होती तिचे डिपॉझिट काकुच्या नाववर त्यांच्या पश्चात असे सर्व त्यांनी व्यवस्थित विलमध्ये करुन ठेवले.
यामागे स्त्री मुक्तीची भुमिका नसुन (इन्हेरिटन्स कायद्याने काही कन्फ्युजन होउ नये म्हणुन ) आणि त्यांची सर्व कमाई स्वकष्टार्जित असल्याने व्यावहारिक द्रुष्ट्या असे केले होते. ती जागा अजुन आईच्या नावावरच आहे.

तस्मात बाई लग्न बंधनाकडे रिलेशन शिप म्हणून बघते व पूर्ण व्यक्तिमत्व समर्पण करून टाकते. व पुरुष त्याकडे एक सोय व काँट्रॅक्ट म्हणून बघतात म्हणून असे वाद उद्भवतात. लग्न नाते की काँट्रॅ क्ट असा नवा बाफ निघावा अशी विनंती.

स्त्रिया कडून कुटुंबातील वाद वाढण्याचे प्रमाण हे पुरुष न पेक्षा जास्त आहेत.
स्त्रिया ह्या पीडित आणि पुरुष हे अत्याचार करणारे ह्याला काहीच पुरावा नाही.
उलट स्त्रिया समर्पण वैगेरे करतात हे चुकीचे मत आहे.
पुरुष च संसार टिकाव म्हणून जास्त त्याग करतात अशीच उदाहरणे खूप दिसतील.
अनैतिक संबंध ठेवण्यात पण स्त्रिया ह्या पुरुषांच्या दोन पावले पुढेच आहेत.

बाई म्हणजे समर्पण

Proud

मग बाई जास्त पगारवाला नवरा का शोधत असते ? कमी पगारवाला किंवा घर बश्या नवरा करून स्वतच्याच घरात नेले तर बाईचे समर्पण होत नाही का ?

खिडकीतून सकाळी सकाळी गाणे ऐकू आले

काटो से खिचके ये आचल
तोड के बंधन बांधी पायल

काय एके काळी हे गाणे आवडायचे !

हिचा नवरा राबून राबून नोकरी करत असतो आणि ही देवानंद बरोबर फिरत असते

मला नोकरी संसार ह्याची पूर्ण जबाबदारी घेणारी बाई घावली तर मीही अजून एक दुसरी बाई बैलगाडीत बसवून मडकी फोडत फिरीन , मीपण तसे आता नाचून बघितले मस्त वाटते
Proud

ब्लॅककॅट, ज्याचा जसा चष्मा तसं त्याला जग दिसतं! बाईला थोडं वेगळं दिसत असतं जग. तुमच्या निराधार कल्पनारंजनाला प्रतिवाद करावासा वाटत नाही. या साऱ्या एकांगी प्रतिसादांमुळे आपल्याला एक माणूस म्हणून अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे मात्र पुनःपुन्हा जाणवतं.

आपल्याला एक माणूस म्हणून अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे मात्र पुनःपुन्हा जाणवतं.>> अनुमोदन. अर्ध्या जीवन शक्तीचे काँट्रिब्युशन
ऑक्नॉ लेजच करायचे नसेल तर काय करणार.

तुमचे तुमच्यापाशी

पण मला मडकेवाली गाणी आवडतात
बुझ मेरा क्या नाम रे
काटो से खिच के ये आचल
आधा है चंद्रमा

सकाळ सुखात गेली

एकांगी प्रतिसादांमुळे आपल्याला एक माणूस म्हणून अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे मात्र पुनःपुlन्हा जाणवतं........... सहमत.

मला नोकरी संसार ह्याची पूर्ण जबाबदारी घेणारी बाई घावली तर मीही अजून एक दुसरी बाई बैलगाडीत बसवून मडकी फोडत फिरीन , मीपण तसे आता नाचून बघितले मस्त वाटते >> arere.
Dev tya bai LA asala manus na bhetavo.
Lol

स्त्री ही नेहमीच पीडित असते ही भूमिका योग्य आहे का?
स्त्री आरोपी असेल तरी तिला रात्री अटक करायची नाही.
स्त्री म्हणून स्त्री चं सत्य बोलत आहे असे समजून कायद्या नी काम करावे अशी आशा ठेवायची.
स्त्री म्हणून बस,ट्रेन मध्ये वेगळी सुविधा मागायची.
स्त्री नी पुरुष चा पाणउतारा केला तरी ती स्त्री असल्या मुळे तिच्या शी पुरुषांनी सभ्य भाषेत च बोलायचे.
मग स्त्री ,पुरुष समानता कशी निर्माण होईल.
स्त्री म्हणून सर्व च क्षेत्रात वेगळ्या सवलती हव्यात आणि समानता पण हवी ही डबल ढोलकी भूमिका काही लक्षात येत नाही.
स्त्री खरोखर सक्षम असती तर तर स्त्री म्हणून कोणत्याच वेगळ्या सवलती तिनी मागितल्या नसत्या.

