शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, कसलं चुटकीसरशी सम्पवून टाकलं
अभिनंदन आणि धन्यवाद सर्वांचे

1. बस (- -) खर = कण

2.घंटा (- -) वान = गाडी

3. प्रभा (- -) दाता = कर

4. प्रभा (- -) चण = वळ

5. अभि (- -) गिरी = नेता

6. रान (- -) थापा = भूल

7. एक (- -) कथा = दंत

8.कला ( - -) मूळे = कंद

9. शक्ती (- -) ग्राम = शाली

10.उप (- -) वारी = क्रम

शब्द-वेषांतर
९ शब्द सूत्रांवरून ओळखा : अक्षरसंख्या कंसात

१. निरोप देतो व समजावतो देखील ( २)
२. माझ्या घरात फिरतात आणि खिशात पण राहतात ! (२)

३. दक्षिणेतला यार मराठीत मात्र अगदी पूज्य (2)
४. बोलताना थांबला आणि ताठरला (2)

५. आपल्याकडची सर्दी पण उत्तरेतली युक्ती (3)
६. मला खाताना आवडतो पण मी नाही कुणाचा होणार ! (3)...... चमचा

७. मंचावर दिसते आणि कवितेत पण असते आणि सोंग पण असते. (3)
८. भावाकडे पर्वत गेला (4) ......... दादागिरी

९. लांबूनही छानपैकी आदर (4) ....… नमस्कार

वरील सर्व ९ शब्दांचे (उत्तरांचे) एकत्रित मिळून एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ते ओळखा.
अजून मदतीविना बरोबर ओळखल्यास बक्षीस मिळेल !!

* पर्यायी उत्तरे या वैशीष्ट्याशी न जुळल्यास नाकारली जातील.

१ दूत
३ स्वामी
७ रचना
८ भाईगिरी

कविन
भाईगिरी >>> अगदी जवळ. थोडे सुधारा.

बाकी चूक, “कारण सर्व ९ चे एक वैशिष्ट्य” हेही जुळले पाहिजे.

७ प्रतिभा >>> नाही.
छान प्रयत्न पण आपल्या अटीशी जुळत नाही.
........................................
थोडे सुधारून देतो.
७. मंचावर दिसते आणि कवितेत पण असते आणि सोंग पण असते.

७ प्रतिमा/ प्रतिक? मंचावर प्रतिमा किंवा प्रतिक दिसतं कवितेतही त्याचा वापर असतो
सोंगाशी नातं लागत नाहीये पण

दादागिरी आणि नमस्कार यात कॉमन वैशिष्ट्य प्राबल्य शक्ती बलस्थान किंवा कशापुढेतरी झुकणे असावे असे वाटले .. दादागिरी करणे ... नमस्कार म्हणजे झुकणे

सोंगाशी नातं >>> सोंग वठवा ! येईल आता ....

दादागिरी आणि नमस्कार >>> नाही. वैशिष्ट्य जरा वेगळेच आहे ९ जणांचे. बघू पुढे.

६. मला खाताना आवडतो पण मी नाही कुणाचा होणार ! (3)
श्रीखंड
म्हणजे श्रींचेच रहाते ....
आवडते पाहिजे पण तुम्ही ट्रिक करत असाल म्हणून Happy

श्रीखंड >>> नाही.

खाताना आवडतो >>> लिंग बघा .
पदार्थच असेही नाही !

6 चमचा
4 स्तब्ध ?

Pages