बाईला घर होऊ शकते

डिग्री मिळाली की लगेच नोकरीला लागणे

मन लावून काम करणे

कितीही कस्ट असली तरी नोकरी टिकवणे

नोकरी सोडून देणे , मग गॅप घेणे , मग पुन्हा नोकरी असे न करणे

3 वर्षाचे आय टी आर तयार ठेवणे

3 वर्षात एकच नोकरी टिकवली किंवा निदान शेवटची एक वर्ष तरी एकाच ठिकाणची नोकरी असेल तर सगळ्या ब्यांका घर घ्या , लोण घ्या , असे करून मागे लागतील.

तोवर 3 वर्षांचा पगार मार्जिन मनी व सरकारी फी भरायला हातात येईल

मग घर घ्यायचे

आणि मग लगीन करून नवऱ्याला तिथे नांदवायला न्यायचे

भारत हे मागास पुरुष sattak देश आहे असे मानले.
पण जगात सुंदर ,श्रीमंत स्त्री नी गरीब, दिसायला सामान्य असणाऱ्या पुरुषाशी लग्न करून त्याला स्वतःच्या मालमत्ते मधील अर्धा हिस्सा दिला आहे असे एक तरी उदाहरण असेल का?
पण सुंदर ,श्रीमंत पुरुषांनी अती सामान्य स्त्रिया शी लग्न करून संपत्ती मध्ये पण अर्धा हिस्सा दिल्याची करोडो उदाहरणे सापडतील.

ब्लॅककॅट आणि हेमंत, जगातील प्रत्येक क्षेत्रात जेव्हा स्त्रिया निम्म्या संख्येने असतील तेव्हा तुमच्या सर्व अपेक्षा पुर्ण होऊ शकतील कदाचित. मात्र जोवर तसे होत नाही तोवर कायद्याने स्त्रीहिताचे संरक्षण करणे भाग आहे.

इंदिरा गांधी पंत प्रधान झाली तेंव्हा 50% खासदार स्त्रिया होत्या की काय ?

Proud

तुम्ही सुरुवात करा

इंदिरा गांधी पंत प्रधान झाली तेंव्हा 50% खासदार स्त्रिया होत्या की काय ? >> नाही ना! तिथेच अडकून पडलो आहोत अजूनही. जोपर्यंत 50% जनतेला 50% प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत काही न्याय्य व्यवस्था आहे असे म्हणता येणार नाही. मी जिथे काम करते तिथे 51% स्त्रिया आहेत. Mid size कंपनी आहे. मला या गोष्टीचा आनंद वाटतो की कोणत्याही reservations शिवाय एका खाजगी कंपनीमध्ये हा रेशो आहे.
मी trainer म्हणून जेव्हा काही संस्थांमध्ये ट्रेनिंग घेते तेव्हा माझ्या बॅचमध्ये निम्मी मुले आणि निम्म्या मुली असतील असं आवर्जून बघते. क्वॉलिफिकेशन क्रायटेरिया दोघांसाठी समान असतात. I am doing my bit.

प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुष समान हक्क हा अट्टाहास कशासाठी??
मुळात निसर्गाने निर्माण करताना स्त्री आणि पुरुष भिन्न निर्मिले आहेत, त्यात वरीष्ठ,कनिष्ठ हा भेद येतोच कुठे?
मी मेकैनिकल कंपनीत जॉब करायचे तेव्हाही आणि आता नवरा त्याच कंपनीत आहे सो आताही.. स्त्रिया कमीच आहेत..
कंपनी पॉलिसी, इक्वालाटी म्हणून कंपनी रिक्रुट करते मुलींना.. त्या टिकल्या पण पाहिजेत ना अशा फिल्डमधे, पुरुषांच्या बरोबरीने, जर समानता असायला हवी तर.
आता कोरोना काळात पाच वर्षाखालील ज्यांना मुले आहेत त्या स्त्रियांना Wfh applicable, पुरूषांना नाही. का??
समानता सगळीकडेच असायला हवी..
स्त्रियांनीही सवलती नाकारल्या पाहिजेत ना मग ?

चांगला प्रश्न विचारलास. Happy प्रत्येक क्षेत्रात संधीवर समान हक्क असावा. (अर्थात विकी डोनर सारखी काही नैसर्गिक अशक्य कार्ये सोडून). समान संधी असावी म्हणजे जे काम बाई ही करू शकते ते तिला करू द्यावे. तिला समान पगार द्यावा. जेव्हा संधी नाकारली जाते तेव्हा वरीष्ठ-कनिष्ठ भेद येतो. विल्मार ८ नावाचा सिनेमा जरूर बघावा.

स्त्रिया टिकत नाहीत याला कारण बरेच वेळा फॅमिली फ्रेंडली पॉलिसी नसते. परदेशात अनेक जागी कंपनीतच पाळणाघर अशा पद्धतीची सोय असते. तिथे स्त्रिया कंपन्यात कष्टाचीही कामे करताना दिसतात. देशात कंस्ट्रक्शन साईटवर पोरे खे़ळत असतात नि बाई बाबाबरोबर विटा उचलत असते. तसेच घरात कामाचे वाटप होत नाही म्हणून स्त्रिया घरातील शांततेसाठी, स्वतःची कुतरओढ थांबण्यासाठी नोकरी सोडतात. परिस्थिती नोकरीस पोषक नाही हे बदलायला हवे.

WFH बाबत स्त्रियांनी सवलत नाकारावी हा विचार करण्यापेक्षा ही सवलत सगळ्या पालकांना द्यावी असा विचार का नाही करत??? पुरूषांनी भांडावे आपल्या हक्कासाठी Wink देऊ पाठींबा. Happy

स्त्रिया टिकत नाहीत हा प्रचार आहे. तपासून बघा मनाशी...

प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुष समान हक्क हा अट्टाहास कशासाठी??>> का नको? निम्मे पुरूष house husband होऊ शकतील! मुली एखाद्या फिल्डमधे का टिकत नाहीत याचा विचार केला की ती कारणं दूर करता येतील. क्षमताच नाही हे कारण नसते बहुतेक वेळा. लग्न, बाळंतपण यांनी मुलीच्या जबाबदाऱ्या जितक्या वाढतात तितक्या मुलाच्या वाढत नाहीत. जर घरातून आणि कामाच्या ठिकाणी उत्तम सपोर्ट असेल तर सक्षम मुलींना सगळ्या क्षेत्रात पुढे जाता येईल. त्यांच्या ज्ञानाचा, बुद्धीचा फायदाच होईल जगाला. उदाहरणार्थ, MIT या जगप्रसिद्ध विद्यापीठात कधीच पाळणाघर नव्हते. आणि तिथल्या प्राध्यापकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण फारच कमी होते. जेव्हा विद्यापीठाच्या आवारात पाळणाघर सुरू झाले तेव्हापासून स्त्री प्राध्यापकांचे प्रमाण वाढले. Getting married or becoming a mother should never hamper career opportunities for women. We are not giving charity by giving maternity leave. Instead we are creating an equitable system. लग्न झाल्यावर किंवा मूल झाल्यावर स्त्रीचे ज्ञान आणि कौशल्य कमी होत नाही. मात्र तिला आवश्यक तो सपोर्ट नसल्याने तिला काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. हे जर आपण टाळू शकलो तर आपण एका अधिक चांगल्या समाजाकडे जाऊ. The hunter gatherer societies were far more egalitarian than our current society. We lost that quality somewhere along the way. It's time to bring it back!

मस्त जि!
आणि हो, प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुष समान हक्क हा अट्टाहास कशासाठी??>> म्हणजे पुन्हा कुणा बाईला असला धागा काढायची वेळ येणार नाही. घरातून जा म्हणल्यावर "ओके, दोन दिवस vacay वर जाते आणि डोकं शांत झाल्यावर ये तू पण हवं असल्यास" म्हणायची आर्थिक, मानसिक धमक प्रत्येकीत हवी.

जिज्ञासा तुम्ही दिलेल्या विद्यापीठाचे उदाहरण पटले पण हे सरसकट सगळ्या क्षेत्रात लागू होत नाही..
मी ज्या कोरपोरेट मधे जॉब करायचे तिथे पंधरा कंपन्या आणि त्याचे ब्रँचेस मिळुन अराउन्ड 39 कंपन्या आहेत.।एकाही कंपनीत executive level la स्त्री नाही का बरे असे असेल??स्त्रिया कमी, पुरुष वरचढ असा माझा मुद्दाच नाहीये... दोघेही भिन्न आहेत आणि आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत..
स्त्री मुळांतच हळवी, संवेदनशील असते ती मुल सांभाळणे,घर सांभाळणे पुरुषांपेक्षा जास्तच चांगले करू शकते..आणि घर सांभाळणे म्हणजे हलके काम हेच आपण आधी डोक्यातून काढले पाहिजे... समाजासाठी चांगले व्यक्तीमत्व असलेले नागरिक बनवणे हे कधीच हलके काम नसु शकते..

Submitted by सीमंतिनी on 20 October, 2020 - 09:38 आणि Submitted by जिज्ञासा on 20 October, 2020 - 09:41 , दोन्ही पोस्ट आवडल्या.
>>स्त्री मुळांतच हळवी, संवेदनशील असते ती मुल सांभाळणे,घर सांभाळणे पुरुषांपेक्षा जास्तच चांगले करू शकते.. >> हे देखील एक प्रकारचे कंडीशनिंगच!

एकाच वेळी करियर आणि घर सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत..मग एकच काहीतरी निवडावे म्हणजे त्या क्षेत्राला 100% न्याय देऊ शकू..
फक्त करियर, मग घराची जबाबदारी नकोच तिथे नक्कीच हवी ती उंची गाठु शकु.
किंवा घरही सांभाळायचे असेल तर करियर दुय्यम ठेवावे लागेल म्हणजे जबाबदारीने चांगले human beings घडवू शकु.. हे माझे मत

नवीन Submitted by सीमंतिनी on 20 October, 2020 - 19:08 >> बरोबर.
मेकॅनिकल कंपनीत लेथ मशीन चालवणाऱ्या, क्रेन ऑपरेटर्स वगैरे काम करणाऱ्या स्त्रिया चीन मध्ये बऱ्याच बघितल्या.

अमुक कामे स्त्रियांना जमणार नाहीत हा एक माईंडसेट आहे. तसेच त्यासाठी लागणाऱ्या पोषक, सुरक्षीत आणि सपोर्टिव्ह वातावरणाची सुद्धा कमतरता आहे भारतात.

हे देखील एक प्रकारचे कंडीशनिंगच!.................

मी जिथे जिथे पाहिलय..बॉस ओरडला कि रडू यायचं मुलींना....मेल एम्प्लौईजला नाही बघितलं कधी रडताना...

ज्यांना घरी राहायचं आहे त्यांनी स्वतःच्या मनाने, खुशीने नक्की राहावं
पण एक वेगळा अँगल म्हणजे सध्याची नोकरी, असुरक्षितता. यात कायम प्रायमरी अर्नर असण्याचा, नोकरीत जे काही अप्रिय होईल ते सहन करण्याचा, नोकरी टिकवण्याचा, प्रसंगी दुसर्‍याच्या छातीवर पाय देऊन पुढे जात राहत जास्त कमावण्याचा लोड फक्त घरातल्या पुरुषावर का असावा?
एखाद्या शिकलेल्या, नोकरी आवडणार्‍या बाईने ही इनसिक्युरिटी पण अर्धी शेअर करावी. तसे केल्यास हे असे सिंगल अर्नर पुरुष (सगळे नव्हे काही) नोकरीत जे डर्टी गेम्स खेळतात, चुकीची चढाओढ लावतात ते किंचीत प्रमाणात तरी कमी व्हावे. नोकरी एक आव्हानात्मक आनंद बनावा. सिंगल अर्नर आहे म्हणून हार्ट अ‍ॅटॅक येईपर्यंत पॉलिटिक्स आणि कोणाला इम्प्रेस करायला रात्री ३ पर्यंत जागून काम अशी जिवघेणी टॉलस्टॉय च्या गोष्टीतली धाव बनू नये (हे अतिशय आदर्शवादी आणि नाईव्ह चित्र. पण हळूहळू हा बदल व्हावा. पुरुषांनी 'बायका नोकर्‍या सोडतील, त्यांना कशाला प्रमोशन ऑनसाईट द्यायची' असं न म्हणता एक व्यक्ती म्हणून संधी द्यावी. आणि वर्क कल्चर मधली असुरक्षितता कमी होऊन ते सुधारावे.)

सि, माझ्या पाहण्यात स्त्रीला घराबाहेर हो असं म्हणनारा कुणीही मी पाहिले नाही..असतीलही तसे.....
पण नवर्याची अक्कल काढणार्या, घालून पाडून बोलणार्या स्त्रिया मात्र पाहिल्यात.

मानवदादा धन्यवाद. एक जरी व्यक्ती अशा पद्धतीचे अनुभव शेयर करू लागला की हळूहळू मते बदलतात.

मी जिथे जिथे पाहिलय..बॉस ओरडला कि रडू यायचं मुलींना....मेल एम्प्लौईजला नाही बघितलं कधी रडताना... >> Happy एच.आर काय म्हणतो अशा बॉसबद्दल?? निदान क्लीनेक्स ठेव रे टेबलावर इतपत तरी सल्ला देतं का त्याला???

Pages